दिन्याचा राजा

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
27 Feb 2015 - 4:09 pm

दिन्याच्या राजाला काळी प्यांट इन केलेला शर्ट घालून एका उंच स्टुलावर चढून आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घराच्या पत्र्यावरून काढताना पाहून मजा वाटली. दुसरा कोणी असता तर लक्ष्य गेलं नसतं पण हा दिन्याचा राजा होता दिन्याचा राजा.
हा तसा माझ्या हून वयाने लहान.
आम्ही घर बदलून ह्या वस्तीत येऊन नुकतेच राहू लागलो होतो. नवे मित्र बनवत होतो.
आमच्या क्रिकेट खेळायची जागा म्हणजे दारा समोरून जाणारी वाट.
तिच्या शेवटी भंगारचा धंदा करणार्‍या खान अंकलचं घर आडवं गेलेलं.
त्याच्या भिंतीला लागला की सिक्स.
सगळी घरं बैठी. सीमेंटच्या पत्र्यांचे छप्पर.
त्या दिवशी खान आंटी खालून कोणाला तरी शिव्या घालीत होता.
आणि त्याच शिव्या पत्र्यावरून एक १२-१३ वर्षांचा मुलगा खान आंटीला देत होता.
तिच्याच घराच्या पत्र्यावर उभा राहून.ते घर त्याचंच असल्याच्या ऐटीत उभा होता तो.
मला मजेशीर वाटत होता.
वस्तीतले बाकीचे हि तो फ्री शो बघत होते, हसत होते.
मी मित्राला विचारला, "हा कोण?"
तो म्हणाला, "दिन्याचा राजा आहे. चु#या आहे साला."
दिन्याचा राजा ची ही ओळख मजेशीर होती. पण नंतर सवय झाली.
वस्तीतल्या कोणाच्याही पत्र्यावर चढायची डेरिंग त्याच्यातच होती.
तो शाळेतही होता पण कितवीला हे कोणालाच माहीत न्हवतं.
आम्ही मोठे होत गेलो ते घाबरत घाबरत, पण ह्याच्यात फारसा फरक पडला न्हवता.
एकदा असाच पत्र्यावर काहीतरी काढायला गेला, ते नेमका हवालदार शिंदे च्या घरासमोरच्या घरावर.
हवालदार शिंदेचं घर वस्तीतलं एकटं दोन माजली घर.
वरच्या खोलीची खिडकी उघडी होती.
समोरच्या घरावर चढलेल्या दिन्याच्या राजाने हवालदाराच्या पोरीला नको त्या अवस्थेत चुकुन पाहीलं.
१४-१५ वर्षांचा दिन्याचा राजा आधीच नावाने बदनाम, त्यात हवालदाराची पोरगी जोरात किंचाळली.
त्यादिवशी हवालदाराने राजाला बेदम मारला. राहिलेली कसर राजाच्या बापाने म्हणजेच दिन्याने काढली.
महिनाभर दिन्याचा राजा लंगडत होता. पण कोणाला कीव नाही आली.
दिन्याचा राजा त्यानंतर शांत झाला, असं नाही पण बदलला होता हे खरं.
हवालदाराच्या पोरीने तिच्या मैत्रिनिला सांगितलं की त्याने आधी तिच्याकडे पाहिलंच न्हवतं, पण हीच घाबरून ओरडली मग त्याने पाहील नि लगेच मान वळवली. पण हे सगळं हावलदार बापापुढे तिला सांगता आलं नाही.
दिन्याच्या राजाने उगाच मार खाल्ला म्हणून ती पण हळ-हळत होती.
आमची वस्ती आक्ख्या शहराच्या पायथ्याला.
त्यामुळे पावसाळ्यात घरात पाणी शिरणं नवीन गोष्ट न्हवती पण वरचा मजला बांधण्याइतकी श्रीमंती पण न्हवती.
२६ जुलई २००५ ला आक्खी वस्ती पाण्यात होती.
आमचं घर तर केंव्हाच पाण्यात पूर्ण बुडालं.
वस्तीतले सगळे वस्तीपासून लांब मुख्य रस्त्यावरून पाण्यात बुडालेली स्वताःची घरं पाहत होती.
कोणी रडत होतं कोणी हळ-हळत होतं, कोणी कोणाला मदत करीत होतं.
पण ह्या सगळ्यात हवालदार शिंदे वरच्या मजल्यावर अडकल्याचा खूप वेळानं कोणी तरी बोललं.
त्यांचं घर वस्तीत खूप आत रस्त्यावरून त्यांच्या वरचा मजला एखाद्या बेटा सारखा दिसत होता, पण इतक्या लांबून अंधारात घरातलं कोणी दिसेना. इतरांच्या रडा रडीत त्यांचं ओरडनं ऐकू आलं नाही.
सगळे बघे, "शिंदे हवालदार अडकला, शिंदेबाई अडकल्या..." ओरडत राहीले, तेव्हा कोणाची वाट ना बघता दिण्याचा राजा पाण्यात उतरला.
इतक्या वेळात त्याने कुठून तरी मोठी दोरी फुगवलेली ट्यूब आणि काही काही जमवलं आणि ते घेऊन तो गेलाही.
राजा राजा ओरडेपर्यंत राजा लांब होत गेला. थोडा वेळ पाण्यात काहीच हालचाल दिसली नाही.
वरुन पाऊस चालू आणि पाणी वाढत होतं.
दिन्याच्या राजा ने आधी शिंदे बाई मग तिच्या मुली आणि मग हावालदार सर्वांना एक एक करून रस्त्यावर आणून सोडलं.
हावालदाराने घरच्या सर्वांना सुरक्षित पाहिलं आणि बायकांसारखा रडला.
धन्यवाद द्यायचा आठवलं म्हणून तो दिन्याच्या राजाला शोधायला लागला.
पण दिन्याचा राजा हावालदारला सुरक्षित आणून लगेच पुढच्या वस्तीत तेच सामान घेऊन कोणाला तरी वाचवायला गेला.
पाउस थांबला, पाणी ओसरलं. सगळे आप-आपले विस्कटलेले संसार सावरू लागले.
हावालदार दिन्याच्या राजाशी थोडा सौम्या झाला, इतकंच.
तो पोलिसाच्या काळजाचा असेल म्हणूनही असेल कदाचित.
राजा नंतर कामावर लागणार्‍या मजूरांमधे जाऊ लागला. नंतर मुकादम झाला. लग्नं केलं. त्याच्याच सारखा बस्क्या नाकाचा मुलगा झाला त्याला.
तो मुलगा बापचेच गुण घेऊन आलाय. बिनधास पत्र्यावर चढतो. पण दिन्याचा राजा पत्र्यावर न चढता चक्क ऊंच स्टुलावर उभा राहून त्याला काढतोय हे बघायला मजा आली.
मुलाचं नाव त्याने सिद्धार्थ ठेवलंय. पण बापासारखच त्याचंही नाव लोकांनी बदलून राजाचा सिद्धू केलंय.
वस्तीत भरपूर वर्षे राहिल्यावर दिन्याच्या राजाचे पूर्ण नाव समजले.
राजदत्त दिनकर जाधव.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

