बिडी काडी

सुचिकांत's picture
सुचिकांत in जनातलं, मनातलं
3 Mar 2015 - 7:57 pm

माझे मूळ गाव थेऊर(चिंतामणीचे). तसे उरुळी कांचन (जिथे गांधीजींचा निसर्गोपचार आश्रम आहे) पण बालपण थेऊर मधेच गेले. आई-वडील तिथल्याच हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. आम्ही d-type चाळीमध्ये मध्ये रहायचो. साखर कारखान्याने ही चाळ बांधली होती. भरपूर मित्र. गोट्या, सूरपारंब्या, कांदाफोड, क्रिकेट, विष अमृत, लपाछपी, अप्पाराप्पी, शिवाजी म्हणतो, donkey-monkey, विटी दांडू, असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. फुलपाखरे पकडायला जाणे, रात्रीच्या शेकोटीसाठी चोयट्या गोळा करून आणणे,मासे पकडायला जाणे, पोहायला जाणे, संध्याकाळच्या वेळेस काजवे पकडायला जाणे, आणि लिंबू टिंबू असल्यामुळे नेहमीच राज्य घालणे, २-२ किलोमीटर लंगडी घालणे, अशा अनेक “नोकऱ्या” केल्या. आता एवढया सगळ्या नोकऱ्या करून माणूस थकणार, हो कि नाही? मग थोडा विरंगुळा आणि काहीतरी वेगळे करण्याची भलती हौस. वय वर्ष : ८-९

आमच्या चाळीमध्ये पवार काका म्हणून रहायचे. (नाव बदललेले आहे :p). बाकी सर्व कुटुंबांच्यापेक्षा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, अर्थात आमच्यासाठी त्या काळी,श्रीमंत या शब्दाची व्याख्या म्हणजे पवार कुटुंब! त्यांचा मुलगा म्हणजे आमचा खास मित्र; त्यांच्या घरी येणे जाणे असायचे. बऱ्याच वेळा आम्ही त्यांना काचेच्या ग्लासात औषध पिताना सुद्धा पहायचो. बऱ्याच वेळेस ते औषध पीत पीत, सिगारेट सुद्धा ओढायचे. आता मुख्य विषय इथे सुरु होतो!
तर सिगारेट ओढल्यावर काय होते बरे? नक्की हा प्रकार काय असतो? अच्छा तर मग ठरलं, सिगारेट ओढायची!!!! मी आणि माझ्या मित्राने खिसे चाचपले तर निघाले "चार आणे". दूध गोळ्या खाण्यासाठी मिळालेले, ५ पैशाला १ दूध गोळी मिळायची!!!! असो, तर सिगारेट!!!! एवढे माहित होते कि सिगारेट पिऊ नये, आरोग्याला चांगले नसते वगैरे, पण उत्सुकता स्वस्थ बसून देत नव्हती. कुलकर्णी पानवाल्याकडे कसे जायचे, कोणी काय विचारायचे सर्व plan तय्यार. खरतर सर्व काही मीच करणार होतो. कुलकर्णी पानवाला बाबांचा विद्यार्थी, आता कसं करायचं? तरी धाडस बघा, मी गेलोच.

मी : १ सिगारेट द्या
पानवाला : कोणासाठी?
मी : पवार काकांसाठी. ते तिथे झाडाखाली थांबलेत.
पानवाला : २५ पैशात सिगारेट येत नाही,
मी : ठीक आहे बिडी द्या मग,

आणि त्याने दिली!!!!!! का दिली बरे? त्याला पवार काकांचा सिगरेटचा ब्र्यांड माहित होता, आणि त्यांच्या नावावर आम्ही २५ पैशात बिडी घेतली आणि त्याने ती दिली सुद्धा!!!

