बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture
स्वमग्नता एकलकोंडेकर in जनातलं, मनातलं
27 Jan 2015 - 12:01 am

मागील लेखात आपण वाचले की बायोमेडीकल्/डॅन्/मॅप्स डॉक्टरच्या सांगण्यानुसार बर्याच ब्लड टेस्ट्स करून मग अपॉईंटमेंट दिली ती रिझल्ट्स डिस्कस करण्याची. त्याबद्दल लिहीतेच आहे, परंतू थोडी बॅकग्राउंड बायोमेडीकलबद्दल द्यावी असे वाटते.

बायोमेडीकल हा काय प्रकार? तर मुख्यतः ऑटीझम हा फार वादग्रस्त मुद्दा आहे. मेडीकल फिल्डमध्ये ऑटीझम हा जेनेटीक म्युटेशनने होतो, तसेच काही वातावरणातील फॅक्टर्सदेखील काराणीभूत असतात असे मानले जाते. थोडक्यात ऑटीझम बरा होत नाही. परंतू डॉक्टर्समध्येच एक फळी आहे (डॅन्/मॅप्स) जे मानतात की ऑटीझम हा पर्यावरणातील फॅक्टर्सने होऊ शकतो तसेच व्हॅक्सीनेशननेही बर्‍याच मुलांमध्ये बदल होतात - जे ऑटीझमसारखी लक्षणं दाखवतात. सायन्स बघायला गेले - तर जगात कितीतरी मुलांना व्हॅक्सिनेशन केले जाते, सर्व मुलांना का ऑटीझम होत नाही? याचा अर्थ व्हॅक्सिनेशनने ऑटीझम होत नाही. तर दुसरी फळी म्हणते - काहीच मुलांची इम्युन सिस्टीम आधीच कमकुवत असते, त्यांच्यात चांगले बॅक्टेरिआज कमी असतात- ते वरवर पाहता हेल्दी असतात! परंतू जेव्हा व्हॅक्सिनेशनसाठी लाईव्ह व्हायरस आणि मुख्यतः जोडीने दिलेल्या व्हॅक्सिनेशनमध्ये एकापेक्षा अनेक व्हायरस शरीरात सोडले जातात तेव्हा ज्या काही बालकांची इम्युन सिस्टीम हेल्दी नसते त्यांच्यासाठी हे व्हॅक्सिनेशन म्हणजे ऑटीझमची लक्षणं दिसण्यासाठीचा एक ट्रिगर असतो. त्यामुळेच सर्व मुलांना नाही, परंतू काही मुलांना व्हॅक्सिनेशन दिल्या दिल्या अतिशय सिव्हिअर रिअ‍ॅक्शन होऊन त्यानंतर त्यांची पर्सनालिटी बदललीच हे ठामपणे सांगणारे बरेच पालक इंटरनेटवर्/पुस्तकांतून सापडतात. यात मुख्य कल्प्रिट बर्याचदा असतो तो एक ते दिड वर्षाच्या आसपास दिली जाणारी लस Measles, mumps, rubella (MMR). सीडीसी (सेंटर फॉर डिसिज कंट्रोल & प्रिव्हेंशन) यांचे ऑफिशिअल वेळापत्रक तुम्हाला इथे मिळेल. -> http://www.cdc.gov/vaccines/schedules/hcp/imz/child-adolescent.html

ओके, मुळात व्हॅक्सिन्स व ऑटीझम हा अतिशय वादाचा मुद्दा आहे. मला त्यात पडायचे नाही. पण माझे मत विचाराल तर मी एकच सांगीन. माझा मुलगा सव्वा वर्षापर्यंत पिडीयाट्रिशिअनच्या मते ब्युटीफुली ग्रो होत होता. साधं सर्दी पडसं देखील त्याला झाले नाही इतकी त्याची फिजिकल हेल्थ चांगली होती. छान हसरा, अफेक्शनेट, सर्व रिस्पॉन्सेस बरोबर देणारा व सर्वात महत्वाचे, जे देऊ ते व्यवस्थित तोंड उघडून खाणारा होता. त्याला सर्वात पहिलं आजारपण आले ते म्हणजे सव्वा-दिड वर्षाचा असतानाच्या सुमारास दिलेल्या व्हॅक्सिनच्या आठवड्यात. सिव्हिअर रिअ‍ॅक्शन. कमी न होणारा ताप, उलट्या.. इतकं की कधीही डॉक्टरांची पायरी आजारपणासाठी न चढलेलो आम्ही डिरेक्टली इमर्जन्सीमध्ये गेलो. त्यानंतर मुलाची पर्सनालिटी बदलली ती बदललीच. त्याआधी जरासा अस्पष्ट शब्द उच्चारणारा , बॅबलिंग करणारा या मुलाची बोलती बंद झाली. चांगला इंटरॅक्ट करणारा, डोळ्यात बघून रिस्पॉन्स देणारा कुठेतरी खिडकीतून बाहेर टक लाऊन बघत बसे. खेळणी ओळीने लावत बसे. कार्स उलट्या ताकून चाकांशी खेळत बसे. सर्व काही खाणारा (अगदी पोहे,उपमा,पालकाची भाजी, कोबीची भाजी,बेगल्स, पॅनकेक्स, चिकन व फिश देखील खायचा ) हा मुलगा खाण्यासाठी तोंडच उघडेना. अतिशय प्रमाणार ओरल अ‍ॅव्हर्जन्स - ज्याबरोबर आम्ही अजुनही लढतो. परिणामी अथक २ वर्षांच्या प्रयत्नाने मुलगा दोन वेळेस खातो. काय? तर पराठा/थालिपीठ किंवा भात. हे आमचे सर्वात सक्सेसफुल दिवसातले खाणे. नाहीतर आहेच पिडियाशुअर.

