राधा कृष्ण

शिरीष फडके's picture
शिरीष फडके in जनातलं, मनातलं
20 Jan 2015 - 6:06 pm

राधा कृष्ण
राधा आणि कृष्णाचं नातं काय? या प्रश्नाबद्दल बरेच वाद आहेत. कुणी म्हणतात, राधा केवळ कृष्णाची भक्त होती. कुणी म्हणतात ती केवळ त्याची प्रेयसी होती. पण राधा-कृष्ण हे पती-पत्नी असण्याबद्दल बर्याच शंका-कुशंका आहेत. थोडक्यात काय तर राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती आणि याचे संदर्भ बर्याच ग्रंथात सापडतील. कृष्णाची पत्नी कोण हा प्रश्न समोर आला तर उत्तरादाखल पुढील नावं येतील – रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती, नग्नजित्ति, लक्षणा, कालिन्दि, भद्रा आणि मित्रवृन्दा. तशा कृष्णाच्या सोळा सहस्र पत्नी होत्या.
पण कृष्ण-राधा हे पती-पत्नी नव्हते, मग त्यांचं नेमकं नातं काय? ते कितपत योग्य? त्यांच्या नात्याला नेमकं काय म्हणावं? निदान त्याला नातं तरी म्हणता येईल का? जर त्यांच्यात नातं आहे आणि लोक भक्तिभावाने त्यांची पूजा करतात, तर मग त्यांच्यातल्या नात्यातलं पावित्र्य कसं टिकून राहिलं? नात्यातलं पावित्र्य म्हणजे तरी नक्की काय? का नात्यापलीकडले असे काही त्यांच्यात ऋणानुबंध होते? निनावी प्रेम होतं का त्यांचं? प्रियकर, प्रेयसी, प्रेम आणि नातं यांची नेमकी सांगड काय? असे आणि अशासारखे अनेक प्रश्न. या सगळ्या भुतकाळाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं आजच्या काळात म्हणजेच वर्तमानकाळात मिळवता येतील का आणि उत्तरं मिळाली तर ती भविष्यकाळात किती चपखल बसतील? शोध घेणं गरजेचं वाटतं.
नातं. नात्यांची थोडक्यात विभागणी करायची म्हटलं तर नाती दोन प्रकारची असतात. रक्ताची नाती (उपजत) आणि बांधलेली नाती (परिस्थिती आणि गरजेनुसार निर्माण झालेली). आईवडील, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी इत्यादी नाती ही रक्ताची किंवा उपजत नाती या प्रकारात मोडतात. नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी इत्यादी नाती ही बांधलेली नाती किंवा निर्माण झालेली नाती या प्रकारात मोडतात. पण नाती कुठलीही असोत नातं म्हटलं की बंधनं आली, नियम आले, जबाबदारी आली, इच्छा-आकांक्षा आल्या, गरजा आल्या, सवयी आल्या, शिस्त आली, मानसिक आणि शारीरिक आकर्षण आलं मग ते एक व्यक्ती म्हणून असेल किंवा व्यक्तिमत्त्व म्हणून असेल. थोडक्यात गरज, सवय, आकर्षण आणि या सगळ्यांना मिळालेली भावनांची जोड जिथे असते तिथे नातं निर्माण होतं. त्यालाच बांधलेली नाती किंवा निर्माण झालेली नाती म्हणतात.
प्रेम = सवय + गरज + आकर्षण
प्रेम = सवय + आकर्षण + गरज
प्रेम = गरज + सवय + आकर्षण
प्रेम = गरज + आकर्षण + सवय
प्रेम = आकर्षण + सवय + गरज
प्रेम = आकर्षण + गरज + सवय
(प्रत्येक व्यक्तिसाठी क्रम वेगळा असू शकतो पण परिणाम एकच.)
प्रियकर-प्रेयसी किंवा नवरा-बायको या नात्यांमध्येदेखील नियम, बंधनं, इच्छा-आकांक्षा किंवा आशा-अपेक्षा याांसारख्या अनेक बाबी असतातच. पण प्रत्येक व्यक्तिला स्वतःच्या आयुष्यात आणि स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक नात्यामध्ये नावीन्य हवं असतं. आयुष्याकडून आणि आयुष्यातील प्रत्येक नात्याकडून सतत काही नवीन मिळावं ही प्रत्येक व्यक्तिची गरज असते. ही एक प्रकारची भूक आहे. नियम, बंधनं अशा बाबी या नावीन्याला अडथळा आणू शकतात. जर नात्यामधली ही भूक भागत नसेल किंवा नात्यामध्ये नावीन्य नसेल तर त्या नात्यात एक पोकळी निर्माण होते. एक प्रकारचा एकटेपणा व्यक्तिला जाणवतो. व्यक्तिला तात्पुरता का होईना पण आधाराची गरज भासते, असा आधार जो ती पोकळी भरून