किशोर मासिक : बालपणी च्या आठवणी

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in काथ्याकूट
14 Feb 2015 - 11:56 am
गाभा: 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अंतर्गत, बालभारती ने सर्वप्रथम 1971 मधे किशोर प्रकाशित करायला सुरुवात केली!!, पाठयपुस्तक मंडळात विषय तज्ञ म्हणुन माझे वडील "सिलेबस रिव्यु" ला पुण्याला जात असत, त्यांनीच प्रथम मला ह्या मासिकाची गोडी लावली, कॉन्वेंट मधे शिकुनही आज जी काही मोड़की तोड़की मराठी मी लिहु शकतो त्याचे बऱ्याच अंशी श्रेय ह्या मासिकाला मी देतो, 1992 ते 2000(वय वर्षे 7 ते 16) दर महिन्याला हे मासिक घरपोच अगदी वेळेवर येत असे पोस्टाने. वाचनाची आवड आईबाबांनी फार पद्धतशीर् लावली होती मला ते आज कळुन येते, रेल्वेत 6 वर्षाचा असताना प्रवासात एकदा हळुच "चाचा चौधरी" हाती दिला होता मला त्या वयात ती चित्रे चाचाजी अन साबु चे पराक्रम त्यांनी गोबरसिंह अन धामाकासिंह ला दिलेली धोबी पछाड़ वाचता वाचता हाती किशोर सरकवले गेले. सुरवातीला ते लांब लेख चित्रे नसलेले (कमी असलेले) मासिक नको वाटे तेव्हा बाबा किंवा आई रात्री झोपताना त्यातले लेख कथा वाचुन दाखवत हळूहळू त्यात रस वाटायला लागला, 16 चा झालो तेव्हा त्याच प्रकारे "एक होता कार्वर" हाती आले! क्रमबद्ध आवड विकसित करत मग आजोबांच्या कपाटात असलेल्या सावरकर, टिळक, आझाद, भगत, मानवेंद्र नाथ रॉय इत्यादी ताऱ्या बरोबर ओळख वाढली! थोर पुरुष भांडतात ते विचारसरणी वर अन अनुयायी भांडतात ते पुरुषांचे नाव घेऊन हे सत्य नेमक्या वयात कळले.
किशोर चा खाका उत्तम होता!! त्याच्या तत्कालीन संपादक मंडळीच कौतिक करावे तितके कमी!प्रथम एक लेख शिवाजी महाराजांच्या न ऐकलेल्या कथा (हिरकणी,गड आला पण सिंह गेला वगैरे सोडुन) असत ते लेख सुद्धा बाबासाहेब पुरंदरे,सेतु माधवराव पगड़ी,निनाद बेडेकर वगैरे बाप लोकांचे असत, त्यानंतर एखाद बालवीर हीरो (फास्टर फेणे, बिपिन बुकलवार टाइप) कसा सत्यरक्षणार्थ करामती करतो ह्या आशयची एक फिक्शनल गोष्ट, मधेच कोडी शब्दकोडी ,शेवटी जागतिक अन राष्ट्रीय चालू घडामोडी अन क्विज अन अगदी शेवटी बालवाचक अन त्यांच्या पालकांचा पत्रव्यवहार असला साधा सुटसुटीत मामला, एका "किशोर"वयीन मुलावर वाचन संस्कार करायचा परफेक्ट मसाला अन रेसिपी होती ती!!!

दगडाचे सूप लिहिल्यावर सहज हे सगळे आठवत गेले अन लिहित गेलो. आपल्या पैकी किती जणांनी किशोर वाचले आहे? आपला अनुभव काय होता? किशोर चा आपल्या जड़णघड़णीत एक वाटा असल्याचे किती जणांस् वाटते, नसल्यास असे कुठले साहित्य होते ज्याने त्याला हातभार लावला, चला ह्या धाग्यात हे सगळे चर्चा करुयात

(नॉस्टॅल्जिक) बाप्या

प्रतिक्रिया

महिन्याभरापूर्वी 'किस्त्रीम'चा २०१४ चा दिवाळी अंक (वेळेअभावी फक्त बाहेरूनच :-( ) बघायला मिळाला तेंव्हा किशोरची आठवण झाली होती. किशोरचा प्रत्येक अंक हा दिवाळी अंक असल्यासारखा माझ्यावेळी मी आणि त्याच्या वेळी मुलगा त्यावर तुटून पडायचा त्याची आठवण झाली. किशोरचं हे चाळीसावं वर्ष असल्याचं या संस्थळावरून दिसतंय. इतक्या प्रदीर्घ कालावधीत २-३ पिढ्यांना पुरून उरेल एवढा खजिना मिळाला ही कौतुकाचीच गोष्ट आहे.

