गाजरं

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
14 Mar 2015 - 6:57 pm

रोम्यांटिक लोक याला मधाचं बोट म्हणतात.
बिचारी छोटी मुले अन बालबुद्धीचे याला चोकलेट म्हणतात.
आमच्यासारखी ओबडधोबड माणसं याला गाजरं म्हणतात.

अशी गाजरं आपल्या अगलबगलेत, समोर, दूर, डोक्यावर लटकवत ठेवणारे चिक्कारजण असतात.
हि गाजरं सर्व प्रकारची, सर्व आकाराची, सर्व प्रतीची असतात.
हि गाजरं कधीही दिसत नाहीत. हाती लागणं तर दूरच!
या गाजरांच्या मागे धावायला लावणारे तर कोपऱ्याकोपऱ्यात दबा धरून बसलेले असतात!
या गाजरांची किमत आपण ठरवत नाही, पण मोजत राहतो.
...... काय काय देऊन? ..... आपापल्या मनाचे खिसे तपासून पहावेत!

कधीतरी बांधावर ठामपणे उभे राहून,
एक ठळक नाही म्हणावा लागतो.
पाय रोवून असल्या रक्तपित्या गाजरांचे समूळ उच्चाटन करावे लागते.
.....म्हणजे मग आपली सेंद्रिय शेती आपल्याला सकसपणे करता येते.
अन मनाचे खिसे फुल्ल्ल ठेवता येतात.

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

बरं, मनाच्या शेतीत कंपोस्ट कसे करतात सांगाल का?

पॉइंट ब्लँक's picture

14 Mar 2015 - 9:21 pm | पॉइंट ब्लँक

एकदम अध्यात्मिक लेख. कळतय पण वळत नाही ही सगळ्यांचीच परीस्थिती आहे. तुम्ही ती थोडक्यात पण छान लिहिली आहे.

नगरीनिरंजन's picture

14 Mar 2015 - 9:34 pm | नगरीनिरंजन

हम्म..गाजरं खायला गेल्यास गुलामी नशिबी येते असे निरीक्षण आहे.

गाजराची शेती आणि मधुमक्षिका पालन,
हा सध्याचा सर्वात किफायतशीर उद्योग असावा असे वाटते आहे.

गाजर म्हणजेच मोहमाया.. आणि काय..

अश्या गाजराची पुंगी बनवावी,वाजली तर ठिक नायतर मोडुन खाल्ली..
खाल्यावर जे आऊटपुट निघल त्यावर नवे कायतरी करावे.

वगिश's picture

16 Mar 2015 - 2:13 pm | वगिश

आवडले

प्राची अश्विनी's picture

17 Mar 2015 - 7:20 pm | प्राची अश्विनी

आवडले, अगदी खरे सांगितलेत!!