श्वानहिरो

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
28 Jan 2015 - 10:49 am

नाव डॅनी असले तरी हा चित्रपटातील खलनायक नसून आमच्या घरातील श्वानहिरो आहे. माझा पुतण्या- अभिषेकच्या आग्रहास्तव माझ्या मिस्टरांनी एका काळ्या कुळकुळीत ग्रेटडेन नामक जातीच्या कुत्र्याच्या पिलाला आमच्या घरी आणले. ग्रेटडेन जातीचे कुत्रे धिप्पाड, उंच असतात. असेच वेगळेपण यांच्या पिलांमध्येही असते. इतर गावठी कुत्र्यांच्या पिल्लांपेक्षा उंच, काळा कुळकुळीत चमकता रंग तसेच पट्टा लावल्याने पावडर-तीट लावलेल्या बाळाप्रमाणे दिसणारा डॅनी घरातील सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय झाला होता.

नवोदित श्वानपिलाचे कोडकौतुक जोरात चालू होते. वापरात असणाऱ्या चादरी जुन्या मानून त्याच्या अंथरूण-पांघरुणाची अभिषेकने सोय केली. थंडी लागत असेल म्हणून स्वत:चे जुने टीशर्टही त्याला घातले. घरातल्या दुधात १ लिटरची वाढ केल्याने दूधवाल्याच्या धंद्यातही वाढ झाली. डॅनीसाठी डॉग फूड, डॉग सोप, पावडर, अशा वस्तूंनी डॅनीचे बालपण सुसज्ज झाले. काही दिवसांनी माझ्या मिस्टरांनी डॅनीसाठी एक ग्रिलचा पिंजरा तयार करून आणला. त्याची स्पेशल रूमच म्हणा ना! त्यातच रात्री आम्ही डॅनीला ठेवू लागलो, तर रात्रीच्या वेळी त्याच्या भुंकण्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो. मग मात्र त्याचे 'डॅनी' हे नाव विसरून 'काय कुत्रा आहे, धड झोपू देत नाही.' असे संवाद आम्हा घरातल्यांमध्ये होऊ लागले. माझे दीर म्हणजे अभिषेकचे वडील आणि अभिषेक अशा वेळी मध्येच उठून त्याला पिंजऱ्याआडून घरातील हॉलमध्ये ठेवत.

डॅनीला डास चावत असतील म्हणून डास निवारण कार्यक्रमांतर्गत कछुआ छाप अगरबत्तीची धूर काढून काढून राख जमा झाली; पण डॅनीचे रात्रीचे भुंकणे काही कमी झाले नाही. त्यानंतर आम्हाला कळले की, डॅनीला डासांची फिकीर नाही, तर आमच्या घराशिवाय करमत नाही. थोडे दिवस ठेवून बाहेरची सवय लावू म्हणून रात्री आम्ही त्याला हॉलमध्ये ठेवू लागलो. त्याची शी-सू घरात होऊ नये म्हणून आळीपाळीने रात्री मधूनमधून उठून बाहेरून शी-शूचा कार्यक्रम उरकून आणावे लागत असे. त्यातही एखादा दिवस झोप लागली की, वर्तमानपत्र पसरायची वेळ यायचीच. आता तर 'हाकलून द्या त्याला घराबाहेर, सोडून द्या कुठे तरी नेऊन' असे संवाद सगळ्यांच्याच- विशेषत: त्याची देखभाल करणाऱ्याच्या तोंडी मोठय़ामोठय़ाने आणि तावातावानेच यायचे. मग डॅनीचा रात्रीचा मुक्काम हळूहळू घरातील हॉलपासून ओटीपर्यंत आणला. त्यामुळे तोच आता आपली नित्य क्रियाकर्मे स्वत:च बाहेर उरकून येतो. स्वावलंबी झाला म्हणा ना!

