उत्कंठावर्धक 'बेबी'

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
25 Jan 2015 - 2:21 pm
गाभा: 

'बेबी'हा सिनेमा २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला ,तो काल पाहिला .'अ वेडनस्डे' आणि 'स्पेशल २६ 'सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे यांचा 'बेबी'हा जबरदस्त चित्रपट आहे . 'बेबी' हे एक अंडरकव्हर युनिट आतंकवाद नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे.

या युनिटचा मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षयकुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांच्या युनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारतात राहाणार्‍या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी प्रयतत्नशील आहे . सिनेमात जिहादच्या मुद्दावर जास्त भर देण्यात आला असून यात डॅनी डेंझोप्पा (बेबी चा टॉप बॉस) च्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा मतितार्थ हा आहे की आता दहशतवादी संघटनांना भारतातूनच मुले रिक्रुट करणे सोपे जात आहे कारण भारतातील मुस्लिम समाजात हा देश आपला नाही ही भावना बळावत चाललेली आहे व पार्ट ऑफ द रिझन इज या दहशतवादी संघटनांनी तसे त्यांना कन्व्हिन्स केलेले आहे व त्याचा परिणाम म्हणून (फुटिरतावादी कारवाया होऊ शकत नाहीत अँड देअरफोर) दहशतवादी कारवाया करण्यासाठी मुलं मिळतात व हा त्या दहशतवादी संघटनांचा विजय आहे व "आपला" पराजय आहे.

अजय सिंह राजपूत आणि टीम मौलाना मोहम्मद रहमानद्वारा पसरल्या जाणार्‍या आतंकाला संपवण्यासाठी नेपाळ आणि सौदी पर्यंत धडक मारतात. चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक असून क्लायमॅक्स खरोखरच ब्लडप्रेशर वाढवणारा आहे ! सर्वानी जरूर बघावा. पीके सारखा भंपक सिनेमा पाहण्यापेक्षा बेबी सारख्या फिल्म्स ना देशवासियानी डोक्यावर घ्यावे , असे सांगावेसे वाटते .

बॅनर : टी-सीरिज सुपर कैसेट्स इंडस्ट्रीज लि., ए फ्रायडे फिल्मवर्क्स, क्राउचिंग टायगर मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स
दिग्दर्शक : नीरज पांडे
संगीत : मीत ब्रदर्स
कलाकार : अक्षय कुमार, तापसी पन्नू, राणा दग्गुबाती, अनुपम खेर, डॅनी, केके मेनन, मधुरिमा टुली, रशीद नाज, सुशांत सिंह
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 घंटे 39 मिनट 42 सेकंड्स
रेटिंग : ४/५

प्रतिक्रिया

जातवेद's picture

25 Jan 2015 - 2:35 pm | जातवेद

चित्रपट चांगला असला तरी हॉलीवुड्चा प्रभाव जाणवत राहतो. नीरज पांडे कडून कथा 'झिरो डार्क थर्टी', 'अर्गो' सारख्या चित्रपटांवरून घेण्याची अपेक्षा नव्हती.

राही's picture

25 Jan 2015 - 3:34 pm | राही

वॉर फिल्म्स किंवा सस्पेन्स थ्रिलर्स आणि सोशिअल एन्टर्टेनर्स ही वेगवेगळी जॉन्र आहेत्.त्यांत तुलना होऊ शकत नाही. म्हणजे संहिता किंवा हाताळणीच्या दृष्टीने.बाकी अभिनय, संगीत वगैरेमध्ये तुलना होउ शकते. त्यामुळे दोन भिन्न पठडीतल्या चित्रपटांना उद्देशून 'ह्याच्यापेक्षा तो बघा' असे तुलनात्मक सांगणे योग्य वाटत नाही.
जाता जाता, आणि वैयक्तिक मत, चित्रपटांचा चांगलेवाईटपणा मोजण्यासाठी 'देशभक्ती' हे मूल्य असावे असे वाटत नाही. हे आपण थेट सूचित केलेले नाही हे मान्य.

hitesh's picture

25 Jan 2015 - 3:49 pm | hitesh

ते पाकिस्तानच्या विरोधात डायल्वाग आहे ना , म्हणुन हा चित्रपट त्यांच्या मते देशभक्तीचा.