तर हे सांगायचा मुद्दा असा की सायन्स काय सांगते ते सांगेल. पण आमच्या डोळ्यासमोर झालेला हा बदल आम्हाला या सगळ्या प्रकरणाच्या दुसर्‍या बाजून बघायला भाग पाडतो. नेहेमीचे डॉक्टर थेरपीज सुचवतात परंतू खात्री देत नाहीत रिकव्हरीची. मग जरा का जीएफ्/सीएफ डाएट्स अथवा कुठल्या सप्लिमेंट्सने लगेचच चांगला फरक दिसत असेल तर तुम्ही विश्वास का ठेऊ नये? शेवटी आम्ही पालक आहोत. आमच्यासाठी आमच्या मुलाचे भले हे एकच ध्येय आहे. कशानेही तो बदल झाला तर हवाच आहे आम्हाला! इंटरनेटवर अशा पालकांना ब्लेम करणारेही लोकं आहेत! की "तुम्ही तुमच्या मुलांना ती आहेत तसं प्रेम करत नाहीत, अ‍ॅक्सेप्ट करत नाहीत." हे चूकीचे आहे. आम्ही अ‍ॅक्सेप्ट केले नाही तर रोजचा दिवस कसा पार पडणार? Of course, I love my child the way he is. But I also hate the way he struggles with very basic skills every step of the way .. And if Biomedical or any sensible methodology is going to be helpful in some way, I am going to try it out.

एनीवे, तर मी आता मूळ मुद्द्याकडे वळते. टेस्ट्सचे रिझल्ट्स.
सर्वच्या सर्व पॅरामीटर्स इकडे देणे अशक्य आहे. त्यामुळे जनरल आयडीया देते. (मला यातील ८०% नावं व गोष्टी माहीत नाहीत. दर वेळेस पुस्तक घेऊन रिपोर्ट वाचावा लागतो. हे काय आहे, याचे काय मिनिंग इत्यादी. मी येथे फक्त नावं देते. अर्थ मलाही माहीत नाही बरेच. येथील डॉक्टर लोकांना काही याबबत माहीती शेअर करायची असेल तर वेलकम!)

पहिला रिपोर्ट माझ्या हातात आहे, त्यात आहे

कोलेस्टरॉल(एल्डीएल्,एचडीएल इत्यादी), Lipoprotein Particles and Apolipoproteins, Inflammation/Oxidation, Myocardial structure/Stress/function, Platelets, Lipoprotein Genetics, Platelet Genetics, Coagulation Genetics, Metabolic (TSH, homocystein, vit B, vit D, RBC Folate) , Renal (Creatinine) Sterol Absorption Markers, Sterol Synthesis Markers, Glycemic control, insulin resistance, Beta Cell function, electrolytes(Na+,K+,Cl-,Co2, Calcium), Liver(AST, ALT,bilirubin), Others(Albumin, total protein, iron, ferritin) Thyroid(TSH, T4,T3, T4 free, reverse T3) , CBC with differential, Omega 3 Fatty Acids, Omega 6 Fatty Acids, Other fatty acids.

-> या रिपोर्टवरच्या कमेंट्समध्ये डॉक्टर असं म्हणतो की:

biomedical3

biomedical2

थोडक्यात, ओमेगा ३ सप्लिमेंट्स व मिथायलेशनची गरज आहे. म्हणजे Methylcobalamin (बी१२ चा एक प्रकर्र) याची गरज आहे.

दुसर्‍या रिपोर्टमध्ये आहेत खालील गोष्टी :

biomedical 4

biomedical5

व्हिटॅमिन सी, व्हीटॅमिन डी याचबरोबर डॉक्टरांनी एझाईम्स, काही इतर सप्लिमेंट्स सांगितले आहेत. तसेच मुलाला mitochondrial dysfunction नावाचाही प्रकार असल्याचे सांगितले त्यामुळे त्यावरही एक औषध सांगितले आहे.

तिसर्‍या रिपोर्टमध्ये आहे IgG Food Antibody Assessment & IgG Spice Profile, IgE Inhalants profile, IgE Mold profile, Celiac & Gluten Sensitivity..

