वाडा ( भाग 1 )

जयंत माळी's picture
जयंत माळी in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 9:12 pm

------ वाडा -------------

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो
मी जयंत माळी घेऊन आलोय एक खास भयानक कथा.
ही कथा पुर्णत: काल्पनीक असून
या कथेतील पात्रे , घटना , स्थळ यांचा कोणत्याही खर्या घटनेशी संबंध नाही. तसे आढळल्या तो निव्वळ योगायोग समजावा
कथेचा लेखक :- जयंत माळी
कथेतील पात्रे :
1} रामराव चंद्रकांत पाटील ( माजी सरपंच )
2} विकास रामराव पाटील
3} सुखदा विकास पाटील
4} सचिन शर्मा
5} विनायक शर्मा
डोंगराच्या कुशीत वसलेले आई जगदंबेची कृपा असणारे करेवाडी गाव.
रामराव पाटील या गावचे माजी सरपंच. रामरावांना गावात भरपुर मान होता. रामरावांचा गावाच्या जवळ एक वाडा होता.
वाड्याच्या मागे विहीर होती.
वाड्यातील प्रत्येक खोली 20 खणांची होती. रामरावांचा एकुलता एक मुलगा विकास पाटील हा कर्नाटक मध्ये M.B.B.S च्या शेवटच्या वर्षाला होता. विकास जन्म होता क्षणीच त्याची आई स्वर्गवासी झाली होती. त्याचे शिक्षण पुर्ण होताच रामरावांनी त्याचे लग्न उरकले. खुप दिवसांनी वाड्यात शुभकार्य पार पडले. पण यानंतर येणार्या संकटाची चाहूल कोणालाच नव्हती.
विकासने गावतच एक रुग्णालय चालु केले.
त्यातच एका चांगल्या बातमीने संपुर्ण वाड्यात एकच आनंद पसरला ती बातमी होती विकास बाप होणार होता सुखदा गरोदर होती पण जेवढी आनंद देणारी बातमी होती तेवढाच त्रास होणार होता
हे गुपीत गोष्ट फक्त रामरावांना माहीत होती.
रामराव पाटील यांनी केलेली चुक संपुर्ण कुटुंबाला भोगावी लागणार होती.
त्यांचेकडुन विकासच्या जन्मानंतर एक स्त्री गरोदर राहीली होती तो आळ स्वतःवर येऊ नये यासाठी त्यांनी त्या स्त्रीची वाड्यातील एक खोलीत हत्या करून तिला वाड्याच्या विहीरीत टाकले होते पण तिने मरता मरता त्या वाड्याला एक शाप दिला होता की " या वाड्यात यानंतर कोणताही वारस मी जन्माला येऊ देणार नाही तसेच त्या वेळी मी एकाच तरी बळी घेणारच तेव्हाच मी मुक्त होईन "
रामरावांनी ती खोली तेव्हापासून बंदच केली होती.
सुखदाचे गरोदरपणाचे पहिले चार - पाच महिने चांगले गेले.
रामरावांना वाटले त्या स्त्रीचा शाप खोटा ठरतोय पण तो एक जीवाच नव्हे तर दोन जीवांचा शाप होता.
सुखदाला सहावा महिना चालु झाला तस तसं तो शाप खरा ठरण्यास सुरुवात झाली होती.
सकाळीच सुखदाच्या अंघोळीच्या पाण्याचे रक्त झालेले पाहुन ती चक्कर येऊन स्नानगृहातच पडली.
