गोरखगड

बज्जु's picture
बज्जु in भटकंती
18 Mar 2015 - 11:06 am

जवळ जवळ १६-१७ वर्ष झाली असावीत गोरखगडाला भेट देऊन. या रविवारी काही झाल तरी गोरखगडला जायचच अस ठरवुन सुध्दा दोन रविवार जमल न्हवतच. मात्र येत्या रविवारी सर्व प्रकारचे योग जुळून आले आणि सकाळी सहा वाजता आम्ही निघालो. मी, सुजीत, मंदार आणि मन्यामामा. त्यापैकी मंदार पार्ल्याहुन तर मन्यामामा डोंबिवलीहुन येणार होते. मंदारनी त्याच्या गाडीतून मला आणि सुजीतला नितीन कंपनी फ्लायओव्ह्रर जवळ ऊचलले आणि आम्ही कल्याणच्या दिशेने निघालो. मन्यामामा अर्ध्या तासात कल्याणला पोहोचतो बोलला. सातच्या सुमारास त्यालाही कल्याण स्टेशन जवळुन घेतल आणि ८ च्या सुमारास मुरबाड-म्ह्सा मार्गे देहरी या गोरखगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचलो. गावातीलच एका ट्परी वजा हॉटेलवर चहा पोहे यावर ताव मारला, हॉटेलच्या मागच्या मोकळ्या जागेत गाडी पार्क केली आणि ८.३० च्या सुमारास गोरखगडाच्या चढाईला सुरवात केली. बरोबर पाण्याच्या बाटल्या आणि ड्रायफुड घेतल होतच.

देहरी गावातुन गोरख आणि मछींद्र गडाचे प्रथम दर्शन

From Trek to Gorakh Gad

फोटोत डाव्या बाजुला मछींद्र व ऊजव्या बाजुचा गोरखगड
From Trek to Gorakh Gad

पहिली टेकडी चढुन वर आलो आणि समोरील रांगेत असलेल्या सिध्दगडाचे मनोहारी दर्शन झाले.

From Trek to Gorakh Gad

अस्मादिकांनाही फेसबुक किंवा व्हॉट्स अप च्या प्रोफाईल साठी स्वत:चा फोटो काढायचा मोह न झाला तर नवलच

From Trek to Gorakh Gad

From Trek to Gorakh Gad

दुसरी टेकडी पार करुन मधल्या पठारावरील महादेव मंदिरापाशी यायला ९.३० झाले.

महादेव मंदिराच्या मागच्या बाजुनेच गडावर जाण्यासाठी वाट आहे.

खड्या चढाईच्या वाटेने साधारण अर्ध्यातासात आपण एका लहान दरवाज्यातुन गडात प्रवेश करतो.

दरवाजा पार करुन १५ मिनीटातच गुहेपाशी पोहोचलो. समोरच मछींद्र गडाचा सुळका खूणावत होता.

गुहेत जास्तवेळ न दवड्ता तडक गोरखगडाच्या अत्युच्च्य टोकावर जाण्यासाठी निघालो.

कातळात खोदलेल्या पायर्‍या

१५-२० मिनीटातच गोरखगडाच्या अत्युच्च्य टोकावर पोहोचलो. गोरक्षनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि आजुबाजुचा सिध्दगड, आहुपे घाट आणि नाणेघाट पर्यंतचा दिसणारा परिसर पहात गप्पा मारत बसलो.

मी, मंदार, मन्यामामा, सुजीत

थोड्या वेळाने पुन्हा गुहेत आलो, बरोबर आणलेले थेपले, मावा केक, ई पारंपारीक खाद्य खाल्ले, टाक्यातील अमॄततुल्य पाणी मनसोक्त प्यायले आणि १२.३० च्या रणरण्त्या ऊन्हात गोरखगड उतरायला सुरवात केली.

२ वाजता पुन्हा देहरी गावात आलो, पुन्हा एकदा चहा घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघालो आणि साडेचारच्या सुमारास ठाण्यात दाखल झालो देखील.

बर्‍याच दिवसांपासुन ठरलेला, काही ना काही कारणाने २-३ वेळा पुढे ढकलला गेलेला गोरखगडाचा ट्रेक अखेरीस पूर्ण झाला.

बज्जु गुरुजी

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Mar 2015 - 11:36 am | प्रचेतस

मस्त हो बज्जु गुरुजी.
बर्‍याच दिवसांनी आलात.
ती भैरवाची मूर्ती टिपिकल उत्तरकालीन आहे.

स्पा's picture

18 Mar 2015 - 11:40 am | स्पा

मस्तच झाली सफर

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2015 - 12:23 pm | अत्रुप्त आत्मा

+१

आनंदराव's picture

18 Mar 2015 - 12:55 pm | आनंदराव

उन्हाचा काही त्रास?
उन म्हंटले की आम्हाला नकोच वाटते.

वेल्लाभट's picture

18 Mar 2015 - 2:38 pm | वेल्लाभट

ट्रेक जबरच फोटो सुंदर ! कधी गेलो नाहीये गोरखगडला. मस्त आहे पण. वाह. सुरेख धागा. उन्हात गेलात म्हणजे कमालच केलीत.

@सुजीत मी तुला कुठेतरी नक्की बघितलंय राव. आपण बोललोत आधी प्रत्यक्ष. आठवत नाहीये पटकन पण १०१%.

काय बदललाय हा परिसर!

कंजूस's picture

18 Mar 2015 - 7:38 pm | कंजूस

मस्त फोटो.
मीपण पंधरा वर्षाँपूर्वी गेलो होता. तळाच्या मठात (?)अगोदर डोकावलो तिथल्या महाराजाने विचारपूस करून चहा दिला. परंतू कोरा चहा कधी प्यायलो नव्हतो आणि नाहीही म्हणवेना. पण नंतर त्या उभ्या पायऱ्या चढतांना झेपलेच नाही आणि पहिल्या देवडीतूनच घोडा मागे फिरवला. चला आता फोटोंतून पाहिला.

पॉइंट ब्लँक's picture

18 Mar 2015 - 11:56 pm | पॉइंट ब्लँक

मस्त फोटो आणि वर्णन

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Mar 2015 - 2:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त झाला ट्रेक..
पण आता उन्हाचा कडाका बघुन जुलै पर्यंत थांबावे म्हणतो :) पावसाळ्यात हा परीसर मस्त दिसेल

अप्रतिम ट्रेक गुरुजी.. बर्याच दिवसानी वाचला आपला लेख

योगेश आलेकरी's picture

30 Apr 2015 - 8:38 am | योगेश आलेकरी

उत्तम लेख..