माझ्याबद्दल थोडक्यात

सुचिकांत's picture
सुचिकांत in जनातलं, मनातलं
3 Mar 2015 - 5:18 pm

मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, हिंदूंच्या तर नाहीच नाही! पण आपला तो बाळासाहेब आणि दुसऱ्याच कार्टं या मानसिकतेच्या विरोधात आहे. मी सर्व धर्मांच्या ठेकेदारांच्या विरोधात आहे. मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. मी whatsapp आणि facebook वर अफवा आणि चुकीचे संदेश पसरवणार्यांच्या विरोधात आहे. माझे स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही, परंतु स्वातंत्र्यपूर्व भारतावर मी मनापासून प्रेम करतो. त्या काळात जन्म झाला असता तर नक्कीच देशासाठी फासावर गेलो असतो. जे लोक गाईंच्या कत्तलिवरुन सोशल नेटवर्किंगवर रान उठवतात आणि त्यांच्या संवर्धनासाठी १ रुपयासुद्धा प्राणीमित्रसंस्थांना देत नाहीत मला अशा लोकांचा राग आहे. जे लोक दहशतवादासाठी विशिष्ट धर्माच्या लोकांना जबाबदार धरतात मी त्यांच्या विरुद्ध आहे. "बलात्कार आणि खून" या गुन्ह्याला मी दहशतवादी कृत्य समजतो........

मला पाऊस पडायला लागला कि मनसोक्त पावसात भिजावस वाटतं. मला पर्यटक नाही तर निसर्गप्रेमी व्हायला आवडतं. भारतात फिरायला आवडत नाही, पण मला महाराष्ट्रात फिरायला भन्नाट आवडतं. महाराष्ट्राची देवभूमी साताऱ्यावर मी मनापासून प्रेम करतो. वर्षातून 10 वेळा तरी कासच्या पठारावर बागडून येतो. मला सह्याद्रीला ऐन उन्हाळ्यात भेट द्यायला आवडतं, बहुधा त्याचवेळेस त्याला सच्च्या निसर्गप्रेमींची गरज असते असा मला वाटतं. पावसाळ्यात, सर्वत्र हिरवाई पसरलेली असताना तर सर्वच भेट देतात त्यात काय नवल? मला किल्ले, माळरानं, धरणाचे परिसर, जंगलं, अशा ठिकाणी फिरायला भारी आवडतं, आणि बरोबर माझा कुत्रा असेल तर मग काय विचारायलाच नको!!! गेल्या अनेक वर्षांपासून २ ट्रेक्स माझ्या मनात आहेत, लोणावळा ते भीमाशंकर आणि प्रचितगड. आता कधी संधी मिळते आणि कधी सर्व गोष्टी जुळून येतात ते पाहावे लागेल.

मी पूर्वी कुत्र्यांना फार म्हणजे फार घाबरायचो! आणि भूतांना सुधा!!!!! मग मी नामी शक्कल शोधून काढली. डिस्कवरीला पहिले होते, कुत्र्यांना ultrasonic समजते. मी कुत्रा पाळण्याचा निर्णय घेतला. एका दगडात २ पक्षी मारले. कुत्र्यांची भीती निघून गेली, आणि भुताची भीती सुधा, कारण नेहमी प्लुटो माझ्या पायाजवळच बसलेला असतो. आता कुठलं भूत येईल मला त्रास द्यायला ते पहायचं होतं मला…त्यात भरीला भर माझा बोका.. एकदा घरातलं वातावरण जरा tense होतं. गेलो बाहेर आणि मांजराचं पिल्लू उचलून आणलं, तेव्हापासून माझ्याकडे कुत्रा आणि बोका सुखाने नांदत आहेत.