-> तुम्हाला फुड अ‍ॅलर्जीज माहीतीच असतील.उदा: सतत पाहण्यात, ऐकण्यात आलेली पीनट्स वा इतर नट अ‍ॅलर्जी. मग त्यात श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो तर कधी स्वेलिंग, कधी हाईव्ह्ज(रॅशेस) होते. हा जो प्रकार आहे तो IgE (or immunoglobulin E) यामध्ये मोडतो. हा जो दुसरा IgG (Immunoglobulin G)हा जरा सटल प्रकार आहे, त्यामध्ये तुम्ही अमुक एक पदार्थ घेतल्यावर तुम्हाला अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन अ‍ॅज सच रॅशेस वगैरे होणार नाही, परंतू काही ना काहीतरी बिहेविअर चेंजेस, हायपर अ‍ॅक्टीव्हिटी, ब्लोटींग, डोकेदुखी असे सिम्प्टम्स दिसू शकतात. थोडक्यात फुड सेन्सिटीव्हिटी. अ‍ॅलर्जीमध्ये फुड बरोबरच मोल्ड्स, पोलन याची अ‍ॅलर्जी तुम्ही ऐकली असेल. तो झाला IgE Inhalants profile, IgE Mold profile. पदार्थांमध्येच मसाले देखील आले. तेई टेस्ट करण्यात आले - IgG Spice Profile मध्ये. याचबरोबर सेलिआक डिसिजची / ग्लुटेन सेन्सिटीव्हीटीचीही टेस्ट घेण्यात आली. (येथे अधिक माहीती वाचा) माझ्या मुलाला मोल्ड , पोलन अशी किंवा रॅश्/स्वेलिंग होणार्‍या अ‍ॅलर्जीज नाहीत. परंतू चिक्कार फुड सेन्सेटीव्हिटीज सापडल्या. त्याचा तक्ता देते.

biomedical 5

biomedical 6

biomedical7

येथे लाल रंग अथवा ३+ जिथे लिहीले आहे ते सगळं माझ्या मुलासाठी अपायकारक आहे. ते पदार्थ निदान ६ महिने तरी अ‍ॅब्सोल्युटली टाळायचे आहेत. त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात रि-इंट्रोड्युस करून त्याची रिअ‍ॅक्शन कशी येते ते पाहून पुढील कोर्स ऑफ अ‍ॅक्शन ठरवावी लागेल. पण तुम्ही पाहीलंत तर दिसेल, आपल्या भारतीय स्वयपाकातले कितीतरी पदार्थ त्याला चालणार नाहीत. उदा: म्हशीचे दूध, दही, बीट्स, कोबी, काकडी, लसूण, ढोबळी मिरची, लेट्युस, कांदा, रताळे, पालक, टोमॅटो, ग्लुटेन (पोळी, ब्रेड), गहू, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, प्लम... परंतू फिशचे बरेचसे प्रकार व पोल्ट्री त्याला चालणार आहे जी तो मुळीच खात नाही. बाकीचे नॉन्व्हेज प्रकार आम्हीदेखील खात नसल्याने घरी बनले अथवा आणले जात नाहीत.

ग्लुटेन सेन्सिटीव्हिटीच्या रिपोर्टमध्ये देखील ग्लुटेन/व्हीटला ३+ असल्याने तेही टाळण्याची गरज आहे. मी गेले ३-४ महिने त्याची पोळी कम्प्लिट बंद केली आहे. :( आणि माझ्या मुलाला पोळी खूपच आवडते. थोडासा समजूतीत फरक वाटतो पण अजुन आम्ही पूर्णपणे १००% जीएफ्/सीएफ डाएट करत नसल्याने याबद्दल मी नंतरच लिहीलेले बरे.

अशा रीतीने वरील रिपोर्टसवरून एक कळते, की आमच्या मुलाला जीएफ्/सीएफ डायेट व काही सप्लिमेंट्स (ओमेगा ३, एम्बी१२, झिंक) याचा फायदा होऊ शकतो. आता दुसरा अडथळा येतो. आमचा मुलगा मुळीच औषध घेत नाही. त्याला दोन माणसांनी पकडले तर तिसरा कसातरी औषध तोंडात ढकलू शकेल - तेही तो थुंकून टाकतो. आम्हाला सप्लिमेंट्स रोजच्या रोज देणे सध्यातरी स्वप्नवतच आहे. परंतू मी जेव्हा शक्य आहे व मुलाच्या मूडनुसार झिंक वगळता सप्लिमेंट्स देऊन पाहीली आहेत. ओमेगा ३ व एम्बी१२ याचा फायदा बोलण्यात वगैरे झाला नसला तरी आय काँटॅक्ट सुधारण्यात मात्र झाला. अचानक आपण जे बोलत आहोत ते मुलापर्यंत पोचत आहे असा दिलासा कुठून तरी आम्हाला मिळाला, मेबी त्याच्या एक्स्प्रेशन्सवरुन? हे सगळं जरी असलं तरी औषधं जर त्याच्या पोटात गेलीच नाहीत तर काय फायदा व तोटा. इथे आम्ही अजुनही स्ट्रगल करतो. त्याला अजुन इतकी समज नाही, की आम्ही सांगितले हे तुझ्यासाठी चांगले आहे - घे, तर तो गपचुप घेईल. त्यासाठी बहुधा थोडी वाट पाहावी लागेल. परंतू वरील रिपोर्ट्सवरून व मुलाच्या रिस्पॉन्सवरून आम्हीदेखील म्हणू शकतो की याचा फायदा होऊ शकतो!

