'बॉक्स ऑफिस..', ‘हाऊस फुल्ल..' या शब्दांचा जन्म..

ग्रेटगणेश's picture
ग्रेटगणेश in जनातलं, मनातलं
28 Apr 2015 - 4:19 pm

'शब्दनाद'...मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांचे जन्म, उगम आणि अर्थांचा शोध घेणारे सदर..

'बॉक्स ऑफिस..', ‘हाऊस फुल्ल..!’

आपल्या हिन्दी-मराठी चित्रपट सृष्टीशी संबंधीत 'बॉक्स ऑफिस' हा शब्द चित्रपट वेड्यांना अतिपरीचित आहे. तित्रपटाचं यश-अपयश त्याच्या तिकीट बारी वरील विक्रीने जोखतात व या तिकीट बारीलाच 'बॉक्स ऑफिस' असं आज म्हणतात.

हा शब्द कसा अस्तित्वात आला याची एक मनोरंजक कथा नुकतीच माझ्या वाचनात आली. या शब्दाचा जन्म ब्रिटीशांच्या लंडन मधला. ब्रिटीश नाट्यकला जगात सर्वात समृद्ध तर ब्रिटीशांच्या नाट्यवेडाला अन्य जगात तुलना नाही..ब्रिटीशांच्या नाट्यवेडाची त्यातल्या त्यात तुलना केवळ मराठी लोकांशीच होऊ शकते.
लंडन मध्ये जेंव्हा नाटकांची सुरुवात झाली त्यावेळेस त्या काळच्या पद्धतीनुसार अमिरांसाठी वेगळे
थिएटर तर गरिबांसाठी वेगळे अशी विभागणी होती. श्रीमंतांची नाट्यगृहे अलिशान असायची तर गरिबांची साध्या तंबूतली. पण गरिबांच्या तंबूच्या थिएटरची एक गम्मत होती. या तंबूच्या थिएटर मध्ये प्रवेश करताना तिकीट काढायला लागायचे नाही. लोकांनी तंबूमध्ये जायचं, जागा मिळेल तिथे बसायचं, नाटक एन्जोय करायचं. नाटक आवडले तरच नाटकाच्या तिकिटाचे पैसे मध्यंतरात भरायचे व नाटक न आवडल्यास तंबू बाहेर असंच जायची मुभा असायची. अशीच सर्वमान्य प्रथा होती त्यावेळेस !

'बॉक्स ऑफिस’ या शब्दाचा जन्म या प्रथेतून झाला. मध्यंतरात या तिकिटाचे पैसे गोळा करायला नाटक कंपनीचा एक माणूस एका लाकडी खोक्यावर म्हणजे ‘box ‘वर उभा राहायचा. ते त्याचं ऑफिस जे कालांतराने Box Office म्हणून प्रसिद्ध झालं आता बॉक्स ऑफिस म्हणजे तिकीट काढायची खिडकी असा अर्थ त्याला प्राप्त झाला..! ही कथा मला ‘माझं लंडन’ या डॉ. मीना प्रभूंच्या पुस्तकात वाचायला मिळाली. हे अख्खं पुस्तक वाचण्यासारख आहे.

‘हाऊस फुल्ल..’ या चित्रपटांशी संबंधित आणखी एका शब्दाला एका मराठी माणसाने जन्म दिला आणि माझ्या माहितीनुसार त्यांचे नाव ‘अनंत हरी गद्रे’..! या शब्दाचा जन्म केवळ स्पेलिंग मिस्टेक मधून झालाय. हाऊस फुल या शब्दाची स्पेलिंग च्या ऐवजी अशी लिहिली आणि हा शब्द सिनेमा जगतात अजरामर झाला. ‘हाऊस फुल्ल’ या शब्दातील शेवटल्या ‘ल्ल’ ला जो सभागृह तुडुंब भरल्याचा फील आहे तो नुसत्या ‘हाऊस फुल’ ला नाही हे आपल्यालाही पटेल.

याची संपूर्ण हकीकत मी पुन्हा केंव्हा तरी सांगेन.

-गणेश साळुंखे
९३२१८११०९१

भाषाप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Apr 2015 - 5:23 pm | प्रचेतस

अत्ताच सांगा ना सम्पूर्ण हकीकत. खूप उत्सुकता लागून राह्यलीय.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2015 - 6:40 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

सौंदाळा's picture

28 Apr 2015 - 6:47 pm | सौंदाळा

आताच कशी सांगणार
आजचा कोटा संपला त्यांचा

आता ग्रेटगणेश शब्दाचा जन्म कसा झाला तेही लिहून टाका एकदा!!

पॉइंट ब्लँक's picture

28 Apr 2015 - 7:00 pm | पॉइंट ब्लँक

चांगली माहीती दिली आहे.

सौन्दर्य's picture

28 Apr 2015 - 7:23 pm | सौन्दर्य

छान, आवडली माहिती.

पैसा's picture

28 Apr 2015 - 7:35 pm | पैसा

णवीण लेखकाला कंपूबाजी करून झोडपणारे सदश्य आणि संपादक पाहून एक मिपाकर म्हणूण शरम वैग्रे वाटली.

निशेदाची दखल घेणेत आल्याली हाए.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2015 - 11:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सामान्य मिपाकर आणि संपादक असा भेदभाव करणारा प्रतिसाद वाचुन एक मिपाकर म्हणुन शरम वगैरे वाटली.

कंपुबाजी, सदश्य, संपादक, शरमिंदा मिपाकर वगैरे शब्दांचा जन्म कसा झाला असावा ह्याविषयी लेखकरावांच्या लेखाच्या प्रति़क्षेत. ग्रेटगणेश सर तुम्ही उत्तम लिहित आहात. मी तर म्हणतो तुम्ही ह्या प्रत्येक शब्दावर उद्या एक-एक धागा लिहाच. आणि हो कृपया खरडफळ्याचा लाभ घ्या. तुम्हाला तिथे रोज नवे नवे शब्द पण कळतील. काही अडचण आली तर मापंकाढे समितीच्या कुठल्याही सदश्याला विनासंकोच व्यनि / खरड करा.

सं.मं. ला एक विनंती: हे लेख दखलपात्र मधे घेता येतील का? जेणे करुन नव्या मिपाकरांना ह्याचा लाभ मिळेल?

मृत्युन्जय's picture

29 Apr 2015 - 10:59 am | मृत्युन्जय

नविन माहिती आवडली.

२ लेखात थोडे अंतर ठेवल्यास लोक समरसून आणि गांभीर्याने प्रतिक्रिया देउ शकतील असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.

मदनबाण's picture

29 Apr 2015 - 11:22 am | मदनबाण

हाउस फुल ची इष्टोरी येउ दे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling report

एक एकटा एकटाच's picture

29 Apr 2015 - 10:15 pm | एक एकटा एकटाच

छान
अजुन येउ देत