जुन्या मराठी चित्रपटांमधलि घरे पहिली कि माझं मन प्रफुल्लीत होतं, बैलजोडी, दारात आड, चुलीवरचा स्वयंपाक, कोपऱ्यात ठेवलेलं जातं, ९ वारी साडी नेसलेल्या स्त्रिया, धोतर घातलेले पुरुष, पाहिलकी वाटतं, एखादा चमत्कार व्हावा आणि मी TV मध्ये प्रवेश करावा आणि ते वातावरण जवळून अनुभवावं, त्याचमुळे माझ्याकडे अनेक मराठी चित्रपटांच्या CD/DVD आहेत. मला प्रभात फिल्म्स चे चित्रपट आवडतात. गेली अनेक वर्षे मला कुंकू हा चित्रपट फार आवडायचा तसा अजूनही आवडतो पण अगदी अलीकडे पाहिलेला शेजारी चित्रपट ०.१ % जास्त आवडतो. त्या काळात हिंदू - मुसलमान शेजार्यांवर चित्रपट काढणे म्हणजे खरोखर कौतुकास्पदच आहे. मला मोहित्यांची मंजुळा फार आवडतो, मंजुळा तर मनापासून आवडते. जेव्हा मंजुळा आणि केदारजी पहिल्यांदा जत्रेत भेटतात तेव्हाचा सीन तर मी ५० वेळा परत परत बघतो. सुधीर फडके, श्रीनिवास खळे , ग. दि. मा., जगदीश खेबुडकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि लिहिलेली गीते ऐकताना मी अक्षरशः हरवून जातो… अलीकडच्या चित्रपटांमध्ये मला "धुमधडाका" भन्नाट आवडतो. माझं स्पष्ट मत आहे, लक्षाने रंगवलेला रात्रीचा भुताचा सीन, मेहमूदने "प्यार किये जा" मध्ये रंगवलेल्या सीन पेक्षा १००० पटीने प्रभावी आहे, आणि १००० पटीने मनोरंजक सुधा आहे!!! अजय-अतुल, सर्व नवीन चांगले संगीतकार, कल्पक मराठी दिग्दर्शक मला फार आवडतात…

माझं मराठी भाषेवर भन्नाट प्रेम आहे. माझी ठाम समजूत आहे कि, जगातल्या सर्व लोकांना मराठी समजतं. खूप साधी,सरळ, आणि सुंदर भाषा आहे, न कळण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हैदराबाद मध्ये सुधा एखाद्या व्यक्तीशी बोलताना मी मराठीतूनच सुरुवात करतो, मग त्याला नाही समजले तर मग हिंदीतून बोलायचं! मी माझ्या मुलीला मराठी शाळेतच घालणार आहे, बाकी कितीही संकटे आली तरी, कितीही त्याग करावा लागला तरीही माझा निर्णय मी बदलणार नाही! आता मराठी अस्मितेबद्दल बोलायचं आणि यांच नाव घ्यायचं नाही हे होऊ शकत नाही.
"राज ठाकरे" आपल्याला जाम आवडतात बरंका, अगदी सन २००० पासून….काही २-४ आक्षेपार्ह गोष्टी सोडल्या तर म न से तसा चांगला पक्ष आहे असं मी मानतो. [ सगळेच राजकीय पक्ष आपल्या कारकिर्दीत एखादी तरी घोडचूक करतातच विसरून जायचं आपण ;)]

मी अभ्यासात जरा माठ होतो. त्यात आईवडील शिक्षक, तेव्हा खरडपट्टी सुधा भरपूर झाली, पण आज जो काही आहे तो त्यांच्यामुळेच! मी माझ्या आईच्याच शाळेत शिकायला होतो. ६ वीला असताना आईच वर्गशिक्षिका होती बाप रे! लोकांना वाटायचं कि चंगळ आहे बुवा, पण मलाच माहिती होतं किती चंगळ होती ते!!! बाबा माझ्यासाठी नेहमी ठरलेले २ श्लोक म्हणायचे,"घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो, राम का रे म्हणाना." - अभ्यास सोडून दिवस दिवसभर क्रिकेट खेळायचोना म्हणून, आणि २रा माझा फेवरेट आहे,
॥अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम् । अधनस्य कुतो मित्रं अमित्रस्य कुतः सुखम् ॥
खरच मी भाग्यवानच आहे, मला असे आई वडील मिळाले…