तुमच्यासारख्या इतर आताच्या तरूण वाचकांच्या त्यांच्या 'घडणी'च्या वेळातल्या आठवणी वाचेनच, पण इथे मिपावरच काही संबंधित लेख येऊन गेले होते:

मैं ऐसा क्यूं हूं

पुस्तकविश्व: लहानपणीचे मित्र-मैत्रिणी

बालपणातल्या हिरोंसोबत

'किशोर'संबंधी काही उल्लेख 'चांदोबा' या लेखातही आला होता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 1:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

ओह!!! मी नव्हते वाचले हे दुवे!! म्हणुन पोस्ट केले

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Feb 2015 - 1:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

किशोर, छावा, ठकठक आणि चंपक मुळे साधारण वयाच्या ५-६ व्या वर्षीचं वाचनाची गोडी लागली. स्वतःचा पुस्तकसंग्रहही हळुहळु वाढत गेला. ह्या आठवणी ताज्या केल्याबद्दल तुमचे आभार.

विनिता००२'s picture

14 Feb 2015 - 1:20 pm | विनिता००२

वाचता येत नव्हते तेव्हापासून 'किशोर' घरी यायचे. खरे तर पेपर देणार्‍या दादाने ते आणुन द्यायला सुरुवात केली होती. मी बालवाडीत पण नव्हते तेव्हा! त्यामुळे पेपरवाल्या दादाचे नांवच मला 'किशोर वाटायचे :)
बर्‍याच नंतर कळले त्याचे नांव 'सुरेश' होते.
किशोर आजही आवडीने वाचला जातो. मुलाला पण त्याची आवड आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 1:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

अतिशय साधी छपाई पण उत्कृष्ट कंटेंट अंन इल्लस्ट्रेशन्स असत त्यांची!! सद्ध्या कसे आहेत?

सविता००१'s picture

14 Feb 2015 - 2:11 pm | सविता००१

वाचतच लहानपण गेलंय. याशिवाय चंपक, चाचा चौधरी आणि ठकठक, चांदोबा होतेच

बाइंड केलेले ...

ज्ञानवृक्षाच्या पारंब्या, दिवाळी अंकातील हावरट हेमा हि गोष्ट राम आणि श्याम ...काय काय आणि किती किती ...
आजही त्या वयात वाचलेले उतारेच्या उतारे लक्ख्ख आठवतात ...
...इलेक्ट्रोनिक घड्याळाची ओळख करून देणारा तो लेख आणि नंतर १-२ वर्षांनी कुणीतरी आणलेले इलेक्ट्रोनिक घड्याळ ..आणि काहीच वर्षात फोर्ट मध्ये फुटपाथ वर बघितलेले त्याचे फिरते विक्रेते बघून बसलेला धक्का...सगळे सगळे आठवते ...
सोन्याबापू ...लय भारी ...

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 2:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

मझ्यामते किशोर चा एक क्लास होता! क्लास अपार्ट!!

