छगनलालांचे सापळे (भाग ९)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
20 Feb 2015 - 12:30 pm

आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/29329

हा भाग शेवटचा,त्यामुळे छगनलाल विषयी काही गोष्टींचा फक्त उल्लेख करतो.

छगनलाल आणि माझे संबंध हे मालक-नौकर ह्या पुरतेच मर्यादित असल्याने, खूद्द छगनरावांनी मला कधीच त्यांच्या बद्दल माहिती दिली नाही.

किरण हा साहेबांचा प्रथम पत्नी पासून झालेला मुलगा. ह्याची आई जिवंत आहे का म्रुत, ह्याचा उलगडा मला झाला नाही आणि मी तो शोध घ्यायचा पण कधी प्रयत्न पण केला नाही.

अशोक आणि साहेबांचे नक्की नाते काय? हे पण कधी समजले नाही,पण ह्या नात्यात साहेबच्या मेहूणीची काही-तरी भुमिका असावी हे नक्की.

साहेबांची मेऊणी, ही आमच्यासाठी शेवटपर्यंत फक्त "साहेबांची मेहुणी" ह्याच नावाने वावरली.

=========================
"मनांत हा विचार घोळवतच मी कामावर गेलो....आणि काय योगा-योग त्याच दिवशी हे काम लवकरांत लवकर सोडायचा निर्णय मला घ्यावाच लागला."

त्या दिवशी नेहमी प्रमाणे कामाला सुरुवात केली.साहेब अहमदाबादलाच तळ ठोकून असल्याने आणि किरणची काहीच मदत नसल्याने, माझी जबाबदारी तशी वाढलेलीच होती.

नेहमी प्रमाणे साहेबांचा सकाळी ९च्या सुमारास फोन आला होता आणि त्यावेळी कालचा रिपोर्ट सांगीतला आणि आजच्या कामाची रूपरेखा त्यांच्या बरोबर ठरवून पण झाली होती.आज कुठल्याही परिस्थितीत २० मशिन्स तयार करायची होती.दुपारी १च्या सुमारास साहेब परत एकदा फोन करणार होते.त्या वेळेपर्यंत निदान ७ मशिन्स तरी पुर्ण करणे भाग होते.

मी ७वे मशिन टेस्टींग साठी हातात घेतले न घेतले, इतक्यात इनकम टॅक्स वाल्यांची धाड पडली.

पहिल्या दिवसापासूनच माझे एक धोरण होते, की अनावश्यक कागदपत्रे साठवून ठेवायची नाहीत.त्यामुळे धाड पडली तरी मला दडपण आले नाही.कपाटाच्या आणि स्टोअरच्या किल्ल्या सरकारी अधिकार्‍यांना देवून मी गप्प बसलो.सकाळ पासून मी किरणची वाट बघत होतोच आता मात्र त्याची अनुपस्थिती ही इष्टापत्तीच वाटली.

दुपारी २-३च्या सुमारास किरण आला.त्याने त्रयस्थ भुमिकेतून बाहेरूनच एकंदर आढावा घेतला आणि निघून गेला.

सरकारी अधिकार्‍यांचे काम लवकर संपायची चिन्हे दिसेनात, त्यामुळे सरकारी अधिकार्‍याला विचारून सर्व कामगारांना घरी पाठवले.अनावश्यक गर्दी कमी झाल्याने आणि कागदपत्रे क्लियर असल्याने, अधिकारी पण जरा मोकळे झाले.

रात्री ९-१०च्या सुमारास त्यांना एक फोन आला आणि आमच्या ऑफीसमधून काही कागदपत्रे घेवून ते निघुन गेले.

ते गेल्यावर लगेच किरण आला.तो बहूदा पाळत ठेवूनच असावा.त्याने सांगीतले की अहमदाबाद आणि मुंबईच्या ऑफीसवर पण धाड पडली.

किरणनेच ऑफीस बंद केले आणि चाव्या पण त्याच्याच कडे दिल्या.

घरी आलो आणि बायकोला सगळे सांगीतले.तिने दुसरी नौकरी शोधायचा सल्ला दिला.

दुसर्‍या दिवशी सकाळीच किरणची गाठ घेतली.त्याने अजून २ आठवडे तरी ऑफीस बंदच राहील असे सांगीतले.नशीबाने पुढच्याच आठवड्यात वापीला नौकरी मिळाली आणि आम्ही आमचे बस्तान पण वापीला हलवले.

