माझ्याही काही रेषा!

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in मिपा कलादालन
7 Apr 2015 - 9:51 pm

लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे पण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नसल्यामुळे जसे जमेल तसे चितारण्याचा प्रयत्न करतो.
त्यातही रंगांशी फारसा संबंध नाही, पेन्सिल स्केचिंग थोडेफार जमते. त्यातलीच काही चित्र इथे अपलोड करतोय.

ज्यांच्यामुळे चित्र काढायला लागलो त्यात goku साहेबांचा वरचा नंबर आहे! (अजूनही dragonball z पाहत असतो कधीतरी!:))
Goku

goku1

dragonball z मुळे Manga आणि chibi या प्रकारांशी ओळख झाली आणि हळूहळू चित्रे जरा जमू लागली.
girl

boy

assassin

या शिवाय चार चाकी गाड्यांचे आकर्षण होतेच त्यामुळे त्यांच्यावरही हात साफ करून घेतला!
audi

porsche

काही किडे! ;)
tide

आणि ३D स्केचिंग…
3D

काही दिवसांनी, मित्रांकडून खूप टोमणे खाल्ल्यानंतर वहीच्या पानांवर चित्र काढण्याऐवजी एक चित्रकलेची वही खरेदी केली! :)
त्यात चित्र काढायला आता सुरुवात केली आहे. लवकरच तीही अपलोड करेन.
इथे चित्रकलेचे जाणकार लोक असल्याने त्यांच्या सल्ल्यांमुळे नक्कीच माझी चित्रकला सुधारण्यास मदत होईल!

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Apr 2015 - 9:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुंदर

श्रीरंग_जोशी's picture

7 Apr 2015 - 9:58 pm | श्रीरंग_जोशी

सुंदर अन कल्पक दिसत आहेत चित्रे.

खटपट्या's picture

7 Apr 2015 - 10:01 pm | खटपट्या

शेवटचे तर जबरद्स्त आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2015 - 10:18 pm | अत्रुप्त आत्मा

वॉव! थ्री डी ..जबराट!

कविता१९७८'s picture

7 Apr 2015 - 10:31 pm | कविता१९७८

अप्रतिम

पॉइंट ब्लँक's picture

7 Apr 2015 - 10:32 pm | पॉइंट ब्लँक

चित्रं भारी आली आहेत. एक प्रामणिक मतः -शेडींग थोडेसे रफ वाट्ले.

शब्दबम्बाळ's picture

8 Apr 2015 - 6:01 pm | शब्दबम्बाळ

शेडींगमध्ये मार खातो नेहमीच…
अनेक व्यक्तिचित्रे त्या शेडींग च्या पायात खराब झाली आहेत!
सुधारण्यासाठी काय करता येईल?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Apr 2015 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! शेवटची कल्पना सुचणे तर एकदम भारी, चित्रही मस्त जमलेय !!

मुक्त विहारि's picture

8 Apr 2015 - 6:24 am | मुक्त विहारि

झक्कास....

आम्हाला ही कला अजिबात जमत नाही.त्यामुळे ह्या अशा कला अवगत असणार्‍या व्यक्तींविषयी आम्हाला नितांत आदर आहे.

नाखु's picture

8 Apr 2015 - 8:53 am | नाखु

तीव्र सहमती.
आम्ही चितारलेल्या हत्तीलाही बर्याचदा हत्ती सोडून इतर प्राणीनावाने संबोधले जाते त्याची नम्र जाणीव आहे.

मदनबाण's picture

8 Apr 2015 - 6:51 am | मदनबाण

जबराट !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 7:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चित्रकला येणार्‍या लोकांचा मनापासुन हेवा वाटतो. एक रुक्ष इंजिनिअरिंग ड्रॉईंग आणि निसर्गचित्र सोडलं तर काहीही काढता येत नाही. घोडा काढायला सुरुवात केला की त्याचं अत्यंत कुरुप माकड किंवा डुक्कर होतं असा अनुभव आहे. शाळेमधे वर्षाला एक ह्या रेटनी किमान ५ ते १० वी ही सहा वर्ष, "बाबा तु चित्र नाही काढलस परिक्षेत तरी चालेल पास करतो" असा सल्ला नेमानी दिलेला आहे =))

३डी चित्र एकदम भन्नाट आहे :)

mayurpankhie's picture

8 Apr 2015 - 11:41 am | mayurpankhie

३ डी स्केच एक नंबर ....

एस's picture

8 Apr 2015 - 12:22 pm | एस

मस्त. खूप छान!

स्पा's picture

8 Apr 2015 - 12:31 pm | स्पा

सुरेखच आहेत चित्रे

किसन शिंदे's picture

8 Apr 2015 - 12:58 pm | किसन शिंदे

थ्रीडी जबराट आलेय. ती कोर्‍या कागदावरची चित्रेही पटापट येऊ द्या.

एक एकटा एकटाच's picture

8 Apr 2015 - 1:04 pm | एक एकटा एकटाच

लास्ट वालं एकदम झक्कास

थ्रीडी आवडलं. आता मी पण अपलोड करावी का चित्रं असा विचार करतोय. ;)

शब्दबम्बाळ's picture

8 Apr 2015 - 5:57 pm | शब्दबम्बाळ

सगळ्यांचे खूप खूप आभार! :)

नगरीनिरंजन's picture

8 Apr 2015 - 7:47 pm | नगरीनिरंजन

३डी कल्पक आहे. सगळीच आवडली.

हर्शरन्ग's picture

8 Apr 2015 - 10:07 pm | हर्शरन्ग

चित्रे चांगली जमताहेत … सराव चालू राहूदे :)
३d चित्र छान आहे.
एक सांगावस वाटत - चित्रांचे फोटो तिरके किवा थोडे बाजूने काढण्यापेक्षासमोरून काढलेत तर आम्हाला सुद्धा ते व्यवस्थित दिसतील.

मॅक's picture

15 Apr 2015 - 2:36 pm | मॅक

अप्रतिम.......

सौरभ उप्स's picture

19 Apr 2015 - 2:52 am | सौरभ उप्स

छानच