किन्नर - बृहन्नडा

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
26 Mar 2015 - 10:28 pm
गाभा: 

किन्नर बृहन्नडा किंवा मुंबईच्या भाषेत हिजडे किंवा छक्के ...

अलीकडे ह्यांचा वावर ठाण्यातील विशिष्ट भागांमध्ये फारच वाढला आहे (किंवा निदांन मला तसे वाटते आहे)...

त्यांच्या बीभत्स दर्शनापलीकडे त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघण्याची आणि जाणून घेण्याची इच्छा आहे आणि म्हणून हा धागा ...

१. हे लोक काही पुरुषी स्त्रिया आणि बायकी पुरुष ह्यांच्यापेक्षा किंवा सामान्य स्त्री किंवा पुरुषांपेक्षा नेमके काय वेगळे असतात ...
२. ज्या स्वरुपात ते सतत लोकांसमोर येतात ते तसे का ?
३. भारता बाहेर हे लोक्स दिसत नाहीत हे कसे ?

कुणी ह्यावर गंभीरपणे सत्य सांगू शकेल का ?

प्रतिक्रिया

हे लोक भारताबाहेर असतात. सर्व जगात असतात. फरक फक्त एवढाच की भारतासारखे ते बाकी देशात भिक मागत फिरत नाहीत. कदाचित त्यांना बाकीच्या देशात मानाची वागणूक मिळत असावी जी भारतात मिळत नाही.

"ते" आपल्यापेक्षा शरीराने वेगळे कसे असतात हे नेट्वर शोध घेतल्यास कळेल. आंतरजालावरील लिंक्स मी काही कारणास्तव इथे देउ शकत नाही.

hitesh's picture

27 Mar 2015 - 11:46 am | hitesh

सहमत

अरे देवा चक्क हितेसभाय सहमत...

होबासराव's picture

27 Mar 2015 - 12:32 pm | होबासराव

हितेसभाय ला काल बोप्पोरमंदि आमि री॑क्वेस्ट केला असेन्..ते त्याने सिरेसलि घेत्ले हे चोक्कस..
ttp://www.misalpav.com/comment/681276#comment-681276

टवाळ कार्टा's picture

27 Mar 2015 - 12:12 pm | टवाळ कार्टा

भारताबाहेरसुध्धा फार जास्त चांगली वागणूक मिळते असे नाही....शेवटी माणूस हा प्राणी आहे हे दाखवून देणारे सगळीकडे असतात

साती's picture

27 Mar 2015 - 11:56 am | साती

'एका किन्नराची ट्रान्सफर ' ही माझ्याच एका कथेची लिंक देते.
यात वरिल बर्‍याच प्रश्नांची उत्तरे आहेतः
http://vishesh.maayboli.com/diwali-2013/1362

रिक्षा ;)

अत्रन्गि पाउस's picture

27 Mar 2015 - 12:41 pm | अत्रन्गि पाउस

धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Mar 2015 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

अतिशय सुंदर कथा आहे !

किनाराच्या करूण कथेच्या पार्श्वभूमीवर केलेले हाऊसमन उर्फ ज्युनियर रेसिडेंटच्या जीवनाचे प्रत्यक्षदर्शी वर्णनही खूप आवडले. हा दुवा तुम्ही "डॉक्टरची फी" या लेखाच्या प्रतिसादातही द्यायला हवा होता असे वाटले.