काढेल. प्रत्यक्षात स्वतःच्या आयुष्यात निर्माण झालेली ती पोकळी ही स्वतःची व्याप्ती वाढवून भरून काढणं कधीही योग्य. पण मनःस्थिती कुंठित झाल्यामुळे तसं करणं शक्य होत नाही. अर्थातच अशी व्यक्ती तात्पुरत्या आधाराची मदत घेते. पण कधी कधी त्या आधाराच्या मोहात पडून ती व्यक्ती कायमचा आधार हिरावून बसू शकते आणि पुन्हा एकाकीपणा येऊ शकतो. तात्पुरता आधार हा तात्पुरता आहे याचा विसर पडतो आणि पुन्हा नात्यामध्ये पोकळी निर्माण होते. समाजात प्रतारणा हा शब्द किंवा यासारखे शब्द या सगळ्या बाबतीत वापरले जातात आणि त्याचे परिणाम किती भयंकर आणि वाईट असू शकतात याची अनेक उदाहरणं समाजात सापडतात. मग या सगळ्यातून मार्ग काय? उपाय काय? यांची उत्तरं म्हणजे राधा-कृष्ण.
प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात एक तरी नातं असं असावं जे नातं नसावं किंवा ते नात्यापलीकडे असावं. लोकांनी किंवा समाजाने त्याला कितीही नावं ठेवली (प्रियकर-प्रेयसी, भक्त, नियमबाह्य इत्यादी) तरी प्रत्यक्षात ते निनावी असावं, ज्याची स्पष्ट व्याख्या नसावी. कुठलेही नियम नसावेत. कुठलीही बंधनं नसावीत. जबाबदारी असावी पण कुणीही जबाबदार नसावं. इच्छा-आकांक्षा, आशा-अपेक्षांचं कुठेही ओझं नसावं. स्वातंत्र्य असावं. मोकळेपणा असावा. प्रेम, आपुलकी, काळजी, राग, आनंद, दुःख, समाधान या सारख्या अनेक भावनांचा नितांत आदर असावा. कुठेही मी नसावा. राधा आणि कृष्ण यांच्यातील संबंधामध्ये या सगळ्याची पूर्तता होते. स्वतःच्या आयुष्यात किमान अशी एक तरी व्यक्ती असावी जिच्याशी राधा किंवा कृष्णाप्रमाणे निखळ, निर्मळ आणि निःस्वार्थी प्रेम असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सर्वमान्य असलेल्या नात्यांमधले नियम, बंधनं आणि समाजाचा एक पारंपरिक ढाचा असा विचार, कृती करण्यास अडथळा निर्माण करतो. तशी ही समाजव्यवस्था चुकीची नाही. पण अशा निनावी नात्याबाबतीत प्रत्येक व्यक्ती मर्यादा पाळेलच किंवा पावित्र्य सांभाळेलच याची खात्री नसते आणि त्यामुळे समाजाचा पारंपरिक आणि प्रतिष्ठित ढाचा बिघडण्याची शक्यता निर्माण होते.
आता प्रश्न आहे तो मर्यादेचा, पावित्र्याचा. मर्यादा, पावित्र्य सांभाळणं म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. ज्या व्यक्तिंना स्वातंत्र्य आणि स्वैराचार, मोकळेपणा आणि भरकटलेपणा यांमधला फरक कळतो त्यांना मर्यादा आणि पावित्र्य सांभाळणं अवघड नाही.
ज्या व्यक्तिंना या मर्यादेचं भान असतं त्यांच्या आयुष्यात कधीही दीर्घकाळ पोकळी निर्माण होऊ शकत नाही आणि सगळी नाती (उपजत, बांधलेली आणि निनावी) सांभाळतादेखील येऊ शकतात. ज्यांनी मर्यादा पाळली, त्यांच्याबाबतीत समाजाने आणि एकंदरीत सगळ्यांनी त्याचा आदर राखणं देखील गरजेचं आहे. तसं झालं तर त्यामुळे समाजात त्याला मान्यता मिळू शकते आणि त्याचं महत्त्व, पावित्र्य जपलंही जाऊ शकतं.
तात्पर्य, काय तर प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी राधा असतेच आणि प्रत्येकीच्या आयुष्यात किमान एक तरी कृष्ण असतोच किंवा असं असावं अशी किमान इच्छा तरी प्रत्येकाची/प्रत्येकीची असते. केवळ ते मनात, कुठेतरी मनाच्या एका कोपर्यात दडवून ठेवलेलं असतं (मग ते स्वतःच्या, आप्तेष्टांच्या किंवा समाजाच्या भीतीपोटी का होईना). असो, कारणं अनेक असोत पण अशा प्रेमाचा आदरपूर्वक सन्मान करता आणि जपता आला पाहिजे हीच काळाची गरज आहे आणि हीच खरी राधा-कृष्णाची भक्तिपूजा.
शिरीष फडके
कलमनामा - १९/०१/२०१५ - लेख १३ - राधा कृष्ण
http://kalamnaama.com/radha-krishna/कलमनामा - १९/०१/२०१५ - लेख १३ - राधा कृष्ण