मंदार कात्रे's picture

25 Jan 2015 - 5:17 pm | मंदार कात्रे

उत्तम चित्रपट आहे, कालच बघितला

स्वप्नांची राणी's picture

25 Jan 2015 - 5:29 pm | स्वप्नांची राणी

आमच्या ईथेही हा पिक्चर प्रदर्शित झाला याचं आश्चर्य वाटलं होतं...पण 'पाकिस्तानात अतिरेकि नाहिच्चेत मुळी. ते भारतातूनच येतात, ईथे फक्त शिकून जातात..' असा काहितरी विचीत्र अर्थ काढून इकडे लावण्यात आला बहुतेक. किंवा आमच्याकडे काटाकुट करुन जितका प्रदर्शित झालाय त्यातून हाच अर्थ लागला. हा सिनेमा साधारण ३ तासांचा आहे ना..? आमच्याकडे तो अवघ्या २ तास आणि काही मिन मधे आटोपला. बरेच की-डाय्लॉग्झ, संवेदनशील द्रुष्ये बहुतेक छाटली गेली असावीत.

बाकी, मला अत्यंत बोर झालं. स्पेशल २६ बराच बरा होता यामानानी.

मंदार कात्रे's picture

25 Jan 2015 - 5:30 pm | मंदार कात्रे

इथे म्हणजे कुठे?

उडन खटोला's picture

26 Jan 2015 - 12:09 am | उडन खटोला

थिएटर मध्ये दाखवताना खूप काटछाट केली आहे, कारण सौदी चा सन्दर्भ आहे

स्वप्नांची राणी's picture

25 Jan 2015 - 5:33 pm | स्वप्नांची राणी

दोहा, कतार.

मंदार कात्रे's picture

25 Jan 2015 - 5:39 pm | मंदार कात्रे

मग तिकडे काटछाट करूनच दाखवणार ! टोरेन्ट किम्वा मुव्हिरुल्झ.कॉम ट्राय करा ... अतिशय उत्तम फिल्म आहे

स्वप्नांची राणी's picture

25 Jan 2015 - 5:40 pm | स्वप्नांची राणी

एक उदाहरण सांगते, म्हणजे ईथे जरा संवेदनशील सिनेमे कसे लावले जातात हे समजेल.

क्विन मधली विजयलक्ष्मी जशिच्या तशी दाखवली कारण ती भारतीय रुट्स असलेली होती. पण अ‍ॅमस्टर्डॅमची ती पोल डान्सर आणि तो पोल डान्स हा सगळा भाग कापून टाकला होता. भारतात परत हाच सिनेमा पाहिला तेंव्हा मला कळलं ते, आणि अर्थातच कारनही समजलं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Jan 2015 - 7:39 pm | निनाद मुक्काम प...

आंजा चा वेग चांगला असेल तर डेली मोशन वर अत्यंत सुस्पष्ट सिनेमाची प्रत आहे ती अंतर्धान पावण्याच्या आंत रेषेवर सिनेमा पाहून घेणे. असे सिनेमे तुमच्या थेटरात पाहू नका , माझा अबुधाबी चा अनुभवावर सांगतो ,
त्यापेक्ष्य पिके सारखे आवर्जून पहा त्यात काही कापाकापी करणार नाहीत.

टवाळ कार्टा's picture

25 Jan 2015 - 11:10 pm | टवाळ कार्टा

लिंक व्यनी करता का :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2015 - 7:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निनाद मु... लिंक प्लीज.

-दिलीप बिरुटे

खटपट्या's picture

25 Jan 2015 - 11:09 pm | खटपट्या

चित्रपट पाहीला. अतिशय छान चित्रपट आहे. अतिरेक्याची भूमिका एका पाकीस्तानी अभिनेत्याने केलीय हे माहीत नव्हते. आता त्याचं काही खरं नाही. :) खानावळीचे चित्रपट बघण्यापेक्षा असे चित्रपट केव्हाही चांगले. त्यातल्या त्यात आमीर खानने एकदा सरफरोश केला होता.
पण आजकाल त्याची "मुसलमान कभी धोका नही देता" ही वाक्ये डोक्यात जातात. (विषयांतराबद्दल क्षमस्व)

