टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
धोंडोपंतांचे हार्दिक अभिनंदन
वरुणराजाच्या कृपेने महाराष्ट्रावर जे दुष्काळाचे सावट आले होते ते आता बरेचसे दुर झाले असुन धरणे, तळी, विहीरी भरु लागले आहेत. बळीराजा केलेली पेरणी वाया जाणार नाही या आशेने सुखावला असुन काही ठिकाणी खरिपाला जरी नुकसान सोसावे लागत असेल तरी रब्बी हंगाम मात्र चांगला असेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मध्यंतरी शेतक=याप्रमाणेच शहरी लोक सुद्धा हवालदिल झाले होते कारण पिण्याच्या पाण्याची समस्या उग्ररुप धारण करत होती.
नेहमी वेळेवर येणारा पाउस अचानक रुसला होता. त्याचे कारण समजत नव्हते.
अशावेळी धोंडोपंतानी त्यांच्या पाशी असलेले गुढ ज्ञान त्याचा योग्य वापर करुन कारण मिमांसा करुन दिलासा दिला की पाउस येणार. विवक्षित काल खंडानंतर पाउस नक्कीच येणार.
आम्ही धोंडोपंतानी सांगितल्यावर निश्चिंत झालो कारण आमचा जेवढा धोंडोपंतांवर विश्वास त्याहुन अधिक त्या गुढ ज्ञानावर .....
काही जणांनी नेहमी प्रमाणे पिचका-या मारल्या पण त्यांचे देव भले करो. ते समजत नाहीत की कोणत्या काळी काय करणे गरजेचे असते. असो.
धोंडोपंताना शुभेच्छा व असेच देवकार्य करण्या साठी त्यांना उदंड आयुष्य लाभो हि प्रार्थना
(के पी तज्ञ) नाना
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

येस्स!
येस्स!
शनिमंगळ युती संपल्यानंतर अगदी भरपूर पाऊस पडेल असं पंतांनी म्हटल्याचं मलाही आठवतंय!
असो, पंतांचे, नान चेंगटांचे आणि वरूणराजाचे, तिघांचेही हार्दिक अभिनंदन...
तात्या.
अगदी हेच
अगदी हेच म्हणतो !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
+१
वा नाना ....
तुमच्याशी सहमत....
पंतानी पुर्वीच हे भविष्य वर्तवलेले होते. असो, पंतांचे हार्दिक अभिनंदन...
अवांतरः पावसाप्रमाणे मार्केट केंव्हा बरसणार ते पंताना विचारले पाहीजे.
विद्याधर
प्रश्न?
पण शनी-मंगळाची युती होती तेव्हाही (आठवा मान्सूनच्या सुरुवातीचे दिवस) कोकणात, मुंबईत कसा काय पाऊस पडला? तिकडे उत्तरेला कसा काय पूर आला? तिकडे तर म्हणे आपलेच पावसाचे ढग गेले, कमी दाबाचा पट्टा उत्तरेला सरकला म्हणून! तिथून पण शनी-मंगळाची युतीच दिसत असणार (म्हणजे मी जाऊन पाहिलं नाही पण माझं सामान्य ज्ञान पाजळून घेते.)!
(गोंधळलेली) यमी
उत्तर
पण शनी-मंगळाची युती होती तेव्हाही (आठवा मान्सूनच्या सुरुवातीचे दिवस) कोकणात, मुंबईत कसा काय पाऊस पडला?
आभाळातुन
तिकडे उत्तरेला कसा काय पूर आला?
पावुस खुप पडला तर खुप पुर येतो असे जाणकार सांगतात
तिकडे तर म्हणे आपलेच पावसाचे ढग गेले, कमी दाबाचा पट्टा उत्तरेला सरकला म्हणून!
हे युपी बिहार वाले सगळ आपलच पळवतात. यावेळेस ढग पळविले काय? राजला सांगतोच
तिथून पण शनी-मंगळाची युतीच दिसत असणार (म्हणजे मी जाऊन पाहिलं नाही पण माझं सामान्य ज्ञान पाजळून घेते.)!
