संस्कृत सुभाषिते

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
21 Mar 2015 - 9:20 pm

आजपासून काही संस्कृत सुभाषितांचा परिचय करून देण्याचा विचार आहे. घाबरू नका. ही शाळेत शिकलात तशी "नीतीशतका"तील उपदेशात्मक नसतील. आपले मनोरंजन नक्कीच करतील याचा भरोसा देतो.
मागे आपण आदीमाता व शिवशंभू यातील संवाद पाहिला होता (आठवत नाही ? ह्ररकत नाही. ही लिन्क http://www.misalpav.com/node/24338) त्यांच्याच संसारातील एक पर्व. शंकराने हालाहल कां प्राशन केले ? एक शक्यता

अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्त: फणी
तं च् क्रौञ्चपते:शिखौ; स गिरिजासिंहोऽपि नागाननम् !!
गौरी जन्हुसुतामसूयति कलानाथं कपालानलो
निर्विण्ण:स पपौ कुटुम्बकलहादीशोऽपि हालाहलम् !!

शंकराच्या गळ्यातला भुकेला नाग गणपतीचे वाहन असलेल्या उंदराला खाऊं इच्छित आहे. पण नागाचेही काय खरे नाही. कार्तीकेयाचे वाहन जो मोर तो नागाला गिळंकृत करावयास टपलेला आहेच. पार्वतीचे वाहन सिंह, त्याचे लक्ष गणपतीचे डोके असलेल्या हत्तीकडेच लागलेले. पार्वती गंगेचा मत्सर करत आहे तर कपाळावरचा अग्नी चंद्राचा ! बोला. असल्या गृहकलहाला वैतागलेला "महादेव" हालाहल पिणार नाही तर काय करणार ?

कवींनी आदीमातेला काशीपुराधिश्वरी का केले ? तिची प्रार्थना करतांना "भिक्षां देही कृपावलंबन करि माताअन्नपूर्णेश्वरी" असे कां म्हटले ? अगदी साधे कारण. त्यांनी शंकराच्या घरांत डोकावून पाहिले, काय दिसले तेथे ?

स्वयं पंञ्चमुख: पुत्रौ गजाननषडाननौ
दिगंबर: कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे ? !!

घरांत खाणारी तोंडेच जास्त हो. स्वत: घरधनी पंचमुखी, दोन मुले; त्यातील एकाला तोंड हत्तीचे तर दुसर्‍याला सहा तोंडे आणि त्यात भर घालावयाला हा गृहस्थ दिगंबर ! आता घरात "अन्नपूर्णा" आहे म्हणूनच संसार चालला आहे नां !!

शंकराचा निवास पृथ्वीवर. तेव्हा कवींनी त्याच्या घरांत जास्त वेळा डोकवावे हे उचितच पण म्हणून क्षीरसागरातील विष्णूची सुटका झाली असे समजू नका. जगन्नाथपुरीच्या देवळातील विष्णूची मूर्ति लाकडाची आहे. का बरे ? उत्तर कवींकडेच मिळणार

एका भार्या प्रकृतिमुखरा चञ्चला च द्वितीया
पुत्रस्त्वेको भुवनविजयी मन्मथो दुर्निवार: !!
शेष: शय्या शयनमुदधौ वाहन: पन्नगारि:
स्मारं स्मारं स्वगृहचरितं दारूभुतो मुरारि: !!

या "वैभवभूषित वैकुंठेश्वर" गृहस्थांचेही हाल काही कमी दिसत नाहीत. एक बायको, सरस्वती, ती बडबडी, दुसरी लक्ष्मी, ती चंचल. एक मुलगा, मदन, तो सर्व जगाला जिंकण्याचा उपद्व्याप करीत बसलेला, झोपायाला शय्या कसली ? ती शेष नागाची, शयनमंदिर म्हणजे समुद्र व वाहन नागांचा शत्रु गरुड ! हे ग्रुहसौख्य आठवून आठवून विष्णूने "काष्टवत" होणेच पत्करले. त्रिखंडात कोठेही जा (बिचार्‍या) नवर्‍याचे नशिव साले फुटकेच.
असो या घ्ररच्या कटकटींना जरा बाजूला ठेवून जरा हलकेफुलके बघु या.

मराठीत छेकापन्हुतीवरच्या लेखावरील (http://www.misalpav.com/node/15896 ) प्रतिसादात श्री बॅटमन यांनी संस्कृतमधील उदाहरणाबद्दल विचारले होते. आज एक उदाहरण देतो. बदल म्हणून कै.ल.गो.विंझे यांनी केलेला काव्यानुवाद देत आहे.

