पेपर फ्लॉवर..डच गुलाब

इशा१२३'s picture
इशा१२३ in विशेष
8 Mar 2015 - 2:07 am
महिला दिन

.
नमस्कार मंडळी!आपल्याला सजावटीसाठी आणि भेट देण्यासाठी नेहेमीच काहीतरी नविन हवे असते.अशावेळेस काही घरीच स्वतः बनवलेले असले तर आनंद वाढतो. अशाच एका वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी बनवला कागदी गुलाबांचा पुष्पगुच्छ.
.
कागदी फुलांसाठी लागणारे साहित्यः डुप्लेक्स पेपर(रंग-मी लाल आणि पिवळा घेतलाय)
तयार हिरवी कागदी पाने (गुलाबाची मिळतात)
२२ नं.जाड तार(घेताना हाताने सहज वळवता येतीये ना हे पहाणे)
हिरवी टेप
पांढरा दोरा
फेव्हिकॉल
कॄती: प्रथम एखाद्या जाड कागदावर फुलाच्या पाकळीचा व पुष्पाधाराचा आकार कापुन घ्यावा.कापलेला आकार डुप्लेक्स कागदावर उभ्या रेषेत ठेवून कापा. डूप्लेक्स कागदाची योग्य मापाची घडी घातल्यास एकावेळेस जास्त पाकळ्या कापता येतील.एका फुलासाठी साधारण १२ पाकळ्या आणि एक पुष्पाधार लागतो.

F
वर चित्रात दाखवल्याप्रमाणे पाकळ्या(साधारण ५सें.मी.उंच,खालचा बेस१.३ सेंमी आणि वर गोलाच्या इथे ४.३ आहे)
घेतल्या.त्यातील एक पाकळी गोलाकार फिरवा.परत दूसरी पाकळी पहिल्या पाकळीवर फिरवून दोर्‍याने बांधा.
नंतर २२ नं.ची लवचिक तार घेउन पाकळीच्या खालील भागास गुंडाळणे.
F
फूलाचा देठ जाड होण्यासाठी त्या तारभोवती अजून एक तार गुंडाळा. या पाकळ्यांवर २ पाकळ्या घेउन समान अंतरावर बांधा.

.
यापुढे तीन पाकळ्या बांधा.नंतर उरलेल्या ५ पाकळ्या बांधा.
हिरवा डूप्लेक्स पेपर घेउन जो पुष्पाधार पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे(साधारण४,५ सेमी.रुंद आणि ३.५सेमी.उंच)
कापला आहे त्याला फेव्हिकॉल लावून फुलाच्या खालील भागास चिकटवून घेणे.

Ff

पुष्पाधाराच्या खालून ते देठाच्याशेवटपर्यंत हिरवी टेप लावा.तयार पान फूलाला गुंडाळा गुलाब तयार.
R
या तयार फूलांची हवी तशी रचना करून सजावट वा गुच्छ तयार करता येइल.
.
लहान मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी चॉकलेट आणि फुलांचा गुच्छ!

.

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 2:51 pm | सविता००१

खूप सुरेख/ मस्तच आहेत फुलं. रंगसंगतीही छान आणि ते मोराचं तबक तर खूपच मस्त.
अप्रतिम कलाकृती.

आयुर्हित's picture

8 Mar 2015 - 4:21 pm | आयुर्हित

सोप्पी पध्दत, सुटसुटीत लेख, सुंदर व कल्पक पुष्परचना.

साती's picture

8 Mar 2015 - 6:57 pm | साती

मस्तं!
छान सोप्पं आणि सुबक काम आहे.

अप्रतिम ! खरंच कला आहे तुझ्या हातात. तिन्ही आवडलं आणि किती सोपं करून सांगतेस :)

तुझ्या लिहिण्याने सोपे वाटले तरी अशा गोष्टी सुबक सुन्दर करायला कल्पकता आणि कलात्मकता लागते.सुरेख सादरीकरण! मस्त.

आनन्दिता's picture

9 Mar 2015 - 11:04 pm | आनन्दिता

+१ मागे एकदा मी ड्च गुलाब करायला घेतले होते पण प्रत्यक्षात फुलुन फुलुन पाकळ्या पडायला आलेला गुलाब तयार झाला!!
तेव्हा पासुन मी फक्त कागदाच्या होड्याच बनवते.

