मराठी भाषा दिन लघुकथा स्पर्धा -निकाल

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
28 Feb 2015 - 4:02 pm

सप्रेम नमस्कार
मराठी भाषा दिनानिमित्त आपण लघुकथा स्पर्धा आयोजित केली होती.तिला सदस्यांचा छान प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यास आनंद होत आहे.
या स्पर्धेसाठी सदस्यांपैकी स्पा,स्वॅप्स,प्रभाकर पेठकर,इनिगोय, स्पार्टाकस आणि संपादकांमधुन पैसा,लीमाउजेट,अजया,विकास यांनी परीक्षण केले.
परीक्षणाचे थोडक्यात निकष(स्वॅप्स यांच्या शब्दात) पुढीलप्रमाणे:

लघुकथा ही किस्सा आणि कादंबरी यांच्यामधला साहित्यप्रकार म्हणून गणला जातो, तसेच त्याला स्वतंत्र आविष्कार म्हणूनही गणले जाते. ही 'लघु'कथा किती लहान वा मोठी असावी याचे काटेकोर निकष नसले तरी त्यात कादंबरीप्रमाणे प्रकरणे नसतात आणि साधारणपणे एका बैठकीत वा वाचनात ती वाचून पूर्ण होते असे ढोबळमानाने सांगता येईल. लघुकथेचा एकूण बाज अथवा आवाका कादंबरीपेक्षा कमी असतो आणि त्यातील व्यक्तिरेखा आणि प्रसंग संख्येने कमी असतात.

कादंबरीच्या दृष्टीने परिचय (Exposition), गुंतागुंत (Complication), पेचप्रसंग (Crisis),
परमोच्च बिंदू (Climax) आणि निराकरण (Resolution) ह्या प्रमुख टप्प्यांचा विचार करता येतो. परंतु लघुकथेमध्ये हे सर्व टप्पे असतीलच असे नाही. एखादी लघुकथा केवळ परिचय, पेचप्रसंग आणि परमोच्च बिंदू एवढेच टप्पे घेत निराकरण एखाद्या-दुसर्‍या वाक्यातही संपवू शकेल, तर दुसरी लघुकथा ही पेचप्रसंग आधी दाखवून नंतर फ्लॅशबॅक तंत्राने बाकीचे टप्पे घेईल. अशा बर्‍याच शक्यता लघुकथेसंदर्भात संभवू शकतात.

निकषांबद्दल बोलायचे झाले तर कथानक, मांडणी, पात्रविकास, गती, उपरोध, प्रथमपुरुष/तृतीयपुरुष निवेदन, सूचकता, परिच्छेदांमधील योग्य सुसंगती, विरामचिन्हांचा आवश्यक तिथे आणि तितकाच वापर, कथानकाच्या बाजाला शोभेलशी शैली - उदा. रहस्यकथांच्या बाबतीत वेगवान, छोट्या प्रसंगांचा वापर, तर प्रेमकथांची तरल हाताळणी, कथेतील पात्रांच्या भाषाशैलींकडे दिलेले लक्ष इत्यादी अनेक निकष सांगता येतील. एखादी कथा संवादांनी पुढे जाईल तर दुसरी कथा स्वतःशीच आणि वाचकांशी संवाद साधत स्वतःची गोष्ट सांगेल. एखाद्या कथेत संवादच कदाचित नसतीलही. त्यामुळे कुठल्या प्रकारच्या वाचकांना कुठल्या प्रकारच्या कथा आवडतील हे जसे सांगता येणे कठीण आहे तसे एखादी चांगली कथा ही वाचकप्रिय असेलच असे नाही.

वरील निकषांपैकी योग्य ते निकष लावले असता खालील प्रवेशिका प्रथम तीन क्रमांकास पात्र ठरल्या आहेत.

प्रथम क्रमांक: अठरा पावलांचा स्टार्ट - आदूबाळ
द्वितीय क्रमांक: वो शाम कुछ अजीब थी - बहुगुणी
तृतीय क्रमांक:गरीब-स्पंदना

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि परीक्षणाचे काम बजावणा-या सदस्यांचे विशेष आभार.
विजेत्यांना बक्षिस व प्रमाणपत्र लवकरच पाठवले जाईल.