या पाणिग्रहलालिता, सुसरला, तन्वी, सुवंशोद्भवा
गौरी, स्पर्शसुखावहा, गुणवती, नित्यं मनोहारिणी !!
सा केनापि हता; तया विरहितो गन्तुं न शक्तोऽस्म्यहं
रे भिक्षो ! तव कामिनी ? न हि न हि ! प्राणप्रिया यष्टिका! !!

"जी हस्ते कुरवाळिली,सरल जी तन्वी सुवंशातली
गौरी, अन् गुणवान्, मनोहर सुखस्पर्शा सदा लाभली
नेली ती कुणिशी ! तिच्याविण न मी जाऊं शके सत्वर !"
"कां भिक्षो ! तव कामिनी ?" " नच तसें, काठी प्रिया सुंदर !"
( या वेळी संस्कृत शब्दांचे अर्थ दिलेले नाहीत. गरज आहे कां?)
आज इथेच थांबू.
शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Mar 2015 - 10:42 pm | पैसा

सगळीच सुभाषिते जाम मजेशीर आहेत! शंकराच्या गृहकलहाबद्दलचे आणि अन्नपूर्णेबद्दलचे माहीत होते. पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

प्रचेतस's picture

21 Mar 2015 - 11:09 pm | प्रचेतस

मस्त सुभाषिते.

विवेकपटाईत's picture

22 Mar 2015 - 1:27 pm | विवेकपटाईत

मस्त, मजा आली.

तिमा's picture

22 Mar 2015 - 1:41 pm | तिमा

या आवडत्या विषयावरील लेखमाला कधी संपूच नये असे वाटते. तेंव्हा लिहितच रहा.

विशाखा पाटील's picture

22 Mar 2015 - 4:28 pm | विशाखा पाटील

आवडलं.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2015 - 5:18 pm | अत्रुप्त आत्मा

हही हही हही!

समांतर;- खाटुक कसा नै अवतरला अजुन या धाग्यावर? :-\

सांगलीचा भडंग's picture

22 Mar 2015 - 7:17 pm | सांगलीचा भडंग

वा मस्त ओळख सुभाषितांची शाळेत असतात एक श्लोक होता तो आठवला . पूर्ण नाही माहिती पण शेवट आठवतो आहे पण साधारण " रामाभिषेके … …… ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ: ". भांड्याचा आवाज येतो जिन्यावरून पडताना असा काही तरी अर्थ होता

बॅटमॅन's picture

23 Mar 2015 - 11:00 am | बॅटमॅन

रामाभिषेके जलमाहरन्त्या, हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:|
सोपानमार्गेण करोति शब्दं, ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ: ||

हा तो श्लोक आहे.

भोजस्य भार्या जलमाहरन्ति कराच्च्युते चंदनं हेमपात्रं
सोपानमार्गे प्रकटोती शब्दं ठा ठं ठठ ठं ठ ठ ठं ठ ठं ठः

असा वाचला आहे.

बॅटमॅन's picture

23 Mar 2015 - 12:04 pm | बॅटमॅन

बरोबर. या श्लोकाचे असे २-३ पाठभेद आहेत. हाच श्लोक

"भोजस्य भार्या मदविव्हला सा" अशा प्रस्तावनेसकट वाचलेला आहे.

रमेश आठवले's picture

24 Mar 2015 - 3:11 am | रमेश आठवले

एकदा एका उर्दु कवि सम्मेलनात (मुशायरा) एका हिंदू कविला डिवचण्यासाठी
-वो मजहब काफिर ही जो बंदे नही इस्लाम के-
असा अंतरा ( शेवटची ओळ ) असलेला शेर ऐकवण्याची फर्माईश करण्यात आली .
त्यावर त्याने हा शेर ऐकवला.
---
लाम के मानिंद है गेह्सू मेरे घनश्याम के
वो मजहब काफिर ही जो बंदे नही इस लाम के
---

श्री कृष्णाचे ( कुरळे) केस हे( उर्दू अक्षर) ل (उर्दू उच्चार -लाम) च्या सारखे आहेत
( म्हणून) या लाम चे जे बंदे नाहीत ते काफिर आहेत
असे ऐकवून बाजी उलटवली.
मानिंद=सारखे
गेह्सू =केस
काफिर = नास्तिक,
बंदे=दास

हा ऐकला होता अगोदर. लयच भारी आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2015 - 6:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

प्रसाद गोडबोले's picture

26 Mar 2015 - 11:50 am | प्रसाद गोडबोले

ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ: ||

अशाच प्रकारचे अजुन एक सुभाषित आहे ना , ते दे की

लुलु लल्ल्लुलु लललल्लु ल्लूल्लू ...