अजुन एक मार्ग आहे जे तुम्ही करत आहात त्याचा किती फायदा होतो हे बघण्याचा. http://www.surveygizmo.com/s3/1329619/Autism-Treatment-Evaluation-Checkl... येथे एक चेकलिस्ट्/प्रश्नपत्रिका आहे. वरची कुठलीही मेडीकल ट्रीटमेंट चालू करण्याआधी व नंतर तुम्ही प्रश्नमालिका सोडवून स्कोअर काढला तर ऑटीझमची लक्षणे कमी जास्त होत आहेत किंवा कसे हे कळून येते.

मुलाच्या रिपोर्टवरून तसेच माझ्या काही लक्षणांवरून मलाही जाणवले की मला देखील फुड सेन्सिटीव्हिटीज असणार आहेत काही. मी काहीदिवस जीएफ्/सीएफ डाएट ट्राय केले असता मला अतिशय चांगले रिझल्ट मिळाले. पोटभर जेऊनही हलके वाटणे - सुस्ती न येणे, पचनसंस्था सुधारल्याचे समजणे इत्यादी फरक जाणवले. शिवाय मुलाच्या थेरपीस्ट्स, स्पीच थेरपीस्ट यांच्याशी बोलताही असंच समजले की ग्लुटेन सेन्सिटीव्हिटी इज अ बिग डील. तुम्ही ते ट्राय केले तर फरक जाणवेल नक्की. त्यामुळे ती एक आशा आहेच. अतिशय कष्टाचा रोड आहे हा, पण मी त्या वाटेला नक्कीच जाणार!! :)

ह्या सगळ्या टेस्ट्स आम्ही करून आता वर्ष होईल. आमचं मुळात तो खाण्याबाबतीत खूप स्ट्रगल असल्याने जीएफ्/सीएफ डायेट ट्राय करण्याचा प्रश्नच नव्हता. तो काहीच खात नाही तर निदान त्याला आधी २ वेळेस खाण्याची सवय लागूदे या विचाराने गेल्या वर्ष-२वर्षाचा बराच वेळ गेला. नेहेमीच्या डॉक्टरांनी जीएफ्/सीएफ हाणून पाडल्याने आम्ही परत कन्फ्युजनमध्ये गेलो. अशा रीतीने हो नाही हो नाही करत परत एकदा जीएफ्/सीएफची सुरवात गेल्या ३-४ महिन्यांपासून केली आहे. नशीब जीएफ्/सीएफ मध्ये भात येतो.
सप्लिमेंट्स जेव्हढी जायला पाहीजेत तेव्हढी गेली नाहीत, परंतू त्याचा नव्याने प्रयत्न चालू केला आहे. हा खूप मोठा प्रवास आहे. परंतू याचबरोबर आम्ही बाकीच्या थेरपीज( स्पीच, एबीए, ओटी) अर्थातच चालू ठेवली आहे. भारतातून आईबाबा, नातेवाईक यांच्याकडून होमिओपथी, फ्लॉवर रेमेडी याही गोष्टी कळतात. काही औषधं घरात आहेतही, परंतू रात्र थोडी सोंगं फार सारखे, आमचा मुलगा छोटा अन त्याचे मेडीसीन्/सप्लिमेंट कॅबिनेटच मोठे असा प्रकार होतो. त्याखेरीज त्याचे रूटीन अतिशय व्यस्त असल्याने हे सगळं जमवणे अवघड जाते. परंतू हॉलिस्टीक अ‍ॅप्रोचचाच फायदा होईल असं आम्हाला वाटते.

** हे नंतर एका मैत्रिणीशी इमेलवर बोलताना जाणवलेले. ते डिस्क्लेमर म्हणून ठेवते इथे. **
हे थोडेसे डिस्क्लेमर :
I have missed many many points while writing that article. I am not a writer and also I write and publish it right away because of time constraints. Even when writing I had a feeling, this article needs lot of editing.

First, the cause of Autism. personally, I don't care what the cause is. Because damage is already done. It could be MMR vaccine at the 1.5 or HepB at the birth, or maybe where we were living was agricultural area. so I'm sure the air filled with the pesticides might have some role. It could also be Mercury amalgam in my teeth, or it could be toxins from tap water. Also genetic mutation. I have mentioned all these 'so called causes' in my previous articles or comments on them. But yes I'm guilty of not mentioning them in the Biomedical article. I kind of got carried away and lost the thought process.

