लेह लदाख मोटरसायकल फेरी - फोटो

खंडेराव's picture
खंडेराव in भटकंती
31 Mar 2015 - 2:55 pm

२०१४ च्या ऑगस्ट मधे मी, बायको, मित्र, त्याची बायको अशा चार लोकांनी स्वतः प्लॅन करुन जम्मु- ष्रीनगर-द्रास-कारगिल-लामायुरु-लेह-नुब्रा-पॅन्गाँग-सर्चु-मनाली-चंदीगड अशी ३०००+ किमीची फेरी केली.

आमच्या गाड्या अफाट होत्या. एक ११० सिसी सुझुकी हयाते आणि एक १३ वर्ष जुनी पल्सर १५०. ११० सिसी वर दोन माणसे ( एक १०० किलो - मी ), १५ दिवसाचे सामान घेउन ही फेरी करणारे बहुधा आम्ही भारतातले पहिलेच.

वेगळाच अनुभव..स्वत:ला नव्याने ओळखले. काही फोटो.

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14

प्रतिक्रिया

स्पा's picture

31 Mar 2015 - 3:02 pm | स्पा

जबराट आलेत फोटो

सूड's picture

31 Mar 2015 - 3:08 pm | सूड

+१

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 4:05 pm | खंडेराव

स्पा आणि सुड!

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 3:20 pm | टवाळ कार्टा

भन्नाट फोटो आहेत...मला पुढच्या वर्षी करायची आहे लेहवारी....आहेत का कोणी मिपाकर तयार?

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 3:27 pm | खंडेराव

कोणी असेल तर बेश्ट, नसेल तर अगदी २-४ जण, किवा एकट्यानेही करा..सॉलिड अनुभव. १५ दिवसात मन भरले नाही, परत जाईल लवकरच.

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 3:30 pm | टवाळ कार्टा

एकटे जाणे शक्यच नै....मित्रमंडळींशिवाय ट्रिपला मज्या नै

गणेशा's picture

31 Mar 2015 - 5:09 pm | गणेशा

प्रथमता मस्त फोटो .. अआणि आनखिन सविस्तर व्रूतांत पाहिजे अशी अपेक्षा.

दुसरी गोष्ट ..
पुढच्या वर्षी म्हणजे २०१६ ला ?
मी तयार आहे . या वर्षीच बेत आखत होतो पण काही जमेल का नाही ते सांगता येत नाही. काल- प्ररवाच रोल ऑफ घेतला आहे, पुणे लोकेशन साठी त्यामुळे.

२०१६ पर्यंत बुलेट घ्यावी काय हा विचार करतोय .. अपाची १५० बरीच जुनी झालेली आहे

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 5:23 pm | टवाळ कार्टा

तुमचा मो.नं. व्यनी करा

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 5:25 pm | टवाळ कार्टा

२०१६ ला बुलेट मिळायला ती आत्ता बुक करायला हवी :)

कपिलमुनी's picture

31 Mar 2015 - 4:08 pm | कपिलमुनी

मी आहे तय्यार !

तोवर 'लेह' वारी पुन्हा वाचायला हवी :)

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 4:33 pm | टवाळ कार्टा

मुनिवर नक्की का?

कपिलमुनी's picture

31 Mar 2015 - 4:45 pm | कपिलमुनी

आतापासून मिपाचे बाईक कट्टे केले पाहिजेत.

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 5:23 pm | टवाळ कार्टा

तुमचा मो.नं. व्यनी करा

ब़जरबट्टू's picture

6 Apr 2015 - 10:32 am | ब़जरबट्टू

लय इच्छा आहे बघा.. पण जल्ला योग येत नाहे.. :( मी येतोच...

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Mar 2015 - 3:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

फोटो जबरदस्त आले आहेत.

शेवटच्या फोटोच्या ठिकाणी ३ इडियट मधला शेवटचा प्रसंग चित्रित झाला होता का?

रॉयल एनफिल्ड बरोबर घेतली नसती तर पाठीवरचे ओझे बरेच कमी झाले असते.

पैजारबुवा,

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 4:04 pm | खंडेराव

हे पॅन्गॉंग सरोवर. इथेच ते चित्रिकरण झाले होते.

एनफिल्ड आमची नाही, फक्त फोटो काढला :-) आमच्या हयाते आणि पल्सर होत्या.
एकुण, लहान जपानी गाड्या सोप्या वागवायला आणि भरोसेमंद असे मत झाले काही लोकांचे हाल बघुन.

कपिलमुनी's picture

31 Mar 2015 - 4:13 pm | कपिलमुनी

डिट्टेल वर्णन येउ द्या की !

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 9:57 pm | खंडेराव

पण फारच लांबलचक आहे, लिहायचा कंटाळा आणि अजुन हात साफ होतोय मराठी कळफळीवर

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 4:31 pm | टवाळ कार्टा

बुलेटवाल्यांचा माज उतरतो हत्ती रस्त्यात रुतला की :)

टवाळ कार्टा's picture

31 Mar 2015 - 6:07 pm | टवाळ कार्टा

रॉयल एनफिल्ड बरोबर घेतली नसती तर पाठीवरचे ओझे बरेच कमी झाले असते.