आमचा डॅनी मनमिळाऊ, प्रेमळ आहे; पण हट्टीही तितकाच आहे. जे पाहिजे तेच करणार. दिवसभर त्याला बांधून ठेवले तर त्याच्या ओरडण्याने कान बधिर होतील असा त्याचा आवाज. त्याला स्वत:ला बांधून घेणे आवडत नाही. त्याचे आपल्या कुळातील भटक्या कुत्र्यांशीही तितकेच जमते. त्यामुळे अन्य भटक्या कुत्र्यांचा वावरही आमच्या अंगणात सर्रास असतो. त्याचेही या भटक्या कुत्र्यांवर इतके प्रेम की, गंमत म्हणजे आमच्या अंगणातील भटक्या कुत्र्यांना घराची राखण करण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्याने दिले आहे जणू! कारण कोणी अनोळखी माणूस आला, की डॅनीचे मित्रच आधी भुंकतात. त्यानंतर डॅनीशेठ कॉन्ट्रॅक्टर बाकीचे निस्तरायला बाहेर येतात. खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर 'खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी' असा नवाबी थाट. नाश्ता दूध-पोहे, बटर वगैरे आणि जेवणात उकडलेले चिकन असेल तरच खाणार. डॅनी अंघोळीच्या बाबतीत एकदम आळशी. अंघोळीसाठी पाइप लावला की याची धावाधाव चालू होते. डॉक्टरांकडून इंजेक्शन घेतानाही हाच प्रकार.

डॅनी घरातील माणसांवरही जिवापाड प्रेम करतो. घरातील कोणी आले, की आधी त्याच्या जवळ जाणार. आमच्यापैकी कोणी २-३ दिवस बाहेरगावी जाऊन आले, की गेटमधून आत शिरताच हा प्रेमाने अंगावर उडय़ा मारायला लागतो.

माझी मुलगी ३ महिन्यांची होती. घरात नणंदेचे लग्न ठरलेले. एका महत्त्वाच्या कामासाठी मला तिच्या बरोबर थोडय़ा वेळासाठी बाहेर जावे लागले होते. त्या वेळेत नेमकी माझी मुलगी उठली आणि पाळण्यात खूप रडू लागली. घरातील सगळेच मी येण्याची वाट पाहतच होते; पण हा डॅनी सारखा पाळण्यात येऊन पाहायचा आणि गेटजवळ येऊन मी आले का ते पाहायचा. अशा त्याच्या खूप चकरा झाल्या. शेवटी मी गेटवर आले तेव्हा धावत जवळ येऊन जणू मला सांगू लागला, ''अगं, तुझं बाळ रडतंय. कशाला गेलीस तिला टाकून?'' त्या क्षणी आम्ही सगळेच डॅनीच्या वागण्याने भारावलो. असे बरेच भारावण्यासारखे प्रसंग डॅनीच्या वागण्यात येतात. पण हे सगळे प्रेम घरातल्या आणि ओळखीच्या माणसांसाठीच! अनोळखी माणसांशी याची कायम दुश्मनी. गेटची कडी जरी वाजली तरी गुरगुर चालू होते बसल्या जागी. कोणी येणार असले की आम्ही आधीच याला साखळीने बांधून ठेवतो; पण 'कुत्र्यापासून सावधान'च्या पाटीवर दुर्लक्ष करून गेटची कडी न वाजवताच कोणी थेट आले की डॅनी त्याच्या दिशेने धावत गेलाच समजा. मग त्याला आवरताना नाकीनऊ येतात.

अभिषेकसाठी तर डॅनी म्हणजे जिवलग मित्र. अभिषेक नववीत असताना डॅनीला आणला म्हणून अभिषेकची आई नाराज होती; पण डॅनीने तिच्या नाराजीवर प्रेमाने मात केली. अभिषेक शाळेतून आता कॉलेजविश्वात गेला; पण डॅनीसोबत खेळल्याशिवाय, त्याची चौकशी केल्याशिवाय अभिषेकला करमत नाही. इतका लळा आहे त्याला डॅनीचा. माझ्या मुली राधा-श्रावणी यांच्याही तोंडी डॅनीचे सतत नामघोष चालू असतात. सासूबाईंचीही दिवसभर घरच्याच सदस्याप्रमाणे डॅनीची विचारपूस चालू असते.

लहानपणी कुत्र्यावर निबंध लिहिलेला आठवतो- कुत्रा हा पाळीव प्राणी आहे, तो घराची राखण करतो; पण आता उमगते की त्यापलीकडेही त्याला भावना, प्रेम, वेळप्रसंगी कठोरता, लळा, आपुलकी यांचीही जोड आहे.

