कुरुडुमळे आणि मुलबागल

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in भटकंती
12 Mar 2015 - 10:46 pm

कुरुडुमळे हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, बेंगलोरपासून अवघ्या १०० किमीच्या आत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच. कौडिण्य ऋषींनी येथे एका टेकडीवर तपश्चर्या केलली. बेंगलोरहून कोलार आणि तेथून जवळपास तीस किमी हायवेवर जायचे. मुलबागल हायवे सोडून तीन किमीवर आगे. मुलबागालहून कुरुडुमळे अवघ्या आठ किमॆवर आहे..

ह्या गावात एक गणपतीचे आणि एक सोमेश्वराचे मंदिर आहे.

गणपतीची मूर्ती अंदाजे बारा (काहि ठिकाणी चौदा लिहिले आहे) फूट उंचीची असून एका अखंड शाळिग्राम दगडात कोरली आहे. ही मूर्ती किती जुनी आहे ह्याची कुठेही नोंद नाही. चौदाव्या शतकापर्यंत हा गणपती उघड्यार होता. विजयनगरच्या राज्यांनी हे मंदिर मूर्तीभोवती बांधले. मंदिरात कलाकुसर तितकीशी पहावयास मिळत नाही. पण मंदिराच्या चौकटी वापरून एक छान आभास निर्माण करण्यात आला आहे. मंदिरातून जसजसे बाहेर जावू तसतशी मूर्ती मोठी होत असल्याचा भास होतो.

मंदिराचा एक फ़ोटो
DSC_0021

सुदैवाने ह्या मंदिरात देवतेचा फ़ोटो काढण्याची परवानगी मिळाली.
DSC_0059

ह्या गावातील दुसरे मंदिर आहे सोमेश्वराचे. हे मंदिर गणपतीच्या मंदिरापेक्षा जुने आहे. चोलांनी मूळ मंदिराची उभारणी केली असून होयसाळा काळात त्यात वाढ करण्यात आली.
मंदिरात प्रवेश करताच हा गणपती आपले स्वागत करतो.
DSC_0063

ह्या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. ह्याच्या शरीरावार वेगवेगळ्या भागावर टिचकी मारली की वेगवेगळे आवाज निघतात आणि मूर्तीवर कुठेही जोड दिसत नाहीत. म्हणजे बहुधा आतून पोकळपणा एकसारखा नसावा असा एक अंदाज आहे.

मंदिराचा एक फ़ोटो
Someshwara

मंदिराच्या खांभावर मजेशीर मूर्ती कोरल्या आहेत. तीन व्यक्ती आणि चारच पाय असलेले हे नृत्य.
DSC_0099

त्याच आवारात कार्तिक स्वामींचे एक छोटेसे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती
DSC_0116

एक विचित्र गोष्ट दिसून येते ती म्हणजे शंकराच्या मंदिरात इतर बर्याच देवतांच्या मुर्त्या आहेत. उदा ही बालाजीची मूर्ती .
DSC_0103

असे ऐकण्यात आहे की कधी काळी कुरुडुमळे आणि जवळपास तीस मंदिरे होतॆ. ती सर्व अरकोटच्या नवबाने उधवस्त केली. काही वाचलेल्या मूर्त्या शंकराच्या मंदिरात आणून ठेवल्या आहेत.

परत येताना मुलबागलला भेट दिली. इथे विरांजनेय म्हणजेच हनुमानाचे मंदिर आहे. मारुतीची मूर्ती आठ फूट उंचीची आहे. ह्या मारुतीच्या हातात गदेबरोबर तलवार सुध्दा आहे. ह्याची स्थापना अर्जुनाने केली असे मानन्यात येते.
मंदिराच्या प्रवेशद्वाराचा फोटो
DSC_0202

मंदिराचा आवार प्रशस्त आहे. आणि मंदिर परिसरात शेषशायी विष्णुची सुद्धा एक सुरेख मूर्ती आहे. आवाराचा एक फोटो.
DSC_0203

बेंगलोरहून चन्नई हायवे वापरून कोलार बायपासवरून मुलबागला जाता येते. गाडी चालवण्यास रस्ता एकदम मस्त आहे. ही सहल अर्ध्या दिवसात पूर्ण करता येते. मुलबागल तालुक्याचे ठिकाण असून, नाष्ट्याची चांगली सोय आहे.
पूर्ण दिवस घालवायचा असेल तर कुरुडुमळे, मुलबागल, विरुपाक्षी, बंगारु तिरुपती, कोटी लिंगेश्वरा या सर्व ठिकाणी भेट देता येवू शकते. ऐनवेळी दुपारी उल्हास आल्यामुळे हे दोन ट्प्यात करावे लागले. राहिलेल्या ठिकाणांचे फोटो परत कधीतरी.

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 Mar 2015 - 9:50 am | पैसा

फोटो आणि वर्णन आवडले. या ठिकाणाबद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली?

