मीटर डाऊन

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
17 Apr 2015 - 12:24 pm

ऑफिस मधून निघालो, बस स्टँड वर आलो तर हा धो धो पाऊस परत सुरु, चायला अख्खा दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे, थांबायचे नाव नाही. मुंबईतला पाऊसच घाणेरडा चायला. मला २६ जुलै ची आठवण आली. FM वर सांगत होते, अर्धी मुंबई भरलीये पावसाने. बहुतेक ऑफिसेस दुपारीच सोडून दिली.आमचा बॉस हलकट पण एक नंबरचा, तो बाजूलाच राहतो. त्याला काय घेणंदेणं? अजिबात सोडले नाही आम्हाला. काम संपवून बाहेर पडेपर्यंत चांगलीच रात्र झालेली होती. गेला अर्धा तास बसची वाट बघतोय. ना बस ना टॅक्सी.हा रोड पण भरायला लागलाय पाण्याने.

एरवी हे असले वातावरण मला जाम आवडले असते, एकदम थ्रील वाटते. मस्त अख्खी रात्र पण काढली असती.मुंबईत ढिगाने मित्र आहेत, टाईमपास करायला.पण आत्ता उद्याच्या जर्मन पेपरचं टेन्शन आलंय,मला काहीही करून घरी पोचायचेच आहे बास, एक करता येईल, मेन रोड पर्यंत चालत जाऊयात, कोणीतरी लिफ्ट दिली तर किंवा टॅक्सी मिळू शकते.तिकडून बस मिळते का ते पाहू, किंवा काहीही करू, पण इकडून निघू.
आलीया भोगासी ... अगदीच काही नाही मिळाले तर बारा किलोमीटर चालत जाऊ चेंबूर पर्यंत, पण आज घरी जायचेच.

अरे वा एक टॅक्सी थांबली चायला, भैया चेंबूर चलोगे?
हा शेरिंग ठीके, चलो जल्दी

चायला नशीब उघडलं, शेरिंग तर शेरिंग

दरवाजा उघडून आत बसलो, आत अजून एक जण होता. पण तो झोपलेला होता. परेल फ्लाय ओवर क्रॉस झाला. चायला बेक्कार पाणीच पाणी.उद्याच काही खरं नाही. मुंबई थांबली. टॅक्सीत मस्त जुनी गाणी लावलेली होती. वा मझा आ गया.तेवढ्यात बाजूला बसलेल्याकडे माझं लक्ष गेलं. हा ओळखीचा वाटतोय.. अरे हा पशा?? हो ...येस. झोपलाय, उठ्वू का?
दहा वर्षांपूर्वी, २००५ ला फोर्ट ला "ब्लू शार्क" नावाची एक छोटी कंपनी होती, त्यात आम्ही एकत्र काम करत होतो, नंतर अशाच एका हे साहेब अचानक नोकरी सोडून गेले.कोणालाही न सांगता.बर मुंबईत हा एकटाच राहत असल्याने कोणाला संपर्क करायचा तेही समजल नाही. मग मीही काही महिन्यात ती नोकरी सोडली.आणि २ वर्षांसाठी पुण्याला गेलो. ते मागच्या वर्षी परत आलो.तेंव्हा फेसबुक नसल्याने आमचा संपर्क राहिलाच नाही. आणि आज अचानक या गाडीत हा बाजूला. त्याला मी उठवलच, आधी एकदम बावरून तो उठला, पण मी दिसल्यावर एकदम ओरडला अबे तू ? इथे कसा काय ? त्याला सांगितलं अरे मी इथेच असतो परेलला. आता पावसाने बस चे प्रोब्लेम्स झालेलेत म्हणून बाहेर पडलो तर हि गाडी मिळाली.नेमका तू दिसलास. तू कसा काय लेका इकडे? चायला किती वर्षांनी भेटतोय? कुठे गायब झालेल्लास? तो पण एकदम सावरून बसला.