हा लेख २४ जानेवारी २०१५ च्या लोकसत्ता वास्तुरंग मध्ये प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/family-pets-dany-1064547/

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

28 Jan 2015 - 11:10 am | सविता००१

आवडला.

छानच लिहिलं आहेस जागूताई.

वाह... मस्त आहे डॅनी तुमचा. भेटायला आले पाहिजे.

बाकी कुत्र्यांच्या मानवी भावनांबद्दल काय आणि किती लिहायचे ? चार वर्षाच्या लहान मुलाला जितकं समजतं तितकं कुत्र्यांनाही स्पष्ट समजतं असं माझं मत आहे.

सविता००१'s picture

28 Jan 2015 - 12:06 pm | सविता००१

समजतंच.
इतकी माया लावतात की बस्स!!

जागुताई लेखन आवडले. माझ्याघरी दोन मांजरं आहेत. त्यांनी खूप लळा लावलाय. अनुभवामुळे हे लेखन जास्त भावलं.

शिन्डरेला , म्याकमिलन, नेपोलियन , विक्तोरिया, वलेन्टाईन आणि .................... डुष्यंत !!
.
.
.
.
.
.
.
.
.
/
.
.
.
.
.

श्वान विषयातील माझे ज्ञान इतकेच मर्यादित आहे !!!

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2015 - 12:03 pm | प्रसाद गोडबोले

सुरेख

जागु ताईम्चा लेख आणि त्यात श्वान म्हणल्यावर जरा दचकलोच होतो पहिल्यांदा ;)

लेख सुरेख झालाय ... ग्रेट डेन ... अप्रतिम कुत्रा ! :)

खटपट्या's picture

28 Jan 2015 - 12:07 pm | खटपट्या

यावरुन एक आठवले. ज्यांचा कुत्रा असतो ते नेहमी बोलतात की "घाबरू नका, काही करणार नाही". :)

कुत्री आकाराने जितकी मोठी तितकी जास्त प्रेमळ, जास्त शांत पण नॉर्मल आयुष्यच कमी असलेली. आणि जितकी आकाराने लहान तितकी जास्त केकाटणारी, चावरी, स्वार्थी भासणारी, पण आयुष्य तुलनेत बरेच जास्त असलेली. (योगायोगाने नव्हे, खरोखरच वेगवेगळ्या जातींच्या सरासरी जीवनमानाविषयी बघितलं तर हे दिसेल.)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 6:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गावठी कुत्री सगळ्यात बेस्ट.

एकतर त्यांची इम्युनिटी जबरदस्त असते आणि राखणीला पण मस्तं. माझा कुत्रा गावठी आहे. कोणाची टाप नाही घरात तंगडं टाकायची. महाभयानक तापट आहे. घरच्यांना सोडुन कोणालाचं आवरतं नाहीत. :))

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 12:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

वाह!!!मस्त लेख!! माझ्या घरी पण होते कुत्रे! जर्मन शेफर्ड!विलक्षण बुद्धिमान जीव असतात अन मायाळू सुद्धा! संध्याकाळी ७ नंतर जर मी किंवा तीर्थरूप घरी नसलो तर कोणीही एक घरी परत येईस्तोवर आई च्या पायाशी बसुन असे! अगदी तुळशी ला दिवा लाऊन प्रदक्षणा घालताना पण हे सोबत असे!! साप चावुन मेले लेकाचे!! :(

स्पंदना's picture

28 Jan 2015 - 12:21 pm | स्पंदना

मूर्ख कुठचा!! बाकि सगळ समजत आणि साप कळत नाही?
ह्रदयाचा लचका तोडून जातात हरामखोर!! मग नकळत भरणारे डोळे आणी दगडासारख वजन असलेल काळीज घेउन जन्मभर फिरावं लागत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 12:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

अत्यंत जास्त कुतूहल जिवावर बेतले! झुडपात खसफसले म्हणून तोंड घातले तर जिभेवर चावला भुजंग! अर्थात तो जर्मन शेफर्ड्स चा स्थाईभाव!! सद्ध्या घरी एक डाल्मेशियन एक लैब्राडोर आहेत !