आजकाल पोरे पोकेमोन अंन ड्रैगन बॉल झी का काय ती हिंस्त्र कार्टून पाहतात त्याचे वाईट वाटते

पिंपातला उंदीर's picture

14 Feb 2015 - 2:48 pm | पिंपातला उंदीर

आमच्या धाग्याचि जाहिरात

http://www.misalpav.com/node/29963

माझीही शॅम्पेन's picture

14 Feb 2015 - 2:57 pm | माझीही शॅम्पेन

तुम्हाला खोट वाटेल पण आजही किशोरे ला जबरदस्त मिस करतो , किशोर वाचून लहानचा मोठा झालो ... त्या तील विविध शोध कसे लागले (उदा फटाके , घड्याळ , कागद) प्रचंड मनोरंजक होते

किशोर प्रेमी माझीही शॅम्पेन

'पिंक' पॅंथर्न's picture

14 Feb 2015 - 5:30 pm | 'पिंक' पॅंथर्न

'किशोर' जास्त वाचनात नाही आले पण हा लेख वाचून लहानपणी आमच्या घरी 'चांदोबा' हे मासिक ( का पाक्षिक ? आता नीट आठवत नाही ) यायचे त्याची आठवण झाली . छान छान गोष्टी आणि सामन्य ज्ञानाचा खजिना असायचा त्यात . मला आठवतय 'चांदोबा' आला की आम्हा बहीण - भावंडात भांडणे लागायची ते वाचण्यासाठी . आणि वाचून पुढच्या अंकाची आतुरतेने वाट बघायचो .
१९८५ ते १९९२ सलग सात वर्षे ते वाचले .
पुढे अर्थातच वाढत्या वयाबरोबर त्यातील गोडी कमी झाली .

ज्योति अळवणी's picture

14 Feb 2015 - 6:24 pm | ज्योति अळवणी

मी आणि माझा भाऊ प्रचंड मस्तीखोर होतो. बंगल्यात राहत असल्याने आजुबाजुला खेळायला फ़ार कोणी नव्हते. पण मग दुस-यांच्या बंगल्यातील झाडांवर चढणे, मारामारी, पाइपावरून गच्चीत जाणे असे आमचे दोघांचे उद्योग असायचे. म्हणून मग आई-बाबांनी ठरवून किशोर, चांदोबा, चाचा चौधरी, सुपर मॅन सारखी खुपशी पुस्तक वाचण्याचा नाद लावला. आमच्या शालेय जीवनात आम्ही कायम पुस्तकच गिफ्ट म्हणून मिळवली. हळूहळू वाचनाच वेड लागल. आज शुद्ध समृद्ध भाषेचा वापर करताना अभिमान वाटतो. संपूर्ण क्रेडिट आई-बाबा आणि किशोर-चांदोबा यासारख्या मासिकाना.

आज शुद्ध समृद्ध भाषेचा वापर करताना अभिमान वाटतो. संपूर्ण क्रेडिट आई-बाबा आणि किशोर-चांदोबा यासारख्या मासिकाना.

क्रेडिट नाही हो, "शुद्ध" भाषेत "श्रेय" .. बाकी प्रतिसादास बाडीस. :)

लहानपणी किशोर मासिक दर महीन्याला येयचे. म्हणजे कोपर्‍यावरच्या पेपरवाल्याकडून आणले जायचे. वर्ष होऊन गेले की त्या बारा मासिकांचे एक छान बाईंडींग केलेले एकत्रित पुस्तक तयार केले जायचे आणि ते परत वाचले जायचे. ही पुस्तके मग माझ्याहून लहान असलेल्या मावस/मामे/चुलत भावंडांनी देखील वाचली होती. नंतर अनेक वर्षांनी माझ्या भाची-भाच्यासाठी पण त्याचा वापर केला गेला. अर्थात कालपरत्वे कमी झाला असेल, तरी नक्की केला गेला. आता अजून (भारतातील) घरात आहेत का हे एकदा तेथे गेल्यावर बघणे आले. :)

त्यात गोष्टी, कविता, माहिती असे अनेक वाचले गेले. या क्षणाला एकदा दिवाळी अंकात आलेली एक "अक्कू बक्कू ची दिवाळी" म्हणून एक कविता आठवली. मला आठवत होते त्याप्रमाणे शांताशेळके यांची होती. पण आत्ता जालावर शोधायचा प्रयत्न केला तर एक तरूण भारतचा दुवा मिळाला, त्या प्रमाणे ती इंदीरा संत यांची असावी. तसेच आत्ता गंमत वाटली, पण लहानपणी नंतर सुरेश मथुरे यांचे कधी काहीच वाचले नाही, केवळ किशोर मधेच वाचले. तरी ते नाव आत्ता अचानक आठवले. त्यांच्या लेखमालेमुळे पाश्चात्य शास्त्रज्ञ तसेच आपले शास्त्रज्ञांसारखे असलेले ऋषी यांच्याबद्दल वाचले गेले.