27 Feb 2015 - 5:13 pm | आनन्दा

आवडली.. सत्यकथा?

म्हया बिलंदर's picture

27 Feb 2015 - 5:48 pm | म्हया बिलंदर

काही अंशी…

किस्सा आवडला. परिच्छेद करताना प्रत्येक संवाद वेगळ्या रेषेवर येईल असे पाहणे गरजेचे, पण प्रत्येक वाक्याचा नवीन परिच्छेद बनवू नये. नाहीतर ते मुक्तकाव्य होतं.

म्हया बिलंदर's picture

27 Feb 2015 - 5:51 pm | म्हया बिलंदर

विद्यार्थी शिकत आहे. साईड वाईड सब कुछ. *PARDON*

कपिलमुनी's picture

27 Feb 2015 - 5:52 pm | कपिलमुनी

आवडला

रेवती's picture

27 Feb 2015 - 6:13 pm | रेवती

कथा आवडली.

अमित खोजे's picture

27 Feb 2015 - 9:08 pm | अमित खोजे

छान कथा आहे. सत्यकथा असावी असे वाटलेच होते. नावातील रहस्याने अजुनच मजा आली. तसे आम्हीही मित्रांना जोश्याचा मन्या, भोसल्यांचा गिर्या वगैरे म्हणायचो. परन्तु एकदम बापाच्या नावावरून पोराचे नाव म्हणजे झकासच की!

भिंगरी's picture

27 Feb 2015 - 9:52 pm | भिंगरी

नेमक्या शब्दात कथेतील सगळ्या व्यक्ती डोळ्यापुढे साकारल्यात.
बाकी
आम्हीही मित्रांना जोश्याचा मन्या, भोसल्यांचा गिर्या वगैरे म्हणायचो. परन्तु एकदम बापाच्या नावावरून पोराचे नाव म्हणजे झकासच की!
हे वाचून मुख्य पानावरील मार्मिक गोडसे यांचा,'तेरा नाम करेगा रोशन'हा लेख आठवला.

आदूबाळ's picture

27 Feb 2015 - 9:14 pm | आदूबाळ

छान कथा...

इरसाल's picture

28 Feb 2015 - 12:24 pm | इरसाल

मित्राचे नाव कखग लोटु कख होते.
मित्र त्याला कॉलेजात लोट्याच म्हणायचे इतकं की नव्याला वाटायचे हेच त्याचे नाव मग कधी कधी त्याच्या घरी जावुन त्याच्याच वडिलांना " काका लोट्या आहे का?

भिंगरी's picture

28 Feb 2015 - 7:06 pm | भिंगरी

मित्राचे नाव कखग लोटु कख होते.
असे कसे हे नाव ?

आमच्या वर्गात एक प्रताप पोपट यादव होता.त्याला यादवांचा प्रताप असेच म्हंटले जायचे =))
शिवाय तो कधीही माझा पोपट झाला म्हणत नसे कारण म्हणे पोपटाला तो झाला होता!!

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2015 - 10:54 pm | टवाळ कार्टा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2015 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा

@आमच्या वर्गात एक प्रताप पोपट यादव होता.त्याला यादवांचा प्रताप असेच म्हंटले जायचे Lol
शिवाय तो कधीही माझा पोपट झाला म्हणत नसे कारण म्हणे पोपटाला तो झाला होता!!>> =)) आय्यो..रामं,रामं. =))

प्रथम म्हात्रे's picture

1 Mar 2015 - 11:51 pm | प्रथम म्हात्रे

आवडली....