एक विचारवंत -शतशब्दकथा

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
9 Apr 2015 - 2:25 pm

एक विचारवंत आणि त्याची बायको विहीरीच्या कांठावर बोलत बसले होते.

अचानक तोल जाऊन बायको आंत पडली. विचारवंत घाबरला. त्याला पोहता येत नव्हते.

त्याने देवाचा धावा केला.

देव हजर झाला."वत्सा,काय मागणे आहे ?"

"मला माझी बायको परत पाहिजे."

देवाने बुडी मारुन मधुबालाला बाहेर काढले."घे तुझी बायको."

" देवा, ही ती नव्हे."

देवाने परत बुडी मारली. कॅटरिनाला बाहेर काढले.

"ही सुद्धा माझी बायको नाही."

देवाने तिसर्‍यांदा बुडी मारली. यावेळेस खर्‍या बायकोला बाहेर काढले.

विचारवंत म्हणाला, "देवा तुझे खूप उपकार झाले."

देव अंतर्धान पावला. त्याबरोबर त्या दोघीही.

बायको सदगदित झाली होती.

विचारवंत मात्र मनांतून नाराज झाला होता.

"देवा, प्रामाणिकपणाचे हेच का फळ ?"

विडंबनमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

9 Apr 2015 - 2:36 pm | एक एकटा एकटाच

विचारवंताचे असेच वांदे होतात.
प्रामाणिक पणा असा हल्ली काही राहिलाच नाहीय.

छ्या............

आतिवास's picture

9 Apr 2015 - 3:46 pm | आतिवास

:-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2015 - 5:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान कथा !

बोध :
१. सगळ्या बोधकथांसोबत असणारा अलिखित अस्वीकरण संदेश (Disclaimer):
Past results do not guarantee future performance.

२. छोट्या/गुप्त अक्षरातले संदेश वाचले नाही तर कायदेशीर फसवणूक होऊ शकते.

आम्ही जर वेगळी कथा वाचली होती.
देवाने मधुबालाला बाहेर काढल्यावर विचारवंत म्हणाला हीच माझी बायको त्यावर देव रागाने म्हणाला "तू खोटारडा आहेस"
यावर विचारवंत नम्रपणे म्हणाला देवा पहिल्यांदा तू मधुबाला मग कतरिना मग माझी बायको काढणार मी तिसरी माझी बायको आहे म्हणून सांगितले तर तिन्ही मला बक्षीस देणार. मला माझीच बायको डोईजड झाली आहे तर तीन तीन बायका घेऊन काय करू?
असो कथेचा हाही शेवट आवडला

संदीप डांगे's picture

9 Apr 2015 - 8:10 pm | संदीप डांगे

हा हा हा. मस्त :-)

अजून एक शेवट होऊ शकतो.
देवाने मधुबालाला बाहेर काढल्यावर विचारवंत म्हणाला हीच माझी बायको त्यावर देव रागाने म्हणाला "तू खोटारडा आहेस". आणि तिघींना घेऊन गायब होतो.

विचारवंत नम्रपणे शांत पावले टाकत मजेत शीळ घालत निघतो....

खरा खुरा सुखांत.

पैल्यासारखे देव राहीले नाहीत आज काल !! :)

एक एकटा एकटाच's picture

9 Apr 2015 - 7:52 pm | एक एकटा एकटाच

अगदी खरा.........

सौन्दर्य's picture

9 Apr 2015 - 9:29 pm | सौन्दर्य

मस्त प्रतिसाद.

सौन्दर्य's picture

9 Apr 2015 - 9:30 pm | सौन्दर्य

कथा जाम आवडली. सुंदर लिहिलेय.

प्रियाजी's picture

10 Apr 2015 - 2:41 pm | प्रियाजी

कथा खुप छान. तुमच्या कथेच्या शेवटाप्रमाणेच सुबोध खरे आणि संदीप डांगे ह्यांनी केलेले शेवटही आवडले. शेवटी व्य्क्ती तितक्या प्रकृती हेच खरे.