Also, my whole point was, whatever may be the cause of autism and toxins in your body, if these simple methods, lifestyle changes and support of supplements are making positive changes somehow, I am going to try them. It will at the least give the satisfaction of 'I tried whatever I can'. I cannot get past and deny all the recoveries read from all the books I have on this topic. :)

But yes, I also know, that this being spectrum disorder - one particular thing worked for A would not necessarily work for B. But Mother warrior has to fight first to see if she is winning or losing. :)

http://marathi.journeywithautism.com/

समाजविचार

प्रतिक्रिया

काय लिहू? वरिल लेख वाचून मनात खळबळ उडालेली नाही तर जी शंका मला (केवळ माझ्या मुलाच्या निरिक्षणाने) आली होती त्याला (कदाचित) पुष्टी मिळाली. तुम्ही म्हणताय तेच मीही म्हणणार की मी त्या विषयातील तज्ञ नाही, डॉक्टर नाही पण एक आई आहे जी आपल्या मुलातील सुक्ष्म बदल हेरत असते. तिला काही शंका येतात. डॉ. ना विचारल्यावर काय उत्तरे मिळतात हे वेगळे सांगायला नको. पण अशाच लसीकरणानंतर माझ्या तब्येतीने ठणठ्णीत मुलाला त्रास सुरु झाला. त्याच्याशी ९ वर्षे दिवसरात्र झगडा करावा लागला. त्यावरील औषधे घेताना खूप कुशंका होत्या. त्या सगळ्या बोलून दाखवणे म्हणजे वादाला आमंत्रण! आपल्याला भोगावं लागतं ते लागतच, शिवाय हे नस्ते वाद नकोत म्हणून गप्प बसयाचं. पुरावा काहीच नसतो. ते अ‍ॅलर्जीचे तक्ते, ती पथ्ये आता तर नावही नको. सुदैवाने आयुर्वेदात आम्हाला योग्य उपचार, योग्य डॉ. मिळाले (भारतात) व मुलगा बरा झाला. जुने दिवस आठवायला नको असे वाटते. तुम्हालाही योग्य उपचार सापडो ही मनापासून इच्छा!

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

27 Jan 2015 - 10:58 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

आणि तुमच्या ह्या प्रतिसादाने मलाही पुष्टी मिळाली जे वाचले ते खोटे नाही याबद्दल!
९ वर्षे! बापरे, किती मोठा लढा! जुने दिवस आठवूच नका. :) गॉड ब्लेस यु..

जयन्त बा शिम्पि's picture

28 Jan 2015 - 6:44 pm | जयन्त बा शिम्पि

रेवती ताई, माझा सहा वर्षाचा नातू आहे स्वमग्न. आपण आपल्या मुलासाठी कोणत्या डॉक्टरांशी सम्पर्क साधला होता व त्याचेवर कोणती आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरली होती हे क्रुपया मला कळवाल काय ? माझा इमेल आय डी असा आहे
jayant.shimpi@gmail.com
आपण माहिती कळविल्यास मी आपला आभारी राहीन. धन्यवाद
जयन्त शिम्पि
वय वर्षे ६६.

रेवती's picture

28 Jan 2015 - 6:54 pm | रेवती

कळवते काका. माझा मुलगा स्वमग्न प्रकारात नाही पण त्याच्या आजाराचे कारण फुफ्फ्फुसांशी संबंधित होते. तातडीच्या उपचारासाठी अमेरिकेतील उपचारपद्धती व आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती वापरली होती.

आपल्याला मिसळपाववरच व्यक्तिगत निरोप केलाय.

मधुरा देशपांडे's picture

27 Jan 2015 - 3:28 am | मधुरा देशपांडे

तुम्हाला योग्य उपचार सापडो ही मनापासून इच्छा!
रेवतीसारखेच म्हणते.

+१००

सस्नेह's picture

27 Jan 2015 - 12:23 pm | सस्नेह

असेच म्हणते.
मुलासाठी आईच्या काळजाला कशी घरे पडतात हे जाणून असलेली,
स्नेहांकिता

अजया's picture

27 Jan 2015 - 7:12 am | अजया

+११
नक्कीच काहीतरी उपचार सापडतील आणि त्याला लागू पडतील.

स्पंदना's picture

27 Jan 2015 - 8:49 am | स्पंदना

व्हॅक्सीनेशनने फरक पडलेला आईलाच कळणार कारण तीच त्याला दिवस रात्र पहात असते. त्याची नेणतेपणीची भुक झोप हे सगळ तिला संवादाशिवाय समजतं.
हे एम एम आर नंतर दिलं तरी चालत ना? मुलाच्या साधारण दोन तीन वर्षाच्या वाढीनंतर जर हे इंट्रोड्युस केलं तर चालेलं ना? त्या मुळे निदान ह्या शक्यता तरी पडताळुन पहाता येतील.

आनन्दा's picture

27 Jan 2015 - 10:39 am | आनन्दा

एम एम आर हे खरेच काहीतरी गौडबंगाल आहे खरं. माझ्या मुलीला पण त्याचीच सगळ्यात जास्त रीअ‍ॅक्शन आली होती. आणि त्याचा वाईट भाग असा आहे की ती रिअ‍ॅक्शन साधारण ८ ते १० दिवसांनी येते. तोपर्यंत तुम्ही व्हॅक्सिन दिले होते हे पण विसरून गेलेला असता.

सर्वसामान्यपणे व्हॅक्सिनचा काळ हा मुलांचे त्या रोगासाठी व्हल्नरेबल असलेले वय बघून ठरवला जातो. उदा. काही व्हॅक्सिन अश्या पण आहेत की ज्या मुलांना ६ महिन्याचे असतानाच द्याव्या लागतात उदा. रोटाव्हायरस. १ वर्ष पूर्ण झाल्यावर त्या व्हॅक्सिनची गरजच नसते म्हणे. एम एम आर चे अगदी असे नसेल, पण कदाचित दीड वर्ष हे वय गोवर कांजिण्या येण्याचे वय असेल, किंवा मोर्टॅलिटी त्या वयातच जास्त असेल.