किंग्स सर्कल क्रॉस झालं. गप्पा सुरु झाल्या.माझी सगळी राम कहाणी त्याला सांगत बसलो.तो पण उत्साहाने ऐकत होता.एक दोनदा माझं बाहेर लक्ष गेलं. परत किंग्स सर्कल क्रॉस झाल्यासारखे वाटले. पण पाऊस भरपूर होता. आणि गप्पांच्या नादात माझे लक्ष नसेल म्हणून मी दुर्लक्षित केले. जुन्या ऑफिस मधले किस्से दोघेही रंगवून सांगत होतो, आठवत होतो. परत एकदा किंग्स सर्कल क्रॉस झाले, आता माझी सटकलीच, पशा काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात त्याला थांबवून त्या भैयाची घेतलीच, साले मीटर डाऊन करके मुंबई घुमा रहा हे क्या, कितने बर किंग्स सर्कल दिखायेगा ? सीधा ले गाडी अभी, चुत्या समझके रक्खा हे क्या?

त्यावर तो काहीच न बोलता टॅक्सी दामटत राहिला, किंग्स सर्कल वरून गाडी सरळ सायन फ्लायओवर वर आली, आता उजवीकडे वळले कि चेंबूर,हे कन्फर्म.

पशा तू पण चेंबूर ला राहतोस ना अजूनही.

तेवढ्यात अचानक टॅक्सी बाहेर लक्ष गेले, परत "किंग्स सर्कल"

आता पूर्ण खोपडी सटकली, अरे काय प्रकार सुरु आहे ? अबे तिसरी बार इधरही?
त्या भैयाची गचांडीच धरली,
तेवढ्यात पशा म्हणाला, सोड त्याला,त्याची चूक नाही अरे

गेल्या दहा वर्षात लाखो वेळा आम्ही दोघे किंग्स सर्कल फिरतोय,याला अंत नाही, तुझं मीटर आत्ता डाऊन झालंय........

कथाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

hitesh's picture

17 Apr 2015 - 12:31 pm | hitesh

छान

नेत्रेश's picture

17 Apr 2015 - 12:36 pm | नेत्रेश

पण हा मेला कधी? ऑफीसातच टपकला की काय?

पॉइंट ब्लँक's picture

17 Apr 2015 - 1:15 pm | पॉइंट ब्लँक

+१

स्पा's picture

17 Apr 2015 - 10:33 pm | स्पा

खरतर तो इसम जिवंतच ट्रॅप मध्ये अडकलाय,
टॅक्सीवाला आणि त्याचा मित्र अपघातात गेलेले
आहेत .:)

नेत्रेश's picture

19 Apr 2015 - 2:50 pm | नेत्रेश

हे ध्यानातच आले नव्हते.

==//\\==

स्पा's picture

17 Apr 2015 - 10:33 pm | स्पा

खरतर तो इसम जिवंतच ट्रॅप मध्ये अडकलाय,
टॅक्सीवाला आणि त्याचा मित्र अपघातात गेलेले
आहेत .:)

स्रुजा's picture

19 Apr 2015 - 3:22 am | स्रुजा

अरे देवा ! काय होणार त्या माणसाचं आता. बिचारा भुकेने मरणार. हा खुलासा वाचल्यावर मला भलतीच चिंता लागून राहिली त्याच्या मरणाची :(

कथा छानच, पावसात टॅक्सी घेणार नाही बुवा आता.

जेपी's picture

17 Apr 2015 - 12:38 pm | जेपी

=))

कंजूस's picture

17 Apr 2015 - 12:54 pm | कंजूस

??????च्यायला फारच डाउन .

चुकलामाकला's picture

17 Apr 2015 - 12:55 pm | चुकलामाकला

आयला! भन्नाट !

पियुशा's picture

17 Apr 2015 - 1:07 pm | पियुशा

" अच्चा अश झाल तल " ;)
जोक्स अपार्ट :)
वाचताना अजिबात कल्ळ नाही पुढे काय होनारे आवडेश:०))
मेल्यावर अस होत असेल तर मी एखाद्या ५ स्टार हाटीलात आवडता मेनु खात खात मरेन मग :प

टवाळ कार्टा's picture

17 Apr 2015 - 1:13 pm | टवाळ कार्टा

स्पारायण धारप शोभतोस :)

आयला असे लूप मधे जाणार असु तर मग लोक आत्महत्या करायला सन्नी लिओनी कडे जातील =))

सुहास झेले's picture

18 Apr 2015 - 3:28 pm | सुहास झेले

अगदी अगदी :)

प्रचेतस's picture

17 Apr 2015 - 1:10 pm | प्रचेतस

सहिच्च

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2015 - 1:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आयला असं लुप मधे फिरायला लागत असेल तर स्वित्झर्लँड मधे मरावं म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2015 - 1:50 pm | अत्रुप्त आत्मा

मी मि.पा.वर रजिस्टर झाल्या झाल्या मेलेलो आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw007.gif
==================
अत्रुप्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate007.gif आत्मा
..........रजिस्टर........