असे काही तरी आहे ना ते सुभाषित ? =))

प्रचेतस's picture

26 Mar 2015 - 12:20 pm | प्रचेतस

जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले |
कपिकम्पितशाखाभ्यो गुलुगुग्गुलुगुग्गुलु ||.

वानरांनी जांभूळववृक्षाच्या फांद्या गदागदा हलवल्यामुळे पक्व झालेली जांभळे पाण्यात पडून 'गुलु गुग्गुलु गुग्गुलु' असा आवाज येत आहे

बाळ सप्रे's picture

1 Apr 2015 - 12:22 pm | बाळ सप्रे

मी ऐकलेली या सुभाषिताची व्हर्जन्स खालीलप्रमाणे..

जंबुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले | तानि मत्स्या न खादन्ति जालगोलकशंकया ||

जंबुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले | तानि मत्स्या न खादन्ति जलमध्ये डुबुक डुबुक ||

बॅटमॅन's picture

26 Mar 2015 - 1:11 pm | बॅटमॅन

चेष्टालुशब्दांश्च मिपाकराणाम्
श्रुत्वा हि कोपेन महत्तरेण
आत्मा अतृप्तो प्रकरोति शब्दम्
लुल्ल्लुल्लुलुल्लू लुलुलू लुलुल्लः || ;)

प्रचेतस's picture

26 Mar 2015 - 1:31 pm | प्रचेतस

=)) .. =)) .. =))

ते फक्त 'अतृप्तो' च्या ऐवजी 'अत्रुप्तो' असं पाह्यजे बघ.

बॅटमॅन's picture

26 Mar 2015 - 1:33 pm | बॅटमॅन

बरोबरे, फक्त तृ असेल तर संस्कृताप्रमाणे वृत्तात बसतं, त्रु असेल तर नाही म्हणून तृ लिहिलं इतकंच. बाकी काही असलं तरी आपण उच्चार त्रु असाच करतो म्हणा.

प्रचेतस's picture

26 Mar 2015 - 1:35 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2015 - 2:08 pm | अत्रुप्त आत्मा

@लुल्ल्लुल्लुलुल्लू लुलुलू लुलुल्लः || >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/cute-smiley-tongue-in-cheek-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

अजून एक सुभाषित दुदु दुदु आणि दुत्त दुत्त वर पाह्यजे राव!! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2015 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा

हलकट सुडूक्,बदकाचं हडूक! :-/

बॅटमॅन's picture

26 Mar 2015 - 2:44 pm | बॅटमॅन

जिलबि अवडते हो आत्मयाची जयाला
दुडुदुडुदुडु धावे, अग्निवेताळ आला
खिखिखिखिखिखि हासे, चेष्टवी आत्मयासी
दुदुदुदुदुदु तेणे नाम आले तयासी ||

दुत्तदुत्त महादुत्त शालखी चेशता कले |
तेने आनंद त्या होई, आतमू पलि तो लले || ;)

सूड's picture

26 Mar 2015 - 3:03 pm | सूड

एकच नंबर !!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2015 - 3:12 pm | अत्रुप्त आत्मा

जिलबि अवडते हो आत्मयाची जयाला
.........http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif
दुडुदुडुदुडु धावे*, अग्निवेताळ आला
खिखिखिखिखिखि हासे, चेष्टवी आत्मयासी
दुदुदुदुदुदु तेणे नाम आले तयासी || http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

दुत्तदुत्त महादुत्त शालखी चेशता कले |
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif
तेने आनंद त्या होई, आतमू पलि तो लले || http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

मेलो...मेलो रे हराम्या शब्दखाटुका! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif काय खोकलिच्याची वृत्तकळा आहे रे भगवंता!
=======================================
* - सदर ओळीस अत्यंत हुबेहुब अनुसरणारा बालं'आगोबाचा एक रांग'डा फोटु आठवला! =))
व्ह्त्साप ग्रुपवरी जो आला होता! =))

बॅटमॅन's picture

26 Mar 2015 - 3:19 pm | बॅटमॅन

सदर ओळीस अत्यंत हुबेहुब अनुसरणारा बालं'आगोबाचा एक रांग'डा फोटु आठवला!