काडेपेटीचा बंदोबस्त करणे फार अवघड नव्हते. आता जागा! कुठे प्यायची बिडी? तर छतावर. आमचे छत म्हणजे सिमेंटचा पत्रा. तर दुपारच्या वेळेस आम्ही डाव केला. सगळीकडे सामसूम असताना बिडी आणि काडी घेऊन पत्र्यावरचा कोपरा गाठला. बिडी पेटवण्याचे अनेक प्रयत्न सुरु झाले. आमच्याच्याने ती पेटेना.
पेटली तर २ वेळा विझून गेली. यशस्वीरीत्या बिडी पेटवल्या नंतर पुढची पायरी होती झुरका मारणे. पहिल्याच झुरक्यात असा ठसका लागला म्हणून सांगू……तर त्या दिवसापासून आज पर्यंत ही गोष्ट गुपित म्हणून माझ्या आठवणींच्या पोतडीमध्ये बंद झाली.

कथालेख

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

3 Mar 2015 - 8:08 pm | नगरीनिरंजन

असं तुकड्या-तुकड्याने लिहीण्यापेक्षा तुम्ही डायरेक ४-५०० पानी आत्मचरित्र लिहून प्रसिद्ध का करत नाही? वाचकांच्या उड्या पडतील.

गंमत म्हणून लिहिले आहे, खूप अगोदर! माझा पिंड लेखकाचा नाही.

नगरीनिरंजन's picture

3 Mar 2015 - 8:21 pm | नगरीनिरंजन

हरकत नाही. फक्त इथे एकदम सगळं टाकू नका. आमचा वाचनाचा वेग फार कमी आहे.

हाडक्या's picture

4 Mar 2015 - 6:18 am | हाडक्या

माझा पिंड लेखकाचा नाही.

आपला पिंड कशाचा आहे हे कसे कळते हो? नै म्हंजे काउ येऊन सांगतो काय कानात (नै तर स्वप्नात) ??

(तशी लै दिवसांची शंखा आहे आम्ची कुनी तरी शिकरन कराच)

इरसाल's picture

4 Mar 2015 - 10:19 am | इरसाल

ते पिंड बिंड इथे लिहु नका.
मिपाकर पिंडाला कावळा नाय शिवु देत कोणाच्या ;)

सुचिकांत's picture

3 Mar 2015 - 8:28 pm | सुचिकांत

वेळ मिळेल तसे वाचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2015 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, जरा दमानं घ्या . मिपावर आलोय की कोणा सुचिकांताच्या ब्लॉगवर कै कळना ना !
वेळ मिळेल तसं वाचुच पण मिपाकरांच्या संयमाचा बांध तुटला की मंग कै खरं नै हेबी ध्यानात ठेवा. :)

आणि हो, इथं कै मिपाकरांना जादु- टोनाबी येतो लिहिलेलं आपोआप गायबबी होतं. ;)

-दिलीप बिरुटे
(एक जादुगार) :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 8:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांना ऐ..ताईंच्या लेखांची लिंक देउ का मिपाकरांची कपॅसिटी दाखवायला?

@सुचिकांत साहेब, तुमचे लेख अतिशय चांगले आहेत ह्यात शंका नाही. पण एका दिवशी एवढे लेख टाकलेत तर मिपाकर साधारण धाग्याची अशी विचार-पुस करतात. ह्या लिंकवर बघा..

http://www.misalpav.com/node/30460

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2015 - 8:58 pm | पिलीयन रायडर

अगगगग... धक्का बसेल हो त्यांना!! इतकी मोठी चुक नव्हती की डायरेक्ट हिच लिंक दिलीत!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 9:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

दुसरं गरमा गरम उदाहरण सापडलं नाही =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2015 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिंक देऊ नका. लेखनावर किती प्रतिसाद आलेत हे पाहुन सध्या त्यांचा आनंद गगनात मावत नैये.
रात्रभर उठु उठु पाहतील आपल्या कोणत्या लेखनावर किती प्रतिसाद आलेत म्हणुन. :)

-दिलीप बिरुटे

सुचिकांत's picture

3 Mar 2015 - 9:07 pm | सुचिकांत

गायब करून टाका

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2015 - 8:48 pm | पिलीयन रायडर

हं.. आणि आणि चुकनही वेळ शिल्लक राहायला नको ह्याची तजवीज तुम्ही करुनच ठेवली आहे!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2015 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय म्हणतो पाऊस ?

