नखांची रंगरंगोटी (नेल आर्ट)

mayurpankhie's picture
mayurpankhie in मिपा कलादालन
1 Feb 2015 - 7:18 pm

नमस्कार मंडळी,

मिपा वर पहिलाच लेख. चूक भूल माफ असावी. अशाच एका विकांताला (वीकेंड ला शब्द नाही सुचला ) नेट सर्फिंग करताना “नेल आर्ट” दिसलं, छान वाटलं पाहून. गूगल केलं तर चिक्कार डिझाईन्स मिळाले. अगदी साध्या १-२ रंगाच्या पासून तर प्रोफेशनल्स पर्यंत. वाटलं एक ट्रायल तो बनता है. हळू हळू जमायला पण लागलं. आणि अशा प्रकारे माझ्या एका नव्या छंदाचा उगम झाला. तुमच्यासाठी काही चित्र आणि कृती अपलोड करत आहे. नक्की सांगा कसा वाटलं ते.

नेल आर्ट जर पार्लर मध्ये करायला घेतलं तर तसं बर्यापैकी महागडा आणि तात्पुरता प्रकार. अशावेळी घरीच काहीतरी प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. फार काही विशेष कठीण नाही करायला. पुन्हा स्वतः काहीतरी छान केल्याचा आनंद वेगळा. तर सुरुवात करूया ...

साहित्य: टूथपिक आणि २-३ नेल पोलीश च्या शेड्स.

नेल आर्ट मधे पान फूल आणि पोलका डॉट्स डिज़ाइन्स जास्त सोप्या व पॉप्युलर आहेत. टूथपिक ने छान फुलं, पानं काढता येतात. तर सगळ्यात आधी बघुया टूथपिक ने कशा प्रकारे आकार काढता येता.

1. सर्वात आधी नखं नेल पोलीश रीमुव्हर ने स्वच्छ करून त्यावर ट्रान्सपेरंट कोट लावा. त्यावर पांढरा किंवा तुमचा आवडता फिका रंग लावा.
Right Click and Open image in new tab

2. आता टूथपिक चा टोकदार भाग गडद नेल पोलिश मधे थोडा बुडवून त्याला हळूच नखावर दाबा. हि झाली फुलाची पाकळी. अजुन 4-5 पाकळ्या काढून फूल पूर्ण करा. मग टूथपिकच्या मागच्या भागाने फुलाच्या मधे एक टिंब काढा.
Right Click and Open image in new tab

3. वरच्या प्रकारचे फूल मधे टिंब न देता पण काढता येते.
4. टूथपिक च्या मागच्या भागाने एक टिंब नखावर काढा. त्याच्या भोवती अजुन 5-6 टिंब काढा. हे एक वेगळ्या प्रकारचे फुल.
Right Click and Open image in new tab

5. टूथपिक चा पुढचा भाग जास्त नेल पोलिश मधे बुडवून जरा मोठ्या आकारात पाकळी काढली म्हणजे पान तयार झाल.
6. अशाच प्रकारे हार्ट शेप काढण्यासाठी, टूथपिक च्या पुढच्या भागाने एकमेकांजवळ दोन लहान पाकळ्या काढा.
Right Click and Open image in new tab

असे आकार वापरुन तुम्ही स्वतःचा एक छान डिज़ाइन बनवू शकता. मझं जरा जास्तच रंगबेरंगी झालय... तुम्ही फक्त फुलं किंवा पान किंवा हार्ट शेप काढू शकता. विरुद्ध रंगसंगती वापरा. पाचही नखांवर डिझाईन्स करण्या ऐवजी जर २-३ नखांवर केली तर जास्त शोभून दिसेल. आणि उरलेल्या नखांवर फक्त रंग लावा. ट्राय करा आणि शेअर करा.
मी हा सगळा उपद्रव youtube किंवा ब्लॉग्स वर पाहूनच केलाय. त्यामुळे गुगल वर बरच काही शेम शेम बघायला मिळेल.

टिप्पणी द्यायला विसरू नका !!! *smile*

प्रतिक्रिया

गणेशा झालाय! (गणेशा होणे= फोटू न दिसणे)

mayurpankhie's picture

1 Feb 2015 - 8:29 pm | mayurpankhie

फोटू कसे उप्लोड करायचे कोणी सांगेल का? मी dropbox ची लिंक दिलीये.

उपद्रव का उपद्व्याप?! छान आहे पण!!

mayurpankhie's picture

1 Feb 2015 - 8:56 pm | mayurpankhie

*yahoo* फोटो दिसलेत !!!

काव्यान्जलि's picture

1 Feb 2015 - 9:16 pm | काव्यान्जलि

आवडेश....

आता फोटू दिसतायत. आवडले. मला नखरंग लावण्याची आवड आहे पण लावत नाही. बरेचदा महिला सणावाराप्रमाणेही कलाकुसर करतात. जसे, खिसमस जवळ आला की पांढर्या बर्फाच्या ब्याग्राऊंडवर लाल सँटा.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2015 - 9:42 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-pink-smiley-emoticon-animation.gifअश्या प्रकारे नखांवर स्मायली रंगवता आल्या तर??? http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-pink-smiley-emoticon-animation.gif

mayurpankhie's picture

8 Feb 2015 - 10:44 am | mayurpankhie

पुढच्या वेळी नक्की ट्राय करेन ...

सानिकास्वप्निल's picture

1 Feb 2015 - 10:20 pm | सानिकास्वप्निल

छान आहेत डिझाईन्स :)
मध्यंतरी मी सुद्धा हे ट्राय केले होते त्यासाठी हौसेने नेल डॉटिंग टूल्स आणले पण शिफ्टिंगच्या गडबडीत कुठे ठेवले आठवत नाही :( आता शोधणे आले...

सुचेता's picture

2 Feb 2015 - 9:16 am | सुचेता

ट्राय केले पाहिजे आता एकदा

सविता००१'s picture

2 Feb 2015 - 11:16 am | सविता००१

मी अगदी बारीक ब्रश वापरते. पण ही टूथपिक ची आयडिया मस्त आहे.

नाव नीट वाचले नव्हते त्यामुळे कुणा मयुर नावाच्या मुलाने लेख टाकलाय की काय असं वाटलं. मग शंका आल्याने तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन खात्री केली! छान प्रयत्न आहे. मिपावर स्वागत आहे.

mayurpankhie's picture

8 Feb 2015 - 10:43 am | mayurpankhie

धन्यवाद !!!

इशा१२३'s picture

2 Feb 2015 - 2:41 pm | इशा१२३

ट्राय करेन नक्की.

जागु's picture

2 Feb 2015 - 3:07 pm | जागु

सुंदर.