त्या दिवशी रात्री ती 2 वाजता त्या विहरीच्या दिशेने जाताना रामरावांना दिसली रामरावांना कळून चुकले की तो शाप खरा ठरतोय.
रामरावांनी तिला लगेच अडवले.
दुसर्या दिवशी लगेच रामरावांनी गावातील मांत्रिकाला बोलावले त्याला सर्व सांगितले. त्याने वाड्यातील ज्या खोलीत स्त्रीची हत्या झाली होती ती खोली त्यांनी मंत्रांनी बंद केली पण त्याचा आता काही उपयोग नव्हता कारण त्या स्त्रीचा आत्मा जागृत झाला होता त्यामुळे त्या मांत्रिकाचा फार उपयोग झाला नाही.
दुसर्या दिवशी इकडे सुखदा निवांत बसली असताना तिच्या हातावर अचानक कशाचा तर वार झाला.
ती जोरात किंचाळली तिच्यावर लगेचच उपचार केले.
रामरावांनी हा प्रकार विकासला समजवला त्याला तो पटला सुध्दा त्याला लगेच त्याच्या कर्नाटकच्या काँलेज मधील मुळचे महाराष्ट्रीयन असलेल्या मित्रांची आठवण झाली.
सचिन आणि विनायक या दोघांना त्याने लगेचच फोन केला.
सचिन आणि विनायक दोघे सख्खे भाऊ दोघे PARANORMAL WORLD च्या अभ्यासात पटाईत अनेक वास्तुंचे दोष त्यांनी दुर केले होते.
दुसर्या दिवशी सचिन वाड्यावर आला.
रामरावांनी आणि विकासने संपुर्ण हकिकत त्याला समजावली. सर्व ऐकून तो थक्क झाला कारण आतापर्यंत असली केस त्याने सोडवली नव्हती.
इकडे सुखदावर त्या आत्म्याचा प्रभाव वाढत होता. सुघदाच्या सेवेसाठी ठेवलेल्या मुलीचा मृतदेह त्या खोलीबाहेरच टांगला होता.
तिची आत्महत्या नसुन ती हत्या होती. ती पण अगदी भयानक तिला मारले होते. संपुर्ण अंगावर छिद्रे होती तसेच तिचे डोळे बाहेर काढले होते.
त्या आत्म्या पहिला बळी घेतला होता. मुलीच्या हत्येमुळे प्रकरण आता पोलिसांत गेले होते.
सचिन ने रामरावांना ती खोली खोलण्याचा आग्रह केला पण रामरावांनी त्याला नकार दिला.
त्या रात्रीच विकास आणि सचिनने त्या खोलीचे कुलुप तोडून त्या खोलीत प्रवेश केला.
आत प्रवेश करताच सचिनला तेथे त्या दोघांशिवाय तिसरे कोणीतरी आहे याच अंदाज लागला त्याने लगेच MOTION SENSOR चालु केला. ( MOTION SENSOR हे एक PARANORMAL EQUIPMENT आहे की जे अदृश्य शक्तींची हालचाल समजावयाला मदत करते. )
त्याला त्या आत्म्याची हालचाल
विकासच्या मागे जाणवत होती
पण खुप उशीर झाला होता त्या आत्म्याने विकासच्या खांद्यावल वार केला होता. विकास इतका जोरत ओरडला होता की त्याचा आवाज संपुर्ण वाड्यात घुमला होता पण प्रत्यक्षात त्याचा आवाज त्या खोलीच्या बाहेर गेलाच नव्हता. सचिनने लगेच विकासला खोलीबाहेर आणले.
ती खोली उघडुन त्यांनी चुकच केली होती त्या चुकीचे परिणाम किती भयंकर होणार होते हे कोणालच माहित नव्हते.

