३१ डिसेंबर-काय चुकलं

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in काथ्याकूट
4 Mar 2015 - 3:18 pm
गाभा: 

३१ डिसेंबरची संध्याकाळ. माझ्या मित्राची मुलगी. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे वय असेल २०, २१. पार्टीला निघाली. जाताना वडिलांची परवानगी घ्यायला आली. वडिलांनी विचारले "पार्टीला बरोबर कोण कोण आहे ?" तिने सांगितले अजून २ मैत्रिणी आहेत आणि त्यांचे २ मित्र(मुलगे) आहेत. यावर वडिलांनी(आमच्या मित्राने) विचारले या सगळ्यांची वये काय आहेत. ती म्हणाली, "सगळे आमच्याच वयाचे आहेत." मित्राने विचारले, "ड्रिंक्स घेतात का ?" ती म्हणाली "कधी कधी घेतात. सोशल ड्रिंकर आहेत" यावर आमच्या मित्राने निर्णय ऐकवला, "तुमचे मित्र अजून तरुण आहेत, पुरेशी समज नाही. त्यात पुन्हा दारु पिणार असतील तर कंट्रोल राहणार नाही. त्यापेक्षा तू आज पार्टीला जायचेच नाहीस !"

यामुळे मुलगी बापावर रागावली. मुलीचे मन मोडल्याबद्दल आमच्या मित्रावर त्याची बायको रागवली काही प्रमाणात त्याची बाजू तिला पटली असली तरी. आमच्या मित्रालाही खरेच कळेना आपलं नेमकं काय चुकलं.

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

4 Mar 2015 - 5:10 pm | सर्वसाक्षी

१) आपल्या मुलीला तू पीतेस का अस का नाही विचारलं?
२) तरुण मुलीला तरुण मुलांबरोबर रात्री पाठवणे जोखमीचे वाटते, असे स्पष्ट का सांगितले नाही?

दारु पिण्याचा आणि मुलींच्या बाबतीत कंट्रोल असायचा संबंध नाही. जर मुलाना मुलींवर जबरदस्ती करायचीच असेल तर ती न पीताही करु शकतात. सकाळ संध्याकाळ मुलींकडे पाहुन गलिच्छ शेरेबाजी करणारे प्यायलेले नसतात. बलात्कारातले बहुतेक आरोपी पूर्ण शुद्धीत गुन्हा करतात. 'माझा अशिल तर्र असल्याने त्याने नकळत बलात्कार केला' असा बचाव कुणा वकिलाने केल्याचे ऐकीवात नाही. दारु प्यायल्यावर एखाद्याची अन्यथा न होणारी हिंमत होउ शकते पण ते अवसान तितकच.(उलट जर ते टाईट असले तर मुलीना सुटकेची संधी आहे.). जर त्या मुलांनी आपण प्रसंगोपत्त पीतो हे त्या मुलीला सांगितले होते व तिनेही ते वडीलांपासून लपविले नव्हते तर ते दारुडे नक्की नव्हते आणि काही लपवाछपवी नव्हती हे वडीलांनी विचारात घ्यायला हवे होते. समजा मुलीने 'फक्त मैत्रिणीच आहेत' असे खोटे सांगितले असते तर? यापुढे ती मुलगी असे करायला प्रवृत्त होणे स्वाभाविक आहे.

या पेक्षा आपल्या मुलीच्या मैत्रिणी कोण, आपण त्यांना ओळखतो का, आपली मुलगी नेहेमी त्यांच्याबरोबर असते का हा हे पाहायला हवे होते. आपली मुलगी त्या मित्रांना किती आणि कधीपासून ओळखते, ती आधी कधी त्यांच्याबरोबर कुठे गेली आहे का तेही विचारयला हवे होते.

सद्य परिस्थ्तितीत रात्री उशीरापर्यंत तुला बाहेर जाउ देणे हे फार असुरक्षित वाटते हे स्पष्ट सांगणे आवश्यक होते.

अत्रन्गि पाउस's picture

4 Mar 2015 - 5:31 pm | अत्रन्गि पाउस

असेच म्हणतो

स्वाती२'s picture

4 Mar 2015 - 7:44 pm | स्वाती२

+१

खरे तर तरुण मुले असतील तर त्यांचे वय, उत्साह लक्षात घेता पार्टी वगैरेचे प्लॅन्स असणे स्वाभाविक आहे. काय प्लॅन्स आहेत हे आधीच विचारावे. शक्य असेल तर पार्टी अरेंज करण्यासाठी मदत करायची तयारी दाखवावी. मुलांना पार्टीसाठी सेफ जागा, अंडर एज ड्रिकिंग होऊ नये या साठी प्रयत्न, येण्याजाण्यासाठी वाहतुकीची सोय/राहायची सोय वगैरे गोष्टी पालकांनीच एकत्र येवून पुढाकार केल्या तर सगळ्यांनाच सोइचे जाते.