टवाळ कार्टा's picture

25 Jan 2015 - 11:13 pm | टवाळ कार्टा

पण आजकाल त्याची "मुसलमान कभी धोका नही देता" ही वाक्ये डोक्यात जातात. (विषयांतराबद्दल क्षमस्व)

माझे काही अगदी सज्जन मुसलमान मित्र आहेत...आत्तापर्यंतचा अनुभव हाच आहे की शिकलेल्या मुसलमानांमध्ये खाल्या ताटात घाण करायची सवय कमी असावी

खटपट्या's picture

25 Jan 2015 - 11:21 pm | खटपट्या

हो, माझेही मुसलमान मित्र आहेतच की. पण एखाद्या पाकीस्तानी माणसाबद्दल परग्रहावरुन आलेला माणूस एवढे सरसकट विधान कसे काय करु शकतो?
तसं म्हणायला मी सुध्दा म्हणू शकतो की "हींदू कभी धोका नही देता"
धोका देणे कींवा न देणे हे प्रत्येक माणसावर आणि परीस्थीतीवर अवलंबून आहे. त्यामुळे सरसकट विधान पटले नाही.

टवाळ कार्टा's picture

25 Jan 2015 - 11:56 pm | टवाळ कार्टा

हे पटले
पण "हींदू कभी धोका नही देता" हे ऑलरेडी अझ्युम्ड आहे म्हणून कोणी त्याचा डायलॉग नाही बनवत

hitesh's picture

27 Jan 2015 - 12:49 pm | hitesh

हिंदु धोका देत नाहीत तर हिंदुंसाठी इंडियन पिनल कोड ४२० लिहायची गरज काय होती ?

ते इतिहासात धर्मवीर म्हणुन एक राजे होऊन गेले. ते तिसाव्या वर्षी बलिदान करुन बसले .. धोकेबाज माणसांमुळेच ना ?

खटपट्या's picture

27 Jan 2015 - 1:03 pm | खटपट्या

बरं मग काय करुया आता ?

बेबी जालावर आली की/ आला की बघीन. ;)
पिके ठीकठाक होता. ग्रेट नाही.

खटपट्या's picture

25 Jan 2015 - 11:46 pm | खटपट्या

ही घ्या बेबीची लींक !!
http://www.desirulez.net/threads/724711-Baby-2015-Watch-Online-Download

रेवती's picture

26 Jan 2015 - 6:23 am | रेवती

धन्यवाद हो खटपट्याजी! बघितल्यावर कळविनच.

कपिलमुनी's picture

26 Jan 2015 - 3:07 pm | कपिलमुनी

लिंक अधिकृत आहे का?
की पायरेटेड आहे??

फुकटात चित्रपट दाखवणार्‍या सर्व सायटी पायरेटेड असतात.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2015 - 4:58 am | मुक्त विहारि

आपली टोरँट पण ह्यातच मोडते का?

खटपट्या's picture

27 Jan 2015 - 5:11 am | खटपट्या

माझ्या मते जेव्हा तुम्ही टोरेंट्वरून एखादी फाईल डाउनलोड करत असता तेव्हा तुमची मशीन इन्टरनेटवर ओपन करत असता. म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी डाउनलोड करता तेव्हा कोणतरी तुमच्या मशीनमधून काहीतरी डाउनलोड करत असतो. हा सगळा गीव आणि टेक चा मामला आहे. त्यामुळे मी टोरेन्ट टाळतो. अधिक माहीती खालील लिंकवर मिळेल. यात व्हायरसचा धोका असू शकतो.
http://www.engineersgarage.com/mygarage/how-torrent-works?page=2

मुक्त विहारि's picture

27 Jan 2015 - 5:25 am | मुक्त विहारि

मग उत्तम साईट कुठली?

खटपट्या's picture

27 Jan 2015 - 5:43 am | खटपट्या

ईंग्रजी चित्रपटासाठी मी putlocker.is हे साईट वापरतो. नाहीतर गूगलमधे watch online movie असे करतो ज्या काही लिन्क येतात त्यावर कुठेतरी सिनेमा मिळतोच.
हिंदीसाठी desirulez.net आणि einthusan.com या साईटी वापरतो.
मराठीसाठी apalimarathi.com आहेच.

या लिंकेवरील बेबी १५ मिनिटे रांगली व नंतर बंद पडली. आता पुढील विकांती बघते. १५ मिनिटे तरी बरा होता शिनेमा.