सादरीकरणाला १०/१०. मोराच्या तबकाला, ११/१० :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2015 - 12:48 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

आरोही's picture

9 Mar 2015 - 2:07 pm | आरोही

किती ती कला !!आणि किती तो उत्साह !! सलाम ! काय देखणे दिसतायेत गुलाब ....

मधुरा देशपांडे's picture

9 Mar 2015 - 2:39 pm | मधुरा देशपांडे

सुरेख.

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 3:55 pm | स्पंदना

मस्तच!!
या साठी बोट अशी झरझर चालली पाहिजेत.

अजो's picture

10 Mar 2015 - 7:30 am | अजो

खूप ंमस्त

सस्नेह's picture

10 Mar 2015 - 5:22 pm | सस्नेह

कला आहे तुझ्या हातात, इशा.

जुइ's picture

10 Mar 2015 - 10:09 pm | जुइ

खुप छान आहेत ही फुले!! आईला ही फुले करताना पाहिले आहे.

पद्मश्री चित्रे's picture

11 Mar 2015 - 2:58 pm | पद्मश्री चित्रे

सही … शेवटचा फोटो एकदम सुरेख.. बघताना खूप सोप्पं वाटतं पण मला जमतच नाही ....

सानिकास्वप्निल's picture

11 Mar 2015 - 3:21 pm | सानिकास्वप्निल

किती सुंदर आहेत डच गुलाब खूप्प्प्प्प्प आवडले.
तु करतेस पण छानच , सुंदर सादरीकरण :)

गिरकी's picture

12 Mar 2015 - 3:56 pm | गिरकी

सुरेख झालेत गुलाब :)

मितान's picture

13 Mar 2015 - 5:01 pm | मितान

मला कधी जमणार :(
हे ही पुढच्या जन्मासाठी राखीव !!!!!

सुचेता's picture

13 Mar 2015 - 8:07 pm | सुचेता

देखणॅ झाले आहेत खरंच

आईग्ग! किती मस्त वाटतय बघायला! अशी भेट देण्याची कल्पना आवडली.
मला वाटते हस्तकलेची आवड शाळेत असताना लागते, मग हे सुट्टीत करायचे छंद होऊन जातात. नंतर ही अशी आठवण येत राहते. मी ऑर्गंडीच्या कापडाचे गुलाब करायला शिकले होते. अगदी क्लासला जावून वगैरे. त्यावेळी अमूक दुकानात हे साहित्य मिळते ते आणा म्हणून सांगितले जाई. २२ नंबरची तार, क्रेप कागद वगैरे साहित्य बघून दिल गुलाब गुलाब हो गया! ती मोराच्या पिसार्‍यात ठेवलेली फुले आवडली.

प्रीत-मोहर's picture

13 Mar 2015 - 9:47 pm | प्रीत-मोहर

हे मला या जन्मात जमेलसे वाटत नाही बॉ. तेव्हा इशे तु माझ्यासाठी फुलांची ऑर्डर घे कशी!!!

स्वाती दिनेश's picture

13 Mar 2015 - 9:58 pm | स्वाती दिनेश

गुलाब फार सुंदर आहेत!
स्वाती

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 3:05 am | उमा @ मिपा

सुंदर!
तू स्वतः कलाकार आहेसच शिवाय इतरांना कला शिकवण्याचही कसब तुझ्याकडे आहे, त्याबद्दल अभिनंदन!

पिशी अबोली's picture

16 Mar 2015 - 3:39 pm | पिशी अबोली

खूपच सुरेख!

वाव. किती सुंदर दिसतायत ती फुलं. करुन बघायला हवी. :)

छानचं अगदी. सवड झाली की नक्की करुन बघेन.

मधली काही चित्रे दिसत नाहीत. सुरेख धागा.

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 2:13 pm | कविता१९७८

मस्तं!
छान सोप्पं काम

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 2:13 pm | कविता१९७८

मस्तं!
छान सोप्पं काम

श्रीरंग_जोशी's picture

24 Mar 2015 - 1:21 am | श्रीरंग_जोशी

केवळ फोटो पाहिले असते तर पहिल्या दोन फोटोजमधले गुलाब खरोखरचेच वाटले असते.

अनन्न्या's picture

26 Mar 2015 - 12:21 pm | अनन्न्या

खूपच सुंदर! फोटोतली फुले खरीच वाटतायत!