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2015 - 1:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचं सदस्यनाम बघुन ते माहिती आहे इथल्या सगळ्यांना ;)

स्पंदना's picture

17 Apr 2015 - 1:37 pm | स्पंदना

काय तरी घोटाळा हाय!!
आता गप बस स्टॉप्वरन चालणारा माणुस एकदम खट्याक?

सूड's picture

17 Apr 2015 - 1:47 pm | सूड

मस्त!!

मी दात काढताना मरु नये बाई :/

कपिलमुनी's picture

17 Apr 2015 - 1:53 pm | कपिलमुनी

teeth

स्पंदना's picture

17 Apr 2015 - 1:55 pm | स्पंदना

तुझं ठिक ग!
त्या आआआआआआआआआ केलेल्याचं काय?

तो पण असाच राहणार.त्याला परत दात येणार.मी परत काढणार.दहा वर्ष लाख वेळा तरी!!

देव करो आणि तुम्ही जायच्या वेळेला एखादे आजोबा कवळी बसवून घ्यायला आलेले असोत!! ;)

केबीपीडी ऊर्फ खुले बोळके पे धोका व्हायचा कुठेतरी. ;)

अजया's picture

17 Apr 2015 - 4:09 pm | अजया

=))

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2015 - 1:56 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/doctor-smiley-emoticon.gif

अनुप ढेरे's picture

17 Apr 2015 - 1:50 pm | अनुप ढेरे

आवडली गोष्ट!

सविता००१'s picture

17 Apr 2015 - 2:08 pm | सविता००१

गोष्ट छान आहे पण.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Apr 2015 - 2:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

जबरी!!!!! एकच नंबर

नंदन's picture

17 Apr 2015 - 2:30 pm | नंदन

गोष्ट आवडली. इतकी माणसे लीलया गचकवत असल्याने 'खाटुक' ही पदवी स्पासरांना देण्यात यावी, अशी मी मागणी करतो.

बॅटमॅन's picture

17 Apr 2015 - 3:01 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!!!

कहर's picture

17 Apr 2015 - 4:31 pm | कहर

मस्त
मला आधी वाटले लोकलसारखा शेजारचा पुन्हा अंगावर कलंडतो कि काय … पण यावेळी तो चक्क गप्पा मारू लागला राव…
लोकल , टॅक्सी, इमान, बैलगाडी आजून बरीच वाहतुकीची साधने बाकी आहेत … आन्दे आन्दे

अच्चा! अश झाल तल स्पावड्या!

वेल्लाभट's picture

17 Apr 2015 - 5:03 pm | वेल्लाभट

भूत-प्रेत, वशीकरण, नोकरी, धंदा, संतान, सास, सौतन, प्रेम-विवाह, हर समस्या का समाधान. मेरे किये किसीभी काम को काटनेवालेको मनचाहा ईनाम. बाबा बंगाली. चेंबूर स्टेशन के सामने. पूरी मुंबई घुमाली; तो अब देखो बाबा बंगाली. ९९९९ ९९९ ९९९.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2015 - 5:29 pm | अत्रुप्त आत्मा

स्पाबा बंगाली http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif .. असं हवं ते!

जबरी कथा. अजून मोठी लिहायला हवी होती.

जे.पी.मॉर्गन's picture

17 Apr 2015 - 7:03 pm | जे.पी.मॉर्गन

ऑफिसबाहेर पडल्यावर तो इसम "टपकल्या"ची हिंट देणारी एखादी ओळ असती तर काही अंदाज तरी आला असता! हे म्हणजे एकदमच मीटर डाऊन झालं!