मला वाटते सर्व दिग्गज लेखक, लेखिका, कवी, कवयत्री, चित्रकार यांनी कधी ना कधी तरी किशोर मधे हजेरी लावली होती. यातील अनेकांचे वाचले गेले. काही लक्षात राहीले काही नाही. पण वाचनाचा संस्कार या सर्व प्रोसेस मधे नक्की झाला. माझ्या लहानपणी टिव्ही म्हणजे एकवाहीनी दूरदर्शन होते. आमच्याकडे खूपच लवकर आले असले तरी त्याला कोणीच चिकटलेले नव्हते. लहान मुलांना सोमवारी किलबिल असायची. ती देखील आम्ही बाहेर खेळायचो तेंव्हा. त्यामुळे फार पाहीली अशातला भाग नाही. मग राहीले गजरा, छायागीत, कधीतरी शनीवारी मराठी चित्रपट तर रविवारी हिंदी... इतकेच काहीसे. आणि जोडीला मराठीत स्मीता पाटील, ज्योत्स्ना किरपेकर, अनंत भावे अशांच्या मराठीत बातम्या बघणे कधी कधी सरीता सेठी हिंदी आणि लुकू संन्यालच्या इंग्रजीत बघणे चालायचे इतकेच. बाकीच्या वेळी वाचन आणि खेळ... जसा मोठा होत गेलो तसे क्लासेसचे फॅड किंचित येऊ लागले होते. (तरी देखील ९-१० च्या आधी क्लासला जाणे, म्हणजे "समज कमी असावी" असे गृहीत धरले जात असावे तेंव्हा. ;) )

पुर्वी किती छान होते आणि आत्ताच्या पिढ्या काय करताहेत असे काही म्हणायचा यात खरेच उद्देश नाही. कालाप्रमाणे बदल घडत जातात. पण आजच व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने वाचलेला एक व्हॉट्सअ‍ॅपिय विनोद आठवला: आज १४-१५ वर्षांची मुले-मुली गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड (अर्थात रिलेशनशिप बद्दल) बोलतात आणि तिशीतले (घोडे) कँडीक्रश खेळताहेत. खरेच आपण कधी काय करायचे असते हेच विसरून गेलो आहोत...

तुमच्या या एका धाग्यामुळे आणि किशोरमुळे अचानक भरकटायलाच झाले...! असो. :)

तिमा's picture

15 Feb 2015 - 1:36 pm | तिमा

आम्ही किशोरच्याही आधीच्या काळात लहान असल्यामुळे, शिशुरंजन, कुमार, चांदोबा, फुलबाग आणि इंद्रजाल कॉमिक्स वर वाढलो. अजूनही कोणी वेताळाचे एकत्रित व्हॉल्युम्स मला देईल तर मी त्याची पारायणे करीन.
माझा एक मित्र तर केवळ इंद्रजाल कॉमिक्स मधला डायलॉग मारल्यामुळे, माझा जीवश्चकंठश्च मित्र झाला. त्याला मुंबईत कुठेतरी माझ्या दुसर्‍या एका मित्राने बघितले, आणि सहज मला सांगितले. मला तो भेटला असता, 'तू, अमूक दिवशी तमुक रंगाचा ड्रेस घालून दादर स्टेशनवर उभा होतास', असे म्हटल्यावर,'तुम्हाला कोणी सांगितले?' असे त्याने आश्चर्याने विचारले. त्यावर फिल्मी स्टाईलने हंसत मी,'वेताळाला जगभर मित्र असतात' असे उत्तर दिले. तोही इंद्रजाल कॉमिक्सचा फॅन असल्यामुळे आमची ओळख आणखी घट्ट झाली.

एस's picture

15 Feb 2015 - 5:40 pm | एस

वेताळ आणि इंद्रजाल, +१

आपण किशोरच्याही आधीच्या काळचे? मग "शाला पत्रक" आपल्या वेळेस असायचे का?

