छायाचित्र निबंध हवेत

माहितगार's picture
माहितगार in मिपा कलादालन
6 May 2015 - 4:42 pm

" फ्रेंच पोलेनिशियाच्या एका बीचवर शाळासुटल्यावर खेळणाऱ्या मुलांचा खेळ, कुणीतरी पकडलेला आणि वापस पाण्यात सोडलेला स्टिंगरे (वाघोळे) मासा पाहण्यासाठी थांबतो आणि पुन्हा सुरु होतो; ते क्षण, स्कॉट विल्यम नावाच्या छायाचित्रकाराने खालील सोप्या छायाचित्र निबंधाद्वारे टिपले आहेत "

Photo essay exapmle by scot william

छायाचित्र मोठ्या आकारात पाहण्यासाठी विकिमिडीया कॉमन्सचा छायाचित्र दुवा

छायाचित्र निबंध, एक अथवा अधिक छायाचित्रे वापरून, एखाद्या विषयास अनुलक्षून, वर्णन करण्याचा प्रयास असतात. छायाचित्र निबंध केवळ छायाचित्रांचे किंवा कॅप्शन आणि छोट्या नोंदी असलेले असू शकतात किंवा थोड्या किंवा अनेक छायाचित्रांसोबत विस्तार पूर्वक केलेले लेखनही असू शकते.

छायाचित्र निबंध सहसा विशीष्ट क्रमाने पहाण्यासाठी क्रमवार असतात किंवा वाचकाला स्वत:च्या सोईने निवडता येतील असे विशीष्ट क्रमाशिवाय सुद्धा असू शकतात. सर्व छायाचित्र निबंधांना हे छायाचित्र संग्रह म्हणता येते पण सर्व छायाचित्र संग्रहांना छायाचित्र निबंध म्हणता येत नाही. छायाचित्र निबंध बऱ्याच वेळा विशीष्ट विषय, प्रसंग अथवा स्थळांचे वर्णन करतात.

मराठी विकिपीडियावर वरील निबंध लेखात सध्या वरील छायाचित्र उदाहरण म्हणून वापरले आहे. असे अजून काही छायाचित्र निबंध बनवून मिळाल्यास हवे आहेत. छायाचित्रे कृपया विकिमिडीया कॉमन्स येथे प्रताधिकार मुक्त स्वरूपात चढवावीत. (इतरांची प्रताधिकारीत छायाचित्रे अथवा इतरांच्या प्रताधिकारीत छायाचित्रांचे अंश वापरू नयेत हे ओघाने आलेच.)

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

6 May 2015 - 4:56 pm | सुहास झेले

विवेक काळे ह्यांचा हा ब्लॉग म्हणजे अश्या चित्र निबंधांचा खजिना आहे... त्यांना विचारता येईल

त्यांचा ब्लॉग - http://natfront.blogspot.in/

फेसबुक प्रोफाईल - https://www.facebook.com/Vivek.Kale.Photography

माहितगार's picture

7 May 2015 - 10:55 am | माहितगार

होय ब्लॉग छान आहे. संपर्क करेन. माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

गणेशा's picture

6 May 2015 - 6:23 pm | गणेशा

कल्पना छान आहे, मला असे पहिल्यांदाच वाचनास मिळाले..

कंजूस's picture

7 May 2015 - 7:33 am | कंजूस

.
१)कोणत्या विषयाची खास विचारणा होते?
२)छायाचित्रे अपलोड करण्यासाठी विकिची साइट वापरावी का दुसरीकडची लींक काम करते?

छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्स येथेच चढवणे श्रेयस्कर असेल. कारण (विकिमिडीया कॉमन्सवरील छायाचित्रे मराठी विकिपीडिया सोबतच) भारतीय संस्कृती विषयक छायाचित्र निबंध मला इंग्रजी विकिबुक्समध्ये वापरता आल्यास जगाततल्या अनेक अन्य भाषात सहज अनुवादीत केली जातील.

उदाहरणार्थ इंग्रजी विकिबुक्सवर इंग्रजीतून मराठीची शिकवणी असलेल्या लेखात दिंडी विषयीचे छायाचित्र मी शब्दार्थ दर्शवण्यासाठी वापरले आहे. सुट्ट्यांचा कालावधी सोडून हा लेख बर्‍यापैकी रेफर होत असतो असे दिसते (अर्थात त्यातही माहितीचा मोठा अभाव असला तरीही)

प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन असलेले छायाचित्र निबंध विकिव्हॉयेज प्रकल्पातून जगातल्या अन्यभाषिक प्रकल्पात पाठवले जाऊ शकेल.

जिथ पर्यंत मराठी विकिपीडियाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांकडून पर्यावरण, महाराष्ट्रातील आदीवासी संस्कृती, वनौषधी, सांस्कृतीक गोष्टी अशा गोष्टींना मागणी दिसते. भूमिती हा विषय छायाचित्र निबंधातून कितपत दाखवता येईल हे सांगणे कठीण पण अभ्यासाच्या विषयात भूमिती बाबतचा लेख अधिक वाचला जातो (मराठी विकिपीडियावर माहिती त्या मानाने कमी असली तरीही)

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2015 - 7:40 am | श्रीरंग_जोशी

कल्पक आहे हा प्रकार.

भूमिती हा विषय अधिक वाचला जातो !!!