सभ्य माणुस's picture

12 Mar 2015 - 8:02 am | सभ्य माणुस

सहमत.

सद्य परिस्थ्तितीत रात्री उशीरापर्यंत तुला बाहेर जाउ देणे हे फार असुरक्षित वाटते हे स्पष्ट सांगणे आवश्यक होते.

यालाच जोडून मी आणखी एक मुद्दा इथे मांडू इच्छितो कि, तरुण मुलांना आणि मुलींना, अश्या प्रसंगात कळत नकळत घडू शकणार्या प्रसंगाबाबत त्यांना झेपेल अश्या भाषेत समजावणे गरजेचे आहे. रागावून सांगून किंवा जबरदस्ती करून हि मुले ऐकणे फार कठीण असते. असे केल्यास पुढच्या वेळी ती खोटे कारण सांगून परवानगी मिळवतील. त्यामुळे त्यांना एक मित्र म्हणून सांगितले तर निश्चितच ती ऐकतील .
एक वेळ असे आपण मानु कि तिच्याबरोबर असलेली मुले चांगली आहेत. आणि कोणताही गैरप्रकार करणार नाहीत. परंतु बाहेर असे असंख्य लोक आहेत जे रात्रीच्या वेळी मुलींवर अत्याचार करू शकतात.
मुलींना आणि मुलांना देखील आपल्यासोबत बाहेर कोणते संभाव्य गैरप्रकार घडू शकतात याची जाणीव असणे गरजेचे आहे. काही अनर्थ घडून गेल्यावर बोलण्यापेक्षा अनर्थ होऊच नये यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे हे फार गरजेचे आहे.

विवेकपटाईत's picture

4 Mar 2015 - 8:16 pm | विवेकपटाईत

१. थोडी दारू घेतली, त्यात काही हरकत नाही.
2. साहजिक मुलीला तिचे मित्र घरापर्यंत सोडतील.
३. वेळ रात्रीची, निश्चित १२ नंतरच घरी परतणार.
पुढचा धोखा
१. तुम्ही घेतलेली आहे, एक घूंट का असेना, दुसर्याला कळतो.
२. आटो परत येताना, आटो वाल्याला वाटेल ( जर त्याच नियत खराब झाली असेल कारण ३१ डिसेंबर बहुतेक त्याची दारू पिण्याची शक्यता नाकारता येत नाही) , ह्या मुलीने दारू घेतली आहे, अर्थात ती चालू आहे. वेळ रात्रीची आपण ही हात मारून पाहावे, कुणाला ही कळणार नाही. तिचा मित्र तिला अश्या परिस्थितीतून वाचवू शकेल का?

दिल्लीचे निर्भया कांड आठवा

काळ वेळ परिस्थिती पाहून 'मुलीने तिच्या मित्रांसोबत' पार्टी, पिकनिक इत्यादी केली तर त्यात आनंद ही मिळेल आणि सुरक्षितता ही.

अभिजित - १'s picture

5 Mar 2015 - 8:23 pm | अभिजित - १

काहि चुकले नाहि. मुल माजलि आहेत .. त्यान्च्य किति आहारि जायचे ते पालकानि ठरवयचे .

नर्मदेतला गोटा's picture

7 Mar 2015 - 10:08 pm | नर्मदेतला गोटा

बरोबर

स्वैर परी's picture

9 Mar 2015 - 7:31 pm | स्वैर परी

बरोबर केले

स्वैर परी's picture

9 Mar 2015 - 7:31 pm | स्वैर परी

बरोबर केले

नावातकायआहे's picture

10 Mar 2015 - 8:36 pm | नावातकायआहे

ह्या वयात नाही मित्रमैत्रिणीं बरोबर जायच तर कधी?
दुनिया जाते ३१ला बाहेर... त्याचे पियर प्रेशर (मराठी शब्द?) असतेच.
जर मित्र मंडळी ओळखीची असतिल तर काहीच हरकत नाही.
आणि दारु पिउन अती प्रसंग होणारच हे ग्रुहितक कश्याला?
आणि झालाच तर त्यात मुलिची चुक काय??

मराठी_माणूस's picture

11 Mar 2015 - 11:55 am | मराठी_माणूस

आणि झालाच तर त्यात मुलिची चुक काय??

होणारे परीणाम भोगणार कोण?

..पार्टीच्या ठिकाणावर भर द्यायला हवा.चांगल्या दर्जाचे पब्लिक रेस्टॉरंट किंवा पब्लिक इव्हेन्ट / कॉन्सर्ट अशा ठिकाणी ओके.
..कोणाच्या फ्लॅटवर किंवा फार्महाउसवर = रेड फ्लॅग.
...मित्रांवर संशय घेतलेला या वयोगटात सहन होत नाही.

.मित्र दिलदार जिवाभावाचे इ इ च असतात त्या फेजमधे..अन पालक पोलीस. आपण पोलीस वाटू नये यासाठी फार आधीपासून बदल करावे लागतात.