हं जावुन पहायला हव होत
(स्थिरबुद्धी) नाना
लोकांच्या
लोकांच्या शंकांना स्वघोषीत शास्त्राच्या शास्त्रज्ञांकडून असलेच उत्तर अपेक्षीत होते. अभिनंदन!
शनी-मंगळाच
शनी-मंगळाची युतीची फळे काही पावसापुरतीच असतात काहो?
बाकी फळे पाहीली नाहित का?
बेंगलुरु आणी अहमदाबाद स्फोट..
शेअर बाजार्....इ..
विद्याधर
शनी
शनी मंगळाची फळे भारतातच मिळतात का हो? बाकिच्या देशांत कसली फळे मिळतात?
ईजाभौंची
बाकिच्या देशांत कसली फळे मिळतात?
तिकडे विजुभौ एप्रिलफळे एक्पोर्ट करतात .. बारामाही फळांचे व्यापारी विजुभौ (एप्रिल)फळवाला
माहीतीगार )
टार्या टपरीवाला
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
मुमुक्षांच्या यज्ञात आपण क्ष ज्ञ
यमे पाउस एल नीनो वगैरे मुळे पडत नाही
तो फक्त शनी मंगळामुळे पडतो.
थोरांचे ज्ञानीयांचे म्हणणे आहे हे विसरतेस काय
असो आपण सारे अज्ञानी. या मुमुक्षांच्या यज्ञात आपण क्ष ज्ञ ही ठरत नाही.
गोंधळलेला विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
विजुभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे.
-शनी-मंगळ युतीचा विरोधी पक्षनेता
चंबू गबाळे
विजुभौ
यमे पाउस एल नीनो वगैरे मुळे पडत नाही
पाऊस एल नीनो मुळे नाहीच पडत, पाऊस 'वगैरे' मुळे पडतो, उदा: ढग, आर्द्रता, वारे, डोंगर, तापमान, इत्यादी, इत्यादी!
तो फक्त शनी मंगळामुळे पडतो. थोरांचे ज्ञानीयांचे म्हणणे आहे हे विसरतेस काय
बिलकुल नाही. पण तो एक बाप माणूस होऊन गेला ना, आयझॅक न्यूटन, तो असं म्हणायचा की दुसरा म्हणतो म्हणून फक्त होकारात हो मिसळू नका; असं का असा प्रश्न विचारा. स्वतःला नाही उत्तर सापडलं तर ज्याला माहिती आहे त्याला विचारा, पण जोपर्यंत पटेल असं उत्तर मिळत नाही* तोपर्यंत 'ज्ञानी' माणूस म्हणतो म्हणून होकारात हो मिसळू नका. (हे मूळ वाक्याचं स्वैर रुपांतर आहे.)
पण मुद्दा असा की कोणी मोठ्ठा माणूस म्हणतो म्हणून गोष्ट खरी असतेच असं नाही! त्यामुळे मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी प्रश्न विचारणार! आता प्रश्न विचारणं म्हणजे ज्ञानी माणसाला आव्हान देणं वाटत असेल तर त्यांनी तसं समजावं. मला विचाराल तर माझ्या डोक्यात किडा गेलेला आहे. आता उत्तर मिळेपर्यंत माझं "काका" सुरू रहाणार!
बाकी ते मुमुक्षू काय, क्ष ज्ञ काय मला कल्ला नाय, तवा खरड पाठवावी ही विनंती!
* till the answer does not boil down to the first principle
अवांतरः पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे.
भौ, तुमच्या बॉलिंगला सिक्स बसलेली आहे!
आणखी एक अवांतरः भौ तुम्हाला ज्ञान म्हणायचं होतं का माहिती, ज्ञानी म्हणायचं होतं का माहितगार?
(विडा न आवडणारी) यमी / अदिती
'नाना
'नाना चेंगट' हा आयडी कुणाचा आहे हे ह्यातुन स्पष्ट व्हावे. वेळोवेळी डुप्लिकेट खाती कुठली ही दाखवुन देणारे संपादक मंडळ 'नाना चेंगट' हा आयडी कुणाचा आहे हे सभासदांच्या विनंतीवर अघड करेल का?
बगाराम
हीच गोष्ट आपल्याबाबतही म्हणता येईल ना मिश्टर बगाराम आणि आमच्या बाबतीतही म्हणता येईल.