पॉइंट ब्लँक's picture

13 Mar 2015 - 10:26 am | पॉइंट ब्लँक

धन्यवाद.
ईंटरनेटवर बरीच माहिती आहे. उदा
http://en.wikipedia.org/wiki/List_of_tourist_attractions_in_Kolar_district
templesofkarnataka.com

कॅमेरा आणि गाडी असली की असले छंद आपोआप जडतात. आणि मित्रवर्गात काहि लोक आहेत ज्यांना अशा जागांना भेट द्यायची आवड आहे. :)

प्रचेतस's picture

13 Mar 2015 - 10:05 am | प्रचेतस

छान फोटो

मंदिराच्या खांभावर मजेशीर मूर्ती कोरल्या आहेत. तीन व्यक्ती आणि चारच पाय असलेले हे नृत्य.

अशाच प्रकारच्या मूर्ती मी इकडील यादवकालीन मंदिरांत पाहिलेल्या आहेत.

भुलेश्वर

a

पेडगाव

a

पिंपरी दुमाला
a

पॉइंट ब्लँक's picture

13 Mar 2015 - 10:29 am | पॉइंट ब्लँक

छान माहिती दिलीत. खरच आभारी आहे. महाराष्ट्रात खिद्रापूर सोडून फारस फिरनं झाले नाही. पण ह्या सर्व जागांना भेट द्यायची इच्छा आहे. बघुया कस जमतय ते.

फोटोंमध्ये अति विग्नेत चा वापर खटकला

खूपच काळसर झालेत

कपिलमुनी's picture

13 Mar 2015 - 11:39 am | कपिलमुनी

vignette होय !

पॉइंट ब्लँक's picture

13 Mar 2015 - 2:19 pm | पॉइंट ब्लँक

नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

जबरीच. दक्षिणेतील मंदिरांचा थाट बाकी निराळाच असतो. लय भारी.

पॉइंट ब्लँक's picture

14 Mar 2015 - 9:08 pm | पॉइंट ब्लँक

तुम्ही दक्षिणेच्या मंदिरांचे मोठे फॅन दिसताय. काही नवीन जागांना तम्ही भेट दिली असेल तर सुचवा.

मी स्वतः प्रत्यक्ष फार देवळे पाहिलेली नाहीत पण गेल्या दोनेक वर्षांत फेसबुकावर 'ancient monuments of India- a photo journey' नामक एक ग्रूप जॉईन केलाय आणि त्याच्या माध्यमातून लै देवळांचे अतिशय डीटेल्ड फोटो पाहिलेत. तुम्हीही तो ग्रूप जॉईन करावा असे सुचवतो. थक्क करणारी माहिती मिळत राहते. उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम- अख्ख्या भारतभरातील लहानमोठ्या असंख्य देवळांचे व मूर्त्यांचे फोटो भरभरून वाहत असतात. तुम्हांला त्यातून बरीच आयडिया मिळेल. तूर्तास नेहमीचे काही यशस्वी कलाकार सुचवतो.

कर्नाटकः हंपी, बेलूर-हळेबीड, सोमनाथपूर, लक्कुंडी, बदामी-पट्टदकल-ऐहोळे, श्रवणबेळगोळ, करिकल.

तमिळनाडू: तंजावर येथील बृहदीश्वरर शिवमंदिर, श्रीरंगम येथील विष्णू मंदिर, मदुराई मधील मीनाक्षी मंदिर, तिल्लै नटराजा मंदिर फ्रॉम चिदंबरम, कलुगुमलै येथील मंदिर (एकदम वेरूळच्या कैलास लेण्यासारखे- वरून खोदत आलेले पण इन्कम्प्लीट), कांचीपुरम आणि महाबळिपुरम येथील मंदिरे, दारासुरम आणि गंगैकोंडचोळपुरम येथील देवळे. ग्रेट लिव्हिंग चोळा टेम्पल्स नामक ग्रूपमध्ये ५ देवळे आहेत ती बघावीत. भव्यदिव्य देवळांमध्ये तमिळनाडूचा हात कुणीच धरू शकणार नाही. सहस्रखांबी मंडप, शेकडो शिलालेख, प्रत्येक खांबावर अतिशय बारीक कलाकुसरीच्या मूर्ती, विस्तीर्ण आवारे, म्युझिकल पिलर्स, धिप्पाड गोपुरे, एक ना अनेक अशी फार जबराट वैशिष्ट्ये आहेत.

आंध्रा: लेपाक्षी, श्रीशैल. समहाऊ या भागातील देवळे इतकी वेल कव्हर्ड नाहीत. पण लेपाक्षी लै फेमस आहे. इथे एक हँगिंग पिलरही आहे.

केरळः माहिती नाही.

तुम्हांला शिल्पकला वगैरेत रस असेल तर होयसळ, चालुक्य, चोळ अन पल्लव या चार राजसत्तांची मंदिरे जरूर पहा. विजयनगरवाल्यांनी व नायक राजांनी तमिळनाडूमध्ये अनेक जब्राट अ‍ॅडिषन्स केलीत तीही पाहण्यालायक आहेत. साला, कधी वेळ येतो काय की.

