एम. एस. ई. बी. आणि संस्कार !

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
5 Feb 2015 - 9:21 pm

म्हया बिलंदर - हेल्लो एम. एस. ई. बी.?
पलीकडून - हं बॉला?
म्हया बिलंदर - अहो, *** ईथे वीज गेलीये.
पलीकडून- बरं .
म्हया बिलंदर - अहो, बरं काय? कोणाला तरी पाठवून बिघाड दुरुस्त करून घ्या.
पलीकडून - हं, येईल १५ मिनटात .
म्हया बिलंदर - कोण?
पलीकडून - कोण म्हणजे?
म्हया बिलंदर - कोण म्हणजे, वीज की तुमचा माणूस?
पलीकडून - माणूस.
म्हया बिलंदर - मग वीज?
पलीकडून - तिथून पुढं १५ मिनटात.
म्हया बिलंदर - अहो, संध्याकाळ झालीये पूर्ण काळोख पडलाय. मुलांचा आभ्यास जेवण सगळं राहिलंय आणि…
(पलीकडून खड्याक. फोन ठेवला)
==========================================
तासाभराने
==========================================
म्हया बिलंदर - हेल्लो एम. एस. ई. बी.?
पलीकडून - हं बॉला?
म्हया बिलंदर - अहो, *** ईथे वीज गेलीये.
पलीकडून- बरं .
म्हया बिलंदर - अहो नव्याने ऐकल्यासारखं काय बोलताय? तुमचा माणूस आणि वीज दोन्हीही आलेले नाहीत.
पलीकडून - हा, तो तर कधीच पाठवलाय काम करत असेल लायीट येईल थोड्याच वेळात….
म्हया बिलंदर - छान, हेच शिकवता का घरी स्वतःच्या मुलांना?
पलीकडून - क्काय?
म्हया बिलंदर - हेच संस्कार देता का मुलांना?
पलीकडून - काय संस्कार?
म्हया बिलंदर - अहो, मी तुम्हाला गेट च्या बाहेरून गेला तासभर बघतोय. घरून फोन आला आणि समजलं वीज नाही. म्हंटल इथून कोणाला तरी सोबत घेऊनच निघावं. तासाभरा पूर्वी फोन केला तेंव्हा तो इथेच गेट वरून. तुम्ही माझा फोन उचलायला आत गेलात बोललात बाहेर येउन बसलात तासभर पेपर वाचलात. पुन्हा फोन आला म्हणून पुन्हा आत गेलात. हे सगळं मी इथून पाहिलं. तुम्ही कोणत्याही माणसाशी बोलला नाहीत, कोणाला पाठवलं नाहीत आणि वर खोटं बोलताय?
पलीकडून - अहो तसं नाही इथे मी एकटाच आहे ना दुसरा कोणी असता तर मीच आलो असतो….
म्हया बिलंदर - म्हणून खोटं बोलताय? घरी मुलांना जर समजलं की त्यांचा बाप सर्रास खोटं बोलतो तर काय परीणाम होईल त्यांच्यावर? काय मत होईल त्यांचं तुमच्याबद्दल?
पलीकडून - चला, मी येतोच तुमच्याबरोबर.
म्हया बिलंदर - अहो पण मग इथे?
पलीकडून - ते बघू हो. कोण नाय मरत ईथे.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Feb 2015 - 10:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त लिवलंय :)

तरीही, चोरी पकडली गेल्यानंतरही उद्धट शब्दात सारवासारवी न करता इतक्या सरळ्पणे वागणारा माणूस एमेशीबीत आहे हे वाचून ड्वाळे पानावले :)

एम.ए,सी.बी. मध्ये काही चांगली माणासे होती पण आणि असतीलही.

बाकी, लिखान छान

म्हया बिलंदर's picture

5 Feb 2015 - 11:48 pm | म्हया बिलंदर

तुम्ही एमेशिबियन आहात(होतात) का?

गणेशा's picture

6 Feb 2015 - 12:52 am | गणेशा

नाय , माझा बा होता

उदय के'सागर's picture

6 Feb 2015 - 11:28 am | उदय के'सागर

+१
पुण्यातल्या चतु:श्रुंगी इथल्या एम.एस.ई.बी. विभागाला काही दिवसांपुर्वी जाणं झालं. बिलात झालेल्या घोळाबद्दल ज्या 'साहेबांना' भेटायला सांगितलं होतं ते अपेक्षेप्रमाणे सुट्टीवर होते. डोकंच फिरलं, म्हंटलं अता आहेच चकरा-वर-चकरा. पण मग तिथे एक दुसर्‍या मॅडम होत्या, त्यांनी व्यवस्थित चौकशी करुन माझ्या समस्येचं 'साहेब' नसतांनाही निराकरण केलं. प्रॉब्लेम ५-१० मिनीटात सुटला. आणि शिवाय ह्या मॅडम कुठलीही चिडचिड न करता (नाकं-तोंडं न मुरडता) सर्वांशीच नीट वागत होत्या हे पाहून डोळे पाणावले - वेल, गमतिचा भाग सोडला तर खरंच खूप चांगला अनुभव आला. ऑफिस बाहेर निघतांना कुठल्याही प्रकारची टिपीकल सरकारी ऑफीस मधून बाहेर पडताना असते तशी डोक्यात चिडचीड नव्हती.
एम.एस.सी.बी. ने कॉल-सेंटर सुरु केलं आहे त्याच्या टोल-फ्री नंबर वरून देखील व्यवस्थित माहिती मिळाली होती - ह्या उपक्रमाला शुभेच्छा, गोष्टी बदलता आहे वा सुधारता आहेत हे पाहून्/अनुभवून फार छान वाटलं/वाटतं.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2015 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ टु एक्का!

ज्योति अळवणी's picture

6 Feb 2015 - 12:31 am | ज्योति अळवणी

एम. एस. सी. बी. चा प्रामाणिकपणा आवडला

किसन शिंदे's picture

6 Feb 2015 - 1:25 am | किसन शिंदे

खिक्क

हा प्रामाणिकपणा आवडला.

अवांतर: स्नेहाच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.. ;)

रायनची आई's picture

6 Feb 2015 - 10:26 am | रायनची आई

माझा मामा आहे एम्.एस्.ई.बी.मधे... एम्.एस्.ई.बी.म्ह्णजे "मन्डे टु सन्डे ईलेक्ट्रीसीटी बन्द" :-)

सस्नेह's picture

6 Feb 2015 - 12:35 pm | सस्नेह

१. एकाच कर्मचार्याच्या अनुभवावरून एमेसीबीचे सरसकटीकरण केलेले दिसते.
२. वरच्या प्रसंगातला काळ कोणता आहे ? कारण एमेसीबी दहा वर्षापूर्वी नामशेष झाली असून सध्या महावितरण आहे.

स्पंदना's picture

10 Feb 2015 - 10:00 am | स्पंदना

सरसकटीकरण्ण!!

देखा? क्या काँन्फीडन्स है? ;)

हा घ्या एम एस ई बी चा अजून एक अनुभव http://misalpav.com/node/10533

पैसा's picture

12 Feb 2015 - 10:20 am | पैसा

हा अनुभव कुठेही येऊ शकतो. मी सध्या बीयश्नेलवाल्यांबरोबर लपाछपी खेळत आहे!