महामानवाची जयंती ।

सवंगडी's picture
सवंगडी in जनातलं, मनातलं
14 Apr 2015 - 11:11 pm

आज महामानवाची जयंती । मस्त साजरी होती आहे… हो ,होते आहे.
लेझर लाईट च्या प्रकाशात मदमस्त झालेले भीम सैनिक नाचतायेत…
मी पण एक मनापासूनचा भीमसैनिक (यात जातपात शोधायला जाऊ नका) !
त्यामुळेच मला हे सगळ पाहून वाईट वाटत.!
बाबासाहेबांमुळे मिळालेल्या व्यक्तीस्वातंत्र्य भाषास्वातंत्र्य, आणि आचारस्वातंत्र्य याचा परिपूर्ण वापर (दुरुपयोग) चालू आहें.पण विचार स्वातंत्र्य मात्र जमेल तसं आम्ही वापरतो.
बाबासाहेबांचे विचार त्यांच्या अनुयायांनी लवकरच संपवायचे चालवले आहे. गौतम बुद्ध म्हणाले होते ,"मला देव बनवु नका! "माझे विचार अवलंबा!"
पण आपण त्यांना देवाच्या जागी ठेवलं ! तिथेच बौद्ध धर्माला उतरती कळा आली.
आज बाबासाहेबांच्या बाबतीतही तसेच काहीसे झाले आहे.
त्यामुळे मला स्वर्गीय वामनराव कर्डक यांचे शब्द आठवतात. -

"भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते,
तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते,
वाणीत भीम आहे,करणीत भीम असता,
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच थोर असते. "!

वावरविचार

प्रतिक्रिया

एस's picture

14 Apr 2015 - 11:12 pm | एस

सहमत आहे.

श्रीरंग_जोशी's picture

14 Apr 2015 - 11:13 pm | श्रीरंग_जोशी

लेखनाच्या आशयाशी सहमत.

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.

रामपुरी's picture

14 Apr 2015 - 11:32 pm | रामपुरी

महामानव, महात्मा इत्यादी देवत्वाला नेऊन ठेवणारी बिरूदे कधीच पटली नाहीत त्यामुळे आमचा पास

बाकि नित्याचच असल्यामुळे फार काहि टंकण्यात अर्थ नाहि.

युगपुरुष, द्रष्टा विचारवंत आणि प्रयोगशील संशोधक डॉ भीमराव आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
जेव्हा बाबासाहेबांचे संपूर्ण विचार स्वतंत्र भारतात अंमलात येतील तो सुदिनच ठरेल.

hitesh's picture

15 Apr 2015 - 6:46 am | hitesh

.

वेल्लाभट's picture

15 Apr 2015 - 6:50 am | वेल्लाभट

काही दिवसांपूर्वी यावर चार ओळी सुचल्या होत्या

मातीत सांडले रक्त
ज्या थोरात्म्यांनी त्यांचे
'दगडाचे' घडवून पुतळे
आम्ही त्यांची 'माती' करतो

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2015 - 8:48 am | अत्रुप्त आत्मा

@ गौतम बुद्ध म्हणाले होते ,"मला
देव बनवु नका! "माझे विचार अवलंबा!"
पण आपण त्यांना देवाच्या जागी ठेवलं ! तिथेच बौद्ध
धर्माला उतरती कळा आली.
आज बाबासाहेबांच्या बाबतीतही तसेच
काहीसे झाले आहे.>> पण आता हे ही परवडले असे म्हणयचि वेळ आलीये. वयैक्तिक अहंकार आणि राजकारणाचि सोय,म्हणुन स्वत:ला जे वाटतं.. ते या राष्ट्र पुरुषांच्या तोंडि कोंबुन त्यांची विटंबना करण्याचा चंग काहिंनि बांधला आहे. आत्ताच फेसबुकावर "शिवरायांना मनुस्मृति प्रमाणे राज्याभिषेक केल्याचा बदला,म्हणुन बाबासाहेबांनि रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृति जाळलि!" असं विधान एका भीमभाक्ता कडून लिहिलेल वाचुन (आणि त्याला खरं उत्तर देऊन ) आलेलो आहे.

संदीप डांगे's picture

15 Apr 2015 - 11:53 am | संदीप डांगे

हे भयंकर आहे हे मात्र खरे.

कुणाच्यातरी सु-पिंक डोक्यातून ह्या कल्पना निघतात आणि लोक येड्या अभिमानापायी बसतात पुढे ढकलत. खरं खोटं कुणी तपासण्याच्या फंदात पडत नाही.

आजकाल तर प्रत्येक जण मग तो काँग्रेसी असो, भाजपाई असो, संघवाला असो कुणीही दुसर्‍यावर इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करतो आणि स्वतःला सोयिस्कर असा इतिहास सांगत बसतो. प्रत्येकाचे दाखले पुरावे तपासत बसायला सामान्य पब्लिकला वेळ कुठंय? कुणी सत्य बाहेर आणले तरी आता त्या सत्यावर तरी किती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती झाली आहे. आम्ही शाळेत शिकलो तो इतिहास आणि ही लोकं सांगतात त्यात प्रचंड फरक आहे. अशी लोकं सगळीकडे फोफावलीयेत.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2015 - 12:43 pm | अत्रुप्त आत्मा

Parag Divekar
@तोच"मनुस्मृती" नावाचा धर्मग्रंथ रायगडाच्या पायथ्याशी
जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेणारे भारतरत्न,
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर>> "हा ग्रंथ विषमतेचे
समर्थन करतो, म्हणुन तो आम्ही जाळतो.. अश्या प्रकारची
विधानं त्यावेळी केलि गेलेली आहेत. आपल्या जे वाटतं ते खरं
मानण्यापेक्षा ,जे खरं आहे-ते आपल्याला वाटलं पाहिजे! नाही
का?
आवडले · संपादित करा · 3 तासांपूर्वी
==============
आता त्या ग्रुपवरिल सदस्य माझि फेबू प्रो बघतील... आणि माझ्या नावानी मनुवादी वगैरे अपप्रचार करतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2015 - 12:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अश्या लोकांना पौड फाट्यावर स्वतः नेउन मारणे.