जोपर्यंत एखाद्या आयडीकडून उपद्रव केला जात नाही तोपर्यंत हे उघडाउघडीचे खेळ करण्याची गरज नाही.
उपद्रवाची
उपद्रवाची आपली व्याख्या काय? समजात अंधश्रद्धा फैलावणे हा उपद्रव नाही का?
अंधश्रद्धा का विनोद?
बगारामभौ,
उपद्रवाची आपली व्याख्या काय? समजात अंधश्रद्धा फैलावणे हा उपद्रव नाही का?
अजुनपर्यंततरी महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा झाला नाही आहे.
आणि नानांचा माझ्या वरच्या प्रतिसादाला जो उत्तररूपी प्रतिसाद होता तो तुम्हाला भलताच विनोदी नाही का वाटला? मला तरी वाटला, मी त्यावर हापिसात बसून खोखो हसले आणि वर बरोबरच्यांना (खगोलशास्त्रात करीयर करणाय्रांना) तो विनोद म्हणून सांगितलाही!
आता त्यांचा (नाना आणि इतरही कोणी असले तर) जर ज्योतिषावर विश्वास असेल तर असू द्यात, आणि तुमचा नसेल तर तसं म्हणा. मिपावर माझ्या माहितीत सर्वच सदस्य असे आहेत की ज्यांना स्वतःचं भलं-बुरं समजतं. त्यामुळे त्यांना विश्वास ठेवायचा असेल तर ते ठेवतील नाही तर नाही ठेवणार! आणि तुम्हाला जर का फारच त्रास होत असेल अशा प्रतिसादांचा तर त्यांच्यावर हसायला शिका. म्हणजे त्रास होणं तर सोडाच पण उलट हसण्याचा फायदाच होईल. आता आपले विजुभौ पहा कशा गंमतीदार कमेंट्स पास करतात ... मी पण त्यांच्याकडूनच हसायला शिकले! (थ्यांकू विजुभौ)
तेव्हा chillax!
यमी
धन्यवाद
धन्यवाद आदिती...
तुझ्या स्पोर्टिंग स्पिरिट्बद्दल....
विद्याधर
विद्यार्थी स्पिरीट
हे स्पोर्टींग स्पिरीट नसून विद्यार्थी स्पिरीट आहे! हा खेळ्/भांडण थोडीच आहे स्पोर्टींग स्पिरीट दाखवायला?
अहो विज्ञान शिकायचं तर तेवढंतरी शिकायला पाहिजे ना मला! आणि हे पहा, मी समजा अगदी कंठशोष केला की हे खोटं आहे वगैरे, तरी विश्वास ठेवणारे काही बदलणार नाही आहेत ... आणि हे खोटं आहे असं म्हणायला मी थोडीच ते फलज्योतिष शिकले आहे?
आम्ही (म्हणजे मी एकटी नाही) जेव्हा एखादा सेमिनार देतो किंवा ऐकतो तेव्हा आम्हाला थोडीच त्या विषयातलं सगळं माहित असतं. जेव्हा आम्ही सगळे ऐकतो, तेव्हा जर बोलणाय्रावर विश्वास नाही बसला तर तसं नाही म्हणू शकत कारण पुरावा काय? शिवाय मला कुठे जगातली प्रत्येक विषयावरची माहिती आहे? पण प्रश्न तर विचारता येतात ना, माहिती मिळवता येतेच ना प्रश्न विचारून? फारतर काय "तू माठ आहेस, तुला अक्कल नाही असं म्हणतील", नाहीतर उत्त्तरं देतील! तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं काय यावरून मांडलेला विषय/शोध्/विचार आणि तो मांडणारापण खरा का खोटा हे ज्याचं तो ठरवतोच ना!
त्यामुळे मला असं उत्तेजित होणं पटत नाही! आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात chillax होणं तर कधीही चांगलंच नाही का?
(माहितीप्रिय) यमी/अदिती
अवांतरः माझं नाव आआआअदिती नाही अदिती आहे! अ, अळूवडीचा, आल्याचा नाही!
सहमत
अतिशय योग्य प्रतिसाद
यमीताईंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे(सरळ भाषेत) मिळतील अशी आशा आहे.
