तपकिरी डोळे

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
3 Mar 2015 - 6:04 pm

"काय रे? काय करतोस ईथे?" एका रांगड्या आवाजाने विचारले.
मी हबकलो, घाबरलो. काहीतरी बोलायचं म्हणून, "म्म..म..मी.."
"अरे तू इथे कसा? काही शोधतोयस का? बाबा हा माझ्याच वर्गातला आहे."
रांगडा आवाज "हूं " म्हणून नाहीसा झाला.
हलके कुरळे केस सावरीत तिने पुन्हा विचारले, "काही शोधत होतास का?"
माझ्या तोंडून चटकन निघालं "तूलाच" ती थोडी आश्चर्याने "काय?" "अं.. तूलाच सपना तायडेने ईंग्लीशच्या नोट्स दिल्यात ना! त्या हव्या होत्या" मी कसा बसा हे सगळं बोललो असेन.
ती "हो दिल्यात. हव्या आहेत का?"
मि "हो."
ती "ये ना. ईथेच घर आहे."
मि एक पाऊल टाकून दचकलो आणि "न्न.. नको." म्हणालो.
तिने ओळकलं आणी हसत म्हणाली "बाबा बाजारात गेलेत घरी नाहीत ते. घाबरू नकोस."
ती हसताना आणखी सुंदर दिसायची. खास करून तिचे तपकिरी डोळे.
खरं तर तिला जेव्हा पहील्यांदा शाळेत पाहीलं तेव्हा नजर तीच्या डोळ्यांवरच पडलेली.
तीने घरी नेलं. अस्ताव्यस्त पलंगावर बसलो.
"आम्ही आत्ताच आलोतना नाशीकहून. म्हणून हा सगळा पसारा आहे." तीने सांगीतलं.
त्याच पसा-यातून तीने नोट्स काढून दिल्या. ईंग्लीश माझं आधीपासून पक्कं होतं. ह्या नोट्स मिच सपना तायडेला दिलेल्या होत्या. म्हणून नोट्स माझ्या काहीच उपयोगाच्या न्हवत्या. पण तीने दिलेल्या, म्हणून पुन्हा वाचून काढल्या.
दुस-या दिवशी शाळेत मित्रांना सांगीतलं. "म्हया, जातवालीच बघीतलीस साल्या, रेणूका गायकवाड...वा आरामशीर लग्न कर." तुषार जाधव बोलला.
"माल काढलीस साल्या" काकडे पाठ थोपटीत बोलला.
"ए, शीऽऽ, माल काय म्हणतोयस? म्हया खरंच आवडलीये रेणूका तुला? मि बोलुका तिच्याशी." सपना तायडेने विचारलं.
मि ताड्कन उठून बोललो "सपने, भाऊ माणतेस तर असं काय करायचं नाही. आणि साल्यान्नो, दहावित काय लग्न करू? बोर्डाचं वर्ष आहे. फालतू म्हस्करी नको. जे झालं ते मित्र म्हणून सांगीतलं तर खेचता तुम्ही लोक."
त्यानंतर डायरेक्ट कोणी चिडवलं नाही आणि ईनडायरेक्ट कडे मि लक्ष दिले नाही.
ब-याचदा भेटल्यावर समजलं की तिला एक ताई आहे व ती पण कामावर जाते.बाबा पण नौकरी करतात. पण गेले काही दिवस हिच्या पोटात दुखतं आणि तो उपचार मुंबईत होईन असं नाशकात समजलं. म्हणून ते ईथे आले आणि हिला आमच्याच शाळेत दाखल केले. तीला मी खूप लपून छपून बघायचो पण कधी समोरून एकटक बघायची हिम्मत नाही झाली. ईतक्या भेटीत तीचं दुखणंही जाणवलं नाही.
बोर्डाच्या परिक्षेआधी कच्चून आभ्यास केला. कधी कूठे भेटली तरच बोलायचो. परीक्षा मस्त गेली. शेवटच्या पेपर दिवशी मामा घरी आलेला. पट्कन बॅग भरली, संध्याकाळच्या एस.टी ने छूऽऽ. १५~२०‌‌‌‍ दिवस मामाकडे कल्ला केला. गोंधळ घातला. परतलो ते तीला भेटायच्या ऊत्साहाने. घरी सामान टाकलं, आईबरोबर दोन शब्द बोललो असेल नसेल की तीच्या घरची धाव धरली. दरवाजा बंद. भला मोठा टाळा. मला वाटलं फिरायला गेली असेल. दुस-यादिवशी देखील बंदच. वाटलं "ति पण सुट्टया घालवायला गेली असेल. पण मला का नाही सांगीतलं? मी तरी कुठे तीला काही सांगून मामाकडे गेलो."..... "रागवली असेल.......नाही तशी समजदार आहे ती." सगळं मि माझ्याशीच बोलत बोलत घरी गेलो. तीस-या दिवशी पण तेच. तीच्या घरा शेजारीच एक मद्रासी परीवार रहायचा.
चवथ्यादिवशी त्या मद्रासी घरातल्या आंटींना बाहेर केस विंचरताना पाहीलं "आंटी, वो ईधर रेहनेवाले गायकवाड किधर गये?"
"मुल्लूक गये मुल्लूक." आंटीने ऊत्तर दिलं.
"मुल्लूक?..." मी पुटपूटलो.
"हांऽऽ, उनका छोटी बेटी को पेट मे कँसर का गाठ होना. आॅपरेशन का टाईम मर गया बेचारा. अच्छा लडकी होणा......." आंटी पुढे काय म्हणाली...मि काय ऐकलं...किती वेळ थांबलो....घरी कसा आलो...येऊन काय केलं... काही आठवत नाही.
रीजल्ट लागला. चांगले मार्क भेटले चांगलं काॅलेज मग छान नौकरी. सर्व ठिकठाक.
माझ्या पूर्ण परीवारात सर्वांचे डोळे काळे. बायकोच्या परीवारात देखील काळेच डोळे. पण आज जेव्हा मी माझ्या दिड दिवसाच्या मुलीला उचलून पाहीलं तेव्हा तिच्या तपकीरी डोळ्यांकडे पाहून माझ्यासारख्या नास्तीकालाही कोणावर तरी विश्वास ठेवावासा वाटतो.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बाबा पाटील's picture

