नशीब - भाग १

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
28 Apr 2015 - 3:23 pm

कावेरी एक खेडेगावात राहणारी सामान्य मुलगी, वयात आलेली, गहुवर्णी, मैत्रीणीसारखा कुणी राजकुमार शहरातुन यावा आणि आपल्याला त्याच्या राजमहालात घेउन जावा अशी स्वप्न बाळगणारी. मागे तीन बहीणींचा गोतावळा असलेली. कावेरीचं शिक्षण दहावीपर्यंत झालं होतं, त्यानंतर ती आईला घरकामात मदत करत होती. वडील शेती करत होते तसेच त्यांनी थोड्या जागेत पालेभाज्या लावल्या होत्या, ते गावात विकण्याचे काम कावेरी बरेचदा करत असे. आत्याने तिच्या मुलासाठी कावरीचा हात भावाकडे मागितला होता पण कावेरीला ते मंजुर नव्हते, तिला शहरात जायचे आहे असे तिने आत्याच्या मुलाला सांगितले तेव्हा तो म्हणाला की मी तुला शहरात नेईन आपण तिथेच राहुया, त्यावर कावेरी म्हणाली "तु पाचवी शिकलेला, शहरात तुला काय काम धंदा मिळेल, मिळुन मिळुन मजुर होशील आणि झोपडात ठेवशील, मला चांगल्या घरात राहायचंय, गरीबीत दिवस काढायचे नाहीत म्हणुन तुच मला नकार दे."

बिचारा विकास काय म्हणणार यावर, कावेरीचे ही खरे होते, शहरात जाउन मी काय नोकरी करणार? त्याला वाईट तर खुप वाटले पण कावेरीच्या हट्टापायी विकास ने तिला नकार दिला. पण त्यावरुन कावेरीची आई तिच्या आत्याशी बोलेनाशी झाली, "माझी पोरगी दहावी शिकलेली आहे, विकासला अशी मुलगी मिळाली असती का? आमच्या मुलीला आम्ही काही कमी केलं नाही आणि हा तुमचा मुलगा तिला लग्नाला नकार देतो म्हणजे काय?" आत्यानेही विकासलाच बोल लावला, "तुझ्या मनात तरी काय आहे रे? तु कमी शिकलेला, कावेरी तुझ्याहुन जास्त शिकलेली तरी मामा लग्न लावुन द्यायला तयार झाला होता आणि तु नाही म्हणालास? तुझं दुसरीकडे कुठे लफडं तर नाही ना? सांग रे बाबा, कावेरीत अशी काय कमी होती की तु तिला नकार दिलास?" विकासने आईच्या बडबडीकडे दुर्लक्ष केले, आईला जर खरे सांगितले असते तर ती तडक मामाकडे गेली असती आणि त्याच्याशी भांडली असती, मामाने कावेरीला जबरदस्तीने लग्नाला उभे केले असते आणि ते विकासला नको होते.

मुंबईला कावेरीच्या मामाच्या मुलीचे वंदनाचे लग्न होते तिथे सगळे गेले होते, लग्नात कावेरीचे बाबा कावेरीसाठी चांगले स्थळ शोधत होते, बरीच मंडळी असल्याने कावेरी खोलीच्या दारामागुन सर्वांना न्याहाळत होती तेव्हढ्यात तिची नजर एका देखण्या मुलावर पडली, चेहरा तर तिला ओळखीचाच वाटला, अरे हा तर राजेश! मामीच्या बहीणीचा मुलगा, लहानपणी आपण इथे यायचो तेव्हा कावेरी, वंदना आणि वंदनाच्या मामाची मुले राजेश आणि भावना एकत्र खेळत असत. पण खुप वर्षात त्यांची भेट झाली नव्हती. राजेश आता मोठा झालाय आणि देखणा ही, कावेरी त्याला एकटक पाहत उभी होती तेवढ्यात राजेशचे लक्ष कावेरीकडे गेले. राजेशनेही कावेरीला ओळखले, तो कावरीजवळ गेला व त्याने तिची विचारपुस केली, बोलता बोलता कावेरी त्याला न्याहाळु लागली. गोरापान चेहरा, भरलेली शरीरयष्टी, पाहताक्षणी राजेश अगदी मोठ्या घरातला वाटत होता, मामीच्या बहीणीची परीस्थीती आधी इतकी चांगली नव्हती असे तिला आठवले. झाली असेल आता.