पुनरेकवार पोस्टवणे ;)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2015 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा

@पुनरेकवार पोस्टवणे >>> =)) जी सर! ह्वस्तपी या! देतोच तिकडे! =))

बॅटमॅन's picture

26 Mar 2015 - 3:23 pm | बॅटमॅन

यावच्छक्य अवश्य पिंगवतो.

जिलबि अवडते हो आत्मयाची जयाला
दुडुदुडुदुडु धावे, अग्निवेताळ आला

जिलब्या पाडत असलेले तांब्याधिपति आणि त्यांच्या मोहाने दुडूदुडू धावत येणारे त्यांचे परममित्र आठवले.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2015 - 3:49 pm | अत्रुप्त आत्मा

=)) थांब हो दुष्ट सुडुका,तुला आज लावितोच एक हाड्डुक्का! =))

थांब हो दुष्ट सुडुका,तुला आज लावितोच एक हाड्डुक्का!

ऑ? माझ्याकडच्या हाडकाने एकच रट्टा घालेन पाठीत!!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Mar 2015 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा

@ ऑ? माझ्याकडच्या हाडकाने एकच रट्टा
घालेन पाठीत!!>> वाट बघा! :P

माझि पाठ आहे टणक
हडुकाचा तुझ्या होइल सं गणक!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Mar 2015 - 3:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दुडुदुडुदुडुदुडु हा शब्द चुकला आहे.

तो शब्द दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदु असा आणि साधारण तिप्पट लांबीचा पाहिजे =))

बॅटमॅन's picture

26 Mar 2015 - 4:06 pm | बॅटमॅन

वृत्तात बसत नाही ओ. नायतर घाटलो अस्तो मगाच्यानच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Mar 2015 - 4:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

विच्छेद टाकायचा मधे एखादा =))

पण अक्षर किमान १८ वेळा लागोपाठ आलं नाहीतर फाउल मानतात ना?

हम्म, आर्यावृत्तात कदाचित करता येईलही अशी रचना....पण पाहिले पाहिजे. तूर्त तत्त्वतः तरी अशी रचना करता येईल हे नक्की जाणा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Mar 2015 - 3:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

शब्दखाटुक हा गुर्जींचा शब्द अचुक आहे....बॅ बॅ बॅ !!! दु दु दु दु...!!

सविता००१'s picture

26 Mar 2015 - 3:26 pm | सविता००१

भन्नाट हसतेय
:))

बट्टमणाच्या गिर्वाणबाजीने निर्वाण प्राप्त जाहले आहे +))

प्रसाद गोडबोले's picture

26 Mar 2015 - 5:30 pm | प्रसाद गोडबोले

चेष्टालुशब्दांश्च मिपाकराणाम्
श्रुत्वा हि कोपेन महत्तरेण
आत्मा अतृप्तो प्रकरोति शब्दम्
लुल्ल्लुल्लुलुल्लू लुलुलू लुलुल्लः ||

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2015 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

खलु चपखलुलुलुम् =))

अत्रुप्त आत्मा's picture

27 Mar 2015 - 12:51 am | अत्रुप्त आत्मा

खाटुकालुशब्दांश्च वा घुळ कराणाम्
तुकडा हि कापेन पृथक्करेण
खाटुक प्रसवे दु- दू करोति शब्दम्
हुहुहू हुहुहू हुहुहू ह्हा ह्हा हा ह्हा ह्हा! =))

आहाहाहा. क्या बात शरद सर. एकच नंबर. संस्कृतातल्या छेकापन्हुतीकरिता अनेक धन्यवाद!!!!

साती's picture

23 Mar 2015 - 11:56 am | साती

'मन्ये मत्कुणशंकया'
'तक्रं शक्रस्य दुर्लभं'

आणि एक समस्यापूर्तीचा- कुणाला काय हवे ते सांगणारा
माधवदाघयानम्'
म्हणजे पराक्रमी पुरुषाला -मानम्
पंडिताला -धनम्
प्राण्यांना-वनम्
पुरोहिताला- धनम्
मोराला- घनम्
चालणार्याला- यानम्

आणि सगळ्यांनाच- माधवदाघयानम्- म्हणजे रणरणत्या उन्हात (शाकारलेल्या) वाहनातून प्रवास!

मत्कुणशंकया आणि माधवदाघयानम् हे दोन्ही श्लोक जमल्यास पेस्टवावेत ही इणंती. धन्यवाद.