कालच पाहिला...एक्दम जबरदस्त आहे.

चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक असून क्लायमॅक्स खरोखरच ब्लडप्रेशर वाढवणारा आहे!

+१००

म.टा.वर आलेलं परीक्षण येथे वाचता येईल.

चौकटराजा's picture

26 Jan 2015 - 12:50 pm | चौकटराजा

असा चित्रपट मल्टीप्लेक्स ला पहायचा असतो त्याप्रमाणे आज सकाळी मुलीबरोबर पाहिला. हा एक चांगला सिनेमा बर्‍याच दिवसानी आला आहे. सिनेमात ताण ,उत्सुकता याच बरोबर हलके फुलके विनोदी पंचेस ही आहेत. मुख्य म्हणजे कथा पटकथा बांधीव असली की हीरो हीरोईनची गरज नसते. अर्थात यात याक्शन हीरो आपला राजीव भाटिया आहेच. पटकथा दिगदर्शन संवाद व कॅमरा ही चारही अंगे एकदम मस्त जमलीयत. यातील काही तांत्रिक गोष्टींचे स्प्ष्टीकरण देण्याचा प्रयत्न संवादातून दिसतो पण त्याच्या फार खोलात न जाता आनंद घ्यावा. वेडनेसडे पाहिल्यामुळे इथे या चित्रपटाला दुसरा क्रमांक मात्र द्यावा लागतो.

मोहनराव's picture

26 Jan 2015 - 2:37 pm | मोहनराव

छान आहे चित्रपट!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2015 - 12:33 am | निनाद मुक्काम प...

हि घ्या लिंक

सदर सिनेमावर अपेक्षेप्रमाणे पाकिस्तान मध्ये बंदी आहे.
त्याच्या वाहिन्यांवर शरीफ ह्यांनी चांगले वाईट असा मतभेद न करता दहशतवादी संघटनेचा निःपात करण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. एकीकडे तेहेरीके तालिबान वर कारवाई व दुसरीकडे जमाते उद्दावा वर मेहेर नजर त्यांच्या कराची येथील मेळाव्यासाठी साठी सरकारी रेल्वे गाड्या सोडणे असे दुटप्पी धोरणावर टीका होत असतांना ह्या समस्येवर उत्तर देण्याचा बेबी प्रयत्न करतो.

या लिंकेवर दिसतोय व शिनेमा भारी आहे.

रोहन अजय संसारे's picture

27 Jan 2015 - 11:23 am | रोहन अजय संसारे

उत्तम चित्रपट आहे, कालच बघितला. एक चांगला सिनेमा बर्‍याच दिवसानी आला आहे.

पिलीयन रायडर's picture

27 Jan 2015 - 12:29 pm | पिलीयन रायडर

मी सुद्धा पाहिला.. खरंच छान पिक्चर आहे. मौलानाची भुमिका केलेला कलाकार कोण आहे? अत्यंत सुंदर काम केलंय...

हाडक्या's picture

27 Jan 2015 - 8:49 pm | हाडक्या

तो रशीद नाझ म्हणून एक पाकिस्तानी अभिनेता आहे. मी चकित झालो होतो पहिल्यांदा समजले तेव्हा..

योगी९००'s picture

27 Jan 2015 - 12:39 pm | योगी९००

आपल्या मि.पा वरून अशा लिंका देणे म्हणजे पायरसीला निमंत्रण देणे आणि promote करणे. या गोष्टीचा निषेध.

उद्या कोणीही आपल्या मिपावर केस घालू शकतो...

हाडक्या's picture

27 Jan 2015 - 8:51 pm | हाडक्या

कुणी केस नाय घालू शकत ओ.
पण नैतिकदृष्ट्या आपला विरोध असेल तर निषेध करु शकता अथवा मिपाचा याला विरोध असेल तर ते निषेध करु शकतात तसेच ते प्रतिसाद उडवू शकतात.

खटपट्या's picture

27 Jan 2015 - 10:49 pm | खटपट्या

आंतरजालावर जेजे दीसतंय ते बघायला कोणीच आपल्याला अडवू शकत नाही. डाउनलोड करुन ठेवणे व दुसर्‍याला देणे हा गुन्हा आहे. हेच नीळ्या चित्रपटांना लागू होते.