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 12:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

तीन दिवस घरी चुल पेटली नव्हती आमच्या ! मागच्या वर्षी त्याच्या गाडलेल्या ठिकाणी जे झाड लावले होते त्याला पहिला आंबा आला! त्या झाड़ालाच आता आम्ही चिंग्या म्हणतो! :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 6:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी सहमत. कुत्री काय किंवा इन जनरल पाळीव प्राणी काय, साले जीव लावतात आणि फटकन एका दिवशी मरुन जातात. माझ्या सगळ्यात आधीच्या कुत्रीची आठवणं झाली. :(

जागु's picture

28 Jan 2015 - 12:27 pm | जागु

सविता, मितान धन्यवाद.

गवी छोटे जास्त चुळबुळे पण असतात असे वाटते.

प्रगो रेसिपी वाटली की काय? धन्स.

खटपट्या धन्स.

सोन्याबापु असेच असतात सगळे श्वानहिरो. माझ्या माहेरी पण असेच होते.

माझ्या माहेरी माझ्या तान्ह्या मुलीला अंघोळ घालताना ती खूप रडायची, म्हणुन आमचा वाघ्या तिला तेल लावायला घेतलं की तेंव्हापासूनच आमच्यावर भुंकायचा. मग आई म्हणायच्या,' काय तुझ्या सारखा गंदा ठेवुया तिला?' ती रडायला लागली की घरभर अस्वस्थपणे पळापळ सुरु याची. अधी मधी दुपारी घरातले सगळे शांत असताना हा अलगद येउन पाळ्ण्यात तिला हुंगुन जाताना मी अनेकदा पाह्यलाय. सकाळी दार उघडल घराच की थाड थाड धावत येण्याचा याचा कार्यक्रम, जर बाळ चुकुन जमिनीवर असेल तर त्याच्यावरुन उडी मारुन पलिकडे जेवायच्या टेबलात कितीदा पाय पसरुन पडलाय गाढव. फार शिव्या मिळायच्या मग. मग गायब एक तासभर. पुन्हा अंघोळी आधी हजर!!

नि३सोलपुरकर's picture

28 Jan 2015 - 12:30 pm | नि३सोलपुरकर

"ह्रदयाचा लचका तोडून जातात हरामखोर!! मग नकळत भरणारे डोळे आणी दगडासारख वजन असलेल काळीज घेउन जन्मभर फिरावं लागत"---१०० % सहमत आहे ताईशी.
भयकंर लळा लावतात साले.

जागु's picture

28 Jan 2015 - 12:34 pm | जागु

अपर्णा सह्ही किस्से.

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 1:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमचा चिंग्या घरी आणला तेव्हा डोळे ही उघडले नव्हते त्याने! आई लाच पहिला पाहिले होते!, लहान बाळे जेव्हा प्रथम डॉगी ला भेटतात तेव्हा चा क्षण विडियो लायक असतो! आमच्या घरा पाशी एक जाधव फॅमिली राहत असे, त्यांचे पण जर्मन शेफर्ड होते, त्यांचा अंकुर नवाचा मुलगा शाळेला निघाला नर्सरीत की तोंडात दप्तर घेऊन जात असे सोबत! स्कूल बस निघेपर्यंत थांबे तिथे! इतके भारी की घरचे लोक बरेचदा त्याच्या सोबत पोरगे एकटे सुद्धा स्टॉप पर्यंत सोडत!, स्टॉप वर एखादा कॉलोनी मधलाच माणुस पोराशी बोलायला थांबला तरी गुरगुरत असे पठ्ठा!

