दादा कोंडकेंची क्रेझ

दा विन्ची's picture
दा विन्ची in जनातलं, मनातलं
16 Apr 2015 - 3:37 pm

मी उच्च शिक्षणासाठी सध्या देवभूमी उत्तराखंड मध्ये आहे. समवयस्क स्थानिक लोकाशी बऱ्याच वेळा गप्पा टप्पा अर्थात हिंदीमध्ये होत असतात . राष्ट्रवादी आणि शिवसेनेची धोरणे इत्यादी विषय असतात . पण मला असे जाणवले कि शरद पवार , बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, यांच्यापेक्षाही बहुतेकांना स्वर्गीय दादा कोंडके हे माहित आहेत आणि त्यांना त्यांच्या एकूण हजरजबाबी पणा तसेच त्यांचे दुहेरी अर्थाचे संवाद, त्यांची सेन्सार बोर्डाशी असलेली भांडणे ( पंगा) वगैरे चांगलीच माहिती आहेत.
महाराष्ट्रात काही उच्च शिक्षित सज्जनांना दादा कोंडके आपल्याला आवडतात हे मान्य करणे हे हीन अभिरुचीचे लक्षण वाटते पण इथे मात्र बरेच जण त्यांना बाप माणूस मानतात.

दादा कोंड्केचा एक पंखा म्हणून लई भारी वाटल मला

कलाअनुभव

प्रतिक्रिया

उत्तराखंडात डी के माहित आहेत?

भारीच!!

दा विन्ची's picture

16 Apr 2015 - 3:59 pm | दा विन्ची

अगदी त्यांच्या अनेक किस्श्यांसह. सिनेमाची द्वैर्थी नावे, त्यांची एर कन्डिशन चड्डी

कपिलमुनी's picture

16 Apr 2015 - 4:02 pm | कपिलमुनी

एका दिवशी किती जिलब्या पाडाल :)
पैली जिलबी शिळी झाली कि मग दुसरी !

दा विन्ची's picture

16 Apr 2015 - 4:05 pm | दा विन्ची

नया मुल्ला पंच नमाझी होता है . आता बास करतो

बॅटमॅन's picture

16 Apr 2015 - 4:21 pm | बॅटमॅन

आयला हे तर जबरीच की!

रच्याकने, आयायटी रुडकी आहे काय तुमचं कॉलेज?

दा विन्ची's picture

16 Apr 2015 - 5:36 pm | दा विन्ची

उगाच नाय म्हणत, batman लई हुशार

यशोधरा's picture

17 Apr 2015 - 12:43 am | यशोधरा

उत्तराखंडात कुठे?

दा विन्ची's picture

17 Apr 2015 - 7:23 am | दा विन्ची

आय आय टी रुरकी