3 Mar 2015 - 6:52 pm | बाबा पाटील

आता आपण मोठे झालात.

म्हया बिलंदर's picture

3 Mar 2015 - 7:55 pm | म्हया बिलंदर

आठवलं म्हणून लिहिलं.

कविता१९७८'s picture

3 Mar 2015 - 7:16 pm | कविता१९७८

सत्यकथा आहे का ही??

म्हया बिलंदर's picture

3 Mar 2015 - 7:56 pm | म्हया बिलंदर

का बुआ?

कविता१९७८'s picture

4 Mar 2015 - 12:52 pm | कविता१९७८

सहज विचारलं, कथा वाचल्यावर खुप आवडली आणि वाटलं कि सत्यकथा असु शकते म्हणुन विचारलं.

मास्टरमाईन्ड's picture

3 Mar 2015 - 7:59 pm | मास्टरमाईन्ड

सत्य घडलेली असली किंवा नसली तरी touching आहे.

पण आज जेव्हा मी माझ्या दिड दिवसाच्या मुलीला उचलून पाहीलं तेव्हा तिच्या तपकीरी डोळ्यांकडे पाहून

स्नेहल महेश's picture

4 Mar 2015 - 4:00 pm | स्नेहल महेश

सत्य घडलेली असली किंवा नसली तरी touching आहे

योगी९००'s picture

3 Mar 2015 - 11:24 pm | योगी९००

गोष्ट आवडली..

संदीप डांगे's picture

3 Mar 2015 - 11:53 pm | संदीप डांगे

लेख वर आणन्याची गरज आहे.

म्हया बिलंदर's picture

4 Mar 2015 - 9:32 am | म्हया बिलंदर

नाही समजलं

संदीप डांगे's picture

4 Mar 2015 - 1:21 pm | संदीप डांगे

अहो, एवढे सुंदर लेख असतांना नुस्ता कांतावलेला मिपाचा बोर्ड बघायला कंटाळा आला होता. म्हणून तुमची कथा वर काढली.

बाकी कथा ह्रदयस्पर्शी.. :-)

एक एकटा एकटाच's picture

4 Mar 2015 - 2:19 pm | एक एकटा एकटाच

कथेचा शेवट आवडला

लघुकथा छान आहे, आवडली. 'शाळा'च्या गोष्टीसारखी वाटली.

सस्नेह's picture

4 Mar 2015 - 3:40 pm | सस्नेह

कथा चांगली आहे.
शुद्धलेखन सुधारले तर आणखी चांगली वाटेल.

म्हया बिलंदर's picture

4 Mar 2015 - 4:12 pm | म्हया बिलंदर

विद्यार्थी शिकत आहे. साईड वाईड सब कुछ. :pardon:

नगरीनिरंजन's picture

4 Mar 2015 - 4:43 pm | नगरीनिरंजन

हृदयस्पर्शी आहे भौ! जरा आणखी निगुतीनं लिहीलं असतं तर रडलं असतं आड्यन्स.

राजाभाउ's picture

5 Mar 2015 - 7:24 pm | राजाभाउ

वा वा !!
एकदम शाळाची आठवण करुन दिलीत राव. मस्त आहे.