मला शाळेत असताना नाट्यवाचन आणि नाट्यसंगीत स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळाली. शास्त्रिय गायनाच्या कलेला मी पुढे अजून विकसित नाही करू शकलो याची मला खंत वाटते. नाट्यवाचनाचे म्हणाल तर तिथे सुधा मी थोडा कमीच पडलो. पण माझा एक DreamJob आहे, मला कार्टून फिल्म्स करता डबिंग करायचय. कधी कधी घरामध्ये मराठी चित्रपटामध्ये जो पाटील असायचा त्याच्या आवाजात मला बोलायला फार आवडतं, त्याशिवाय मी एक छाट-छूट नकलाकार सुधा आहे बरका! सगळ्यात चांगली नक्कल मी करतो ती माझ्या बाबांची, अजून त्यांना हि गोष्ट माहित नाही त्याशिवाय संजीव कुमारचा घशातून आवाज काढताना मी जे तोंड वेडं वाकडं करतो त्यासाठी बायकोचा मार सुधा खातो कॉलेजात असताना फिरोदिया करंडकामध्ये मी भाग घेतला होता, पण जाऊदे नको त्या आठवणी! आमचं नाटक पडलं! फार वाईट वाटलं होतं मला

पुरुषोत्तमच्या स्टेजवर एकदाजरी संधी मिळाली असतीना तर…. जाऊदे उगाच अख्या जगासमोर स्वतःचे कौतुक नको!!!! आई रागवेल

कथालेख

प्रतिक्रिया

उमा @ मिपा's picture

3 Mar 2015 - 5:54 pm | उमा @ मिपा

आवडलं!

आशु जोग's picture

3 Mar 2015 - 11:33 pm | आशु जोग

सूचीकाका तुम्ही शहरी माणसं का...

एका स्टँडर्ड प्रतिसादाच्या प्रतिक्षेत !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 6:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अच्चा अच्च जालं तलं!!! =))

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 6:08 pm | टवाळ कार्टा

म्हणजे स्पाच्या का? :)

मुक्त विहारि's picture

3 Mar 2015 - 5:59 pm | मुक्त विहारि

मी झोपतो करून हिमालयाची उशी.

जावू दे.इतपत ओळखच ठीक आहे.

चुरुमुरे सांदळतील.

कहर's picture

4 Mar 2015 - 9:40 am | कहर

*good* *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP*

शलभ's picture

3 Mar 2015 - 6:03 pm | शलभ

छान.. आवडलं.. :)

नमस्कार. मी सुद्धा हैदराबाद मध्ये आहे. भेटुयात!

सचिन कुलकर्णी's picture

3 Mar 2015 - 6:42 pm | सचिन कुलकर्णी

मी देखील हैद्राबादमध्ये आहे. बाकी व्य.नि. मध्ये बोलूयात.

सौंदाळा's picture

3 Mar 2015 - 6:21 pm | सौंदाळा

हम्म
म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः

मकारादि मकारान्त यस्य लेखनम् अस्ति स: सुचिकांत!! ;)

काळा पहाड's picture

3 Mar 2015 - 11:04 pm | काळा पहाड

ते समर्थांचं काही तरी वचन का काय आहे ना?

आदूबाळ's picture

3 Mar 2015 - 6:23 pm | आदूबाळ

आमची आगामी लेखमाला: एका सरांचा उदय.

हाडक्या's picture

3 Mar 2015 - 6:29 pm | हाडक्या

एका सरांचा उदय.

"एका सरांचा उदयास्त" असं लिहायचंय का हो आदुबाळ तुम्हाला ? ;)

उदयाबद्दलच आवर्जून लिहावं लागतं. प्रतिसाद वाचून अस्त आपोआप होतो.

बॅटमॅन's picture

3 Mar 2015 - 6:38 pm | बॅटमॅन

द सर रायझेस!

आमच्या सातार्‍याच्या माणसाने फक्कड लिज्बी पाडलेली आहे ह्याचा आम्हाला भलताच असा सार्थ अभिमान वाटतो आहे.
यांस (तरी) तांब्यापीठाधिपतींनी दीक्षा देवून पीठात घ्यावे ही (जाहीर) विनंती.!!