वापीला जाण्यापुर्वी परत एकदा किरणची भेट घेतली.त्याला सगळी परिस्थिती सांगीतली.त्याने पण माझ्या भावना ओळखून मला छगनराव आणि कंपनीतून मुक्त केले.

पुढे ३-४ महिने मी आणि किरण भेटत होतो.धाडीतून छगनराव सुटले, हे पण मला किरण कडूनच समजले.छगनरावांनी दमणच्या ऑफीसचा चार्ज किरणकडॅच दिला अणि ते मुंबईला निघून गेले.

पुढे मी पण वापी-अतुल-चिपळूण-कल्याण-आसनगांव आणि गल्फ अस भटकत राहिलो.

ह्या प्रवासात कधी संकटे आली किंवा अडचणी आल्या तर मार्ग मात्र नक्कीच मिळत गेला.

नाही म्हटले तरी छगनरावांचे, विपरित परिस्थितीला आटोक्यात कसे आणायचे आणि वेळीच निर्णय घेवून ते अंमलात आणायचे संस्कार, ह्या जन्मात तरी पुसले जाणार नाहीत.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Feb 2015 - 1:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडेश. मालिका आटोपती घेतल्यासारखी वाटली. आणि संन्यास नं घेता किमान चक्कर टाकुन २-४ खर्डी तरी टाकतं चला :)

पैसा's picture

20 Feb 2015 - 8:13 pm | पैसा

शेवट आटोपटता घेतलात!

श्रीरंग_जोशी's picture

20 Feb 2015 - 8:43 pm | श्रीरंग_जोशी

पूर्वीच्या सर्व भागांत जी उत्कंठा निर्माण झाली होती ती तशीच शिल्लक ठेऊन कथामालिका संपली.

प्रत्यक्ष आयुष्यात असे होत असल्याने विचित्र मात्र वाटले नाही.

सापळ्यांतून मुक्त झाल्याबद्दल कथानायकाचे अभिनंदन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2015 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

शेवट जरा गडबडीत केलात ! मालिका मात्र चित्तवेधक होती. मोकळा वेळ मिळाला की परत पहिल्यापासून वाचली जाईल.

आता नविन लेखनाच्या प्रतिक्षेत !

रुपी's picture

21 Feb 2015 - 3:24 am | रुपी

संपूर्ण लेखमाला एकदम वाचली. आवडली!

मन१'s picture

12 May 2016 - 3:48 pm | मन१

आख्खी मालिका पुन्हा एकदा वाचून काढली. लोकांच्याही वाचणयत यावी म्हणून हा अंक वरती काढत आहे.

नमकिन's picture

15 May 2016 - 7:10 pm | नमकिन

समाजसेवा

सीरिज शेवटपर्यंत एकदम वाचली. फार मजा आली.

चौथा कोनाडा's picture

7 Aug 2018 - 4:22 pm | चौथा कोनाडा

संपूर्ण लेखमाला वाचली. भन्नाट अनुभव !!

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Aug 2018 - 6:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

साहेब म्हणजे एक नमुनाच वाटला !!
पी एम पी, एम एस इ बी यांचे काँट्रॅक्टरपण असेच असतील का? रस्त्यावर बस बंद पडल्या, ब्रेक फेल झाले , रस्त्यावरच्या दिव्यांचे स्विच खराब झाले, तरी यांचे धंदे मस्तपैकी चालुच.

बाकी मालिका मस्त!!पुलेशु

पाषाणभेद's picture

13 Dec 2019 - 3:04 pm | पाषाणभेद

गेल्याच आठवड्यात व्हाअ‍ॅवर झालेल्या चर्चेत या धाग्याचा उल्लेख होता. रात्रीच्या रात्री सारे भाग एकापाठोपाठ वाचून काढले. खूप छान लिहीले आहे. फक्त घाईत लिहील्यासारखे वाटले. सापळ्यातून बाहेर आलात ते बरे केलेत.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2019 - 3:27 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. ..

असेच म्हणता येईल.

कुमार१'s picture

20 Dec 2019 - 5:26 pm | कुमार१

भन्नाट अनुभव !