नखांची रंगरंगोटी - Nail Art ( Ombre effect i.e. Shades)

mayurpankhie's picture
mayurpankhie in मिपा कलादालन
8 Apr 2015 - 5:02 pm

आज नखांवर शेडींग करूया. जेव्हा पहिल्यांदा २-३ रंग नखांवर मिसळलेले पाहिलेत तेव्हा काहीतरी मस्त पाहिल्यासारखं वाटलं. मग नेहमीच्या सवयीने गुगलून बघितलं की नक्की करता तरी काय.

तेव्हा कळलं एका साध्याशा गोष्टीने किती मस्त प्रकार करता येता ते. ती गोष्ट म्हणजे Sponge ... याला मराठीत काय म्हणता ते माहित नाही :P

चला तर घ्या तुमच्याकडे असेल तो sponge अगदी किचन मधला पण चालेल. आता एका रंगाचे २-३ शेड्स किंवा कोणताही फिका रंग आणि आपला आवडता पांढरा रंग. मी नेव्ही ब्लू , आकाशी आणि पांढरा घेतलाय. अंदाजे नखावर ३ रंग दिसतील अशा रेघा sponge वर काढा.

Ombre 1

किंवा एक दुसऱ्या पद्धतीने पण करता येईल. एका प्लास्टिक च्या छोट्या डिश मधे दोन रंग थोडे थोडे घ्या. आणि त्यांना जरासं मिसळा. आता त्यावर sponge दाबा.

Ombre 2

हा sponge आता नखावर हळूच दाबा. शेड्स तयार :)

Ombre 3

सगळे नखं सुकल्यावर स्टेप्स रिपीट करा.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

8 Apr 2015 - 5:16 pm | कविता१९७८

कलर कॉम्बीनेशन छान, पण फीनीशिंग हवी. बर्‍याच ठीकाणी कलर नखांच्या कडांच्या बाहेर लागलाय तर काही ठीकाणी कडांपर्यंत लागलेला नाही असं दिसतय.

mayurpankhie's picture

8 Apr 2015 - 5:28 pm | mayurpankhie

हो अहो ...

नखांना आजूबाजूला सेलो टेप लावायचा असतो त्यामुळे आजूबाजूला रंग लागत नाही. किंवा नंतर नेल पेंट रीमुवर ने काढावा लागतो. माझा नीट काढला गेला नसेल. म्हणून तसं दिसतंय :)

कविता१९७८'s picture

8 Apr 2015 - 5:31 pm | कविता१९७८

कानासाठी जे बडस् येतात ते नेलपेंट रीमुव्हर मधे बुडवुन त्याने नखांच्या कडा साफ कराव्यात म्हणजे फिनीशिंग छान येते.

mayurpankhie's picture

8 Apr 2015 - 5:49 pm | mayurpankhie

+१

"सगळ्यात शेवटी पारदर्शक नेलपॉलिशचा कोट लावावा."

पारदर्शक नेलपॉलिशचा कोट - आणखी छान फिनीशिंग येण्यासाठी! :)