साती's picture

23 Mar 2015 - 12:18 pm | साती

कमले कमला क्षेते हरःक्षेते हिमालये
क्षीराब्धौच हरिक्षेते मन्ये मत्कुणशंकया

(शेते की क्षेते काय आठवत नाही)

माधवदाघयानम् कुठे लिहिलेला मिळेल का बघायला हवे.
आम्हाला रत्नागिरीत पोखरणकर गुरुजी म्हणून पाचवी ते दहावी संस्कृत दहावीयला होते. पाचवीपासून टिळक विद्यापीठाच्या पीठाच्या परीक्षा असत ना!
तर ते गुरुजी शिकवायच्या धड्यासुभाषितांव्यतिरिक्त इतकं काय काय शिकवित की विचारू नका.
सगळी प्रसिद्धं संस्कृत नाटके वगैरे थोडक्यात शिकविली होती.
आम्ही दळिद्र्यांनी मेडिकलला जाताच त्या वह्या अग्निला स्वाहा केल्या.
:(

पैसा's picture

23 Mar 2015 - 12:21 pm | पैसा

कमले कमला शेते असं आहे ते!

पैसा's picture

23 Mar 2015 - 12:24 pm | पैसा

असारे खलु संसारे, सारं श्वसुर मंदिरं
हिमालये हरः शेते, हरि: शेते पयोनिधौ।।

यस्स, मलाही हाच माहिती होता.

पैसा's picture

23 Mar 2015 - 12:50 pm | पैसा

असार अशा संसारात सासर्‍याचे घर हेच खरे सार आहे म्हणा ना! (सर्व जगात सासर्‍याचे घर हेच रहायला उत्तम!) बघा की, शंकरराव हिमालयात तर विष्णु क्षीरसागरात रहातात!

बॅटमॅन's picture

23 Mar 2015 - 4:55 pm | बॅटमॅन

श्वशुरगृहनिवासः स्वर्गतुल्यो नराणाम् |
यदि भवति विवेकी, पंचमे षड् दिने वा |
दधिमधुघृतलोभान्मासमेकं वसेच्चेत् |
तदुपरि दिनमेकं पादरक्षिप्रयोगः ||

जावई सासुरवाडीस आलाय अन सगळे त्याची सरबराई करताहेत त्यात अगदी न्हाऊन निघाल्याने म्हणतोय की पुरुषांसाठी सासुरवाडीला राहणे म्हणजे स्वर्गच जणू! त्यावर सासरा म्हणतो की जर जावई शहाणा असेल तर तो पाचसहा दिवस तेवढेच राहतो. मग जावई कोपराने खणू पाहत म्हणतो की दही, मध, तूप, इ. च्या लोभाने खरं तर इकडं महिनाभर डेरा टाकावंसं वाटतंय. त्यावर सासरा म्हणतो की इन द्याट केस, नंतर एके दिवशी कधीतरी 'पादरक्षि' अर्थात चपलेचा प्रयोग होईल तरी खबरदार!

स्रुजा's picture

26 Mar 2015 - 12:54 am | स्रुजा

वाह ! अंतू बर्वा आठवलं.

"उत्तम ! थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कपोसकर वकिलाच्या जावयासरखं नका करू. त्यानं सहा महीने तळ ठोकला शेवटी कपो सकर वकिलान् खळं सारवायला लावलं त्यास. जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो, कसं? "

मजा येते आहे सगळ्याचे प्रतिसाद वाचून.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Mar 2015 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे

=))

बॅटमॅन's picture

23 Mar 2015 - 12:35 pm | बॅटमॅन

श्लोकाबद्दल धन्यवाद!

बाकी संस्कृत साहित्याबद्दल काय बोलावे? त्या महासागरातले तुमच्या गुर्जींसारखे वाटाडे जितके असतील तितकं उत्तमच आहे.

साती's picture

23 Mar 2015 - 12:25 pm | साती

पोखरणकरगुर्जींच्या नावाबरोबर कित्येक सुभाषिते आठवू लागली.
व्याकरणाचा कोथळा काढून इथे आठवेल तशी लिहेन.
कुणीतरी मग रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करा.

एकोनाविंशति स्त्रीणां स्नानार्थं शरयू गतः
एको भक्षते व्याघ्रेण विंशती गृहमागता

यातलं खरं तर व्याकरण म्हणजे स्त्रीपुरुष लिंगासाठी धातू कसे चालवायचे माहित असल्याशिवाय काय समजणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Mar 2015 - 12:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा ! संकृत सुभाषितानी म्हणजे पंचपक्वांनांची मेजवानी !