महेश अशोक खरे's picture

28 Jan 2015 - 2:08 pm | महेश अशोक खरे

लेख फारच अप्रतिम ! फोटोतर फारच सुंदर आहे. आमच्या घरीही माझ्या मुलीने इमोशनल ब्लॅकमेल करून (मला भावंड नाही. मग मला खेळायला कोण? वगैरे...) आम्हाला कुत्रा आणायला लावला. लॅब्राडॉर जातीची मादी आणली. एक महिना वयाचा तो मऊ लुसलुशीत गुंडा घरात आणला तेव्हा मन आनंदाने भरून गेलं. माझ्या पत्नीला कुत्र्यांची भयंकर भिती वाटायची. आई-वडिलांच्या स्वच्छतेच्या आग्रहामुळे त्या पिल्लाला गॅलरीत ठेवावं लागलं. रात्री ते जेव्हा त्याच्या आई-भावंडांच्या आठवणीने व नवीन जागेच्यामुळे वाटणार्‍या असुरक्षित भावनेने केविलवाण्या आवाजात रडू लागलं तेव्हा मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो. मांडीत घेऊन थोपटत चक्क अंगाईगीतं म्हंटली तेव्हा कुठे ती शांत झोपली.
आता आमची ‘सारा’ चार वर्षाची आहे. माझ्या बायकोच्या ऍलर्जीचं रुपांतर आता श्वानप्रेमात झालं आहे. तिने साराचं बाळंतपणसुद्धा बरेचसे एकटीने निभावले. पुलंनी पाळीव प्राण्यांवर लेख लिहिला कारण बहुधा त्यांनी कधी कुत्रा पाळला नसावा. (पुलं आणि त्यांच लिखाण आमच्या आवडीचं आहे हे इथे नमुद करतो.)

पियुशा's picture

28 Jan 2015 - 3:13 pm | पियुशा

व्वा मस्त ! आमचा पिल्या ही असाच सेम... अगदी
बेल्ट नको असतो गळ्यात , आता मोठा झाला ना फ्रीडम हवा म्हणुन गुप चुप बेल्ट काढुन पळतो मनसोकत भटकुन खायच्या वेळीसाहेब दारात हजर परत !
आताशा बर्याच नविन दोस्ताशी - दोस्तिनिशी मैत्री झालिये त्याना सुद्धा घेउन येतो बरोबर
रोज रात्री कॉलनी सामसुम झाली की हा बसलेला असतो गेट समोर , बरोबर मित्रपरिवार अस्तोच काय कु.. कु.. चाल्लेल असत त्याच्या भाषेत काय माहीत ?
मग आम्ही भावन्ड जराशी मजा म्हणुन डायलॉग
बाजी करुन घेतो त्याच्या कु...कु.. ची ;)
पिल्लु " ये देखो मेरा घर. अप्पुन इधर को रेहता , कैसा हे भिडु ?
इतर " बोले तो मस्त हे भाय , तेरी तो ऐश है
पिल्लु : तुमको कैसा लगा रे मोनिका ( मोनिका कुत्रिच नाव आहे आम्हिच ठेवल )बहु बनके आयेगि क्या इधरकु
तेरेको भी दुध काला मिलेगा कभी कभी चिकन / बोटी मिल जायेगा :)
मोनिका : क्यावूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ ;)

२ माउ पण आहेत दिवसभर झोपलेल्या असत्तात, नुसते मागे मागे पायात
घोटाळण एक ३ री पण आहे ती आम्ही पाळलेली नाही पण याच्या खायच्या वेळी ती हजर असतेच रोज , आइ म्हणते तिने मेस लावलिये आपल्याकडे खाण्यापुर्ती :)
खाते दुध पिते की अन छु लगेच
नको तितका लळा लावतात लेकाचे :)

सविता००१'s picture

28 Jan 2015 - 4:21 pm | सविता००१

मस्त.
आम्हीपण घरी कधीच कुत्री पाळली नाहीत. कारण शेजारच्या काकांचा कुत्रा आमच्याकडेही तेवढाच हक्काने यायचा. सगळे लाड करून घ्यायचा आणि तेवढेच आमचे पण करायचा. खरच फार फार मस्त असतात पण जातात ना तेव्हा.......... :(

क्लिंटन's picture

28 Jan 2015 - 6:18 pm | क्लिंटन

कारण शेजारच्या काकांचा कुत्रा आमच्याकडेही तेवढाच हक्काने यायचा. सगळे लाड करून घ्यायचा आणि तेवढेच आमचे पण करायचा.

कुत्रा म्हणजे माझा आणि हिलरीचाही अगदी विक पॉईन्ट.आम्हाला दोघांनाही कुत्रे प्रचंड आवडतात. तरीही कुत्र्याचे करायला वेळ नाही आणि घरी माणसे नाहीत म्हणून आजपर्यंत कुत्रा पाळलेला नाही.आमच्याकडे नाही तरी निदान शेजार्‍यांकडे तरी कुत्रा असावा असे फार वाटते :)

पूर्वी कॉलेजात असताना आमच्या शेजारच्या घरात डॉली नावाची एक पॉमेरिअन कुत्री होती.ती आमच्याकडे अगदी स्वतःचे हक्काचे घर असल्याच्या थाटात यायची.आम्हीही कुत्र्याची हौस पूर्ण करून घेतली.नंतर मी काही वर्षे हिरव्या देशात असताना घरी केलेल्या प्रत्येक फोनमध्ये डॉली कशी आहे हे न चुकता विचारायचो.