गिरकी's picture

27 Mar 2015 - 12:47 pm | गिरकी

:(

बाकी अशा लोकांना मानाने वागणूक देण्याबद्दल वर प्रतिसाद आहे तर सांगायला अभिमान वाटतो की माझे हापिस भारतात असूनही इथे अशा लोकांना नोकरी देण्याची पॉलिसी आहे (कदाचित एमएनसी असल्याने असेल) आणि अशा २ जणी मी माझ्या हापिसात पाहिल्या आहेत. त्या टेक्नोलॉजी मध्ये आहेत की इतर कशात ते माहित नाही पण कॅन्टीन मध्ये इतर माणसांच्या ग्रूप सोबत जेवायला बसतात आणि गप्पा मारत असतात तेव्हा भारतातला समाज हळू हळू सुधारतोय आणि प्रमाण कमी असलं तरी अशांना सामान्य माणसांमध्ये सामान्य रितीने वावरता येतंय हे बघून बरं वाटतं. पण अशांच्या बद्दल चर्चा होतेच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 12:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी पुर्वी जेव्हा कॉलेजला ट्रेननी अप-डाउन करायचो तेव्हाची गोष्ट. नेहेमीच्या ठरलेल्या डब्यामधे एक गृप कायम पत्ते कुटत बसलेला असायचा. आणि त्याच डब्यानी एक तृतीयपंथी व्यक्ती सुद्धा नेहेमी नीटनेटक्या साडीमधे प्रवास करत असे. त्यावेळी लोकं त्या व्यक्तीकडे आठ्या घालुन बघत असतं. बाकी नेहेमी तृतीयपंथी भिकारी लोकं डब्याडब्यात घुसुन भीक वसुल (होय वसुलचं) करायचे त्यावेळी ही व्यक्ती मात्र शांतपणे आपल्या उतरायच्या ठिकाणाची वाट पहात असे. ह्या पत्ते खेळणार्‍या गृपनी एकदा त्या व्यक्तीला बळजबरीनी डब्यातुन उतर वगैरे प्रयत्न केलेला तेव्हाचे त्या व्यक्तीचे उद्गार माझ्या व्यवस्थित लक्षात आहेत.

ते छक्के टोळीनी भीक मागतात त्यांना तुम्ही दबुन भीक घालता. मी एका आर्किटेक्टकडे कामाला जाते. कष्टाच्या कमाईवर जगते तर तुम्ही मला त्रास देताय. सगळेजण अवाक होउन गप्प झाले. नंतर नंतर मात्र त्या व्यक्तीची सवय होउन गेली. एखादा दिवस नसेल तर आवर्जुन चौकशी होऊ लागली. एके दिवशी एका कॉलेजकुमाराला कशालातरी पैसे कमी पडत होते तर त्या व्यक्तीनी स्वतःच्या पर्समधुन १५० रुपये काढुन दिलेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Mar 2015 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

समाज आपल्यासारख्या सज्जन माणसांमुळे'च' टिकून आहे असा (गैर)समज असलेल्या लोकांच्या पूर्वग्रहदूषित व्यवहाराचा उत्तम नमुना !

'पिंक' पॅंथर्न's picture

27 Mar 2015 - 1:30 pm | 'पिंक' पॅंथर्न

सार्जनिक सुलभ शौचालय वापरते वेळी अशा व्यक्तींना ब-याचदा कुचंबना सहन करावी लागते.

मी अंधेरीला एका सार्वजनिक शौचालयात असा प्रसंग डोळ्याने बघितला आहे. एक साडी घातलेली तृतीय पंथी व्यक्ती तेथे आली होती. पण त्या सुलभ शौचालयाचा चालक त्याला स्त्रियांच्या शौचालयात जावू देत नव्हता आणि ती व्यक्ती कदाचित साडी वगैरे घतलेमुळे पुरुष शौचालयात जाण्यास तयार नव्हती. बरीच वादावादी झाली अखेर त्या व्यक्तीने शौचालयाच्या बाहेरच एका कोप-यात विधी उरकला.

सांगायचे तात्पर्य हेच की अशा व्यक्तींबाबत मानसिकता बदलण्या बाबत आपल्याला अजून बराच लांबचा टप्पा गाठायचा आहे.

"मी हिजडा, मी लक्ष्मी" हे लक्ष्मीनारायण त्रिपाठी चे पुस्तक जरूर वाचा.(शब्दांकनः वैशाली रोडे)

अत्रन्गि पाउस's picture

10 Apr 2015 - 7:24 pm | अत्रन्गि पाउस

धन्यवाद !!

चाणक्य's picture

10 Apr 2015 - 8:30 pm | चाणक्य

प्रत्येकाच्या डोळ्यात सणसणीत अंजन घालणारं पुस्तक आहे हे. लक्ष्मीचं आंतरराष्ट्रीय स्तरावरही ईतक्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे हे पुस्तक वाचेपर्यंत मला.ठाऊक नव्हतं.