साहित्यिक

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

28 Feb 2015 - 4:08 pm | संदीप डांगे

विजेत्यांचे आभिनंदन...

उत्कृष्ट निकाल...

जेपी's picture

28 Feb 2015 - 4:15 pm | जेपी

विजेत्यांचे अभिनंदन..
मिपाचे आभार ,

अनुप ढेरे's picture

28 Feb 2015 - 4:20 pm | अनुप ढेरे

अभिनंदन

नाखु's picture

28 Feb 2015 - 4:20 pm | नाखु

अजून एक आदर्श पायंडा

प्रचेतस's picture

28 Feb 2015 - 4:23 pm | प्रचेतस

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

यसवायजी's picture

28 Feb 2015 - 4:25 pm | यसवायजी

*clapping* अभिनंदन *good*

खेडूत's picture

28 Feb 2015 - 4:52 pm | खेडूत

सर्व कथा आवडल्या...
विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन!

उगा काहितरीच's picture

28 Feb 2015 - 4:58 pm | उगा काहितरीच

लींक्स दिल्या तर बरं होईल .

अजया's picture

28 Feb 2015 - 5:10 pm | अजया
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Feb 2015 - 5:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा!! :)

स्वाती२'s picture

28 Feb 2015 - 5:03 pm | स्वाती२

अभिनंदन!

चैत्रबन's picture

28 Feb 2015 - 5:06 pm | चैत्रबन

सर्वांचं अभिनंदन :)

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Feb 2015 - 5:31 pm | लॉरी टांगटूंगकर

अभिनंदन.
लिखते रहो!

इशा१२३'s picture

28 Feb 2015 - 5:34 pm | इशा१२३

अभिनंदन!

आदूबाळ's picture

28 Feb 2015 - 5:35 pm | आदूबाळ

ये ब्बात! धन्यवाद!

कथा स्पर्धेच्या निमित्ताने मनात बरेच दिवस असलेली कथा लिहावीशी वाटली. एरवी माझ्यासारख्या आळश्याला एवढं मोटिवेसन आलं नसतं.

बहुगुणी आणि स्पंदना यांचे अभिनंदन!

आदूबाळ आणि स्पंदना यांचे हार्दिक अभिनंदन!

वाचनीय कथा लिहिणार्‍या इतर लेखक/लेखिकांचेही मनःपूर्वक कौतुक करायला हवे, या स्पर्धेचं परीक्षण करणं नक्कीच कठीण गेलं असणार इतक्या उल्लेखनीय कथा होत्या, तेंव्हा सर्व परीक्षकांचेही आभार!

बोका-ए-आझम's picture

1 Mar 2015 - 8:15 pm | बोका-ए-आझम

मालक, ही कथा चित्रपटाचा ऐवज आहे. बघा जरा. अमोल गुप्ते किंवा विक्रमादित्य मोटवाने सारखा दिग्दर्शक सोनं करेल या कथेचं. मनावर घ्या. आणि विजेतेपदाबद्दल अभिनंदन!

तुषार काळभोर's picture

28 Feb 2015 - 5:38 pm | तुषार काळभोर

हार्दिक अभिनंदन... सर्व विजेत्यांचे अन् सर्व स्पर्धकांचे देखील!!

. सर्व विजेत्यांचे अन् सर्व स्पर्धकांचे आभार आणि अभिनंदन ! +)

विजेत्यांचे अभिनंदन! अपेक्षित निकाल आहे.

स्रुजा's picture

28 Feb 2015 - 6:16 pm | स्रुजा

अभिनंदन !!!

प्रभाकर पेठकर's picture

28 Feb 2015 - 8:51 pm | प्रभाकर पेठकर

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

सर्वसाक्षी's picture

28 Feb 2015 - 9:54 pm | सर्वसाक्षी

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन

चाणक्य's picture

28 Feb 2015 - 10:36 pm | चाणक्य

छान उपक्रम

विजेत्यांचे अभिनंदन!!