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2015 - 8:56 pm | पिलीयन रायडर

नक्की कुठला..?!
नै म्हंजे बाहेरचा थांबलाय.. मिपावर मात्र दणादण चालु आहे!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2015 - 8:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कमी दाबाचा पट्टा कुठं तरी तिकडे झाला आणि संपुर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला.
हे एकटं चुकार आभाळ मिपावर आलं अन लै मोकळं होऊ लागलंय.

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2015 - 9:01 pm | पिलीयन रायडर

जरा लोक जेवण करुन येऊ द्यात!! नाही "प्रिती"क्रियांचा त्सुनामी आणला तर ज्याचं नाव ते!
ऐ चल ना.. चा आदर्श समोर असेल तर काही खरं नाही!

सुचिकांत's picture

3 Mar 2015 - 8:50 pm | सुचिकांत

मला वाटले कि मिसळ पाव हा मराठी ब्लॉग आहे. लोक वाचत असतात मराठी. मला काय माहित होते, एवढे active users असतात इथे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2015 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मला वाटले कि मिसळ पाव हा मराठी ब्लॉग आहे.
आरं माज्या राजा..ब्लॉग हा आपल्या एकट्या लेखकाचा असतो असं म्हणतात तिथं दहा लोक एकत्र येऊन लेखन नै करत ना नै का ?

>>>> लोक वाचत असतात मराठी.
लोकांना कै कामं नै राह्यले दिसलं मराठी की वाचत असतात याच्याशी अगदी सहमत आहे.

>>>> मला काय माहित होते, एवढे active users असतात इथे !
अ‍ॅक्टीव्ह युजर आत्ता ऑफिसमधे मिपा मिपा खेळुन घरी गेलेत.
हात पाय धुवुन हजर झालेत ना की आपलं लेखन शोधायला
गुगलची मदत घ्यावी लागेल. :)

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2015 - 8:55 pm | पिलीयन रायडर

अगदी समोरच तुमच्या तुम्हाला "आम्ही कोण?" वगैरे लिंक दिसतील!! त्याही बघा जरा.. इतरांचही वाचा.. तुम्ही एकदम १०० लेख ओतले तर कुणाचेच लेख दिसणार नाहीत.. शिवाय इथे असे अनेक लोक आधीच आहेत जे नुसते स्वतःचे लेख टाकण्यापुरते येतात.. दुसर्‍यांना प्रतिक्रिया देत नाहीत.. असा स्वार्थीपणा तुम्ही करणार नाही अशी आशा!

सुचिकांत's picture

3 Mar 2015 - 9:01 pm | सुचिकांत

मला एकंदर कळालेले आहे कि कशा पद्धतीने मिपा चालते. एकदम लेख टाकल्याबद्दल क्षमस्व. भविष्यात काळजी घेईन.

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2015 - 9:03 pm | पिलीयन रायडर

हे इथे लिहीलं आहे.. पण तोवर ज्या काही प्रतिक्रिया येतील त्या गोड मानुन घ्या आता!! आणि फार मनावर घेउ नकात..
आमचा मुद्दा तुमच्या चांगला लक्षात राहिल ह्याची काळजी मिपाकर घेतात कधी कधी!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2015 - 9:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मला एकंदर कळालेले आहे कि कशा पद्धतीने मिपा चालते.

नै नै, एका दिवसात मिपा नै कळत. डोक्यावरचे केस पांढरे व्हायला लागलेत पण हे मिपा कसं चालतं अजुन आम्हाला पत्ता नै लागलाय.

>>>> एकदम लेख टाकल्याबद्दल क्षमस्व. भविष्यात काळजी घेईन.

क्या बात है भै, चलो गले मिलो. मिपावर स्वागत. मिपाकरांचे लेख वाचा, प्रतिसाद वाचा, आपलेही लेख टाका आणि मिपावर मजा करा. दोन क्षण आनंदात घालवा. पुढील लेखन आणि प्रतिसादासाठी शुभेच्छा. :)

-दिलीप बिरुटे

हाडक्या's picture

4 Mar 2015 - 6:24 am | हाडक्या

स्वारी हो काका, तुमचा पर्तिसाद वाचलाच नव्हता गडबडीत.. आणि तुमी लिहिलेय तेच टायपून आलोय बघा.

