(सोबती)

स्वप्नज's picture
स्वप्नज in जे न देखे रवी...
22 Jan 2015 - 8:08 am

प्रेरणा- www.misalpav.com/node/30059

मुळ कवीयित्रीची क्षमा मागून तसेच 'तांब्या' संप्रदायाच्या मठाधिपती, महागुरु, सर्व सेवक व भक्त यांना वंदन करुन हे विडंबन सादर करत आहे.

जेवणाला मिळतील सोबती खूप
सोडायला तुम्ही एकटेच असता
कितीही जवळचं वाटलं कोणी
शेवटी लांबूनच पाहणारे निघतात

ज्याचं त्याला लागतं कुंथावं
प्राक्तनात असलेलं चुकत नसतं
कुणी किती जरी खाल्ला मऊ घास
दैवात कुंथणे टळत नसतं

हेच जर आहे चिरंतन सत्य
नुसतं कुंथून भागणार नसतं
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा
हसत कुंथणं योग्य असत

समर्पण- 'तांब्या' संप्रदायातील सर्वांनाच 'त्या' गोष्टीसाठी तांब्या परवडत नाही. काही गरीब लोक 'पत्र्याचे/प्ल्यास्टिकचे' साधन वापरतात, अशा भक्तांना समर्पित.

विडंबनराजकारण

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 9:54 am | टवाळ कार्टा

अग्गागा...संप्रदाय वाढतोय =))
लगे रहो :)

'तांब्या' संप्रदायातील सर्वांनाच 'त्या' गोष्टीसाठी तांब्या परवडत नाही. काही गरीब लोक 'पत्र्याचे/प्ल्यास्टिकचे' साधन वापरतात

याला टमरेल ऐसे नाव =))

स्वप्नज's picture

22 Jan 2015 - 10:07 am | स्वप्नज

दिक्षा द्यावी महाराज.

(नतमस्तक) स्वप्नज

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 10:11 am | टवाळ कार्टा

मी सुध्धा तुमच्यासारखाच आहे हो...दिक्षांत देणार्यां मठाधीपतींनी सध्ध्या VRS घेतली आहे ;)

पैसा's picture

22 Jan 2015 - 4:11 pm | पैसा

कॉल्लिंग बुवा!

तिमा's picture

27 Jan 2015 - 3:51 pm | तिमा

हा तांब्या संप्रदाय वाटत नाही. हा कुंथ संप्रदाय आहे. अशा सर्वांनी अडचणीत आल्यास,
'EVA Q' घ्यावे. मुद्दल कधी गळून पडले ते कळणारही नाही.

खमक्या's picture

27 Jan 2015 - 4:53 pm | खमक्या

सर्वांनाच 'तांब्या' सुलभ नसतो, काही जणांच्या जिलब्या 'सुलभ' नसतात. अशा कुंथ संप्रदायाचे काव्य दिसतेय हे.

कुंथायच्या गोष्टी आणि काव्यरस धबधबा !! =))))