नशिब कधीही बदलु शकतं यावर तिचा विश्वास होता. राजेशनेही त्याच्या कामाबद्द्ल सांगितले, डायमेकींगची कामे करतो असे कावेरीला समजले, तिने राजेशकडे त्याच्या आईबाबांची चौकशी केली. "आणखी कोण कोण असतं घरात?" कावेरीने त्याचे लग्न झाले आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला, आईवडील, भावना आणि मी अजुन तर इतकेच आहोत, आई बाबांना घाई झालीये नवीन मेम्बर घरात आणण्याची हे म्हणत तो एकटक कावेरी कडे पाहत होता, कावेरी लाजुन घरात पळाली.

वंदनाच्या लग्नानंतर लगेचच कावेरी गावी परत आली. आठेक दिवसातच मामाकडुन निरोप आला आणि बाबा एकदम खुष झाले, राजेशचे स्थळ कावेरीला सांगुन आले होते, घरातले वातावरण आनंदी झाले होते, कावेरी तर खुप खुष झाली होती, तिचे शहरात सुखाने राहायचे स्वप्न पुर्ण होणार होते, राजेशला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता, बाबांनी लगेचच होकार कळवला. राजेश हा मामाच्या मेव्हणीचाच मुलगा असल्याने व त्याला लहानपणापासुनच ओळखत असल्याने बाकीची विचारपुस करण्याची गरजच कुणाला वाटली नव्हती. कावेरीला आधीच पाहिले असल्याने राजेशच्या आईवडीलांनी आठ दिवसांतच साखरपुडा करायचे सुचवले. कावेरीच्या बाबांनी अत्यावश्यक तयारी करुन नातेवाईकांना आमंत्रण दिले, ठरल्या दिवशी राजेश त्याचे आईवडील, कावेरीचे मामा मामी आणि जवळचे नातेवाईक आले आणि साखरपुडा व्यवस्थित पार पडला, कावेरीच्या बाबांनी सर्वांचे मानपान सांभाळले. कावेरी तर साखरपुड्यात मिळालेली महागडी साडी पाहुन भारावुन गेली. राजेशचा थाट पाहुन तर कावेरी हुरळुनच गेली. लग्नानंतर राजेश गाडी घेणारे असे राजेशचे वडील कुणाला तरी सांगताना तिच्या कानावर पडले होते. गावातली मोठी मंडळी सर्वांना भेटुन अगदी खुश झाली. कावेरीच्या बाबांचे अभिनंदन होउ लागले. कावेरीच्या आत्याला कावेरी आपलीच सुन झाली असती तर किती बरे झाले असते असे वाटत होते पण भावाच्या आनंदात तीही आनंदी झाली.

६ महीन्यांनंतरची लग्नाची तारीख पक्की करुन मंडळी परतली. इथे कावेरीच्या आनंदाला उधाण आले होते, तिला आपल्या नशीबावर विश्वासच बसत नव्हता. राजेशबरोबर लहानपण खेळता खेळता आपण त्याची सहचारीणी होउ हे तिला कधी वाटले देखील नव्हते. कावेरीचे आईबाबा लग्नाच्या तयारीला लागले. कावेरीचे राजेशशी रोज फोनवर बोलणे व्हायचे तेव्हा बर्‍याचदा राजेश तो वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे सांगे. बर्‍याचदा त्याच्याबरोबर कुणी असल्याचा भास होई. कावेरी विचारी "नेहमी कसे हो तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असता?" तेव्हा तो म्हणे "अगं बिझिनेसच्या निमित्ताने फिरावं लागतं." कावेरीला वाटलं असेल, डाय मेकींगची डिलीव्हरी द्यायला राजेशला फिरावं लागत असेल. बोलता बोलता दिवस सरले. लग्नाची तारीख जवळ आली. ठरल्या वेळेवर लग्न पार पडले. कावेरीच्या वडीलांनी त्यांच्य ऐपतीप्रमाणे मानपान संभाळले. राजेशकडुन लग्नात कावेरीला सोन्याचे मंगळसुत्र, हार, बांगड्या मिळाल्याने तिच्या बाकीच्या मैत्रीणी अवाक झाल्या. कावेरीतर आनंदाने हरखुन गेली. चांगले स्थळ मिळाल्याचा आनंद कावेरीच्या आईवडीलांच्या तोंडावर ओसंडुन वाहत होता.

"आपल्या कावेरीचे चांगले झाले आता बाकीच्या मुलींची कार्येही पटापट होतात की नाही बघ" असे कावेरीचे बाबा तिच्या आईला सांगू लागले. कावेरीचा मैत्रीणींनाही कावेरीसारख आपलं नशीब निघावं असं मनोमन वाटु लागले.

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

28 Apr 2015 - 3:36 pm | स्पंदना

छान सुरवात.
येउ द्या आणखीन.

