माझी काझिरन्गा सफर

खंडेराव's picture
खंडेराव in भटकंती
3 Mar 2015 - 5:53 pm

नमस्कार. मिसळपाव वरिल हा पहिलाच लेख. अजुन मराठी लिहिणे शिकत आहे, चुकिन्बद्दल माफी असावी.

आसाम मधे एकटाच काही कामासाठी पोहोचलो. एक दिवस रविवारची सुट्टी मिळाली. स्थानिक मित्राने काझिरन्गा पहान्याचा सल्ला दिला. तसा मी आपखुश असल्यामुळे एकटाच जाण्याचा निर्णय घेतला.

गुवाहाटी ते काझिरन्गा अन्तर जवळ जवळ २०० किमी. रस्ता अगदी चान्गला, बराचसा मुबई पुणे सारखा आहे. बसेस सतत चालू असतात.

४ तासात कोहरा येथे पहोचलो, जे अभयारन्याचे प्रमुख दार आहे. रस्त्यावर खुप सारी होटेल्स व गेस्ट होउसेस आहेत. एकटाच असल्यामुळे जे पहिले दिसले तिथे ९०० रुप्यात खोली घेतली. घोडचुक झाली. रात्रभर गाड्याचे आवाज. अरण्याच्या प्रमुख दारातुन पुढे खुप सारे प्रवासी होटेल्स व गेस्ट होउसेस आहेत, बरीचशी आसाम टुरिस्म ची, भाडे हि कमी आणि उत्तम सोय.

गेस्ट होउस मालकाला सकाळच्या हत्ती सफारी चे बूकिंग करायला सांगुन बाहेर पडलो. आसामात सन्ध्याकाळ अगदी लवकर होते. ५ वाजता पुर्ण अंधार. एका रिसॉर्ट ने बिहु आणि इतर नाच आयोजित केले होते, १ तास ते बघुन जेवन करुन रुमवर परत आलो. सकाळी ५.३० ला निघुन ६.३० ची हत्ती सफारी गाठायची होती. अरण्याच्या ईस्ट झोन मधे 3 वेळा हत्ती सफारी होते, दर एक तासच्या अंत्राने, सकाळी 5.30 पासुन,

वेळेत पोहोचलो. पैसे भरले. एकुन खर्च ११०० ( ६०० हत्ती, प्रवेश, केमेरा आणि ५०० गेस्ट होउस ते सफारी स्थळ गाडी. )
जबरदस्त अनुभव. हत्तीवर चढ्ण्यासाठी एक चोथरा केला आहे, अगदी सत्तरीतील लोकही आरामात बसत होते. एकुनात अगदी निट व्यवस्थापन. एका हत्तीवर चार जण आणि माहुत.

Morning

हत्तीवर बसणे म्हनजे मजा. आरामात डुलत डुलत गजराज निघाले. पहिले दर्शन हरिन कळपान्चे आणि मग एक रानडुक्कर. काही फुटांवरुन प्राणी बघता येतात. नंतर, ७-८ गेंडे! दिवसभरात ३ सफारीमध्ये ( २ जीप आणि १ हत्ती ) ६० गेंडे सहज दिसले, खुप पक्शी आणि ईतर प्राणी.

मायहान्ग नावाचे एक पारम्पारिक नॉर्थ ईस्ट होटेल आहे तिथे दुपारी जेवलो. मस्त जेवन. आसामी थाळी अवश्य खा, आणि अनुभव म्हणुन अपान्ग प्या!

रात्री अस्साम टुरिस्म च्या बंगल्यात राहिलो. ६०० रुपयात मस्तच. स़काळी ६ ला परतीचा प्रवास सुरु.

काही फोटो देतोय. मराठीतुन टंकने अवघड काम. थकलो इत्क्यातच.

Wild Buff

.

bird

.

Family

.

Guard

.

2

ap1

Badak

ap22

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Mar 2015 - 6:16 pm | मुक्त विहारि

लेख आवडला.

खंडेराव's picture

3 Mar 2015 - 9:21 pm | खंडेराव

धन्यवाद!

हत्तीवरील माहूत, लाल फुले असा फोटो व दोन कासवांचा मस्त आलेत.

खंडेराव's picture

3 Mar 2015 - 9:22 pm | खंडेराव

ती फुले म्हनजे पळस / पलाश. फ्लेम ओफ द फोरेस्ट. सध्या जंगलभर फुलली आहेत.