तिमा's picture

20 Feb 2015 - 5:59 pm | तिमा

'शाला पत्रक नांव कधी ऐकले नाही. पण ऐकले नाही तरी असेल आणि मला माहित नसेल.

रंगासेठ's picture

17 Feb 2015 - 12:58 pm | रंगासेठ

किशोर मासिकाचे जुने अंक हवे असल्यास कुठे मिळतील काय? माझ्याकडे होते पण नंतर भाचीला दिले. आत्ता कुठे आहेत हे माहिती नाही.
*DONT_KNOW*
किशोर आणि चांदोबातील लेखांमुळेच वाचनाची आवड लागली. फार आवडायची ही मासिके. :good:

सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की, मागील 46 वर्षे मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बालभारतीचे प्रकाशन असलेल्या किशोर मासिकाचे आजवरचे सर्व अंक आता डिजिटल रुपात ऑनलाइन मोफत उपलब्ध झाले आहेत. नाशिक येथे झालेल्या भव्य सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री मा.श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते 30 हजार पानांच्या या दस्तऐवजाचे लोकार्पण करण्यात आले. या निमित्ताने बालसाहित्याचा मोठा खजाना किशोरप्रेमी वाचकांसाठी खुला झाला आहे. बुकगंगाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून हा प्रकल्प कुठलाही मोबदला न घेता पूर्ण करण्यात आला. दर्जेदार बालसाहित्य आणि अनेक दिग्गज चित्रकारांच्या कलाकृतीचा आनंद या माध्यमातून घेता येणार आहे. हे सर्व अंक आता बालभारतीच्या वेबसाईटवर सोबतच्या लिंकवर उपलब्ध आहेत.

http://kishor.ebalbharati.in/Archive/

- किरण केंद्रे,
कार्यकारी संपादक, किशोर

किशोर आणि चांदोबा वचायला अजूनही (कधीकधी) छान वाटते.

आणि तुम्ही म्हणता सरकार काहीच करत नाही

पैसा's picture

18 Feb 2015 - 10:28 pm | पैसा

मी किशोर अगदी सुरुवातीच्या काळात वाचले आहेत. ७१-८० च्या दशकात. तेव्हा खूप उत्तम लेख, कथा कविता वाचायला मिळायचे. प्रभाशंकर कवडी आणि राम वाईरकर यांची चित्रे आठवतात. अंक आधी वाचण्यासाठी घरात आमची भांडणे व्हायची. कुमार, चांदोबा हेही वाचायचो. तेव्हा ऑनलाईन वगैरे नसल्याने अंक वाचून होताच पुढचा अंक पोस्टमन कधी आणतोय याची वाट बघायला सुरुवात व्हायची!

एकदा किशोरचा नवा कोरा दिवाळी अंक आईने पिशवीतुन काढुन दिल्या सेकंदाला मी आणि माझ्या बहिणीने हिसकाहीसकी करून त्याच्या पार चिंध्या करून टाकल्या होत्या.... :-(

फार वाट बघायचो किशोरची....

जुइ's picture

21 Feb 2015 - 7:07 am | जुइ

खुप वाचले आहे. शिवाय ईंग्रजी चांदोबाचे बाईडिंग केलेले २ जाडजुड प्रति घरी होत्या. किशोरचे एका दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ चांगले स्मरणात राहिले आहे कारण त्यावर चिंटु आणि मित्रमडंळी यांचा एक प्रसंग चितारला होता.

विशाल कुलकर्णी's picture

24 Feb 2015 - 10:41 am | विशाल कुलकर्णी

थोर पुरुष भांडतात ते विचारसरणी वर अन अनुयायी भांडतात ते पुरुषांचे नाव घेऊन हे सत्य नेमक्या वयात कळले. सहमत आहे बापु :)

बाकी किशोरबद्दल बाडिस ! माझ्याकडे सोलापूरच्या घरी अजुनही जवळपास सत्तर-ऐशी जुने अंक जपून ठेवलेले आहेत किशोरचे. अतिशय आवडते पुस्तक :)