मोबाइल रिचार्ज

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
24 Feb 2015 - 1:19 pm

 'बघ तो नबंर ...नाइन. .टू. .थ्री फोर...सेवन'

'बरोबर  अगदीच बरोबर, हे तीच्या चुकीचा नबंर ?',

'छे हो मी आसे करणारच नाही..',

'होतात हो चुका होतात. ..काका. .पण आसे घाबरू नका',

'घाबरू नका काय? ...मग माझे मला पैसे द्या नाहीतर बॅलेस तर द्या',

'ओ काका हे काय बोलताय, मी फोन तुमच्या कडे दिलेला नबंर टाकायला आणि तुम्ही मलाच बोलताय, चुका तुमच्या आणि दंड आम्हाला का?',

'हे बघा मला काही कळत नाही  शेवटी तुमच्या फोन चा दोष आहे, '

'हे बघा काका तसे नसते, चुकीचा नबंर दाबला की चुकीचा नबंर पडणार, '

'तुमच्या सागण्यावर मी नबंर दाबला की ,'

'ते काही नाही मी तुम्हाला पैसे काही देणार नाही, '

आता मात्र सदा काका ची चांगलीच सटकली, 'हे दहा नव्हे पन्नास नव्हे चांगले शंभर रूपये दिलेत तुम्हाला ,ते मला पाहीजे म्हणजे पाहिजे',

'म्हणजे काय काका, तुम्ही दादागिरी करताय की?',
 
दोन्ही मधील वाद जवळपास आलेली टपोरी ऐकतात,

'कोण करतो रे दादागिरी? ', त्यातील बंड्या म्हणतो,

'काही नाही राव येथे कोणी दादागिरी करत नाही हे रोजच आपल, 'आसे म्हणुन राजु सर्वाना तेथून घालवून लावतो,

राजू चा घाबरलेला चेहरा पाहून सदा काका ना दया येते,

'बरं तो नबंर काढ जो चुकीचा आहे',

'कशाला आता नको त्या भानगडीत कशाला डोके घालताय, '

'आरे म्हणजे त्या नबंर वर फोन करुन त्याला माझ्या नबंर वर बॅलेस सोडण्यास सांगतो',

'आईला काय डोक आहे तुमचं काका,  कोठे पोलीस मध्ये होता का? , हे घ्या नबंर. .....नाइन टू थ्री. ..फोर..,

' हॅलो'
'हॅलो'

'बोला,'

'आहो मी सदा बोलतो, '

'बोला की कुठला सदा? गावातील का शहरातील सदा?,'

'आहो मी ज्याने तुमच्या मोबाईल वर चांगलाच शंभर रूपये चा बॅलेस सोडला म्हणजे चुकुन गेला, तर थोड सहकार्य करता? ',

'बोला की मग काय करू तुमच्या साठी ',

'ज्या नबंर वरून मी फोन केला आहे त्या वर लगेच एक शंभर रूपयांचा बॅलन्स करा ',

'छे हो आता ते शक्यच नाही कारण चुक माझी नाहीतर तुमची आहे',

'आहो आता तर म्हणाला की सहायता करतो म्हणून?',

'आहो हे फक्त बोलायचे आसे ,'

'म्हणजे तुम्ही लबाड दिसता, '

'आहो सध्याच्या जगात आसे च वागायचे आसे,  तुम्हालाच म्हणून सांगतो ते तुमच्या फायद्याचे आहे बघा',

हे ऐकल्यावर सदा काका खुश झाले,
राजू चेहरा न्याहाळत आसे

'कोणता ओ फायदा? ,'

'तुम्ही जो मला फोन केलात ना त्यात तुमचा बॅलन्स मिळणारच नाही पण हा फोन कट करुन तुम्ही तुमचा बॅलन्स वाचऊ शकता,'

'आहो निदान पन्नास रुपये चा तरी. ..',

आणि

फोन कट होतो.

राजू  सदा काकाचे सर्व ऐकतात राजू ला त्या विषयी वाईट वाटते, म्हणून राजू एक फोन कंपनी ला करतो,

ट्रिंग. ..

ट्रिंग. ..

.......सेवेत आपले स्वागत आहे...
रिचार्ज करण्यासाठी एक दाबा..
इन्टरनेट रिचार्ज साठी दोन दाबा. ..
तुमच्या बॅलन्स च्या तक्रारी साठी तीन दाबा. .....