खरच फार फार मस्त असतात पण जातात ना तेव्हा.......... :(

हो अगदी फार चटका लावतात.आमच्या शेजार्‍यांची डॉली गेल्याचे असेच दु:ख मला झाले होते.

मला वाटते की खरोखरचे अनकन्डिशनल जीवापाड प्रेम म्हणजे काय हे कुत्र्याचे प्रेम न बघितलेला माणूस समजूच शकणार नाही.

(एक कट्टर श्वानप्रेमी) क्लिंटन

सोन्याबाबु, महेश छान अनुभव.

पियुषा भारीच आहे संभाषण. मजा आली.

रेवती's picture

28 Jan 2015 - 4:43 pm | रेवती

लेख आवडला जागु!

महेश अशोक खरे's picture

28 Jan 2015 - 7:15 pm | महेश अशोक खरे

श्री. क्लिंटन,
त्यांची एकच कंडिशन असते. ती म्हणजे, त्यांना जवळ घ्या, कुरवाळा, त्यांच्याशी खेळा. एवढ्या भांडवलावर आपण त्यांचे आयुष्यभर प्रेमाचे व्याज मिळवू शकतो. गंमत म्हणजे जर थोडा धीर ठेवला तर रस्त्यावरचे कुत्रेही असेच प्रेम देऊ शकतात. फक्त त्यांच्यावर गुजराती/जैन पद्धतीने भूतदया वगैरे दाखवून त्यांना खा खा खायला घालू नये. त्यामुळे त्यांची पैदास अती प्रमाणात होते. माझा अनुभव असा आहे की जर शांतपणे थांबून रस्त्यावरच्या कुत्र्याकडेही हात पुढे केला तर बर्‍याचवेळा तो थोड्या साशंकपणे (हाऽऽऽड हाऽऽऽड अशा पूर्वानुभवामुळे) तुमच्याकडे बघतो. मग हळूहळू शेपूट हलवत तुमच्याकडे येतो. लांबूनच तुमच्या कपड्याचा वास घेतो. तुम्ही शांतपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवल्यास तसे करू देतो. मग त्याची तुमची मैत्री होते. एखादा कुत्रा लांब लांब गेल्यास जाऊ द्यावे. (माणसांच्या बाबतीतही असेच करायला
हरकत नाही. असो पण तो मुद्दा नाही.)
असो. पाळीव कुत्र्यांवरून रस्त्यावरील कुत्रांविषयी एवढे विषयांतर पुरे. नाहीका?

पैसा's picture

28 Jan 2015 - 8:34 pm | पैसा

मात्र जिवाभावाची कुत्री मांजरं आपल्या हाताने पुरताना काय वाटतं ते पुरेपूर अनुभवलं आहे. अजून काही लिहायची इच्छाच होत नाही. :(

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 4:07 am | मुक्त विहारि

परत आमच्या लेडी डायनॅसॉरची आठवण झाली...

मुक्त विहारि's picture

30 Jan 2015 - 6:30 am | मुक्त विहारि

.

जागु's picture

30 Jan 2015 - 10:25 am | जागु

सह्ही एकदम हिरो आहे.

vikramaditya's picture

30 Jan 2015 - 1:34 pm | vikramaditya

११ वर्षे जीवापाड संभाळलेल्या आमच्या 'सिम्रन' ला जेव्हा एस.पी. सी. ए. ,( परेल) च्या विद्युत दाहिनी मध्ये ठेवले तेव्हा अपत्य निधनाचे दु:ख काय असते ते कळले.
श्वानाचे प्रेम काय असते हे अनुभवल्याशिवाय कळणार नाहे. एक वेळ तुमचे 'सो कॉल्ड' स्वकीय तुमच्याकडे पाठ फिरवतील (ह्यात अपत्ये सुद्धा आली), पण एक श्वान कधी तुम्हाला अंतर देणार नाही.
After all, a dog is the only animal in the world that loves you more than it loves itself.

