वृक्षारोपण माहिती हवी आहे

देवांग's picture
देवांग in जनातलं, मनातलं
23 Feb 2015 - 7:17 pm

मी एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करतो. आम्हाला सिंहगडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे(प्रती वर्षी १५०० ) ज्या द्वारे तिथे जास्तीत जास्त घनदाट झाडी करता येईल. परंतु आम्हाला ह्याबाबत जास्त माहिती नाही. कृपया तुम्हास ह्या विषयाची माहिती असल्यास ती शेअर करावी.

१. कुठल्या महिन्यात कार्यक्रम हाती घ्यावा
२. कुठल्या प्रकारची झाडे लावावीत ज्यासाठी कमी पाणी लागेल आणि त्यांची वाढ जास्त काळजी न घेत होऊ शकेल ?
३. छोटी रोपे लावावीत कि मध्यम आकाराची रोपांची लागवड करावी ?

अजून काय काळजी घ्वावी ?

धोरणप्रतिसाद

प्रतिक्रिया

संस्थेतर्फे करायचे तर प्रथम वनखात्याशी तुमच्या रेजिस्टर्ड संस्थेच्या लेटरहेडवर पत्रव्यवहार करून त्यांनाही सहकारी म्हणून घ्यावे त्यांच्याकडे रोपे ,निधी असतो स्वयंसेवक {आणि अल्पोपहार अधिक प्रसिद्धीचा खर्च }तुमचे घ्या. तारखा तेच ठरवतील. मुळात जागा त्यांची असल्याने त्यांच्या मदतीशिवाय पुढे जाणे कठीण आहे.

हि संस्था आमदाराची आहे. त्या मुळे सरकारी विघ्न येणार नाही. बाकी काय काळजी घ्यवी कुठली रोपे लावावीत ह्याची माहिती मिळाली तर बरे होइल.

सरसकट वृक्षारोपण करण्यापेक्षा, एखाद्या पर्यावरणतज्ञाचा सल्ला घ्या. सरकारी तज्ञ तुमच्या हातावर ताडाची वगैरेच झाडे ठेवतील.. तुमच्या वृक्षारोपणाचा तीथल्या प्राणी पक्षांवर होणारा परिणाम देखील लक्षात घ्या.. आंबा, चिंच, बाभूळ, हिरडा, व तत्सम औषधि वृक्षांचा प्रामुख्याने विचार करा..

जागा कुणाची आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तोच ठरवणार कोणती झाडे लावायची. तज्ञांना कोण विचारतो ?

प्रमोद देर्देकर's picture

24 Feb 2015 - 11:09 am | प्रमोद देर्देकर

देवांगजी :- लोकप्रभा मासिकामध्ये आपल्या आवारातली फुलबाग, फळबाग, झाडे, जागा, या विषयी ६ महिने लेखमाला लिहणारे श्री. महाडीक यांचा दुरभाष मिळवला होता व सुमारे २ वर्षांपुर्वी त्यांच्याशी २/३ वेळा बातचीत केलेली होती. कारण मला माझ्या प्लॉटवरती झाडे लावण्याकरता ते सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणार होते. माझी त्यांची भेट झालेली नाही. पण ते स्वतः जागेला भेट देवुन व्यवस्थित समजावुन सांगतात असे ते म्हाणतात. फक्त मला वाटतं त्यांचा येण्याजाण्याचा खर्च करावा लागेल असे वाटते. तेव्हा माझ्याकडे घरी त्यांचा संपर्क पत्ता / दुरभाष असल्यास तुम्हाला व्य.नि करतो.
धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2015 - 11:12 am | डॉ सुहास म्हात्रे

व्यनी करण्याऐवजी ती माहिती इथेच टाका असे सुचवतो. म्हणजे ती इतर कोणाला हवी असल्यास आता आणि भविष्यातही उपयोगी ठरेल.