नुग्गेहळ्ळी

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in भटकंती
5 Mar 2015 - 2:49 pm

होयसाळा राज्यघरण्याने दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत दक्षिण भारतात राज्य केले. त्यांनी जवळपास दोनशे मंदिरे बांधली. त्यातील हळेबेद बेलूरची मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. पण इतर बरीच मंदिरे दुर्लीक्षीत आहेत किंवा मोडकळीला आलेली आहेत.
नुग्गेहळ्ळी हे हसन जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. श्रवनबेळगोळा पासून अवघ्या २६ किलोमीटर असूनहि प्रवाश्यांपासून लपून राहिले आहे. ह्या गावात तेराव्या शतकातील दोन सुंदर मंदिरे आहेत - लक्ष्मी नरसिंह आणि सदाशिव . ह्या मंदिरात टिपलेले काही फोटो :

लक्ष्मी नरसिंह मंदिर
DSC_0883

मंदिराच्या भिंतीवर विविध देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत.

नाट्यलक्ष्मिची सुंदर मूर्ती
DSC_0770

क्लोज अप

DSC_0770-001

अजून एक लक्ष्मीची मूर्ती . ह्या दोन्ही मूर्त्यांच्या हातात मक्याचे कणिस बघा. हि मंदिरे युरोपियन भारतात येण्याआधी बांधलेली आहेत. त्यामूळे मका त्यांनी भारतात आणला हा तर्क चुकीचा ठरतो
DSC_0793

शेष नागवारील विष्णू.
DSC_0845

गोवर्धन पर्वत उचलणार कृष्ण।
DSC_0853

अजून एक विष्णू
DSC_0864

हिरण्यकश्यपूचा वध
DSC_0747

कालिया मर्दन.
Taming Kaliya

सदाशिव मंदिरात फारसे कोरीव काम आढळत नाही . पण मंदिर प्रेक्षणिय आहे.
DSC_0969

अधिक माहितीसाठी
http://en.wikipedia.org/wiki/Lakshmi_Narasimha_Temple,_Nuggehalli
http://nuggehalli.org/

बेंगलोरहून श्रवनबेळगोळा आणि नुग्गेहळ्ळी एका दिवसात प्रवास पूर्ण होऊ शकतो. सार्वजनिक वाहतुकीची सोय बहुधा नसावी. जेवण श्रवनबेळगोळामध्ये केलेले उत्तम

प्रतिक्रिया

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 2:56 pm | खंडेराव

फोटोही मस्त आलेत आणि मंदीरही..काय डिटेल्स् आहेत कामात..

होयसळांचे मंदिर म्हणजे नादच नाय करायचा. इतके जबराट कोरीवकाम अन्यत्र क्वचितच कुठे आढळते. अपरिचित मंदिराची माहिती करून दिल्याबद्दल बहुत धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2015 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त!

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 3:26 pm | कपिलमुनी

ते लाइट इफेक्ट कसे दिलेत ?

पॉइंट ब्लँक's picture

5 Mar 2015 - 3:38 pm | पॉइंट ब्लँक

हे फोटो दुपारी तीनच्या सुमारास काढले आहेत. त्यामुळे लाइट थोडा हार्श आहे. तो कमी करण्यासाठि थोडा ब्लर आणि विग्नेट चा उपयोग केला आहे. पिकासा आणि गिम्प मध्ये काहि पर्याय आहेत. उदा कर्व वापरून काहि अंशी छेड छाड करता येते :)

ह्या दोन्ही मूर्त्यांच्या हातात मक्याचे कणिस बघा.

ते म्हाळुंग असावं. कोल्हापूर महालक्ष्मीच्या मूर्तीतही हे कोरलेलं सापडतं.

पॉइंट ब्लँक's picture

5 Mar 2015 - 3:49 pm | पॉइंट ब्लँक

हम्म. एकंदर वादाच विषय दिसतोय. आधि वाचायला हव होत.
http://scholar.google.co.in/scholar?q=maize+in+india+somnathpur&btnG=&hl...
http://www.econ.ohio-state.edu/jhm/arch/maize.html
असो. नजरेस आणून दिल्याबद्द्ल आभारि आहे.

सविता००१'s picture

5 Mar 2015 - 3:51 pm | सविता००१

कसल्या सुरेख आणि कोरीव मूर्ती आहेत. फोटो पण मस्तच आलेत.
आणि म्हाळुंग बद्दल सूड शी बाडीस.

एस's picture

5 Mar 2015 - 4:01 pm | एस

उत्तम ओळख.

थोडे अजून फोटो टाकायला हवे होते असे वाटले. आणखी लिहा ह्या विषयावर.

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 2:19 pm | पॉइंट ब्लँक

सूचनेबद्दल आभारी आहे. मिपावर पहिल्यांदाच लिहिले आहे. पूढिल लेखार सुधारण्याचा प्रयत्न करेन.

अनुप ढेरे's picture

5 Mar 2015 - 4:10 pm | अनुप ढेरे

भारी!