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 6:41 pm | टवाळ कार्टा

पीठात घ्यावे >> =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2015 - 6:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोणी पीठात हसताहेत, तर कोणी तांब्यात रडताहेत... पण वेड्यांना हे माहीत नाही की सर्वांचा शेवट जिल्बीतच होणार आहे +D

बॅटमॅन's picture

3 Mar 2015 - 6:50 pm | बॅटमॅन

हाहाहाहाहाहा =)) =)) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 8:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_

चविष्ट म्हण मराठीला अर्पण केल्याबद्दल.

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 9:43 pm | टवाळ कार्टा

=))

हाडक्या's picture

3 Mar 2015 - 11:27 pm | हाडक्या

_/\_
मस्त हो .. :)

तांब्यापीठाधिपतींनी पीठ टवाळजी कार्टा यांच्या स्वाधीन केले आहे.

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 9:44 pm | टवाळ कार्टा

नै ओ...गुर्जींनी व्हिआरेस घेतल्यावर मी पण व्हिआरेस घेतली...सध्ध्या बसायची जागा रिकामी आहे :)

दिलिप भोसले's picture

3 Mar 2015 - 6:35 pm | दिलिप भोसले

आवडले,एक वेगळा प्रयोग,

मोहनराव's picture

3 Mar 2015 - 7:36 pm | मोहनराव

बरं मग?

सुनील's picture

3 Mar 2015 - 7:44 pm | सुनील

माझे स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही

असो.

भारतात फिरायला आवडत नाही, पण मला महाराष्ट्रात फिरायला भन्नाट आवडतं

समजलं नै! महाराष्ट्र तूर्तास भारतातच आहे ना?

मी कुत्रा पाळण्याचा निर्णय घेतला

हे बाकी आवडलं! ;)

सुचिकांत's picture

3 Mar 2015 - 8:03 pm | सुचिकांत

हे वर्षानुवर्षे विचार करून लिहिलेले नाही ! फेसबूकासाठी लिहिलेले आहे, साधारण २-३ तासात ! पण सर्व प्रतिक्रिया छान !
अनोळखी व्यक्ती आपल्या लिखाणावर काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता होती, ती पूर्ण झाली.

वेल्लाभट's picture

4 Mar 2015 - 11:24 am | वेल्लाभट

वेलकम टू मिपा !

यसवायजी's picture

3 Mar 2015 - 8:08 pm | यसवायजी
गणेशा's picture

3 Mar 2015 - 8:13 pm | गणेशा

अप्रतिम लिहिलेले आहे.

प्रत्येकाच्या मनामध्ये असे बरेच काही असते आणि त्याला ही तसेच काहीसे जगायचे असते. परंतु सध्य परिस्थीती मध्ये तो तसा जगत नसतो म्हणुन ह्या ज्या दिसलेल्या/अनुभवलेल्या/चित्रपटातील गोष्टींवरुन तो आपण तेथे असतो तर, किंवा आपल्या आवडीचे असे काय कायसे सुंडर चित्र आपल्या मनावर कोरत असतो.

निटसा विचार केला तर आपल्याला जगताना असे सर्व साधे साधे सिंपल आवडत असते.. पण आपण जगताना मात्र सर्व हायक्लास गोष्टींच्या मागे लागलेलो असतो असे उगाच वाटुन गेले.

तिमा's picture

3 Mar 2015 - 8:16 pm | तिमा

आता आली का पंचाईत? किती किती नावं लक्षांत ठेवायची आम्ही या सगळ्या थोर लेखकांची ? आणि प्रत्येकाला अभ्यासपूर्ण प्रतिसाद द्यायचा म्हटला तर हा जन्म देखील पुरणार नाही!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2015 - 8:17 pm | अत्रुप्त आत्मा

@माझे
स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही,
परंतु स्वातंत्र्यपूर्व भारतावर मी मनापासून प्रेम
करतो. >>> हम्म्म्म! अवघड आहे एकंदरित. असो!