संदीप डांगे's picture

15 Apr 2015 - 1:04 pm | संदीप डांगे

+१

खंडेराव's picture

15 Apr 2015 - 2:10 pm | खंडेराव

फार झाल्यात हो, प्रत्येकाला कुठेतरी नेउन टाकतात लोक. कोणि मनुवादी, कोणि सिक्युलर तर कोणि आप्टार्ड..
( कॉन्ग्रेसवाले कमनशीबी, त्यांना सेपरेट बादलीच नाही :-) )

अशा लो़कांकडे दुर्लक्ष सोडुन दुसरा उपाय काय?

तिमा's picture

17 Apr 2015 - 6:13 pm | तिमा

बाबासाहेबांपासून स्फूर्ति घेऊन, बाबासाहेबांच्या तोडीचे, अनेक नेते निर्माण होतील अशी आशा वाटत होती. पण कितीही आठवले तरी, त्या तोडीचा दुसरा कोणी नेता डोळ्यांसमोर येत नाही, हे भारतमातेचे दुर्दैव!

महामानवास विनम्र अभिवादन.

नाखु's picture

15 Apr 2015 - 1:00 pm | नाखु

स्वतःची अशी राष्ट्र प्रेरणा नायक वाटून घेतले आहेत (आणि प्रत्यक्षात त्यांचे चार विचारही वाचले+आचरले नाहीत)
अश्या लोकांबद्दल राग+किळस+घृणा+दया यांपलिकडे पोहोचलो आहे. हे महामानव अनुयायींना "खरे कधीच समजू नयेत" अशी तुंबडीभरू-नेत्यांची ईच्छा अस्ते, ती ही अनुयायींमंडळी वर्षानुवर्षे पूर्ण करीत आहेत.

मूळ लेखाशी तीव्रतेने सहमत.

संदीप डांगे's picture

15 Apr 2015 - 1:17 pm | संदीप डांगे

ज्या महापुरुषांच्या प्रतिमा अनुयायी डोक्यावर घेऊन बेभान नाचत असतात त्याच महापुरूषांच्या विचारांना तेव्हा ते पायदळी तुडवत असतात.

यावर ओशोंचे एक सुंदर प्रवचन आहे. गांधीबद्दल त्यांचे काय विचार आहेत हे सांगताना महापुरुषांबद्दल अनुयायी कट्टर का असतात ते मस्त सांगीतलंय. महापुरूषांशी स्वतःला येणकेणप्रकारेण जोडून स्वतःही महान आहोत हे सिद्ध करायची केविलवाणी धडपड करतात. त्यांचे विचार आत्मसात केले तर स्वतःच महापुरूष होता येतं पण ते एवढं सोपे नसल्याने फक्त अवडंबर माजवण्यात लोक आयुष्य घालवतात.

अभिजीत अवलिया's picture

15 Apr 2015 - 10:16 pm | अभिजीत अवलिया

कुणाचीही जयंती पुण्यतिथी असो वा कुठलाही सण असो. जोरजोरात गाणी लावणे, रस्त्यावर मिरवणुका काढून ट्रॅफिक अडवणे, जबर्दस्ती वर्गणी गोळा करणे, दारू पिऊन गोंधळ घालणे हे नेहमीचे झाले आहे. आणी कुणी ह्याच्यावर आक्षेप पण घ्यायचा नाही. नाहीतर भावना भडकायला एक क्षण पण लागत नाही.

सतीश कुडतरकर's picture

17 Apr 2015 - 11:52 am | सतीश कुडतरकर

मागील सहा वर्षे कल्याणमध्ये राहण्यास होतो. ५०% विभाग बौध्दधर्मीय. खरतरं बौध्द धर्माविषयी आत्मियता अशी काही नाही. काहीतरी धर्म असावा म्हणून आमचाही वेगळा धर्म. फक्त बाबासाहेबांनी सांगितलं ना, म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. पण बाबासाहेबांनी ज्या तथागत बुद्धाचा मार्ग दाखवलाय त्याच्या शिकवणीकडे मात्र दुर्लक्ष. आपल्या हिंदू धर्मातूनच तिकडे गेले असल्याने काही दुर्गुण निघण्यास वेळ लागणारच.

पण परिस्थिती अगदीच वाईट नाही. त्या सहा वर्षात खूप सारे मित्र झाले, त्यांच्याबरोबर वादविवाद व्हायचे, पण कधीही हातघाईवर प्रकरण गेल नाही. समाजात शिक्षणाच प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे आणि त्यांनाही जयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या धुमशानाची चीड येते. पण ते लोकही आपल्यापरीने समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एक गोष्ट चागली झाली ती म्हणजे मला बाबासाहेब कळले. लहानपणापासून घरातून मिळालेल्या संस्कारांमुळे बाबासाहेबांबद्दल जी अढी निर्माण झाली होती, ती दूर झाली आणि एका विशाल 'मराठी' व्यक्तिमत्वाची नव्याने ओळख झाली.