स्पंदना's picture

27 Jan 2015 - 4:52 pm | स्पंदना

अहो कधी कधी म्हणण्यापेक्षा कायमच बर्‍याच औषधांचा मारा हा फक्त औषधी कंपन्यांच्या आग्रहास्तव असतो. जसे की सिंगापुरात "हिमालया" कंपनी इंट्रोड्युस झाली आणी आमचा जीपी कधीही कश्यासाठीही गेलं की त्यांच इम्युनिटी स्ट्राँग करायच (आता नाव विसरले, सेप्टएलिन की काय तरी) औषध देणार म्हणजे देणारच. अयोयो!! घरात बाटल्याच बाटल्या झाल्या त्या टोनिक कम औषधाच्या.
तसाच झटका दिला ६९ च्या सुमारास निघालेल्या "प्रोलुटॉन डेपो" ने. प्रत्येक गर्भवती स्त्रीला डॉक्टर हे इंजेक्शन कंपल्सरी देउ लागले शहरात. बर बाळाला अन आईला बरं या भावनेपायी अन बहुतेकदा डॉक्टर म्हणतो म्हणुन ही इंजेक्शन्स दिली गेली. मग आता आमच्या पिढीत, मुली असतील ठिक, मुले असतील तर बर्‍याचदा स्पर्म काउंट कमी. ( हे सगळ डॉक्टरांकडुन ऐकलेलं. मला थ्रेटन्ड अ‍ॅबोर्शन्ची केस म्हणुन ही इंजेक्श्न्स दिली गेली, तेंव्हा माझी गायनॅक मला मुलगी झाल्यावर मग सांगु लागली.)
एम एम आर अगदी वयाच्या ४०व्या वर्षीपण देतात. तुमच्याकडे जर या लसीकरणाची नोंद नसेल तर रेकॉर्ड साठी म्हणुन परत घ्या अस मला येथल्या कौन्सील मध्ये सांगितलं. (मी पळुन आले ती गोष्ट निराळी :D )

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

27 Jan 2015 - 10:59 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

मला ठाऊक नाही. मी जाणकारही नाही. आपापल्या डॉक्टरशीच बोलावे, अजुन काय करणार आपण?

विशाखा पाटील's picture

27 Jan 2015 - 9:31 am | विशाखा पाटील

त्यामागची कारणे आणि त्यावरचा उपाय शोधण्याचा तुमचा प्रयत्न थक्क करणारा आहे. हतबल न होता, rationally विचार करणाऱ्या Mother Warrior ला यात मार्ग सापडो!

जेपी's picture

27 Jan 2015 - 10:50 am | जेपी

वाचतोय..

मित्रहो's picture

27 Jan 2015 - 12:08 pm | मित्रहो

नाहीतर ओमेगा ३ सप्लीमेंटची गरज पडली नसती. gf/cf डायेट खरेच कठीण आहे. ज्वारी, दाळी ग्लुटेन फ्री आहेत. पण काही मुलांना मूग मटकींची पण ऍलर्जी असते. दूध, दही, लोण्यातले कॅसीन लोणी तापवून त्यातला जो तपकीरी पदार्थ असतो त्यात निघून जाते असे म्हणतात. पण घरी केलेले केंव्हाही उत्तम.

तुम्हाला योग्य उपचार सापडो ही मनापासून इच्छा!

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

27 Jan 2015 - 11:08 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

हो ना.. फिश खात नाही. तसेही काहीकाही फिश मध्ये मर्क्युरीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तेही बघून खावे. गम्मत आहे नाही? प्रेग्नन्सीत इकडे आवर्जून कोणते फिश खा/ खाऊ नका ते सांगतात कारण त्यात मर्क्युरी असतो. पण फ्ल्यु शॉटमधला मर्क्युरी कसा चालतो मग? :| सीडीसीच्या वेबसाईटवर हे सापडले : "all vaccines routinely recommended by CDC for children younger than 6 years of age have been thimerosal-free, or contain only trace amounts of thimerosal, except for some formulations of influenza vaccine." ट्रेस अमाउंटमध्ये तरी का बरं असतो मर्क्युरी? हेही वाचा: http://www.diet-blog.com/11/concerned_about_mercury_in_fish_and_flu_shot...

असो, येथे जीएफ्/सीएफ पदार्थ मिळतात, म्हणजे जीएफ ओटमील, पीठं. पण खरंतर नेहेमीपेक्षा वेगळी लागतात ती. जरा सवयच करावी लागते आपल्याला. चव व वासाचे सेन्सेस हायटन्ड असलेल्या मुलांना हे खायला घालणे फार अवघड जाते. प्रयत्न करत राहायचे.

तुम्हाला योग्य तो उपाय सापडो आणि मुलावर अपेक्षित चांगला परिणाम दिसू लागो!!

तुमच्या पेशन्स साठी हॅट्स ऑफ !!