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2015 - 6:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखातील मतं आवडली. थोडक्यात काय आयुष्यात एक अशी व्यक्ती असावी जिच्यावर तुमचं विनाकारण प्रेम असावं.

”स्वातंत्र्य, मोकळेपणा, प्रेम, आपुलकी, काळजी, राग, आनंद, दुःख, समाधान या सारख्या अनेक भावनांचा नितांत आदर असावा”

सहमत.

चला आता राधेला शोधणं आलं. :)

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

21 Jan 2015 - 11:56 am | सस्नेह

कृष्णाला का शोधू नये ? *biggrin*

प्रचेतस's picture

20 Jan 2015 - 6:37 pm | प्रचेतस

:)

प्रसाद प्रसाद's picture

20 Jan 2015 - 6:51 pm | प्रसाद प्रसाद

तिसऱ्या परिच्छेदापासून शेवटपर्यंत लेख मस्त.

राधा आणि कृष्णाचं नातं काय? या प्रश्नाबद्दल बरेच वाद आहेत


राधा ही व्यक्तिरेखा महाभारताच्या ज्या काही जुन्या प्रती/संहिता सापडल्या (असतील) त्यात ही होती का?

विवेकपटाईत's picture

20 Jan 2015 - 7:50 pm | विवेकपटाईत

महाभारतात राधा हे पात्र नाही.

मनिम्याऊ's picture

20 Jan 2015 - 7:28 pm | मनिम्याऊ

गुलजार साहेब आठवलेत..
त्यांच्याच शब्दात सांगायच म्हणजे.

हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू,
हाँथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम न दो।

सिर्फ अहसास है ये, रूह से महसूस करो,
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो

सोत्रि's picture

20 Jan 2015 - 9:56 pm | सोत्रि

प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात एक तरी नातं असं असावं जे नातं नसावं किंवा ते नात्यापलीकडे असावं. लोकांनी किंवा समाजाने त्याला कितीही नावं ठेवली (प्रियकर-प्रेयसी, भक्त, नियमबाह्य इत्यादी) तरी प्रत्यक्षात ते निनावी असावं, ज्याची स्पष्ट व्याख्या नसावी. कुठलेही नियम नसावेत. कुठलीही बंधनं नसावीत. जबाबदारी असावी पण कुणीही जबाबदार नसावं. इच्छा-आकांक्षा, आशा-अपेक्षांचं कुठेही ओझं नसावं. स्वातंत्र्य असावं. मोकळेपणा असावा. प्रेम, आपुलकी, काळजी, राग, आनंद, दुःख, समाधान या सारख्या अनेक भावनांचा नितांत आदर असावा. कुठेही मी नसावा.

_/\_ _/\_ _/\_

- (गदगदीत) सोकाजी

खटपट्या's picture

20 Jan 2015 - 10:15 pm | खटपट्या

बर्‍याच दिवसांनी मनासारखं वाचायला मिळालं. विशेषतः तीसर्‍या परीच्छेदापासुन लेख खूप भावला, आवडला.

राधा ऐसी भयी शाम की दिवानी.