गवि's picture

30 Jan 2015 - 1:59 pm | गवि

A

Image from Mumbai Mirror.

News link:

http://www.mumbaimirror.com/mumbai/others/Millionairess-pauper-of-Versov...

फक्त कुत्र्यांनी साथ दिली अगदी डेथ बेडपर्यंत या बाईंना. दुसरीकडे जाऊन चांगले अन्न मिळण्याचे ऑप्शन्स असतानाही सोडून गेली नाहीत. केवळ प्रेमाखेरीज दुसरं काही नाही कुत्री म्हणजे.. अ‍ॅक्च्युअली माणसांना सवय नसते इतक्या निष्पाप आणि निरपेक्ष प्रेमाची.

खरे आहे विक्रमादित्य, गवि.

सुनील's picture

30 Jan 2015 - 2:57 pm | सुनील

लेख आणि बरेचसे प्रतिसाद आवडले आणि पटलेदेखिल.

खूप खूप लळा लावतात साली ही कुत्री!!

('टफी'चा पालक) सुनील

श्वानप्रेमी मंडळींच्या एका वेबसाईट वर लिहिलेला माझा एक छोटासा लेख इथे डकवतो. हा वैयक्तीक अनुभव आहे.

विंग्रजीत आहे, कृपया चालवुन घ्या... धन्यवाद.
===========================================================================================
“Take care, my child”
It was a cold winter morning in the year 2003. “I love you, too”, my wife whispered sweet nothings. I smiled to myself and turned my back towards her. I could dare do so because, I knew that this affection was not being showered upon me but instead it was her response to the wet lick from our new pet, a month old female Labrador puppy snuggled in our blankets. Within days of landing at our home, she figured out the way to our bed and obviously to our hearts. Simran, as she was named by us was the quintessential canine who would love us more then she loved herself. Separated from her biological mother after a month of her birth, it was no wonder that Simran considered us as her only family.
Soon started the walks with her in the early mornings and during the day, come Sun or rains. Fed lovingly by my wife with choicest food items which she relished, she grew into a huge tall Labrador, a bit uncommon for her breed. She was the undisputed queen of the pets and pariahs in the neighbourhood. It was a sight to behold when Simran would take a stroll in the neighbourhood with her stray friends following her like her knights. Often , when these strays were fed by us, she would sit calmly and observe the proceedings. Her walks would invite stares from every passerby, full of admiration and awe.
She had a huge body and a gentle soul. She was innocent like a child who could not speak and yet would convey her feelings through her eyes and facial expressions. She was so innocent that a stray could even steal her favourite chew stick from right under her nose and yet she would just watch with a bewildered look on her face.
Ten and half long years that she spent with us went by in a flash. It was towards end of June 2013 when she was diagnosed with an incurable disease and after a brief illness lasting couple of days, Simran left us for her last journey. Her only purpose in life was to be with us each single moment of her life and she fulfilled that till her last breath. She was the daughter we never had. Even in the extreme bouts of illness towards the end of her life, she would look into our eyes and say” don’t worry, all is well, I am not going anywhere.” As we cremated her on July 1, 2013 and immersed her ashes in the sea, the rain gods welcomed her in the heaven with mild showers.
Simran, our child, may your soul rest in peace. You taught us to be compassionate towards all living beings and being selfless. You set an example for us to know what it is to love unconditionally. Each passing day, when we look at your portrait with misty eyes, we imagine you frolicking in the paradise with abandon gay and joy. Who knows when, but mom and dad will surely catch up with you again, but not yet, not yet.
==================================================================================================================================

अजया's picture

30 Jan 2015 - 4:27 pm | अजया

जागु,छान लेख.
कुत्रा पाळला तर त्याचं मलाच सर्व बघावं लागेल,कुठे बाहेर गेले काही दिवस तर कुठे ठेवणार त्याला, अशा विचारानी खरं तर घर मॊठे असल्याने राखणीसाठी तरी कुत्रा ठेवु हा नवर्याचा आणि मुलाचा हट्ट मी कधीच पुरवला नाही.लेख आणि प्रतिसाद वाचुन मला आपण चूक केली की काय वाटतंय!