पुढच्या भागाची वाट पाहतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots erupt

कविता१९७८'s picture

28 Apr 2015 - 3:45 pm | कविता१९७८

धन्यवाद , (क्रमशः) लिहायचं राहीलय

जेपी's picture

28 Apr 2015 - 3:45 pm | जेपी

+1

कपिलमुनी's picture

28 Apr 2015 - 4:25 pm | कपिलमुनी

मिपा लग्नाळू झालय :)

अन्या दातार's picture

28 Apr 2015 - 4:39 pm | अन्या दातार

मिपा वयात आल्याचे लक्षण मानावे काय?? ;)

पॉइंट ब्लँक's picture

28 Apr 2015 - 6:57 pm | पॉइंट ब्लँक

ही ही. आवडले.

किसन शिंदे's picture

28 Apr 2015 - 4:45 pm | किसन शिंदे

येऊद्या पटकन पुढचा भाग..

होबासराव's picture

28 Apr 2015 - 4:49 pm | होबासराव

"नेहमी कसे हो तुम्ही वेगवेगळ्या ठीकाणी असता?" तेव्हा तो म्हणे "अगं बिझिनेसच्या निमित्ताने फीरावं लागतं."
ह्म्म दया कुछ तो गडबड है.

पैसा's picture

28 Apr 2015 - 5:03 pm | पैसा

लिही पटापट.

सस्नेह's picture

28 Apr 2015 - 5:13 pm | सस्नेह

कविता दि कथालेखिका !
पुभाप्र.

विशाखा पाटील's picture

28 Apr 2015 - 6:52 pm | विशाखा पाटील

चांगली सुरूवात.
एक सूचना - योग्य विरामचिन्हे टाकल्यास वाचताना अडखळायला होणार नाही.

पॉइंट ब्लँक's picture

28 Apr 2015 - 6:58 pm | पॉइंट ब्लँक

छान सुटसुटीत लेखन.

आता राजेशचं काहीतरी अफेअर असणार, मग कावेरी अगदी कावरीबावरी होणार. तोवर त्या विकासने काहीतरी चानचान केलं असणार, मग आपण त्याच्याशी लग्न न करुन कित्ती कित्ती मोठी चूक केली अशी कावेरीला उपरती होणार.

असं तर नाही ना?

कविता१९७८'s picture

28 Apr 2015 - 7:09 pm | कविता१९७८

अरेच्च्या , असा तर विचारच केला नाही मी.

सूड's picture

28 Apr 2015 - 7:10 pm | सूड

हुस्श्श!! मग ठीकै!!

जेपी's picture

28 Apr 2015 - 7:10 pm | जेपी

=))

वाईच दम काढा की..

कविता१९७८'s picture

28 Apr 2015 - 7:11 pm | कविता१९७८

सर्वाना धन्यवाद

विशाखाताई सल्ल्याबद्दल आभार, प्रयत्न करते.

अजया's picture

28 Apr 2015 - 9:34 pm | अजया

वाचतेय.पुभालटा.

द-बाहुबली's picture

29 Apr 2015 - 12:13 am | द-बाहुबली

मी ऐसि-अक्षरे संस्थळावर स्त्रियांची आर्थीक व लैंगीक फसवणूक या विषयावर एक लेख लिहला होता त्यात काही वास्तवातील घडलेली उदाहरणे ही दिलेली होती. स्पॉयलर नको म्हणुन लिंक देत नाही पण बहुतेक ही कथा त्यातिल एका उदाहरणाला मिळते जुळते वळण घेइल असेच वाटत आहे :(

रुपी's picture

29 Apr 2015 - 12:58 am | रुपी

छान सुरुवात. पुभाप्र

खटपट्या's picture

29 Apr 2015 - 7:13 am | खटपट्या

मस्त सुरवात !! राजेश चा संशय येतोय. बघूया...

छान सुरवात, पुढच्या भाग लवकर टाका.

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2015 - 11:37 am | सानिकास्वप्निल

वाचत आहे, छान लिहिले आहे.
पुभाप्र

स्वाती दिनेश's picture

29 Apr 2015 - 12:49 pm | स्वाती दिनेश

सुरुवात छान!
पुभाप्र
स्वाती

तुषार काळभोर's picture

29 Apr 2015 - 12:56 pm | तुषार काळभोर

डायमेकिंग...पैसा...
शंका येतीये, पण उघड उघड बोलून नको दाखवायला..

एक एकटा एकटाच's picture

29 Apr 2015 - 10:05 pm | एक एकटा एकटाच

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

पदम's picture

30 Apr 2015 - 2:53 pm | पदम

मस्तच कविता. लवकर पुढचा येउ दे.

पाटील हो's picture

20 May 2015 - 12:27 pm | पाटील हो

आजुन कधि..पुढचा भाग येउ दे.

गणेशा's picture

20 May 2015 - 1:32 pm | गणेशा

छान सुरुवात ... पुढील भागांच्या प्रतिक्षेत