राधा ऐसी भयी श्याम की दीवानी,
की बृज की कहानी हो गयी
एक भोली भाली गौण की ग्वालीन ,
तो पंडितों की वानी हो गई

राधा न होती तो वृन्दावन भी न होता
कान्हा तो होते बंसी भी होती,
बंसी मैं प्राण न होते
प्रेम की भाषा जानता न कोई

कनैया को योगी मानता न कोई
बीन परिणय के देख प्रेम की पुजारीन
कान्हा की पटरानी हो गयी

राधा ऐसी भाई श्याम की

राधा की पायल न बजती तो मोहन ऐसा न रास रचाते
नीन्दीयाँ चुराकर , मधुवन बुलाकर
अंगुली पे कीसको नचाते
क्या ऐसी कुश्बू चन्दन मैं होती
क्या ऐसी मीश्री माखन मैं होती
थोडा सा माखन खिलाकर वोह ग्वालिन
अन्नपुर्ना सी दानी हो गयी
राधा ऐसी भाई श्याम की..........

राधा न होती तो कुंज गली भी
ऐसी निराली न होती
राधा के नैना न रोते तो
जमुना ऐसी काली न होती
सावन तो होता जुले न होते
राधा के संग नटवर जुले ना होते
सारा जीवन लूटन के वोह भीखारन
धनिकों की राजधानी हो गयी
राधा ऐसी भाई श्याम की. (चोप्य पस्ते)

-दिलीप बिरुटे

इनिगोय's picture

21 Jan 2015 - 11:25 am | इनिगोय

छान. आवडलं विवेचन.

सस्नेह's picture

21 Jan 2015 - 11:58 am | सस्नेह

चांगला लेख. पण शंका अशी की अशा नात्यासाठी राधा अन कृष्णच कशाला व्हायला हवं ?
कोणत्याही अन कितीही माणसांमधलं नातं इतकं सुंदर असू शकत नाही का ?

बॅटमॅन's picture

21 Jan 2015 - 6:01 pm | बॅटमॅन

बलीवर्दनेत्रभञ्जक.

अहो त्या उपमा हजारो वर्षांपासून वापरल्या जातात. त्यांचा हँगओव्हर इतक्या लगेच बरा जाईल?

प्रचेतस's picture

21 Jan 2015 - 6:06 pm | प्रचेतस

किमान ८०० ते ९०० वर्षे रे.
मला वाटते १२ वे शतक.

ऊप्स आयमाय स्वारी. थन्क्स फोर एक्ष्प्लनतिओन!

हां तर प्वाइंटाचा मुद्दा इतकाच की त्या उपमा इ. लै वेळेस वापरल्याने समाजमनात खोलवर रुतून बसल्यात.

प्रचेतस's picture

21 Jan 2015 - 6:28 pm | प्रचेतस

व्हय व्हय. :)

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 8:07 pm | प्रसाद गोडबोले

किमान ८०० ते ९०० वर्षे रे.
मला वाटते १२ वे शतक.

आँ ?

नेटवर गुगलुन पाहिले जयदेवाचा काळ १२००- असाच दाखवला आहे .
पण माझ्या माहीतीनुसार ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी राधेचा उल्लेख आहे म्हणजे केवळ ५०-६० वर्षात गीत गोविन्द इतके सुप्रसिध्द झाले असावे काय की त्यातील कवि कल्पना ओडीसातुन महाराष्ट्रात पोहचाव्यात ?

अवांतर : घ्या काथ्या कुटा नीट .... मिपा माझा

ञानेश्वरीत एके ठिकाणी राधेचा उल्लेख आहे

ती ओवी असेल तर दे की इथे.
मलाही लैच उत्सुकता लागून राह्यली ना बे.

बाकी ज्ञानेश्वरीतला उल्लेख कृष्ण - राधेचा आहे का कर्ण - राधेचा?

आता ही कर्ण - राधा काय प्रकार आहे ??

बादवे, " घ्या काथ्या कुटा नीट .... मिपा माझा" हे भलतेच आवडल्या गेले आहे असे नमूद करतो. मिपाचे एक विडंबन दालन तयार करून त्याची ट्याग-लैन म्हणून वापरणेस काही हरकत नसावी. :)

ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे.
राधा ही अधिरथाची पत्नी. कर्णाचे पालनपोषण केलेली आई.

त्यामुळे कदाचित ही राधा कर्णाशी संबंधित असावी असे वाटून गेले.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 12:04 pm | प्रसाद गोडबोले

सॉरी . thousand apologies !