सखी's picture

28 Jan 2015 - 10:37 pm | सखी

तुम्हाला योग्य तो उपाय सापडो आणि मुलावर अपेक्षित चांगला परिणाम दिसू लागो!!
तुमच्या पेशन्स साठी हॅट्स ऑफ !! ++१११ - असेच म्हणते.
त्याला पोळी आवडते आणि तिच बंद करावी लागली - हा म्हणजे तुम्हाला तोंड दाबुन बुक्क्याचा मार असं म्हणावसं वाटतयं. परिचयातील एका मुलाला खूपच अ‍ॅलर्जीच आहेत (दाण्याची कॉमन असतेच, मला वाटते दुध, डाळी, काही भाज्यापण - पण त्याला दुधी भोपळ्याचे थालपिठ चालते) तशी तुमच्या मुलाला दुसरी कोणतीतरी पोळी करुन देता येईल का? चव कदाचित वेगळी लागेल पण हे त्याचही कम्फर्ट फुड असावं असं वाटतयं.

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

28 Jan 2015 - 11:05 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

त्याला थालिपीठं , धिरडी, पराठे जनरली आवडतात. परंतू तो नेहेमी हे पदार्थ खाईलच याची गॅरंटी नसते..
मी पोळी बंद करण्यामागे फक्त थेअरॉटीकल कारण नाही तर प्रत्यक्षात गव्हातल्या ग्लुटेनने त्याला किती त्रास होतो हे बघितले आहे. ग्लुटेन म्हणजे ग्लु सारखा बांधून ठेवणारा घटक, ज्यामुळे ब्रेड फुलतो वगैरे. परंतू मुलाच्या पचनसंस्थेला ग्लुटेन चालत नसल्याने त्याच्या बॉडीत ते ग्लु सारखेच चिकटुन बसते. जेव्हा तो पोळी खातो तेव्हा हम्खास कॉन्सटीपेशन होते त्यला. व बाउल मुव्हमेंट्स होताना अक्षर्शहः पिळवटून रडतो तो. चेहरा लाल होतो.. नंतर शक्तीपात झाल्यासराखा बसतो ५ मिनिटं. त्यामुळे हे वर्थ नाहीये हे कळून चुकले.. अजुन १००% ग्लुटेन फ्री नाही आहे डाएट. पण प्रयत्न चालू आहेत.

सुचेता's picture

28 Jan 2015 - 1:22 pm | सुचेता

मझ्या वाचनात १ पुस्तक आल होतं what your dr. doesn't know about nutrition. एका एम डी न लिहलेल त्यात अशा प्रकारचं मत व्यक्त केलेल होत , एकुनात वैद्यकिय अभ्यास्र्कमात आहारावर भरच दिलेला नसतो. म्हणुन तुम्ही हे उपाय करताय त्यात मुलावर अपेक्षित चांगला परिणाम दिसू लागो!!

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

28 Jan 2015 - 11:06 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

येस.. मी वाचले नाही हे पुस्तक. पण सोरिअसली डॉक्टरांना न्युट्रीशन बद्दल कितीतरी मोठा अभ्यासक्रम पाहीजे पण तसे नसते.

पैसा's picture

28 Jan 2015 - 7:18 pm | पैसा

एमेमार. आता आठवतंय, माझा मुलगासुद्धा दीड वर्षाचा होईपर्यंत जरा बोलायला लागला होता. बहुतेक ही लस दिल्यानंतरच त्याच्यावर काही परिणाम झाला असावा. त्याला २/३ दिवस बराच ताप आला होता. त्यानंतर तो बोलायचा बंद झाला. हाक मारली तरी कोणाकडे बघेना. आपले काय खेळणे असेल ते ते घेऊन बसायचा. तेव्हाच आमचे होम्योपाथ शेजारी म्हणाले की याला ऑटिझम आहे का अशी शंका येतेय. पण पेडियाट्रिशियन आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणाले की याच्यात इतर काही लक्षणे नाहीत. नंतर हळूहळू तो रिकव्हर झाला. अगदी नॉर्मल. त्याला रिकव्हरीसाठी काय निमित्त घडलं असेल याचा विचार करते आहे.

सगळंच अगम्य आहे. पण तुमच्या बाळाला जेवणात काय चालेल याचा अभ्यास करून चिकाटीने देत रहा. हळूहळू यश मिळेल! भात आवडत असेल तर त्यात काही काही घालून फ्राईड राईस खाईल का तो?

स्वमग्नता एकलकोंडेकर's picture

28 Jan 2015 - 11:07 pm | स्वमग्नता एकलकोंडेकर

बघा.. :(
व्हॅक्सिनेशन शाप की वरदान असा निबंध लिहूया आता.. :)

उपाशी बोका's picture

27 Jul 2015 - 8:05 pm | उपाशी बोका

ओके, मुळात व्हॅक्सिन्स व ऑटीझम हा अतिशय वादाचा मुद्दा आहे.......

प्रेग्नन्सीत इकडे आवर्जून कोणते फिश खा/ खाऊ नका ते सांगतात कारण त्यात मर्क्युरी असतो. पण फ्ल्यु शॉटमधला मर्क्युरी कसा चालतो मग?