स्वप्नांची राणी's picture

30 Jan 2015 - 5:28 pm | स्वप्नांची राणी

नाही ग अजया. तुझा निर्णय योग्यच आहे. मी राहते त्या देशात मी पाहिलय, लोकं मोठ्या हौसेनी कुत्रा पाळतात. आणी जेंव्हा त्यांच्या वार्षिक सुट्टीची वेळ येते तेंव्हा अगदी निर्दयपणे आपल्या अपत्यवत संगोपन केलेल्या जिवांना चक्क वाळवंटात सोडून देतात मरायला. खर म्हणजे पेट पासपोर्ट काढून पाळीव प्राण्यांना बरोबर नेता येते. आणि गोरे लोक असेच करतात. पण, माफ करा, स्पष्ट लिहितेय, काही आपले लोक आणि काही प्रमाणात अरबी लोकच असे क्रुतघ्नासारखे वागतात.

खरंतर रस्त्यावरच्या कुत्र्यांमुळे दात घशात जाता जाता वाचलेत आणि त्यामुळे त्याच संध्याकाळी एके ठीकाणी सीमांतपूजनाला कपाळावर बँडएड लावून जावं लागलं होतं. इथे लोकांनी लिहीलेले अनुभव फारच चांगले दिसतायेत.

महेश अशोक खरे's picture

30 Jan 2015 - 6:51 pm | महेश अशोक खरे

मा. सूडभाऊ,
व्यक्ती तितक्या प्रकृती हे जेवढं माणसांबाबत खरं आहे तेवढंच कुत्र्यांबाबतही असतं. रस्त्यावरच्या कुत्र्यांचे खा खा खायला घालून फाजिल लाड करू नयेत असे माझेही मत आहे. पण आपण आपल्या मुलाबाळांना लहानपणापासूनच ‘हात रे भू भू’ असं शिकवत असतो. (अर्थातच इथे व्यक्तीशः कुणाकडे बोट दाखवत नाही आहे. साधारणपणे दिसून येणारे निरिक्षण मांडत आहे.) त्यामुळे कुत्रा दिसला की हाड हाड करायला आपण फार लवकर शिकतो. स्वाभाविकपणेच रस्त्यावरील कुत्रेही माणसांकडे अविश्‍वासाने बघत असतात. त्यांच्याशी थोडंसं सहानुभुतीने वागलं तर ते सुद्धा प्रेमानेच प्रतिसाद देतात. पण ज्यांना कुत्र्यांची भिती/तिरस्कार आहे त्यांनी या फंदात नाही पडलं तरी हरकत नाही. मात्र कुत्रा दिसला की घाबरून न जायचा प्रयत्न करावा. कारण निसर्गतः कुत्रे भिती ही भावना पटकन ओळखतात. कुत्रा अंगावर आला तर धावून काहीच उपयोग नसतो. (ती स्वाभाविक प्रतिक्रिया असली तरी) कारण पळणार्‍याचा पाठलाग आणखी चेव येऊन करणे ही त्यांची निसर्गप्रवृत्ती असते. आणि धावून कुत्र्यापेक्षा पुढे पळायचं तर धावणारा मिल्खासिंग असायला हवा. त्यामुळे धावू नये हे इष्ट. आपण थांबून राहिलो की कुत्राही आपल्या पासून काही अंतरावर येऊन थांबतो. शक्य असल्यास त्याला दरडाऊन (आवाजात कठोरपणा आणून) थांब / नाही / नो असे काहीतरी म्हटल्यानेही योग्य परिणाम होतो. असो. पण माणूस आणि रस्त्यावरचा कुत्रा यांच्यात निवड करायची झाली तर माणसाचीच करायला हवी. मेंदुत बिघाड झाल्याने माणसांवर हल्ले करणार्‍या कुत्र्यांना शक्य तेवढ्या तातडीने जीवनमुक्त केले पाहिजे. पण एकुणात कुत्रा रस्त्यावरचा असला तरी तो मुळात माणसांशी प्रेमाने वागणारा असतो एवढेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच.

सूड's picture

30 Jan 2015 - 7:00 pm | सूड

मा. सूडभाऊ

अर्र!! माननीय? वारलोच! नुसतं सूड लिहीत चला. ह्याच टिपा त्या संध्याकाळी कपाळावरची पट्टी बघून एक दोघांनी दिल्या. अमलात आणावी लागायच्या कुत्र्यांशी मैत्री करता येवो.