मी ज्ञानेश्वरी ची सुलभ मराठीतील आवृत्ती पहात होतो त्यात
"राधेशी केवढी जवळीत | तीही न देखे हे प्रेमसुख | हा उपदेश अध्यात्मिक | न ठाऊक तिजला |"
अशी ओवी होती .
पण मुळ प्रत तपासुन पाहीती तर त्यात मुळ ओवी अशी आहे !
"देवी लक्ष्मी येवढी जवळीक परी तीही न देखे या प्रेमाचे सुख | आजि कृश्ण स्नेहाचे बिक | यातेंचि आथी ||"

अपोलॉजीजीज फॉर रॉंग रेफरन्सेस !

ह्यातुन कोणताही संदर्भ देताना मुळ प्रत तपासुन पहयची असा धडा घेतला आहे :)

प्रचेतस's picture

22 Jan 2015 - 12:11 pm | प्रचेतस

धन्स रे :)

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 8:01 pm | प्रसाद गोडबोले

दांभिकपणा

राधा क्रूष्णाचे नाते हे हिंदु धर्मातल्या क्लासिकल दांभिकपणाचे उदाहरण आहे असे माझे स्पष्ट मत आहे .

सगळ्यांना नुसते राधाकृष्ण देव देव करायला हवे असतात , पण कोणी प्रत्यक्षात हे नाते जगत असेल तर मात्र त्य्ला व्यभिचार ठरवुन जग मोकळं होतं !

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 9:14 pm | हाडक्या

प्रगो .. तुमच्या विचारातला बदल दर वर्षी जाणवण्याइतपत आहे असे नमूद करतो (इन्क्लुडिंग गिर्जाकाका फेज).

तरीही अगदी अचूक मत.. :)

यावरही प्रश्न आसाय की हा दांभिकपणा कालांतराने समाजात आला असेही शक्य आहे. म्हणजे एखादा समाजाचा भाग राहिला नाही (म्हंजे थोडा जास्तच आदर्श वगैरे होऊ लागला) की समाज त्यांना देव करून त्यांची वेगळी "व्यवस्था" लावतो असे एक निरिक्षण आहे.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 11:48 am | प्रसाद गोडबोले

सहमती दर्शवल्या बद्दल धन्यवाद !

प्रगो .. तुमच्या विचारातला बदल दर वर्षी जाणवण्याइतपत आहे असे नमूद कर

हे मात्र चुकले ! माझे विचार सहसा बदलत नाहीत . ( वैसे भी पर्फेक्शन को इम्पूव्ह करना डिफिक्ल्ट होता है ;) )

हे पहा आमचे एक जुने लेखन http://misalpav.com/node/23982 .

२०१० साली लिहिलेली कथा आहे ही राधा कृष्णा सारख्या नात्यावर लिहिलेली !!

आता बोला !!

प्रचेतस's picture

22 Jan 2015 - 12:10 pm | प्रचेतस

हाहाहा :)

हाडक्या's picture

27 Jan 2015 - 9:51 pm | हाडक्या

हा हा हा

माई मोड ऑन

गप्प रे प्रसादा, तुला चड्डीतून प्यांटीत आलेले या डोळ्यांनी पाह्यलेय हो. तू काय "पर्फेक्शन"च्या गप्पा सांगतोस रे.

माई मोड ऑफ

सस्नेह's picture

21 Jan 2015 - 9:16 pm | सस्नेह

चष्मा अपना अपना...

ह्म्म्म .. चष्मा म्हणून नै हो पण एक वेगळा अंदाज म्हणून .
बाकी आजच्या समाजाच्या दांभिकपणाबद्दल दुमत नाहीच.

उपप्रतिसाद प्रगो यांना आहे

अजया's picture

21 Jan 2015 - 9:04 pm | अजया

बलीवर्दनेत्रभञ्जक!!
दांभिकपणाबद्दल अगदी सहमत.

ललित आवडले , वाचल्याचे समाधान मिळाले, धन्यवाद :)

सविता००१'s picture

22 Jan 2015 - 10:59 am | सविता००१

ललित लेखन. आवडलं.

पैसा's picture

22 Jan 2015 - 11:04 am | पैसा

छान लिहिलंय. पण व्यवहारात इतकं निर्भेळ नातं मिळणं आणि टिकणं फारच कठीण असतं.

जरा पोसितीव थिंक ग पैका टाय :)

पैसा's picture

22 Jan 2015 - 11:09 am | पैसा

'कठीण' म्हटलंय बाळ्या, 'अशक्य' नाही!

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 12:08 pm | मदनबाण

छान !

जाता जाता :- चला... बाजारात आता बासरी शोधणे आले ! ;)
{गोपी किशन } ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }