काही शब्दप्रयोग.

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
26 Feb 2015 - 3:45 pm
गाभा: 

मराठी भाषा नवशब्दप्रयोगपिपासू आहे किंवा कसे ...आता हे किंवा कसे हे खास म टा चे मराठी ...

हल्ली कुणीतरी कुठेतरी वाय फाय ऐकले काय, जो उठतो तो आपला अमुक एरिया वाय फाय करणार ;तमुक स्टेशन वाय फाय होणार ........ शब्द वापरणार्याचा उत्साह असा जणू काही ह्यांनीच ते शोधले आहे आणि काहीतरी अद्वितीय अद्भुत गोष्ट करताहेत.

परीर्लुप्त.. हा असाच एक शब्द ..लहानपणापासून क्वचित ऐकतोय ...पण अजून वाक्यात उपयोग करायची वेळ आलेली नाही ... तसाच तो प्रभृती किती पोक्त आणि शिष्ट शब्द आहे ..

धर्तीवर ने असाच एक उच्छाद मांडलाय ...जरा कुणी कुठे काय केले कि ते जरा रुजते नं रुजते तोच 'अमुक अमुक धर्तीवर ..ह्यांनीसुद्धा तमुक तमुक केले ..अहो असे कॉपी पेस्ट करून कुठे काही होते का उगाच कै तरी

हल्ली बऱ्याच दिवसात xxxx हे कडक शिस्तीचे भोक्ते असे वाचायला नाही मिळाले आणि कुणी हल्ली "पृच्छा" केलेली नाही

आमच्या पहिल्या कंपनीत ऐन मध्यभागी शॉपफ्लोअर वर एका भिंतीवर वर करडी दटावणी ...कायमची रंगवून ठेवली होती कि राष्ट्राची जोरदार प्रगती चालू आहे....

लेखी मराठीची हि स्थिती ..तर बोली मराठीची आणखीन दुसरीच कथा ...क्रेडीट कार्ड / मोबाईल वगैरेंच्या कॉल सेंटर वरचे समस्त सखाराम गटणे ऐकले कि त्यांची दयाच येते ... "आम्हाला फोन करण्यासाठी धन्यवाद ..आम्ही आपली काय मदत करू शकतो ? ...होल्ड करण्यासाठी धन्यवाद ..आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि आपली सेवा प्रतिबंधित होणे हि एक तांत्रिक अडचण असून लवकरच उत्तराची अपेक्षा आहे"... च्या मारी तुझ्या xxxx ...माणसासारखा बोल कि रे ..पण नाही ...

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

26 Feb 2015 - 5:19 pm | आनन्दा

च्या मारी तुझ्या xxxx ...माणसासारखा बोल कि रे ..पण नाही ...

उगीचच गटणे आठवला. छापखान्यातील खिळे :)

अत्रन्गि पाउस's picture

26 Feb 2015 - 5:23 pm | अत्रन्गि पाउस

कॉल सेंटर वरचे समस्त सखाराम गटणे

म्हटले कि ...

तिमा's picture

26 Feb 2015 - 9:25 pm | तिमा

आमच्या पहिल्या कंपनीत ऐन मध्यभागी शॉपफ्लोअर वर एका भिंतीवर वर करडी दटावणी ...कायमची रंगवून ठेवली होती कि राष्ट्राची जोरदार प्रगती चालू आहे....

आमच्या कॉलेजच्या मुतारीतल्या भिंतीवर लिहून ठेवले होते," आपल्या राष्ट्राचा आधारस्तंभ आपल्याच हाती आहे."

एकदा रत्नागिरी प्रवासात एस. टी. च्या मागच्या बाकावर दोन व्यक्ती बोलत असलेले ऐकले.

"आमच्या कॉलेजला गेल्या महिन्यात प्राचार्य लाभले."
"लाभले का? अरे वा!"
अत्यंत गंभ्रीरपणे . म्हणजे चेष्टा वगैरे काही नाही.

सरकारी मराठीतला त्यांचा हा संवाद बराच वेळ चालू होता. कोण प्राचार्य, कुठून कुठे गेले, अजून किती विभाग, त्या त्या विभागाचे प्रमुख व्याख्याते, हे असे काय काय लाभले हे सगळं ते एकमेकांस समजावून सांगत होते. आणि प्राध्यापक, व्याख्याते, अधिव्याख्याते हे नुसते येत नव्हते- दर वेळी लाभतच होते.