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

काय भौ ,सगळ रहस्य आधीच सांगुन टाकल..
पोलीस टैम्स मध्ये हायस का ????????????????????????????

२०-२० खणांच्या एकेका खोलीला तुळया किती मोठाल्या असतील असा प्रश्न पडला आणि मनातल्या मनात प्रचंड शहारलो. चित्तथरारक कथा आहे! धाडधाड तीन पिढ्यांपर्यंत पोचलीसुद्धा! वेग पाहूनच पाचावर धारण बसली. मोशन सेंसरची कंसातली तिथल्या तिथे दिलेली माहिती पाहताच भीतीने अगदी घाबरगुंडी उडाली! मोजिंना च्यालेंज करणारं कोणीतरी पैदा झालंय या कल्पनेनंच दचकलो!

ततपप..., आपलं ते पुभाप्र.

जयंत माळी's picture

4 Mar 2015 - 9:27 pm | जयंत माळी

पहिली कथा आहे
तुमचे प्रतिसाद पाहुन पुढच्या कथा चांगल्या लिहायचा प्रयत्न केला जाईल

जयंत माळी's picture

4 Mar 2015 - 9:29 pm | जयंत माळी

पुढचे वेळी इतकी स्लो लिहणार की .....

आदूबाळ's picture

4 Mar 2015 - 9:58 pm | आदूबाळ

चित्तथरारक कथा आहे.

आमच्या ऑफिसच्या प्रत्येक मजल्यावरही वीस वीस खण (क्युबिकल्स) आहेत. त्यातल्याच एका खणात बसून रामरावांची कहाणी वाचत होतो. वाचून झाल्यावर टेबलावर सहज नजर गेली तर रक्ताच्या रंगाचं काहीतरी पडलेलं दिसलं. वर सांगितल्याप्रमाणे माझं चित्त तर थरारलंच, पण कोपरही थरारलं आणि त्या रक्तिम रंगाच्या दाट द्रव्यात गेलं.

शेजारी बसलेली सहकारीण चमकून पहायला लागली, पण समजूतदारपणे हसत तिने टिश्यू पेपर पुढे केला.

"नाही!" मी निर्धाराने म्हणालो. "हे पाप माझ्याच्याने होणार नाही!"

टोमॅटोचे शाप तर मला बसलेच होते, पण इतर कोणत्याही झाडाचे तळतळाट मला घ्यायचे नव्हते.

("वेचक टोमॅटो केचप" या आगामी भयकथासंग्रहातून साभार)

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

कपिलमुनी's picture

4 Mar 2015 - 10:14 pm | कपिलमुनी

पुभाप्र..

जाता जाता @गवि : तुमीबी वाड्याच्या पुढच्य भागाचं मनावर घ्या

धडपड्या's picture

4 Mar 2015 - 10:20 pm | धडपड्या

तुम्ही फेसबुक वरच्या, लहान पोरांच्या, MY HORROR EXPERIENCE या पेजवर पण लिहीता का?

जयंत माळी's picture

4 Mar 2015 - 11:09 pm | जयंत माळी

हिच कथा MHE पेजवर दिली होती मी

विकास पाटील हा कर्नाटक मध्ये M.B.B.S च्या शेवटच्या वर्षाला होता. त्याचे शिक्षण पुर्ण होताच रामरावांनी त्याचे लग्न उरकले. खुप दिवसांनी वाड्यात शुभकार्य पार पडले. पण यानंतर येणार्या संकटाची चाहूल कोणालाच नव्हती.विकासने गावतच एक रुग्णालय चालु केले.त्यातच एका चांगल्या बातमीने संपुर्ण वाड्यात एकच आनंद पसरला ती बातमी होती विकास बाप होणार होता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2015 - 8:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

गणित चुकतयं काहीतरी नै? =))

पदम's picture

5 Mar 2015 - 8:40 am | पदम

क्रमशः लिहायला विसरलात का?

यमगर्निकर's picture

5 Mar 2015 - 12:31 pm | यमगर्निकर

भयकथेचा विषय, पात्र, स्थळ खुप चांगले निवडले आहेत, पण कथेचा वेग खुपच जास्त आहे, भयकथेत जेव्हडे बारकावे येतिल तेव्हडि भयकथा रोमांचक होते, विकास आणि सचिनने त्या खोलीचे कुलुप तोडून त्या खोलीत प्रवेश करतात हा प्रसंग अजुन रंगवता आल असता, अजुन प्रसंगात बारकावे येउदेत मग खुपच मजा येइल.

मनिमौ's picture

5 Mar 2015 - 2:47 pm | मनिमौ

करताना पात्रे अजुन रंगवा. त्यांचे संवाद असतील तर मजा येईल. TRAP एकदा वाचा. खुप शिकायला मिळेल.बाकी पुलेशु

फेसबुकवर भुताटकी समूहात ही कथा वाचली आहे.

जयंत माळी's picture

6 Mar 2015 - 8:27 pm | जयंत माळी

पिंगू लिंक द्या किंवा ग्रुपचे नाव सांगा ?

विजुभाऊ's picture

10 Mar 2015 - 3:16 pm | विजुभाऊ

खूप छान बालकथा आमि कित्ती घाबल्लो.