पॉइंट ब्लँक's picture

24 Mar 2015 - 8:46 pm | पॉइंट ब्लँक

ह्या ग्रुपची माहिती दिल्याबद्दल खरच आभारी आहे. आजच जॉईन करतो.
आंध्रामधील मंदिरे फेमस नसण्याच एक कारण नक्षलवाद असू शकेल. आंध्रातील बरेच जिल्हे बरिच वर्षे नक्षलग्रस्त होती. आजही काही जिल्हे ऑफिशियली "हाय क्राईम झोन" आहेत. लेपाक्षीच्या विरभद्र मंदिराला भेट देण्याचा योग दोनदा आला. आणि संधी मिळाली तर परत जायची ईच्छा आहे. हँगिग पिलर मुळात हँगिग नव्हता असे म्हणतात. त्याची एक गोष्ट आहे. सिवस्तर लिहितो त्याविषयी.

बाकी तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे, इतक सर्व पाहाण्याचा योग कधी येतोय काय माहीत. पण जेंव्हा जेंव्हा वेळ मिळेल. तस तस भेट जरूर देत जाईन.

बॅटमॅन's picture

25 Mar 2015 - 12:23 am | बॅटमॅन

आंध्रामधील मंदिरे फेमस नसण्याच एक कारण नक्षलवाद असू शकेल. आंध्रातील बरेच जिल्हे बरिच वर्षे नक्षलग्रस्त होती. आजही काही जिल्हे ऑफिशियली "हाय क्राईम झोन" आहेत.

अगदी शक्य आहे. हा विचारच केला नव्हता.

हँगिग पिलर मुळात हँगिग नव्हता असे म्हणतात. त्याची एक गोष्ट आहे. सिवस्तर लिहितो त्याविषयी.

अन या स्टोरीबद्दल ऐकून होतो अगोदर पण आता विसरलो. तरी कृपया सांगणेचे करावे ही विनंती.

कपिलमुनी's picture

25 Mar 2015 - 11:45 am | कपिलमुनी

ancient monuments of India- a photo journey
जकुकाकांचा ग्रूप का ?
बरेच मिपाकर्स आहेत तिथे :) फोतोस भारी असतात

बॅटमॅन's picture

25 Mar 2015 - 1:32 pm | बॅटमॅन

इंडीड!

मस्त. स्पा म्हणताहेत तसे थोडे विनेटिंग कमी करून पहायला हवे होते. त्याचबरोबर काँट्रास्टही कमी ठेवायला हवे होते असे वाटले. फोटो अजून टाका.

पॉइंट ब्लँक's picture

13 Mar 2015 - 2:23 pm | पॉइंट ब्लँक

काँट्रास्टही जास्त झाला आहे? मॉनिटरचे कॅलिबरेशन तपासून बघयला पाहिजे.

सर्वच बाबतीत अप्रतिम.............

नवीन जागेबद्दल धन्यवाद. 'काम' न केलेले फोटो असतील तर टाका.

पॉइंट ब्लँक's picture

13 Mar 2015 - 7:49 pm | पॉइंट ब्लँक

डीसलारवाल्याला (म्हणजे फोटोग्राफर असं नव्हे) काम न केलेले फोटो टाका अस सांगणे हे एखाद्याने त्याच्या मंडळींना अलंकार आणि शृंगारवर्जित (मेक अप वर्जित) रहाण्याचा अट्टाहास धरण्याइतका अक्षम्य गुन्हा आहे . :-)

पुढच्यावेळी काम कमित कमी करयचा प्रयत्न करतो .

प्रचेतस's picture

13 Mar 2015 - 8:39 pm | प्रचेतस

मला होयसळांपेक्षा चालुक्य शैली आवडते.

कपिलमुनी's picture

16 Mar 2015 - 4:03 pm | कपिलमुनी

शैली मधल्या फरकांवर एक शैलीदार लेख येउ द्या

जुइ's picture

14 Mar 2015 - 9:58 pm | जुइ

फोटो आणि माहिती दोन्ही आवडले :-)

स्वाती दिनेश's picture

16 Mar 2015 - 12:05 pm | स्वाती दिनेश

अनवट जागेची माहिती समजली, फोटोही सुरेख!
स्वाती

ह्या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. ह्याच्या शरीरावार वेगवेगळ्या भागावर टिचकी मारली की वेगवेगळे आवाज निघतात आणि मूर्तीवर कुठेही जोड दिसत नाहीत. म्हणजे बहुधा आतून पोकळपणा एकसारखा नसावा असा एक अंदाज आहे.

... हंपी ला विठ्ठल मंदिरातील खांबांवर टिचकी मारल्यास हाच अनुभव येतो. परंतु तेथील खांब भरीव आहेत आणि त्याचा संबंध aerodynamics शी जोडला जातो.

पॉइंट ब्लँक's picture

24 Mar 2015 - 8:55 pm | पॉइंट ब्लँक

हंपी मधिल खांबाविषयि ऐकून आहे. पण aerodynamics शी त्याचा संबंध आहे हे माहिती नव्हते.