मधुरा देशपांडे's picture

1 Mar 2015 - 12:45 am | मधुरा देशपांडे

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन!!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2015 - 1:20 am | अत्रुप्त आत्मा

+++१११
आणि टाळ्या!

सानिकास्वप्निल's picture

1 Mar 2015 - 1:55 am | सानिकास्वप्निल

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन *clapping*

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Mar 2015 - 2:05 am | निनाद मुक्काम प...

सर्व विजेत्यांचे अन् सर्व स्पर्धकांचे आभार आणि अभिनंदन !

खटपट्या's picture

1 Mar 2015 - 2:06 am | खटपट्या

विजेत्यांचे अभिनंद्न !! मान्यवरांचे आभार.

सुहास झेले's picture

1 Mar 2015 - 2:08 am | सुहास झेले

सर्वांचे अभिनंदन :)

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

श्रीरंग_जोशी's picture

1 Mar 2015 - 10:01 am | श्रीरंग_जोशी

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

हि स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संपादक मंडळाचे व भाग घेणार्‍या सर्वांचे व परिक्षकांचे मनःपूर्वक आभार.

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2015 - 10:57 am | पिवळा डांबिस

विजेत्यांना बक्षिस व प्रमाणपत्र लवकरच पाठवले जाईल.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
पण संपादक मंडळ, प्रमाणपत्रांखेरीज 'बक्षिसे' काय दिली आहेत ते ही जाहीर करा.
म्हणजे त्यामानाने आदुबाळाकडे प्यार्टी मागायला बरं!
नायतर आम्ही मागायचो दोराबजीची बिर्याणी अणि तो द्यायला तयार असायचा वडापाव, असं नको!!!!!!
:)

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2015 - 2:56 pm | नगरीनिरंजन

विजेत्यांचे अभिनंदन! उपक्रम आवडला; दरवर्षी अशी स्पर्धा व्हावी ही सदिच्छा.

पिंपातला उंदीर's picture

1 Mar 2015 - 3:34 pm | पिंपातला उंदीर

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.स्तुत्य उपक्रम *dance4*

शशिकांत ओक's picture

1 Mar 2015 - 4:16 pm | शशिकांत ओक

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन...

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2015 - 12:21 am | डॉ सुहास म्हात्रे

विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन !

तसेच, सर्व प्रतिस्पर्ध्यांचेही अभिनंदन. स्पर्धेतल्या सर्वच कथा सुंदर होत्या. त्यामुळे परिक्षकांचे काम कठीण् होते यात संशय नाही !

स्पार्टाकस's picture

2 Mar 2015 - 10:13 am | स्पार्टाकस

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!

अस्मी's picture

2 Mar 2015 - 11:17 am | अस्मी

विजेत्यांचे अभिनंदन!!
सर्व कथा सुंदर होत्या...

हरेश मोरे's picture

2 Mar 2015 - 11:49 am | हरेश मोरे

सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!

सर्व कथा खुपच छान होत्या. खुप अवडल्या.

अठरा पावलांचा स्टार्ट केवळ कहर होती....!!

सुंदर निकाल!

अभिनंदन सर्वे विजेत्यांचे.

ब़जरबट्टू's picture

2 Mar 2015 - 1:04 pm | ब़जरबट्टू

टाळ्या...

अठरा पावलांचा स्टार्ट केवळ कहर होती....!!

+१

बॅटमॅन's picture

2 Mar 2015 - 1:11 pm | बॅटमॅन

विजेत्यांना हार्दिक काँग्रॅट्स!!!!!!!!!!!!

सविता००१'s picture

2 Mar 2015 - 2:30 pm | सविता००१

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

रुपी's picture

3 Mar 2015 - 3:48 am | रुपी

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचेही अभिनंदन!

मित्रहो's picture

4 Mar 2015 - 11:24 am | मित्रहो

विजेत्यांचे अभिनंदन

पिशी अबोली's picture

4 Mar 2015 - 12:59 pm | पिशी अबोली

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

सर्वं विजेत्यांचे अभिनंदन .

hrishikesh vitekari's picture

6 Mar 2015 - 11:41 am | hrishikesh vitekari

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.पार्टी पायजे...