सुगंधा - भाग १

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
6 Apr 2015 - 5:45 pm

"तुने साथ जो मेरा छोडा दिवाना तेरा मर जायेगा..........." दुरवर संध्याकाळच्या कातरवेळेत अमोघच्या कानावर हे सुर पडत होते आणि तो आणखीनच भावनात्मक झाला. तिला विसरणे खरंच इतके अवघड होते? का? ती जेव्हा आपल्या आयुष्यात नव्हती तेव्हा आपण जगत नव्हतो तिच्या आधी आपल्या आयुष्यात कुणी दुसरी होती असेही नाही. मग ? आपल्याला तिची सवय लागलीये? तिचं सतत समोर राहणं आपल्याला खलायचं, तिचं वागणं , बोलणं , हसणं खिदळणं सर्वच नावडतीचं मीठ अळणी असल्यासारखं वाटायचं , मग आता असं झालय तरी काय आपल्याला, का ती सारखी डोळ्यासमोर दिसते? का तिच्या बांगड्यांचा आवाज कानात घुमतोय. तिची बडबड ऐकण्यासाठी जीव वेडापिसा झालाय?

हळुहळु अमोघ भुतकाळाच्या गाठी सोडण्यात गुंग होउन गेला. अमोघ दिसायला अगदी राजकुमार, गोरापान रंग, उंची ही साजेशी, शिडशिडीत बांधा कुणीही पाहुन प्रेमात पडावं असाच, स्वभाव ही लाखात एक, मित्रांना तर हेवा वाटायचा, या राजकुमाराला एखादी राजकुमारीच मिळेल हे सर्वांनाच वाटायचं, अमोघला राजकुमारी नको होती पण त्याच्या तोडीस तोड असलेली मुलगी हवी होती जी त्याच्या शिक्षण , स्टेटस ला शोभेल, खुप सुंदर नको पण चारचौघात स्वतःच व्यक्तिमत्व खुलवणारी हवी होती. लग्नासाठी बर्‍याच मुलींना नकार दिल्यावर अमोघच्या वडीलांच्या मित्राने पानसे काकांनी तिचं स्थळ सुचवलं, म्हणाले मुलगी अतिशय सालस आणि लाघवी आहे , हा दिसण्यात थोडी कमी पडेल पण कर्तुत्वात तर नक्की उजवी आहे, आईवडीलांविना वाढलेली पोर आहे त्यामुळे सासु - सासर्‍यांना अगदी आईवडीलांप्रमाणे मान देईल अस जवळ जवळ काकांनी आईवडीलांच्या मनात ठसवलंच, झालं हे ऐकल्याचा अवकाश आईवडील तर मागेच लागले पाहुन घे पाहुन घे. आई-वडीलांच्या इच्छेखातर अमोघ तयार झाला. तिला पाहायला जायचे तो दिवस ठरला आणि आईबाबांना घेउन अमोघ गावी आला.

न्याहारी करुन, थोडी झोप काढुन सर्वांनी प्रवासाचा शीण घालवला आणि संध्याकाळी ४ वाजता भेटण्याची वेळ ठरवली. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळेत तिच्या मामाच्या घरी सर्वजण पोहोचले. स्वागत झाल्यावर तिचा मामा तिची माहीती देउ लागला, लहान पणीच तिचे आईवडील अपघातात वारले तेव्हा पासुन ती इथेच राहते, सोशल वर्क मधे तिने मास्टर्स केलंय आणि गावाजवळच्याच एका एन.जी.ओ. मध्ये ती काम करते , हे ऐकुन अमोघ अमोघच्या आईने तिला पाहण्याची ईच्छा प्रदर्शित केली आणि ती हातात चहाचा ट्रे घेउन आली. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या, मुलगी तशी काळीसावळीच पण ओठाजवळचा भाग थोडा वाकडा होता आणि ते व्यंग जाणवण्याइतपत ठळक होतं, पाहता क्षणीच स्थळ दाखवणार्‍या पानसे काकांवर अमोघला अतिशय राग आला, मी काकांचा काय वाईट केलंय की त्यांनी मला असे स्थळ दाखवावे असे त्याच्या मनात आले, अमोघ च्या आईला तर काय बोलु हे ही सुचत नव्हते. तिचा रंग, शिक्षण या बद्द्ल अमोघला आक्षेप नव्हता पण अशी व्यंग असलेली मुलगी आपल्याला दाखवण्यात यावी हे अमोघला अपमानकारक वाटु लागले. तिच्या मामाला सर्वांचे चेहरे पाहील्यावर ही गोष्ट लगेचच लक्षात आली तो वर मामाने तिच्या नावे असलेल्या १०० एकर जमीनीचा व तिच्या इतर प्रॉपर्टीचा पाढा वाचायला सुरुवात केली आणि अमोघ च्या आईवडीलांना तिच्यातले व्यंग दिसेनासे झाले. मामांनी अमोघला तिच्याशी बोलायचे सुचवले तितक्यात अमोघच्या बाबांनी त्यांना मुलगी पसंत आहे आणि आता काही विचारायची गरज नाही सर्वच तर मामांनी सांगितले आहे असे सांगुन अमोघची आणि तिची भेट टाळली. अमोघचा तर त्याच्या आईवडीलांवर विश्वासच बसत नव्हता.

थोड्याच वेळात मंडळी निघाली आणि अमोघने तर निघताना तिच्याकडे वळुन सुद्धा पाहिले नाही पण बाबांच्या डोळ्यातली जरब अमोघला खुप काही सांगुन गेली. पानसे काका बरोबरच असल्याने घरी आल्यावर धुसफुसतच अमोघ मागच्या वाड्याजवळ असलेल्या तलावजवळ निघुन गेला. आई - बाबा आणि पानसे काकांनी विचारविनिमय करुन एका महीन्यातच लग्नाची तारीख ठरवली , अमोघला समजावण्याची जबाबदारी आईने स्वतःवर घेतली. अपमानाचा ओघ ओसरल्यावर अमोघ घरी आला तेव्हा चांगलेच अंधारले होते, त्याला घरात जायची इच्छाच होईना, ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसुन तो विचार करु लागला. गावी दिवे लागणीची वेळ म्हणजे काही वेगळ्चं , सर्वजण आपापल्या घरी , रस्ता सामसुम. एक अनामिक हुरहुर अमोघला जाणवु लागली, एकदम एकटे पडल्याची जाणीव, अशा साथिदाराबरोबर भविष्य कसे असेल , आपल्याला लोकं काय म्हणतील, आपण काय इतके नागुजरे होतो की आपल्याला अशी मुलगी मिळावी? आपल्यात असे काय व्यंग आहे की आपल्याला अशा मुलीशी लग्न करण्यासाठी आपलेच आईवडील जबरदस्ती करतील असे नाना प्रश्न अमोघच्या डोक्यात नाचु लागले. तेवढ्यात आई जेवणासाठी अमोघला बोलवायला आली. "अमोघ... बाळा जेवायला येतोस ना...?" अमोघ लागलीच दचकला आईला पाहुन नेमके काय बोलावे हे त्याला कळलेच नाही पण त्याचा रागावलेला चेहरा आईने लगेच ओळखला आणि त्याला मनवायला सुरुवात केली. "हे बघ बाळा, तिच्या थोडेफार व्यंग असले तरीही ती मुलगी सुशिक्षित आणि संस्कारी आहे बरं, तिचा स्वभाव अतिशय मनमिळाउ आहे , सर्वांना, आम्हाला आणि तुला देखील संभाळुन घेईल, काही कमी पडलं तरीही काही तक्रार करणार नाही." हे ऐकल्यावर अमोघचा पारा आणखीनच चढला , "आई , हे तु बोलत नाहीयेस , तिची प्रॉपर्टी बोलतीये, तुम्ही माझे सख्खे आई-वडील असुन माझ्याशी असे कसे वागु शकता?? हे बोलताना अमोघचा आवाजही चढला होता ते ऐकुन अमोघचे वडील बाहेर आले. ते म्हणतील ती पुर्वदिशा असल्याने अमोघकडे काहीच पर्याय उरला नाही आणि त्याने नाखुषीनेच लग्नाला संमती दिली. दुसर्‍या दिवशी मंडळी पुण्याला परतली.

एका महीन्यात शुभ मंगल सावधान करुन वर्‍हाडी मंडळी लगेचच पुण्यात निघुन आली. तिला मिळालेला माहेरचा आहेर पाहुनच आई खुष झाली होती. घरी आल्या आल्या शेजार पाजारचे लोक तिला पाहायला आले आणि कुजबुजु लागले तशी अमोघच्या मनात आणखीनच अढी बसु लागली. घरात पुजा आटोपल्यावर कुलदेवतेचे दर्शन घेउनच नव्या संसाराला सुरुवात करा असे बाबांनी सांगितले आणि तशी तयारी केली सुद्धा , आतापर्यंत सर्व आजुबाजुला असल्याने अमोघला काही जाणवत नव्हते पण कुलदेवतेच्या दर्शनाला जायचे म्हणजे दोघे एकत्र फीरणं आणि सोबत राहणं ये अपरीहार्य आहे हे अमोघच्या लक्षात आले. तिच्याशी कसे वागावे या संभ्रमात तो पडला नाही म्हंटले तरी लग्न तर सर्वांच्या साक्षीने केले होते त्यामुळे काही वावगे वागुनही चालणार नव्हते, तिला जर तु मला पसंत नाहीस असे सांगितले व हे तिने जर बाबांना सांगितले तर बाबांनी आणखी दबाव आणला असता , काय करावे या वंचनेत असतानाच गाडीत ती अमोघच्या शेजारी बसली आणि अमोघला आणखी संताप आला. सर्वांचा निरोप घेउन प्रवासाला सुरुवात झाली आणि अवघडलेल्या तिने हळुहळ गप्पा मारायला सुरुवात केली. "सुट्टी कीती दिवसांची आहे??" हा प्रश्न अमोघला अपेक्षितच नव्हता , तिचे तोंड जरी वाकडे असले तरीही आवाज अगदी व्यवस्थित होता, "अजुन ८ दिवस ओढता येईल कारण आधीच एक महीना सुट्टी घेउन झालीये पण लग्नासाठी म्हणुन मॅनेजमेंट ने कंसिडर केलंय." मग तीच्या प्रश्नांच्या भडीमारात आणि प्रवासाच्या शिणाने अमोघला केव्हा झोप लागली ते कळालंच नाही. जाग आली तेव्हा गाडी जवळपास कोल्हापुरला पोहोचली होती. मावशीच्या घरी जाउन फ्रेश झाल्यावर जेवण आटोपुन सकाळीच महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे ठरले.

सकाळीच उठुन महालक्ष्मीचे दर्शन झाले आणि मावशीने ज्योतिबाच्या दर्शनाला जायचा घाट घातला, गाडी तर होतीच त्यात नवविवाहीत जोडपे , मावशी, मावशीचा मुलगा असे ज्योतिबाच्या दर्शनाला निघाले, तीने सांगितले की ती पहिल्यांदाच कोल्हापुरात आलीये तशी मावशी म्हणाली अजुन २ दिवस रहा म्हणजे नरसोबाची वाडी ही करुन टाकु पण तिनेच उत्तर दिले की ह्यांना सुटटी नाहीये, अमोघला बरेच वाटले. थोड्या वेळात सर्वांना झोप लागली अचानक समोरुन दुसरे वाहन येउन अमोघ बसलेल्या ठीकाणी एका बाजुने जोरदार गाडीवर धडकले, अमोघला पायाला जबरदस्त मार बसला आणि मानेला झटका बसल्याने त्याची मान हलेना एका जागीच अडकली, बाकीच्यांना जुजबी मार बसला, लगेचच तीने दुसर्‍या वाहनांना थांबवुन मदत मागितली व ताबडतोब अमोघला इस्पितळात हलवण्याचा बंदोबस्त केला. अमोघला शारीरीक आणि मानसिक धक्क्या पेक्षा आश्चर्याचा धक्का बसला होता तो म्हणजे तीचे हजरजबाबीपणे वागणे, अपघाताच्या धक्क्यातुन लगेचच सावरुन तिने पटकन हालचाल करुन त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले, न घाबरता न बावरता.

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

छान लिहिलं आहेस.पुभाप्र.

एक एकटा एकटाच's picture

6 Apr 2015 - 8:15 pm | एक एकटा एकटाच

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

मनिमौ's picture

6 Apr 2015 - 9:05 pm | मनिमौ

पुभाप्र

सुरुवात मस्त झाली ! लवकर टाक पुढचा भाग.

कविता१९७८'s picture

6 Apr 2015 - 11:25 pm | कविता१९७८

धन्यवाद

सुरुवात आवडली, पण पुढे काय असेल त्याचं पुसट चित्र पण उभं राह्यलं.

खटपट्या's picture

7 Apr 2015 - 3:17 am | खटपट्या

हेच म्हणतो...

सानिकास्वप्निल's picture

7 Apr 2015 - 1:07 am | सानिकास्वप्निल

सुरुवात छान झालिये, वाचतेय.

किसन शिंदे's picture

7 Apr 2015 - 5:31 am | किसन शिंदे

आवडलं, पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2015 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2015 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

के.पी.'s picture

7 Apr 2015 - 7:02 am | के.पी.

प. भा. मस्त. पु. भा. प्र.

एस's picture

7 Apr 2015 - 7:56 am | एस

पुभाप्र!

प्रीत-मोहर's picture

7 Apr 2015 - 8:04 am | प्रीत-मोहर

आवडली सुरवात. पुभाप्र. मस्त लिहतीयेस कविता

स्पंदना's picture

7 Apr 2015 - 8:11 am | स्पंदना

मस्तच कविता!!
येउदे पुढचा भाग.

पॉइंट ब्लँक's picture

7 Apr 2015 - 8:14 am | पॉइंट ब्लँक

सुरुवात मस्त. "दम लगाके हैशा" ची आठवण झाली. :)

नाखु's picture

7 Apr 2015 - 9:00 am | नाखु

पु भा प्र.

पियुशा's picture

7 Apr 2015 - 10:24 pm | पियुशा

भारिच लिवल्स की ग :)

कुठल्या भागात घडतेय ही गोष्ट? लँड सिलिंग वगैरे काय नाय का या लोकांना?

एक व्यक्तीच्या नावावर १०० एकर जमीन!!!