कंजूस's picture

5 Mar 2015 - 6:08 pm | कंजूस

बहळा सुंदरवादा.
नृसिंह फारच आवडला नवीन ठिकाणाची ओळख +१आणि लाइट इफेक्टस परिणामकारक +१.थोडक्यात छान.कणीस समृद्धिचे प्रतीक मध्यभागी फुगिर दिसतंय मक्याचं नसतं.

प्रचेतस's picture

5 Mar 2015 - 6:55 pm | प्रचेतस

म्हाळुंगं किंवा बीजापूरक.
प्रजननशक्तीचे प्रतिक मानतात ह्या लिंबूवर्गीय फ़ळाला.

बाकी होयसळ शैली खूपच सालंकृत असल्याने साधेपणातील सौंदर्य येथे अजिबातच दिसत नाही.

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 2:26 pm | पॉइंट ब्लँक

माहिती बद्दल धन्यवाद. काहि ठिकाणी ते मु़क्ताफळ pe.arl-fruit नावचे काल्पनिक फळ असल्याचे काल वाचनात आले.

black pearl's picture

5 Mar 2015 - 8:18 pm | black pearl

अप्रतिम फोटो ...

रेवती's picture

5 Mar 2015 - 9:47 pm | रेवती

सुरेख!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2015 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम शिल्पकला आणि सुंदर फोटो !!!

स्वाती दिनेश's picture

16 Mar 2015 - 6:21 pm | स्वाती दिनेश

अप्रतिम शिल्पकला आणि सुंदर फोटो !!!
हेच म्हणते,
स्वाती

चौकटराजा's picture

6 Mar 2015 - 6:20 am | चौकटराजा

काही कारणाने हलेबीडू बेलूर पाहून सुद्धा श्रवण बेळगोळ पहायचे राहून गेले आहे. आता योग आल्यास हे ही ठिकाण पहाता
येईल. त्यासाठी धन्यवाद. बाकी वल्लींचा मुद्दा बरोबर आहे. दक्षिणेतील कोरीव कामात अलंकारांचा अंमळ अतिरेकच दिसतो.
अर्थात त्याचे कवतिकही आहेच !

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 2:21 pm | पॉइंट ब्लँक

काहि साधी सुंदर जागाहि आहेत. लिहिन पूढच्यावेळी त्यांच्याबद्दल.

पिलीयन रायडर's picture

6 Mar 2015 - 4:16 pm | पिलीयन रायडर

अहाहाहा!!!!! काय फोटो..काय फोटो!!!!

अहो तुम्ही वॉटरमार्क नाहीत का टाकला? कुणी ढापले तर? मी तर सेव्ह करुन घेतेय माझ्याक्डे, पण कुठेही वापरणार नाही.. माझ्या आनंदासाठी.. करु का?

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 5:16 pm | पॉइंट ब्लँक

वॉटरमार्क आज पर्यंत वापरला नाहि. तुम्हाला फोटो आवडले आणि चोरी करण्याचे लायकिचे आहेत हे वाचून आनंद झाला :). तुम्हि फोटो सेव करून ठेवू शकता. :)

सतीश कुडतरकर's picture

10 Mar 2015 - 4:43 pm | सतीश कुडतरकर

चोरी करण्याचे लायकिचे आहेत हे वाचून आनंद झाला>>

:-)

विशाखा पाटील's picture

6 Mar 2015 - 6:38 pm | विशाखा पाटील

सुंदर फोटो! काय शिल्पकाम आहे!

अनय सोलापूरकर's picture

9 Mar 2015 - 6:09 pm | अनय सोलापूरकर

छान माहिति

झकासराव's picture

10 Mar 2015 - 4:48 pm | झकासराव

मस्त आहेत फोटो.
लाईट एफेक्ट्स छान वाटत आहेत.
:)

प्रियाजी's picture

11 Mar 2015 - 3:45 pm | प्रियाजी

एका नवीन प्रवास स्थ्ळाची अत्यंत उपयुक्त माहिती. फोटोही अतिशय सुरेख. अजून इतर ठिकाणांची माहिती शक्य असल्यास द्या. वाचन खूण साठविली आहे.

फोटोग्राफी अप्रतिम.......

पैसा's picture

13 Mar 2015 - 8:40 pm | पैसा

मूर्तींवरील अलंकरण बघून शब्द संपले! तुम्हाला या फोटोंसाठी खूप धन्यवाद! असेच आणखी अपरिचित ठिकाणांबद्दल खूप लिहा!

आनन्दिता's picture

14 Mar 2015 - 3:19 am | आनन्दिता

शिल्पे अफाट देखणी आहेत.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2015 - 6:14 am | मुक्त विहारि

थोडे अजून प्रवासवर्णन हवे होते.

सतीश कुडतरकर's picture

14 Mar 2015 - 1:17 pm | सतीश कुडतरकर

शिल्पांच सौंदर्य फोटोमध्ये मस्तच उतरलंय.