पण विव्दान लोकहो, संकृत सुभाषितांबरोबर त्यांचा मराठीत अर्थही द्या, कृपया ! अकरावीनंतर संंकृत सोडले त्याला दशके लोटली आहेत :)

समस्यापूर्तीचा ठाठं -
भोजराजाला असे समस्यापुर्तीचे खेळ दरबारात खेळायला मजा यायची.
त्यात तो थोडी विचित्र वाटणारी चौथी ओळ स्वतः लिहायचा आणि वरच्या तीन ओळी विद्वानांनी रचायच्या असत. (त्याच वृत्तात)

या ठाठं ठठठं ठठठं ठठंठः अश्या वरवर विचित्र वाटणार्या श्लोकात महाकवींनी वरच्या तीन ओळी लिहिल्या-
भोजराजाची पत्नी (स्नानाकरिता)जल आणत होती
ते चंदनपाण्याचे सोन्याचे भांडे खाली पडले
जिन्यावरून ते गडगडत जाताना आवाज आला
ठाठं ठठठं ठठठं ठठठ;:

दुसर्‍या मत्कुण शंकयाचा अर्थं

(आपापले घरदार सोडून)
लक्ष्मी कमळात झोपते शंकर हिमालयात झोपतो
हरी क्षीरसागरात झोपतो कारण-
घरात ढेकाणांचा सुळसुळाट!

प्रमोद्_पुणे's picture

23 Mar 2015 - 7:24 pm | प्रमोद्_पुणे

ठा ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ:

पॉइंट ब्लँक's picture

23 Mar 2015 - 5:01 pm | पॉइंट ब्लँक

हा हा. वाचून लै मज्जा आली.

मस्त धागा.अजून सुभाषिते आल्यास आमच्यासारख्या संस्कृत निरक्षरांची सोय होईल!

साती's picture

23 Mar 2015 - 11:20 pm | साती

याचा दिसणारा अर्थं-
एकोणीस स्त्रिया स्नानासाठी शरयू नदीवर गेल्या, एकीला वाघाने खवाघाने, वीस परत आल्या (कसे काय बुवा?)

तर याची समस्यापूर्ती अशी आहे की 'एक नः म्हणजे पुरुष, वीस स्त्रीयांसह शरयू नदीवर स्नानासाठी गेला.' संस्कृतात बर्‍याचदा शब्दात 'र' आला की मागच्या न चं 'ण ' करतात, म्हणून एको नः विंशती स्त्रिणां एकोणाविंशतीस्त्रिणां होतं.
स्त्रिणां म्हटल की 'स्त्रियांसह 'असा अर्थं आपोआप होतो ते संस्कृतातल्या विभक्ती रुपांच्या गंमतीने .

आता पुढची ओळ सोपी होते. (त्या) एकाला वाघाने खाल्ले आणि बाकीच्या वीस स्त्रिया परत आल्या.
:)

साती's picture

23 Mar 2015 - 11:21 pm | साती

एकीला वाघाने खाल्ले असा बदल करून वाचावे

आवयंस!! एकीस वाघान् खाल्लंन ना? मग वीस कशा परत येतील? त्या एकाला वाघान् खाल्लंन तर भाषांतर बरोबर वाटतंय. आणि तसंही एको आहे, कन्यकेस खाल्लं असतं तर आकारान्त एकवचन आलं असतं (असं वाटतंय, माझंही ज्ञान यथातथाच आहे.).

साती's picture

24 Mar 2015 - 12:06 am | साती

पटकन वाचणार्‍याला वाटावे की एकोणीस स्त्रीयांपैकी एकीला वाघाने खाल्ले तर वीस परत कश्या आल्या, आणि व्याकरण बिकरण समजून घेऊन वाचले तर एक पुरुष आणि वीस स्त्रियांपैकी एका पुरुषाला वाघाने खाल्ले आणि वीस स्त्रिया परत आल्या.
;)

साती's picture

23 Mar 2015 - 11:27 pm | साती

वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर:।
यम: हरति प्राणं वैद्य: प्राणं धनं च॥

यमराजाचा भाऊच असलेल्या वैद्यराजा तुला नमस्कार असो
यम केवळ प्राणच लुटतो, तू तर प्राणाबरोबर धनही!

(बघा, बघा- हे तेव्हापासून चालू आहे. आणि उगाच इथे मिपाकर्स 'डॉक्टरांच्या फिया आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा याबाबत आत्ता वाद घालतायत.
;) )

साती's picture

24 Mar 2015 - 12:17 am | साती

चिता प्रज्वलितां द्रष्ट्वा वैद्यो विस्मयागतः|
नाहं गतो न मे भ्राता कस्येदं हस्तलाघवम्||

ह्याचा अर्थं एकदम सोप्पा आहे.
गावात चिता जळताना पाहून गावातले वैद्यराज म्हणतायत'अरेच्चा! मी गेलो नाही, माझा भाऊ गेला नाही (पेशंट तपासायला, वर नव्हे!) मग हे हस्तकौशल्य कोणाचे?'
;)

असो. आज एवढे बास. नंतर आठवतील तशी लिहेन.