@त्या काळात जन्म झाला असता तर नक्कीच
देशासाठी फासावर गेलो असतो. >>> ह्या काळात अण्णां च्या किंवा अंनिस च्या आंदोलनात कृतिशील सहभागी होऊन तुरुंगातंहि जाता येइल. थांबु नका. :)

स्वातंत्र्योत्तर भारतात फक्त राजकारण ठासून भरले आहे, आणि स्वातंत्र्य पूर्व भारतात देश भक्ती!

मुक्त विहारि's picture

3 Mar 2015 - 8:33 pm | मुक्त विहारि

आजकाल काही सांगता येत नाही...

हाडक्या's picture

4 Mar 2015 - 12:49 am | हाडक्या

ह्या ह्या ह्या.
सायेब.. हे कुटून शिकलात म्हनायचं. आमचं गांधीबाबा लय मोट्टं राजकारनी होतं आणि टिळकपण. देशभक्ती वगैरे संपली आसं वाटत असेल तर जेपी (आधीचे आणि आत्ताचे पण) पहा.
चांगले-वाईट राजकारनी अजूनपण हायेत (त्याचा क्रायटेरिया पन ठरवा) आणि आधी पन होते (आगदी इंग्रजाच्यात पन) थोडं प्रमाण कमी जास्त झालं असेल (कारण माध्यमं पन तेव्हा तशी कमीच होती ना मग सगळं गोग्गोडच दिसतं आपल्याला). असो. :)

ह्म्म !! आतापर्यंत छान प्रवास झालाय तुमचा. आता मिपावर आला आहात. अजुन छान प्रवास होईल. आम्ही आहोत ना बरोबर.

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2015 - 8:45 pm | पिलीयन रायडर

हा लेख टाकुन तुम्ही फार चांगले केलेत..
कार्ण आता मिपा वर आल्यावर सरजी...आप ही आप छा गये हो!!
सगळ्यांना एकच प्रश्न पडणार.. कोण हा माणुस सुचिकांत..?? तर उत्तर लगेच हजर आहेच..! वा!!

तुमच्याबद्दल झालं? आता मिपाबद्दल पण जाणुन घ्या.. इतरांनाही चार-दोन बर्‍या वाईट प्रतिक्रिया द्या.. आपल्या लेखाला काय प्रतिसाद मिळतो हे जाणुन घेण्याची हौस सगळ्यांनाच असते.. नाही का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 8:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्याबद्दल झालं? आता मिपाबद्दल पण जाणुन घ्या.. इतरांनाही चार-दोन बर्‍या वाईट प्रतिक्रिया द्या.. आपल्या लेखाला काय प्रतिसाद मिळतो हे जाणुन घेण्याची हौस सगळ्यांनाच असते.. नाही का?

सहमत. सुचिकांत साहेब माझ्या लेखांवरही एखादी प्रतिक्रिया येउंद्या.....(झैरात झैरात)

जेपी's picture

3 Mar 2015 - 9:07 pm | जेपी

माई मोड ऑन-
अरे सुचिकांता,छानच लिहिलेस हो..पण तु आता स्वांतत्र्यपुर्व काळात जन्मला नाहीस याचा थोडा विचार कर ..असे आमचे हे म्हणतात.
-माई मोड ऑफ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 9:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्या ह्यांचे किस्से म्हणे आदिमानवांनी आमचे पुर्वज ह्या नावाखाली गेरुनी रंगवलेत गुहांमधे...

जेपी's picture

3 Mar 2015 - 9:19 pm | जेपी

माई मोड-
अरे चिमण्या,आमचे पुर्वज गेरु नाही हो वापरयचे.चुना वापरायचे ,लावयला सोपा.असे हे म्हणतात.
-माई मोड ऑफ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 9:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे चिमण्या,

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

बॅटमॅन's picture

3 Mar 2015 - 10:11 pm | बॅटमॅन

अरे चिमण्या >>>> =)) =)) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 10:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

च्यामारी जेपीमाई जोरात आहेत...!!

खटपट्या's picture

3 Mar 2015 - 11:10 pm | खटपट्या

रातच्याला माई बॅटन जेपीकडे देउन जातात... :)

बॅटमॅन's picture

3 Mar 2015 - 11:14 pm | बॅटमॅन

क्या जेपी ही हैं माई के 'हे' ??????

