दुर्गदुर्गेश्वर रायगड बद्दल माहिती हवी

जगप्रवासी's picture
जगप्रवासी in भटकंती
10 Mar 2015 - 12:53 pm

नमस्कार मिपाकर हो ,

मला रायगड ला जायचं आहे पण तिथे राहण्याची जेवणाची काय सोय आहे याची माहिती नाही, तरी त्याबद्दल काही माहिती दिलात तर खूप मदत होईल. मिपा वर त्याबद्दल दोन लेख सापडले वेल्लाभट यांचा - आणि मिपाकरांचा पण त्यात राहण्यासाठी काय सोय होईल याची माहिती नाही मिळाली. गुगल वर शोधाशोध करून जास्त काही माहिती मिळाली नाही. तिथल्या एमटीडीसी च्या रिसोर्ट वर फोन करून बघितलं पण फोन कोणीच उचलत नाही. तरी कृपया मला मदत करवी.

जाण्याची तारीख : सकाळी १४ मार्च २०१५ ते १५ मार्च २०१५
व्यक्ती : ४ (मी, बायको , मित्र आणि त्याची बायको )

धन्यवाद
जगप्रवासी

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

10 Mar 2015 - 3:11 pm | वेल्लाभट

एमटीडीसीत आनंद आहे. पण ट्राय करा. त्यांच्या मुख्य कार्यालयात फोन करून बघा.
बाकी वरती देशमुखांची रहायची सोय आहे. यथातथा स्वच्छता असलेल्या खोल्या आहेत. तिथे राहू शकता. पण एमटीडीसी जरा बरं आहे त्यापेक्षा.

वेल्लाभट's picture

10 Mar 2015 - 3:13 pm | वेल्लाभट

९४ २२ ६८ ९८ ९७

रायगडरोपवे कंपनीच्या खोल्या अप्पर स्टेशनजवळ आहेत.
त्यांचा फोन नं वरील दुव्यात मिळेल.

बाबा पाटील's picture

10 Mar 2015 - 8:31 pm | बाबा पाटील

९६०४१६१७१८

१)माझ्यामते रायगड पाहून येणे राहाण्यापेक्षा बरे- वैयक्तिक मत२)महाडात राहावे . ३)रोपवेचे रिटर्न तिकिट असते ते त्याच दिवशी वापरावे लागते का याबद्दल कोणी प्रकाश टाकावा कारण आम्हाला विनाकारण पुन्हा तिकीट काढावे लागले होते .४)रायगड +श्रीवर्धन अशी ट्रीप करणे बरे. फक्त रायगड कंटाळवाणा आहे. इतिहास कितीही सांगितला तरी फक्त उरलेल्या बांधकामाकडे पाहून कल्पना करणे मला तरी जमले नाही.५)रोपवे जिथे वर जाते तिकडे एमटिडिसी आहे -पायी चढून दरवाजे पार करत वर येतो त्याच्या विरुदध टोकाला ६)रोपवेनेच जाणार असाल तर तो स्टॉप अगोदर येतो आणि करंजोळ/रागडफाटा/महाडातृनच अगोदर फोन करून रोपवे चालू असण्याची चौकशी करावी अन्यथा छत्तीस किमी वाया.

प्रचेतस's picture

10 Mar 2015 - 9:03 pm | प्रचेतस

फक्त रायगड कंटाळवाणा आहे>>>

ह्याच्याशी असहमत.
बरेच अवशेष आहेत, बरीच बांधकामे आहेत.
कधी पूर्वेकडच्या भवानी टोकावर जावे आणि नुसतेच पल्याडचा लिंगाणा निरखत बसावे तर कधी टकमकावर जावे आणि पायातळीचे लुकलुकणारे दिवे बघत बसावे. कधी नुसतेच होळीच्या माळावर फेऱ्या मारत बसावे तर कधी थेट समाधीपाशी जाऊन काहीच न करता शांत बसावे. कधी वाघदरवाजा पाहून यावा तर कधी नेहमीच निर्जन असणाऱ्या कुशावर्ताच्या काठावर बसावे. कधी शिबंदीची घरटी पाहून यावी तर कधी टकमकावरचे दारुकोठार पाहून यावे. कधी पालखी दरवाजातून जाऊन मेणा दरवाजातून बाहेर पडावे तर कधी राणीवशात फेऱ्या मारून याव्यात. कधी द्वारांवरील शरभ निरखावेत तर कधी दरबारातील भला मोठा पत्थर तसाच का ठेवलाय याचा विचार करत बसावे. कधी राजमहालाजवळ जवळ असलेल्या स्तंभांत बसून जगदीश्वराचे शिखर निरखावे तर कधी अवकीरकरांच्या झापावर जाऊन मावळी जेवण ओरपावे.

वेल्लाभट's picture

11 Mar 2015 - 9:42 am | वेल्लाभट

येस! म्हटलं तर सगळंच कंटाळवाणं होऊ शकतं; म्हटलं तर काहीही रोचक होऊ शकतं.

यशोधरा's picture

11 Mar 2015 - 4:02 am | यशोधरा

रायगड कंटाळवाणा आहे.... ???? :(

स्वच्छंदी_मनोज's picture

11 Mar 2015 - 9:49 pm | स्वच्छंदी_मनोज

फक्त रायगड कंटाळवाणा आहे>>>

माफ करा.. पण ह्याच्याशी जोरदार असहमत आहे.. आतापर्यंत अनेक वेळा रायगडला गेलोय (रोपवे नव्हता त्याच्याही आधीपासून) पण कधीही रायगड कंटाळवाणा वाटला नाही उलट दरवेळी काहीतरी नवीनच मनाला भावून गेलेय.

पोटल्याच्या डोंगरावरून उडालेला तोफगोळा बरोब्बर गडावर पडला की काय ?

जगप्रवासी's picture

11 Mar 2015 - 5:58 pm | जगप्रवासी

रायगड बघायचा आहे. वल्लींच्या लेखाची प्रिंट घेऊन ठेवली आहे, बघू वल्लीना जे दिसत ते आपल्या सारख्या सामान्य माणसाला दिसत का ते

वेल्लाभट's picture

12 Mar 2015 - 2:02 pm | वेल्लाभट

बघाच.....

काय राव, फक्त रायगड कंटाळवाणा आहे??????????

असोच. यावर काय बोलणार आता??????????????????? राहिलं.

चारु राऊत's picture

30 Mar 2015 - 10:14 pm | चारु राऊत

एमटीडीसी फोन नम्बर ९४२२७८७७७६

माझं मत. फक्त रायगड सहल करू नये रायगड अधिक श्रीवर्धन करावे.

होबासराव's picture

1 Apr 2015 - 8:50 pm | होबासराव

आपले प्रवासवर्णन लिहा कि जरा, कुठे थांबला होतात ? राहण्याची व्यवस्था कशी होती ?