(साधा-भोळा) - चंबू गबाळे
-पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे.
अदिती, आत्त
अदिती,
आत्तापर्यंत मी असे बघितले आहे की माणूस हा मूलतः अंधश्रद्धाळूच आहे. कोणाची फलज्योतिषावर अंधश्रद्धा, तर कोणाची विज्ञानावर. बहुतेक वेळा असे दिसले आहे की ज्यांचा विश्वास नाहिये ते फक्त 'ह्यॅ, असं कुठे असतं का?' एवढंच म्हणू शकतात, म्हणजे ते सुध्दा काही अभ्यास वगैरे करून मग ठरवत नाहीत. तू असं लिहिलं आहेस की खोटं आहे असं म्हणायला मी कुठे फलज्योतिष शिकले आहे, हे मला आवडले. ही खरी वैज्ञानिक वृत्ति. जो पर्यंत मी स्वतः अभ्यास करत नाही किंवा कोणा दुसर्याच्या निष्कर्षावर विश्वास ठेवत नाही तो पर्यंत खरं किंवा खोटं मानणे चुकीचे आहे.
तुझ्या प्रतिसादात मला काय आवडले ते सांगण्यासाठी हे लिहित आहे. वरील मूळ चर्चा विषय किंवा फाटे फुटलेल्या चर्चा विषया वर मला काहिही टिप्पणी करायची नाहिये.
बिपिन.
नाना एक सांगा....
नाना एक सांगा,
धोंडोपंतांनी वर्तवलेले भविष्य जर खोटे ठरले असते तर तुम्ही काय केले असते?
१. इथे टॉपिक काढून तसे सांगितले असतेत का?
२. तुमचा धोंडोपंतांवर असलेला व गुढ विद्येवरील विश्वास उडाला असता का?
अभिज्ञ.
उलट्या अर्थाने लिहिलेला लेख?
चर्चाप्रस्तावकाचा अर्थशास्त्राबद्दलचा अभ्यास दांडगा आहे.
त्यांनी मागे अमेरिकेतील गृह-बाजारातील अर्थशास्त्रीय दोष दाखवून देणारा एक तपशीलवार लेख लिहिलेला होता, तो माझ्यासह अनेकांनी अभ्यास करून वाचला.
तरी हे लक्षात घेणे योग्य आहे, की अमेरिकेतील गृहबाजार पडण्याचे वेगळे कारण ज्योतिषी श्री. मोतियानी सांगतात. (इंडियापोस्ट दुवा). या वर्षाच्या सुरुवातीला गुरू धनुराशीत होता, आणि काही प्रमाणात नकद धन लोकांकडे होते (अमेरिका सरकारने आयकरखात्यातर्फे सर्वांना ३००-६०० डॉलरचा चेक पाठवला.) मे ९ तारखेपासून गुरू "रेट्रोग्रेड" (वक्रीत?) गेला. अर्थात गुरू नकद धन सुकवणार होता - बाजार ढासळणे अपेक्षितच होते. ज्योतिषी श्री. मोतियानी वर्तवतात की हा प्रकार या सप्टेंबरपर्यंत तीव्र होत राहील. (इंग्रजी पाठ्य खाली देत आहे).
आता मला मोठा प्रश्न पडला आहे की मागे अमेरिकेच्या गृहबाजाराबाबत तो अर्थशास्त्रीय लेख मी गंभीरपणे वाचला, ती मी चूक केली काय? श्री. मोतियानी यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत - त्यांच्या ज्योतिषाच्या यथार्थ विश्लेषणावर वायफळ अर्थशास्त्रीय लेख निरर्थक पिंक मानावी काय? किंवा अकलेचे तोडलेले तारे मानावेत काय? गुरूची दशा संपल्यानंतर निश्चिंती होईल असे ज्योतिष सांगत असताना कोणी उगीच अर्थव्यवस्थेबद्दल शंका-कुशंका का काढाव्यात?
तो अर्थशास्त्रीय लेख तपशीलवार लिहिला असल्या कारणाने तो विडंबनात्मक नसावा असे मला वाटते. हा त्रोटक चर्चाप्रस्ताव उलट अर्थाने लिहिला असल्याची शक्यता मला अधिक वाटते. खरेखोटे चर्चाप्रस्तावकच सांगू शकतील.