खटपट्या's picture

4 Mar 2015 - 1:10 am | खटपट्या

बाबौ !!
Skype Emoticons

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 8:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

तिमा's picture

3 Mar 2015 - 9:21 pm | तिमा

सरांपासून धडा घेऊन, सर्व आजी -माजी-पाजी सदस्यांनी कळफलक घेऊन आपापला पंचनामा बडवावा अशी नम्र सूचना. त्यामुळे आपण नक्की कोण आहोत आणि मिपावर का आहोत याची सर्व सदस्यांना पुनर्जाणीव होऊन ते एका वेगळ्याच प्रतलावर(उसना शब्द) जातील.

एस's picture

3 Mar 2015 - 10:29 pm | एस

धड्याची ऐशीतैशी!

सस्नेह's picture

4 Mar 2015 - 8:11 am | सस्नेह

..धड्याची म्हणालात !
'सरांची' म्हणाला असतात तर धडगत नव्हती ;)

तिमा's picture

4 Mar 2015 - 5:44 pm | तिमा

बरं झालं! ग धड्याची नाही म्हणालात. मग कोणाचीच धडगत नव्हती.

सरांपासून धडा घेऊन, सर्व आजी -माजी-पाजी सदस्यांनी कळफलक घेऊन आपापला पंचनामा बडवावा अशी नम्र सूचना.

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

म्हया बिलंदर's picture

3 Mar 2015 - 10:32 pm | म्हया बिलंदर

यांना म्हणायचं काय होतं ?

एस's picture

3 Mar 2015 - 10:45 pm | एस

मिपावर एकामागोमाग जिल्ब्या टाकायला आवडतं हे लिहायचं राहिलं वाटतं.

खटासि खट's picture

3 Mar 2015 - 11:24 pm | खटासि खट

मिपाकरांच्या पतिक्रियांचा बारीक अभ्यास करून कुणीतरी..............................................

सेल्फ गोलचा प्रयत्न केला आहे.

सिरुसेरि's picture

3 Mar 2015 - 11:25 pm | सिरुसेरि

आय मी मायसेल्फ

आशु जोग's picture

3 Mar 2015 - 11:34 pm | आशु जोग

तुम्ही समद्या मिसळकरांची एक सहल का नाही काढत..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 8:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहल काढायची हौस असणारे आमचे एक मित्र सद्ध्या सेमीमिपासंन्यास घेउन मुक्तपणे विहार करत आहेत, दुसरा कोणी ती बॅटन त्यांच्याएवढ्या क्षमतेने पेलु शकेल असं मला वाटतं नाही. तस्मात त्यांना परत आणा महिन्याला ५ च्या हिशोबानी ट्रिपा होतात का नाही बघा.

पुणेकर भामटा's picture

3 Mar 2015 - 11:43 pm | पुणेकर भामटा

होत आस कधि कधि....... चालुद्या....

महाराज तुम्ही फारच थकला आहात लिहून. आज मला खाऊन दिवस ढकला असं म्हणत माझ्याविषयी लिहिणारा एकपण उंट पुढे येत कसा नाही ?शेवटी हा माझ्याविषयी लिहिण्याचा तंबू महाराजांवरच पडणार आणि साताऱ्याऐवजी साओ पाउलोतून नवीन आईडी जन्म घ्यावा लागणार का?

खटासि खट's picture

4 Mar 2015 - 9:35 am | खटासि खट

@ सुचिकांत
तुम्ही उडालात काय ?

वेल्लाभट's picture

4 Mar 2015 - 11:24 am | वेल्लाभट

बाप्पा...... केवढा परिचय तो ! :)
कै कै वाक्य जमली नाय्त. बाकी वळिखलं तुमासनी

सूड's picture

4 Mar 2015 - 5:51 pm | सूड

२७

सांगलीचा भडंग's picture

4 Mar 2015 - 5:52 pm | सांगलीचा भडंग

जाऊदे उगाच अख्या जगासमोर स्वतःचे कौतुक नको!!!! आई रागवेल

आई रागावली का ?