घर घर की काहानी

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
25 Feb 2015 - 9:44 am

'Don't take me for granted';
तिने दम दिला
'अग? पण मी कुठे?'
त्याने केविलवाणा प्रयत्न केला

'माहिती आहे मला तुझा स्वभाव...
मला न विचारता... द्यायचा इतरांना भाव;
एक गोष्ट लक्षात राहील तुझ्या... तर शपथ..'
चिडून गेली ती आत तणतणत!

कस सांगू हिला.. surprise आहे!
तिचा वाढदिवस... माझ्या लक्षात आहे!
एक गजरा... एक नाटक... नंतर long drive चा plan आहे...
तिच्या आवडीच्या restorent मधे टेबलसुद्धा booked आहे...

खरच आवडतेस ग मनापासून;
विसरभोळा आहे घे सांभाळुन;
संसार तुझ्याशिवाय अपुरा आहे...
अस आपल् म्हणायच...
खर तर मीच तुझ्याशिवाय अधूरा आहे....

---------------

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

किती जिल्ब्या पाडाल?

सस्नेह's picture

25 Feb 2015 - 11:45 am | सस्नेह

तुम्हाला मधुमेह आहे का ? +D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Feb 2015 - 12:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मधुमेह असो नसो. काळजी घ्यायलाचं पैजे का नै? प्रिवेंशन इज बेष्ट मेडिशिन...!!! =))

पूर्वी असले लेख एकतर बोर्डावर जास्त वेळ राहू दिले जात नसत किंवा खाली ढकलले जात. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो. चांगले लेख राहतात बाजूला आणि कचराच तरंगतो वर. असो.

आनन्दिता's picture

26 Feb 2015 - 12:31 am | आनन्दिता

+१

सविता००१'s picture

26 Feb 2015 - 12:13 pm | सविता००१

+१०००

सस्नेह's picture

26 Feb 2015 - 10:49 am | सस्नेह

खरय तुमचं. मिपाकारांचं एक मेंदू-मार्जन सेश्षण घ्यायलाच हवं आता... *sad*

आणखी एक अतिगोड पा़ककृती !!

यसवायजी's picture

25 Feb 2015 - 12:02 pm | यसवायजी

का-हानी पोचवताय?
पोचली पोचली।

असंका's picture

26 Feb 2015 - 11:48 am | असंका

:-))

सविता००१'s picture

26 Feb 2015 - 12:14 pm | सविता००१

:))

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2015 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

झाले पण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
दोन दिवस! ?

सुहास झेले's picture

25 Feb 2015 - 12:59 pm | सुहास झेले

अरेरेरे :-|

विशाखा पाटील's picture

25 Feb 2015 - 1:25 pm | विशाखा पाटील

पुढची कविता टाकण्यापूर्वी शब्दकोशात शब्द तेवढे तपासून घ्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2015 - 12:38 am | डॉ सुहास म्हात्रे

ज्योति मॅडम,

मला मिपाकर 'Don't take me for granted' असे म्हणताना दिसत आहेत. तुम्हाला दिसत नाहीत का ?

संदीप डांगे's picture

26 Feb 2015 - 4:07 am | संदीप डांगे

कि करा पापाजी? पे'ट्रोल' खतमइ नइ ओंदा..

पलाश's picture

26 Feb 2015 - 10:20 am | पलाश

+१००.
तर काय? हे अस इतकं खोटं वाटण्याइतकं गोड गुलाबी ("मैने प्यार किया" या हिंदी चित्रपट प्रकारातलं प्रेमळ ;) ) लिहायला खूप कल्पनाशक्ति लागत असणार. त्यातून ते पुन्हा पुन्हा लिहायचं म्हणजे तर फार म्हणजे फार अवघड काम !! थोडी विश्रांतीची गरज आहे आता निदान वाचकांना तरी!!!!

:-))

बाकी तुम्ही काही म्हणा सर, पण या इतक्या कहर विनोदी प्रतिसादांसाठी तरी हा रतीब चालुच रहावा असं वाटतंय....

इतक्या उत्कट पवित्र मंगल निर्मळ प्रेमाच्या अविष्काराला नावे ठेवण्याचा उद्देश कळला नाही. जगात आज प्रेमाचा र्‍हास होत असताना आणि पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने पतीपत्नींत घटस्फोट वाढत असताना आणि लिव्ह इन सारख्या गोष्टी लोक उजळमाथ्याने करु पाहात असताना कोणीतरी दवबिंदूसारखं स्वच्छ निर्मळ संसारी प्रेमाचं दर्शन इतक्या आरस्पानीपणे घडवत असेल आणि कोणत्याही अभिनिवेशाखेरीज, तर त्याने लोकांना गहिवरुन का येत नाही बरे? त्याऐवजी काही लोक त्याला जिलबी किंवा तत्सम हिणकस संबोधनाने का संबोधतात बरे?

आपल्या साधेपणाने स्वर्गीय उंचीला पोचणार्‍या अश्या त्यागाधारित प्रेमाच्या दर्शनाने लोक कुत्सित छद्मी प्रतिसाद देताना पाहून माझं मन आक्रंदून उठतंय.. पुन्हापुन्हा भळाभळा अश्रू वाहताहेत.. जणू मी अश्रुमय बनलो आहे..

प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश.. प्रेमापोटी जन्म घेतसे दुनियेचा विश्वास.. या अप्रतिम मधुर गाण्याची आठवण मी याठिकाणी करुन देऊ इच्छितो आणि प्रेमासाठी सर्वांनी हृदय उघडावे अशी हात जोडून विनंती करतो.

या गाण्याचा व्हिडिओ न मिळणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, पण खाली हा संपूर्ण अप्रतिम चित्रपट जोडत आहे. त्यात थेट १ तास ११ मिनिटे या ठिकाणी क्लिकवून या हळुवार गाण्याचा लाभ घेता येईल. पण प्रेमाविषयीच एकूण जगात आकस वाढत असल्याने फार कमी निस्सीम प्रेमाचे चाहते हे गाणे पाहतील असे दु:खाने नमूद करावेसे वाटते.

सविता००१'s picture

26 Feb 2015 - 12:17 pm | सविता००१

केवळ अशक्य कहर प्रतिक्रिया
:))

ढन्यवाड्स। हे इस मञ फवोरोटे हीरो एंड थिस सांग इस अवसोमे।

(खिचडीप्रेमी) SYG

पैसा's picture

26 Feb 2015 - 3:54 pm | पैसा

ढसाढसा रडवलंत हो!

*cray2*

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2015 - 11:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायला, हे तर या कवितेला मिळालेले बंपर बक्षिस हाय ! +D

रेवती's picture

26 Feb 2015 - 11:59 pm | रेवती

दिव्य प्रतिसाद!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Feb 2015 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ :-D