मला एकंदर कळालेले आहे कि कशा पद्धतीने मिपा चालते.

अर्रे लब्बाडा.. सांग पाहू कोणाचा डु-आयडी तू.?
इतक्या फाष्ट ब्रह्मदेवालापण नाय कळणार मिपा कशे चालते ते.. तुला बरे कळाले ? ऑ ?? ;)

सानिकास्वप्निल's picture

3 Mar 2015 - 9:01 pm | सानिकास्वप्निल

अगदी समोरच तुमच्या तुम्हाला "आम्ही कोण?" वगैरे लिंक दिसतील!! त्याही बघा जरा.. इतरांचही वाचा.. तुम्ही एकदम १०० लेख ओतले तर कुणाचेच लेख दिसणार नाहीत.. शिवाय इथे असे अनेक लोक आधीच आहेत जे नुसते स्वतःचे लेख टाकण्यापुरते येतात.. दुसर्‍यांना प्रतिक्रिया देत नाहीत.. असा स्वार्थीपणा तुम्ही करणार नाही अशी आशा!

+१११११११११११
प्रचंड सहमत.

इरसाल's picture

4 Mar 2015 - 10:22 am | इरसाल

नव-नव-संपादिका काय ?

अवकाळी आणी भरल्या पिकावर गारपीट..

खटपट्या's picture

3 Mar 2015 - 11:04 pm | खटपट्या

आता वर एवढ्या कानपिचक्या आल्याच आहेत तर, चित्तरकता पुर्न करुन टाका..... पहीला दारुचा घोट वगैरे.. येउद्या ..

पवार साहेब तुमच्या चाळीत राहत होते ही मौलिक माहीती मिळाली.

उत्तम लेख. उत्कंठावर्धक आत्मचरीत्र, थरारक वर्णन. भाषेवरचं प्रभुत्व जाणवतंय. संधी मिळाली तर साहेबांचं चरीत्र लिहा. आपल्यात एक थोर साहीत्यिक दडलेला आहे याची जाणीव झाली. एक ना एक दिवस आपण साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल यात शंका नाही.
(मिपाकरांच्या प्रतिक्रियांनी बिथरून जाऊ नये. त्यांनाही अधून मधून देव अशा प्रकारे शिक्षा देतच असतो ).

हे नक्की सातार्‍याला राहायचे का पुण्याला तेच कळलं नाहीये अजून!!

शक्यतो महापुरुषांच्या शेजारी महापुरूषच राहतात.
पूर्वी बारामतीला सातारा म्हणत असावेत. साहेबांचं धोरण कुणाला कळालंय ?

सिरुसेरि's picture

3 Mar 2015 - 11:37 pm | सिरुसेरि

भांडारकर रोडवर पवार quarters नावाची जुनी इमारत आणी बस स्टॉप आहे .

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2015 - 6:33 am | श्रीरंग_जोशी

मी पाच वर्षांचा असताना मोठ्या लोकांना फुकताना पाहून एक दिवस गल्लीमध्ये पडलेले थोटूक उचलून ओठांना लावले. ते पाहून शेजारच्या काकूंनी लगेच माझ्या आईकडे बातमी पोचवली.

बाकी वसतिगृहात राहताना मी अट्टल कर्मणी फुकाड्या झालो होतो. ते सोडल्यास तुमच्यात अन माझ्यात याबाबतीत पूर्ण साम्य आहे.

पुणेकर भामटा's picture

4 Mar 2015 - 8:24 am | पुणेकर भामटा

लेख वाचुन जोरदार ठसका आला.... :-)

विजुभाऊ's picture

4 Mar 2015 - 11:05 am | विजुभाऊ

ठ्यॉ.........
लैच्च फुटलो हासुन हासून......
हातात हात घालून काही पुसता येत नसेल हसता येतं

विजुभाऊ's picture

4 Mar 2015 - 11:06 am | विजुभाऊ

अर्र दुसर्‍या लेखावरचा प्रतिसाद इथे चिकटला.......
चालतय का?