सांगलीचा भडंग's picture

26 Mar 2015 - 8:25 pm | सांगलीचा भडंग

वरची दोन्ही एक नंबर

"वैद्यराज नमस्तुभ्यं" हा खरंच विनोद आहे ना ? मी एकदा रेल्वेने जात असताना एक आयुर्वेदिक कॉलेजातले प्राध्यापक सोबत होते. गप्पांच्या ओघात हा श्लोक म्हणालो, त्याबरोबर गप्पांचा ओघ एकदम आटलाच हो...प्राध्यापक सरळ सरळ रागावलेलेच दिसले!!!! :-(

असंच कै नै. एखादा डॉक्टराने नाडलेला कवी असू शकतो.

अशाच अर्थाचं एक सुभाषित होतं त्याची फक्त आता एकच ओळ आठवतेय.

राक्षसेभ्यः सुतां हृत्वा जनकस्य पुरीं गत:।

आता वरवर वाचता राक्षसांकडून(?) कन्या आणण्यासाठी जनकाच्या नगरीस गेला (?). पण राक्षसेभ्य: हा शब्द राक्षसानाम् इभ्य: (राक्षसांचा राजा (इभ्यः)) आहे हे लक्षात आल्यावर खरा अर्थ उघड होतो.

बॅटमॅन's picture

24 Mar 2015 - 12:41 pm | बॅटमॅन

पुढे ओळ अशी:

अत्र कर्तृपदं गुप्तं, यदि जानासि तद्वद/ यो जानाति स पण्डितः |

मुक्त विहारि's picture

24 Mar 2015 - 4:50 am | मुक्त विहारि

लेख आणि प्रतिसाद , दोन्ही उत्तम...

वाखूसा

तारतारतरैरेतैरुत्तरोत्तरतो रुतै:
रतार्ता तित्तिरी रौति तीरेतीरे तरौतरौ॥

: रतार्त तित्तिरी (टिटवी) उत्तरोत्तर वाढत जाणार्‍या स्वरात या तीरावरुन त्या तीरावर, या तरुवरुन त्या तरुवर रडत/ओरडत (फिरते) आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2015 - 10:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाहवा !

र आणि त ही केवळ दोनच व्यंजने वापरून बनवलेले रुचकर काव्यव्यंजन !

साती's picture

25 Mar 2015 - 10:55 pm | साती

एकदम तारारिरी आहे.
मस्तं!

सविता००१'s picture

1 Apr 2015 - 9:58 am | सविता००१

:))

सविता००१'s picture

1 Apr 2015 - 10:04 am | सविता००१

:))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2015 - 10:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणी यथा काष्ठम चं काष्ठम वालं सुभाषित पुर्ण लिहिल काय अर्थासकट.

स्रुजा's picture

26 Mar 2015 - 12:31 am | स्रुजा

यथा काष्ठम च काष्ठम च, समेयाताम महोदधौ
समेत्य च व्यपेयाताम, तद्वत़ भूत समागमः

मला सुभाषित पाठ होतं पण लिहीताना बरोबर आहे की नाही ते कळेना. म्हणून मग आंजावर उचकापाचक करून नीट शुद्धलेखनात लिहीलंय, तरी चूक असेल तर सांगा :)

गदीमांनी फार् सूंदर भाषांतर केलंय याचं गीत रामायणात:

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ.
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Mar 2015 - 8:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप वर्षांनी वाचलं हे. आवडतं सुभाषित होतं हे. :)
धन्यवाद.

:) माझा जरा उलटा प्रवास झाला या सुभाषिताचा. गीतरामायणाने झपाटून टाकलं होतं तेंव्हा एकदा हे सुभाषित वाचलं त्या संदर्भात आणि इतकं अप्रतिम भाषांतर त्याचं की ते कडवं आणि सुभाषित आता एकत्रच ल़क्षात आहेत.

मनीषा's picture

26 Mar 2015 - 7:06 am | मनीषा

लेख आणि प्रतिसाद वाचून

भाषांसु मुख्या मधुरा - दिव्या गिर्वाणभारती
तस्मात् ही काव्यम् मधुरम् - तस्मादपि सुभाषितम्

हे मनापासून पटले आहे .