जे.पी.

स्पा's picture

17 Apr 2015 - 10:31 pm | स्पा

खरतर तो इसम जिवंतच ट्रॅप मध्ये अडकलाय, टॅक्सीवाला आणि त्याचा मित्र अपघातात गेलेले आहेत .

एक एकटा एकटाच's picture

17 Apr 2015 - 7:40 pm | एक एकटा एकटाच

आवडली

विवेकपटाईत's picture

17 Apr 2015 - 10:03 pm | विवेकपटाईत

तुझं मीटर आत्ता डाऊन झालंय........ मस्त आवडली.

सतिश गावडे's picture

17 Apr 2015 - 10:50 pm | सतिश गावडे

मस्त. मजा आली वाचताना. मात्र बर्‍याच वाचकांचा "कथेचा निवेदकही ऑफीसमधून बाहेर पडताच गचकला आहे" असा समज झाला आहे असे दिसते.

अशीच लहानपणापासून ऐकलेली एक गोष्ट आठवते. गोष्ट आहे इंदापूर ते माणगांव या प्रवासाची. मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार्‍यांना ही गावे माहिती असतील. मुंबईकडून कोकणात जाताना आधी इंदापूर लागते आणि मग माणगांव. एका व्यक्ती इंदापूरच्या थोडंसं पुढे माणगांवला जायला गाडीची वाट पाहत असते. वेळ रात्री दहा नंतरची. बराच वेळ जातो, त्या व्यक्तीला गाडी काही मिळत नाही. अकरा वाजतात. बारा वाजतात. शेवटी एक रिक्षा येऊन थांबते. त्या व्यक्तीला हायसं वाटतं. रिक्षात बसते. रिक्षात आधीच एक स्त्री बसलेली असते. थोडया वेळाने या व्यक्तीचे रिक्षात आधीच बसलेल्या स्त्रीच्या पायाकडे लक्ष जाते. या व्यक्तीची भीतीने बोबडी वळते.

कसेबसे अवसान आणून ती व्यक्ती रिक्षा ड्रायव्हरला सांगते की "अहो या बाईचे पाय बघा"
रिक्षा चालक मागे वळून न पाहताच म्हणतो, "तिचे काय पाय पाहतोस? माझे पाय पहा."

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2015 - 12:28 am | अत्रुप्त आत्मा

हहु हहु हहु हहु! भ्या वाटलं! http://www.sherv.net/cm/emoticons/shocked/fainting-smiley-emoticon.gif

छोटा चेतन-२०१५'s picture

18 Apr 2015 - 12:01 am | छोटा चेतन-२०१५

खतरनाक

रुपी's picture

18 Apr 2015 - 12:57 am | रुपी

फारच जबरी! आवडली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2015 - 6:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कथा....!

-दिलीप बिरुटे

अभिजीत अवलिया's picture

18 Apr 2015 - 1:29 pm | अभिजीत अवलिया

आवडली ....

सौरभ उप्स's picture

19 Apr 2015 - 2:44 am | सौरभ उप्स

स्टोरी लॆच भारी,

शाॅर्ट फिल्म होउ शकते

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2015 - 6:05 am | श्रीरंग_जोशी

खासंच आहे कथा.

या निमित्ताने मला माझा आवडता डरना मना हैं हा चित्रपट आठवला.

श्रीरंग_जोशी's picture

19 Apr 2015 - 6:05 am | श्रीरंग_जोशी

खासंच आहे कथा.

या निमित्ताने मला माझा आवडता डरना मना हैं हा चित्रपट आठवला.

मुक्त विहारि's picture

19 Apr 2015 - 11:17 am | मुक्त विहारि

आवडली....

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Apr 2015 - 2:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा,

शैलेन्द्र's picture

19 Apr 2015 - 3:18 pm | शैलेन्द्र

मस्त..

वपाडाव's picture

28 Apr 2015 - 3:49 pm | वपाडाव

मस्त्च

किसन शिंदे's picture

28 Apr 2015 - 4:06 pm | किसन शिंदे

जबरा रे!!

मोहनराव's picture

28 Apr 2015 - 4:33 pm | मोहनराव

मस्त रे स्पांडुबा!