तुम्ही दुवा दिलात तर तुम्हाला कोणी काही बोलू शकत नाही. जर प्रत्यक्ष तुमच्या हार्ड-ड्राईव्ह वर असेल, सीडीवर असेल तर तुम्ही गुन्हेगार. इतर वेळी लिंका पाठवणे गुन्हा होत नाही हाच मुद्दा होता. त्यांनी त्या होस्ट केल्या आहेत त्यांना जबाबदार धरले जाते.

प्रत्येक देशातले कायदे वेगळे असतात. मिपा कोणत्या देशात रगिस्टर्ड आहे?

भारतात, युरोपात आणि आम्रविकेत याच प्रकारचा नियम आहे. अजून कुठे जर मिपामालक गेले असतील रजिस्टर करायला तर माहीत नाही ब्वा.. ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2015 - 1:42 am | निनाद मुक्काम प...

डेली मोशन वर जगभरातून नवीन सिनेमाच्या चांगली किंवा थेटरात रेकॉर्ड केलेली फिल्म टाकली जाते व सिनेमाच्या मालकाने तक्रार केल्यावर ती लगेच काढली जाते.
ह्या सिनेमाची तक्रार केलेली नाही म्हणूनच तो उपलब्ध आहे.
माझ्यामते हा सिनेमा जगभरातील भारतीयांनी पहावा हाच हेतू त्यामागील असावा.
भारतीयांनी दुसर्या देशात जाऊन मोसाद सारख्या कारवाया
केलेल्या भारतीय लोकांना पाहायला आवडते. सिनेमात पंतप्रधान
हेर खात्याच्या अधिकाराच्या ,तुम्ही काय स्वतःला मोसाद समजतात का असे वैतागून विचारतात तो प्रसंग मस्तच
भविष्यात अनेक कोवेर्ट ऑपरेशन भारतातर्फे राबविली गेली पाहिजे ,
गुजराल ह्यांनी अनके वर्षापासून चालू असलेली कोवेर्ट ऑपरेशन
रद्द करून आपल्या देशाचे अतोनात नुकसान केले होते.
मनोहर पर्रीकर ह्यांनी हेच सुचित केले होते.

यमगर्निकर's picture

29 Jan 2015 - 3:32 pm | यमगर्निकर

मी परवाच बेबी पिक्चर बघीतला. लै भारी वाटला, लोकानि हा पिक्चर थियेटर मध्ये जाउन पहावा, त्या शिवाय ह्या पिक्चरचि मजा येनार नाहि. आणि बी. पी. च्या पेशन्टनि हा पिक्चर चूकुनहि पाहु नये..

मी-सौरभ's picture

29 Jan 2015 - 7:01 pm | मी-सौरभ

हा धागा वाचून काल हा पिक्चर पहिला. ठीक आहे. हॉलिडे यापेक्षा बरा होता असे वाटले.
पिक्चर वाईट नाहीये पन कहानी किंवा अ वेन्सडे च्या लेव्हल चा नव्हता.

स्वाती दिनेश's picture

29 Jan 2015 - 7:23 pm | स्वाती दिनेश

हा धागा पाहून मी काल रेषेवर हा सिनेमा पाहिला , आवडला पण काही कच्चे दुवे- उदा. हानी महंमदच्या पात्राला थोडे अजून फूटेज चालले असते.
वेन्स्डे जास्त आवडला होता.
स्वाती

ज्योति अळवणी's picture

7 Feb 2015 - 12:37 am | ज्योति अळवणी

बेबी कालच बघितला. उत्तम सिनेमा. आमिरपेक्षा अक्षय सरस नक्कीच

दुश्यन्त's picture

7 Feb 2015 - 1:30 am | दुश्यन्त

उत्तम चित्रपट.. बर्याच दिवसातून एक उत्तम चित्रपट पाहायला मिळाला.. मस्ट वॉच! नीरज पांडे आणि अक्षयचे अभिनंदन!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2015 - 7:00 am | अत्रुप्त आत्मा

ऐसाच बोल्ताय! +++१११

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.उडनखटोला आणी समस्त मिपाकरांचा सत्कार आज थेट्रात पिच्चर बघुन करण्यात येईल.

शुभेच्छुक -जेपी आणी ..... *wink*