************************************

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

24 Feb 2015 - 1:31 pm | आदूबाळ

मी....

आता वाचतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 1:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझा प्रतिसाद शिस्तीतं उडवला गेलेला आहे. मी पहिला टाकलेला प्रतिसाद :(

काळा पहाड's picture

24 Feb 2015 - 2:54 pm | काळा पहाड

मी वाचला होता तुमचा प्रतिसाद. आणि मोजींच्या कथेवरचा पहिला प्रतिसाद म्हणजे अमिताभ बच्चन बरोबर शेकहँड करण्याएवढं पुण्य पाहिजे. तुमचा राग समजू शकतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2015 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोजीसाब, बहुंत इंतजार करायां... हाँsss

जेपी's picture

24 Feb 2015 - 1:50 pm | जेपी

प्रबोधनकार मोजींना _/\_

आज मोजिंचा राँग नबंर लागला :(

यसवायजी's picture

24 Feb 2015 - 2:26 pm | यसवायजी

*DANCE*
.
*DANCE*
.
आता वाचतो.

यावेळेस दंग्याला स्कोपच इल्ले.
अरे कुठे नेऊन ठेवलाय वर्जीनल मोजी आमचा?

कपिलमुनी's picture

24 Feb 2015 - 2:29 pm | कपिलमुनी

कोणीतरी खोडसाळपणा करतय आणि आपण मात्र :(

इरसाल's picture

24 Feb 2015 - 2:41 pm | इरसाल

१.फोनवरुन टाईप करत आहेत.
२.एनीसॉफ्ट्की नावाचे लिहायचे सॉफ्टवेअर वापरुन लिखाण चालु आहे.
३. अशुद्धलेखन करायचा प्रयत्न चालु आहे
४. काही ठिकाणी हे सॉफ्टवेअर व्यवस्थित वापरता येत नाही(वापरणार्‍याची बाल-बुद्धी)
५. मागच्या कथेतला युएस्पी जसा शब्दाखाली टिंब ह्या वेळेस विसरलेले दिसत आहेत.
६. ज्याला शंभर, चांगले, सांगतो, ट्रिंग, दंड हे लिहीता येते त्याला नंबर लिहिता येत नाही हा शुद्ध....... आहे माने !

थॉर माणूस's picture

24 Feb 2015 - 2:55 pm | थॉर माणूस

हे आमचे ज़ीवनभौ नव्हेतच...
:(

सानिकास्वप्निल's picture

24 Feb 2015 - 3:08 pm | सानिकास्वप्निल

मजा नाही आली वाचताना :(

भलत्याचा बॅलन्स वाढवला. बरं.
फोनच्या बाबतीत म्हणून ठीक..

किसन शिंदे's picture

24 Feb 2015 - 7:23 pm | किसन शिंदे

जीमो 'टच' वाटत नाहीये कथेला. :(

मोहनराव's picture

24 Feb 2015 - 7:42 pm | मोहनराव

जिमो, मी तुमचा फॅन.. पण मजा नाय आली यावेळी.

जेपी's picture

24 Feb 2015 - 8:49 pm | जेपी

हय ..हय..
एवढ उलगडुन प्रबोधन केलय आन मिपाकर तोंड पाडुन बसलेत...

घोर कलयुग..

नाखु's picture

25 Feb 2015 - 10:41 am | नाखु

तर्रीबाज मिसळसाठी आलेल्या "कष्ट"मर ला शँपलात भिजीवलेले गार्ढोण पोहे मिसळ म्हणून दिल्यावर मिपाकर तोंड पाडुन (आणि लेखण्या मोडून) बसतील नाय तर काय !!!

तिमा's picture

25 Feb 2015 - 11:19 am | तिमा

हे नक्कीच ओरिजिनल लिखाण नाही. अकाऊंट हॅक झाल्यासारखा वाटतोय! ह्यांत जीमोंचा वॉटरमार्क नाही.

खटपट्या's picture

25 Feb 2015 - 12:28 pm | खटपट्या

गोष्ट आवडली आहे "आसे" नमूद करतो.

:-) .....गडाबडा लोळुन हसण्यासाठी काय किवर्ड वापरतात?

दिपक.कुवेत's picture

25 Feb 2015 - 8:31 pm | दिपक.कुवेत

मला जरा कोणी सांगेल का?