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2015 - 7:14 am | श्रीरंग_जोशी

नववी दहावीत पूर्ण संस्कृत घेऊनही फारसं न झेपल्यानं थेट संस्कृत कळलं नाही पण मराठी भाषांतरं वाचून मनोरंजन झालं

ठंठठंठठंठंठठठंठठंठः - दहावीत शिकलेल्या एका श्लोकाचा हा शेवट मात्र चांगला लक्षात आहे :-) .

प्रसाद गोडबोले's picture

26 Mar 2015 - 11:55 am | प्रसाद गोडबोले

आमचे आवडते सुभाषित

अजरामरवत्प्राज्ञो विद्यामर्थं च चिन्तयेत् । गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥

हे शाळेचे घ्होष वाक्य होते ! तेव्ह्हा काही शष्प कळाला नाही अर्थ .... आता जेव्हा विद्या अर्थार्जन चालु आहे आणि धर्माचा अभ्यास आचरण चालु आहे तेव्हा कोठे अर्थ गवसायला लागलाय :)

कस्तुरी जायते कस्मात् ? को हन्ति करिणाम् शतम्?
भीरु: करोति किं युद्धे? मृगात् सिंहः पलायते॥

'मृगात् सिंहः पलायते॥' हे वाचून अर्थ लागतो की हरिण सिंहाला पळवून लावते (हरणापासून सिंह (दूर)पळतो).
पण समस्यापूर्तीच्या या सुभाषिताचे पहिले तीन चरण कवीने असे काही रचलेत की त्या तीन प्रश्नाची उत्तरं शेवटच्या चरणात मिळतात.

कस्तुरी जायते कस्मात् ? : मृगात् (कस्तुरी कशापासून मिळते? : हरणापासून)
को हन्ति करिणाम् शतम्? : सिंहः (शंभर हत्तींना कोण मारतो? : सिंह)
भीरु: करोति किं युद्धे? : पलायते (भित्रा माणूस युद्धात काय करतो? : पळतो)

रमेश आठवले's picture

27 Mar 2015 - 3:18 am | रमेश आठवले

इतक्या अवघड सांकेतिक भाषेत लिहिलेल्या आणि शेवटची ओळ वास्तवाला धरून नसलेल्या रचनेला सुभाषित का म्हणावे असा प्रश्न पडला आहे.

मराठीत आपण ज्याला "धक्कागीत्त" म्हणू अशा प्रकारच्या अनेक गीत प्रकारांना चिर, विचित्र, शब्दवैचित्र, समस्या, अपन्हुति, प्रहेलिका (उखाणे) इत्यादी संस्कृत भाषेत पहिल्यापासून स्थान आहे. हे फार वरच्या दर्जाचे काव्य नाही. पण आपण तरी मराठीत ज्ञानेश्वरी, किंवा एकनाथी भागवत एवढेच वाचतो की "चारोळ्या"चाही आनंद घेतो ? या प्रकारात एखादे विसंगत वाटणारे विधान तिसरी ओळ म्हणून दिल्यावर तुमची काव्यप्रतिभा, शब्द सामर्थ्य पणाला लावून तुम्ही पहिल्या सुसंगत अशा ओळी रचता हरिणापासून सिंह पळतो या हास्यास्पद वाटणार्‍या ओळीचे त्याने तीन प्रष्नांची उत्तरे म्हणून चौथी ओळ दिली. गंमत ! आणखी एक उदा."तक्रं शक्रस्य दुर्लभं "
इंद्राला ताक दुर्लभ ? कसे शक्य आहे ? याचे उत्तर कोण देतो/ते बघू. एक मान्य यांना सुभाषित म्हणणे जरा ओढाताणच.
शरद’

पलाश's picture

30 Mar 2015 - 6:30 pm | पलाश

आपला लेख आवडला.
शाळेत संस्कृत होते. ही भाषाआजी आवडे. पण व्याकरणाच्यामुळे दुरावा आला. खूप जमलं नाही आमचं. मराठी मायभाषेतील अनुवादित संस्कृत हा संस्कृतशी जोडणारा सेतु माझ्यासारख्यांसाठी अतिउपयोगी आहे.
आता हे वरील प्रश्नाचे उत्तर खाली देते आहे. तेव्हा शाळकरी वयात फार फार मजेशीर वाटले होते हे तीन प्रश्नांचे उत्तर.
भोजनान्ते च किं पेयं (?) जयन्तः कस्य वै सुतः (?) ।
कथं विष्णुपदं प्रोक्तं (?) तक्रं शक्रस्य दुर्लभं ॥