सुनील's picture

3 Mar 2015 - 7:19 pm | सुनील

लेख चांगला पण त्रोटक झाला आहे. अजून लिहिता आले असते.

लिहित रहा, सवय होईल!

पुलेशु.

खंडेराव's picture

3 Mar 2015 - 9:24 pm | खंडेराव

नक्की! सुरुवात केली तेव्हा खुप लिहायचे होते पन सध्या वेळ फार लागतोय :-(

सूड's picture

3 Mar 2015 - 7:33 pm | सूड

कासवं आवडली!!

पाणी कमी झाल्यावर एकामागे एक अशी दहा दहा असतात! ही हिमालयन पॉन्ड कासवे...

मधुरा देशपांडे's picture

3 Mar 2015 - 9:45 pm | मधुरा देशपांडे

फोटो आवडले. कासवांचा तर खासच.

संदीप डांगे's picture

3 Mar 2015 - 11:53 pm | संदीप डांगे

लेख वर आणन्याची गरज आहे.

आत्ता पाहिल्यावर कळतेय की मगाशी काही फोटू दिसलेच नव्हते. आता बदक व पिल्ले पहिल्यांदा पाहतिये. तेही गोड आलाय.

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 10:59 am | खंडेराव

धन्यवाद! आसामात बदके फार..प्रत्येक घरी बदक आणि एक छोटे तळे.

आनंद's picture

5 Mar 2015 - 10:44 am | आनंद

मस्त !
ह्यातला गेंड्याचा किंवा गव्याचा फोटो स्पर्धे साठी द्या( कासवाचा चालणार असेल तर तो ही द्या.नबर काढेल.)

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 11:01 am | खंडेराव

:-) एक मरमॉटच्या जोडीचा दिलाय, बघु काय होते!

एस's picture

5 Mar 2015 - 10:56 am | एस

पुभाप्र. म्हणजे लिहिणार असाल तर. तसं क्रमशः बिमशः काही दिसत नाहीये, तरीपण म्हटलं आपलं. :-)

अजुन माहिती टाकतो इथेच. चालेल का तसे कि नविन पोस्त लिहावी लागेल?

पुभाप्र म्हनजे काय :-) ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Mar 2015 - 11:08 am | डॉ सुहास म्हात्रे

"माझी काझिरंगा सफर - २" या नावाने पुढचा लेख टाका.

पुभाप्र = पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

सांगलीचा भडंग's picture

14 Mar 2015 - 2:00 pm | सांगलीचा भडंग

फोटो उत्तम .गेंडा जंगलात बघणे यासारखा अनुभव नसेल कारण मुळात तो फार थोड्या ठिकाणी आहे जंगला मध्ये
पुढच्या भागात काझीरंगा ची थोडी जास्त माहिती द्या आणि कसे जायचे , वेबसाईट याची माहिती पण दिली तर उत्तमच .

खंडेराव's picture

16 Mar 2015 - 11:44 am | खंडेराव

लिहितो अजुन एक भाग...

प्राची अश्विनी's picture

25 Mar 2015 - 8:29 pm | प्राची अश्विनी

लेख आवडला, कुठल्या मोसमात गेला होता?
फोटो सुरेख !

खंडेराव's picture

26 Mar 2015 - 9:35 am | खंडेराव

मी तिथे फेब्रुवारीच्या तिसर्या आठवड्यात होतो. हवामान एकदम चांगले असते तेव्हा.

पॉइंट ब्लँक's picture

25 Mar 2015 - 10:30 pm | पॉइंट ब्लँक

छोटा असला तरीही लेख आवडला. फोटूसुद्धा छान आले आहेत :)

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2015 - 4:55 am | श्रीरंग_जोशी

पुभाप्र.

मितान's picture

26 Mar 2015 - 8:10 am | मितान

अप्रतिम छायाचित्रं !!!!!

वर्णन मात्र फार त्रोटक झालंय. हे म्हणजे अ‍ॅपिटायजर द्यायचं आणि मेन कोर्स आणायचाच नाही असं झालं !!!! :)

खंडेराव's picture

26 Mar 2015 - 9:37 am | खंडेराव

अजुन एक भाग आता! जरा व्यवस्थित वर्णनासह!