बघा.. :(

वरील मते वाचून लसीकरण तोट्याचे आहे, असा (गैर)समज होण्याची शक्यता आहे. निव्वळ या कारणासाठी प्रतिसाद देत आहे. एम्.एम्.आर. लशीचा आणि ऑटिझमचा संबंध आहे, असा एक मतप्रवाह आहे जो आजवरच्या पुराव्यानुसार आणि CDC च्या मतानुसार चुकीचा आहे. ऑटिझमसाठी मोठी लॉबी कार्यरत आहे हेसुद्धा लक्षात घ्यावे लागेल. One of the loudest broadcasters of this supposed link between vaccines and autism is actress Jenny McCarthy, who has campaigned in support of Wakefield's findings as recently as 2011. वेकफिल्डचा रिसर्च पेपर चुकीचा होता हे सिद्ध झाले आहे आणि तो मागे घेण्यात आला आहे.

लशीकरणामुळे जगभर खूप फायदा झाला आहे. देवीसारख्या रोगाचे १००% निर्मूलन झाले आहे. पोलियो आणि मलेरियासारख्या रोगांचे निर्मूलन होण्याच्या मार्गावर आहे. इतर अनेक रोगांसाठी लशीकरण उपयुक्त ठरत आहे. पण अश्या परिस्थितीतसुद्धा लशीकरणाच्या विरोधात चळवळ सुरू होत आहे, हे खेदकारक आहे आणि त्याचे परिणाम दिसत आहेत.

टीपः मी डॉक्टर नाही आणि माझ्या अख्ख्या खानदानात कुणीही डॉक्टर नाही. मी डॉक्टरकडे एक प्रोफेशनल म्हणून सल्ला मागतो, प्रश्न पडले तर त्याला विचारतो, त्याचा सल्ला मानतो, पटले नाही तर दुसर्‍या प्रोफेशनलकडे जातो. पण आजकाल तर गूगल वापरून आणि इंटरनेटवर माहिती वाचून आपण डॉक्टरपेक्षा हुशार, इंजिनीयरपेक्षा तज्ञ, राजकारण्यांपेक्षा धूर्त वगैरे समजण्याचा जमाना आहे. तसे होऊ नये म्हणून हा प्रपंच.

Scientists in Argentina have discovered a gene mutation that causes autism.

A three-member team of researchers sequenced and decoded for the first time the complete genome of three patients with Autism Spectrum Disorder (ASD) and epilepsy and discovered the genetic mutation that causes the disorders in Argentina.

The researchers studied the case of three brothers who suffer from autism, representing “an infrequent form of familial ASD.”

The scientists included team leader and neurologist Marcelo Kauffman, chemist Adrian Turjanski and molecular biologist Martin Vazquez, from Argentina’s National Council for Scientific and Technical Research, state-run ‘Xinhua’ news agency reported.

The study “opens possibilities for research into treatments of Autism Spectrum Disorder, which is characterised by reduced social skills, repetitive behaviour, behavioural disorders, a severe lack of language development and other clinical symptoms,” said Kauffman.

“While there is no known specific treatment for SHANK3 (gene) defects, there are treatments in the research phase that, once approved, could benefit these and other patients in the future,” Kauffman added.

The findings were published in the journal PLOS ONE.

Gene mutation that causes autism identified

पॉइंट ब्लँक's picture

7 Apr 2015 - 11:28 pm | पॉइंट ब्लँक

मराठीत भाषांतर करणे अवघड आहे, म्हणून ईंग्रजीत लिहितो.
Gene mutation in a disease is only an association study. It is difficult to do a cuase and effect analysis only on the baisis of that. Function Impact (FI) analysis , followed by pathway analysis study is needed to prioratise genes to be studied for disease. And both these steps have severe shortcomings. FI tools give highly discordant results and our current knowdelge of pathway is far from complete. The analysis is further crippled by lack of sound statistical technique for pathway analysis.
Gene mutation study alone is not enough in many situations. there are other factors like epi-genomics, gut bacteria composition, immunology and so on.
This is one reason that the clinical contributions of genomics dont stand upto the hype in last 15 years.

म्हणून जिनोमि़क्स वाले कितीही दंगा करोत आणि कुठल्याही जरनमध्ये पेपर छापोत, त्यांचे क्लेम जरा कमी सिरियसली घ्या. कारण सेल बॉयोलाजी अजूनही पाषाणयुगात आहे आणि अस्थिर आहे.

पॉइंट ब्लँक's picture

7 Apr 2015 - 11:37 pm | पॉइंट ब्लँक

दोन टर्म्स स्प्ष्टीकरण न देता वापरल्या. इथे देतो. थोडी क्लिष्टता कमी करण्यसाठी थोडी ढोबळ व्याख्या लिहित आहे.

1. Gene form proteins. Proteins interact with each other to perform cellular activities.. A subset of these interactions that represnt a cellular functionality is called a pathway.
2. A mutation in a gene can impact the protein it forms. Functioan Impact (FI) analysis measures the extent of this impact.

आयुर्हित's picture

27 Jul 2015 - 1:19 am | आयुर्हित

Google glass may improve social skills in autistic people.