संदर्भासहित स्पष्टिकरण द्या :)

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 10:02 pm | खंडेराव

चुभुद्याघ्या, माझा अनुभव

लदाखमधे सर्व मोटारसायकलस्वार पास होताना हात देतात, हसुन बघतात. पण बुलेटवाले काय भाव देत नाहीत इतरांना. बाकी १०० मधे ८० हात करतात, बुलेटवाले प्रमाण उलटे. यातुन अभारतीय बुलेटस्वार वगळा, ते मस्तपैकी विक्टोरी साइन देतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Apr 2015 - 9:14 am | ज्ञानोबाचे पैजार

जाउद्या हो,

बुलेट वाले असतातच कुजकट.

पैजारबुवा,

बरे झाले सांगीतलेत. आता बुलेट घेतली की कुजकट वागावे लागणार... :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Apr 2015 - 9:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुजकटपणा असल्याशिवाय बुलेटचं बुकिंग घेत नाहीत. =))

कपिलमुनी's picture

1 Apr 2015 - 3:02 pm | कपिलमुनी

बहुधा पैजारबुवांना अत्यंत वाईट्ट 'अणुबव' आलेला दिसतोय किंवा ही आंबट द्राक्षे असावीत ;)

पॉइंट ब्लँक's picture

31 Mar 2015 - 4:19 pm | पॉइंट ब्लँक

जबरदस्त फोटो आले आहेत :)

वेल्लाभट's picture

31 Mar 2015 - 4:19 pm | वेल्लाभट

खंडेराव !
जय देवा जय देवा जय देवा जय देवा
जय देवा जय शिव मार्तंडा
लेह लडाखची सवारी
फोटो आवडेश प्रचंडा

पण खूप कमी टाकलेत फोटो. आणि वर्णन???
असं कसं चालेल?

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 10:07 pm | खंडेराव

वेल्लाभट :-)

फोटो टाकतो अजुन..आणि लिहायचाही प्रयत्न करतो..

लडाख वेड आहे अगदी. एक अगम नावाचे गाव लागते वारी पासला जाताना. काय रस्ता, नदीमधुन जातो. असे वाटते, १० दिवस मस्त बसुन रहावे तंबु ठोकुन...

प्रचेतस's picture

31 Mar 2015 - 4:35 pm | प्रचेतस

मस्त फोटो

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2015 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा व्वा... लै लै भारी फोटू... आणि मधे ते शोतुशं गोंदुश फुल तल लै गोड.

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 10:10 pm | खंडेराव

इतकी गोड होती, आमचा १० तास गाडी चालवायचा थकवा पळाला :-) आईच्या पाठीवर बसुन आलीहोती..

यशोधरा's picture

31 Mar 2015 - 6:01 pm | यशोधरा

अरे वा! मस्त फोटो! वर्णन?

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Mar 2015 - 6:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर फोटो !

जुइ's picture

31 Mar 2015 - 10:08 pm | जुइ

खूप सुंदर फोटो!!!

यसवायजी's picture

31 Mar 2015 - 10:47 pm | यसवायजी

क्या ब्बात्त!!

मदनबाण's picture

1 Apr 2015 - 4:56 pm | मदनबाण

लयं भारी ! अजुन फोटु हवेत...
देवा रवळनाथा माका कधी लेह लडाख चो ट्रिप घडनार ते जरा स्वप्नात येउन सांग रं महाराजा ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

फोटो खुपच अप्रतिम आहेत.......
माझी पण खूप ईच्छा अआहे बाईक वरून फिरण्याची पण आपल्याला झेपेल की नाही म्हणून कधी प्रयत्न केला नाही.

खंडेराव's picture

6 Apr 2015 - 9:30 am | खंडेराव

यशोधरा, इस्पिकचा एक्का, जुइ, यसवायजी, मदनबाण, मॅक!

मॅक : नक्की जमेल..थोडीशी शारिरिक आणि मानसीक तयारी असेल तर बिलकुल अवघड नाही.

मदनबाण : या वर्षी करा की प्लॅन ऑगस्ट सप्टे. मधे, उत्तम महीने तिथे फिरायला.

उमा @ मिपा's picture

13 Apr 2015 - 1:04 pm | उमा @ मिपा

खूप छान फोटो!
वर्णन लिहाच.

किसन शिंदे's picture

14 Apr 2015 - 1:08 am | किसन शिंदे

वाह! सगळेच फोटो अतिशय जबर आले आहेत.

स्पावड्या जायचं का लेहला...बाईकवरून? ;)

अकिलिज's picture

15 Apr 2015 - 5:59 pm | अकिलिज

जून्या लडाख वारीची आठवण झाली. सडाफटींग होतो म्हणून शक्य झाले होते. आता लटांबर सोडेल की नाही माहीती नाही.
बुलेटपेक्षा पल्सर बरी हेच मत आहे. खासकरून ओढे ओलांडताना बुलेट दगडगोट्यांना अडकते.