गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः मदत हवी आहे...!

अदि's picture
अदि in भटकंती
8 Mar 2015 - 5:58 pm

आमचा येत्या गुरुवार-शुक्रवार-शनिवार मशारनिल्हे (जुन्या लेखकांची पुस्तके वाचल्याचा परिणाम :D )ठिकाणी जायचा प्लॅन आहे. विचार पक्का झाला आणि सल्लागार म्हणुन मिपाकरचं नजरेसमोर आले.

मिपाकर जर खालील गोष्टींबाबत मार्गदर्शन करु शकले तर त्याची मला मदत होऊ शकेल.

१) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः चांगली बजेट लॉजेस/हॉटेल्स
२) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे
३) खवय्येगिरीसाठीची ठिकाणे.

प्रतिक्रिया

दोन्ही धार्मिकस्थळे आहेत आणि येणार कुठून आणि जाणार कुठे यावर वेळ वाढत जाईल आणि वाहन करून येणार असाल तर आणखी सोपे होईल .

विजयकुमार भवारि's picture

8 Mar 2015 - 9:52 pm | विजयकुमार भवारि

गणपती पुळे ला घरगुती राहण्याच्या चांगल्या सोयी आहेत ... फक्त मंदीरा च्या जवळ राहणे नको !...

चिपळूणवरून जातांना डेरवण(श्री शिव समर्थ गड), वेळणेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी(थिबा प्यालेस), पावस करून अंबा घाट मार्गे परतता येईल.

वेळ असेल तर (नाहीतर पुढील खेपेस)कोल्हापूर,पन्हाळा,ज्योतिबा,दाजीपुर अभयारण्यही पाहता येईल.

गणपतीपुळे येथे MTDC किंवा श्री गणेश कृपा हॉटेल

मधल्या रस्त्यात अंबा घाटात दि जंगल रिसोर्ट हे एक चांगले ठिकाण आहे.

सुनिल पाटकर's picture

13 Mar 2015 - 10:40 pm | सुनिल पाटकर

गणपतीपूळेचा समुद्र किनारा अप्रतिम आहे.हाँटेल अनेक पण लुटण्याचे प्रकार, येथे प्राचीन कोकण हा प्रकल्प पाहण्या सारखा जवळ केशवसुतांचे गाव मालगुंड येथे त्यांचे स्मारक आहे.
समुद्र किनारा .जेवणाच्या सोयी उत्तम, पावसला स्वरुपानंद समाधी ,मार्लेश्वर,रत्नागिरी,आरेवारे बीच पाहू शकाल

सुनिल पाटकर's picture

13 Mar 2015 - 10:40 pm | सुनिल पाटकर

गणपतीपूळेचा समुद्र किनारा अप्रतिम आहे.हाँटेल अनेक पण लुटण्याचे प्रकार, येथे प्राचीन कोकण हा प्रकल्प पाहण्या सारखा जवळ केशवसुतांचे गाव मालगुंड येथे त्यांचे स्मारक आहे.
समुद्र किनारा .जेवणाच्या सोयी उत्तम, पावसला स्वरुपानंद समाधी ,मार्लेश्वर,रत्नागिरी,आरेवारे बीच पाहू शकाल

गणपतीपुळे मधुन कोल्हापूर ला येताना रत्नागीरीतुन या. गणपतीपुळेहुन निघाल्यावर आरे वारे बीच आहे
अगदीच सुंदर.
शिवाय रत्नागिरीत बघण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत.जसे थिबा पॅलेस,मांडवी व भाटे बीच,टेबल पॉइंट इ.
रत्नागिरीतुन आंबा घाट मार्गे कोल्हापूर,आंबा घाट बघनेबल.
बाकी कोल्हापुरात येतानाच पन्हाळा बघुन येता येईल