------
(चर्चाप्रस्तावाबद्दल "शो मी द डेटा" म्हणणारा धनंजय)
------
--वरील दुव्यावरील लेखातले अवतरण--
The raging mortgage crisis, Motiani had told a newspaper in December, is the biggest financial disaster cover up in the history of financial institutions. Confirming the recessionary trends in the US economy, Motiani said, "The cosmetic efforts of marginally lowering interest rates are of no use, because the people facing foreclosure cannot afford to pay any mortgage anyway." The showdown will begin May onwards and through September, people will really feel the pinch, he foresees.
"There are astrological reasons for it -- Guru (Jupiter) is transiting in dhanu (Sagittarius) raashi right now and it will be retrograde in its own house from May 9 onwards, where it will become neech. Jupiter being the planet of financial liquidity, right now the government is providing the liquidity by cutting down the interest rates and doling out checks to taxpayers, but for how long can they do it? Only, as long as Jupiter is in direct position in Sagittarius; but when it becomes retrograde in May, Jupiter will suck away all the liquidity from the financial world. Hence, will be a major decline in stock market." Incidentally, in a television interview, Motiani had predicted that interest rates would be cut in January, which has come true.
Jupiter being the planet of
Jupiter being the planet of financial liquidity, right now the government is providing the liquidity by cutting down...
याचा अर्थ असा लावायचा का की गुरू हा रोखतेचा ग्रह असल्यामुळे (मला शिकवलं गुरू वायूचा बनलेला आहे, पण हा "विनोद" नंतर करता येईल) सरकार रोखता पुरवत आहे ....
सरकार काही आकाशात किंवा पंचांगात पाहून रोखता पुरवत नसावं (माझा अंदाज)!
श्री. मोतियानी यांनी काही सांगून ठेवलं असेल आणि नंतर ते खरं झालं (असेल)! पण यामध्ये गुरू प्रत्यक्षरित्या काही करत असेल, करू शकत असेल असं मला वाटत नाही, वाटायचं कारणंही नाही (याचं स्पष्टीकरण लिहिण्यासाठी मागणी असेल तर एक लेख लिहू शकते). त्यामुळे मला असं वाटतं की फलज्योतिष (ज्योतिष नव्हे) हे संख्याशास्त्र आहे. आणि जेवढ्या वेळा योग्य भाकितं केली गेली असतील त्याच्या काही प्रमाणात भाकितं खोटीही ठरली असतील. त्यांना प्रसिद्धी मिळालीच असेल असं नाही.
हा पाऊस सुरू व्हायच्या आधी जर आपली (सरकारची आणि शास्त्रज्ञांची) सिद्धता असती तर कृत्रिम पाऊस पाडता आला असता. (असे प्रयोग म्हणे ऑलिंपिक नगरीतही झाले किंवा होणार होते). मग त्याचं स्पष्टीकरण काय झालं असतं?
आणि इथला मुद्दा: शनी-मंगळाची युती झाली की काहीतरी वाईट होतं (असाच काहीसा)! आणि याला उदाहरणं पाऊस उशीरा लागला, बाँबस्फोट झाले इत्यादी! मला प्रश्न असा पडलाय की कोणाचं वाईट होतं. या ग्रहावर दुसय्राचं वाईट झालं की आनंद मानणारेही लोक आहेत. आपल्याकडे स्फोट करवणाय्रांना तर या गोष्टींचा आनंदच झाला असणार. त्यांच्यासाठी या गोष्टी चांगल्याच होत्या.
किंवा मनमोहन सिंग किंग ठरले याचा काहींना आनंद झाला काहींना दु:ख! पण शनी-मंगळाची युती तर सर्व पृथ्वीवरून तशीच होती, गुरूचं वक्री होणं हे सगळ्या जगात सारखंच होतं. (नाना, मी स्वतः जाऊन ते पाहिलं नाही तरी गणित करून ते सहज सिद्ध करता येईल.) मग परिणाम काहींसाठी चांगले, काहींसाठी वाईट असे का?
जसं सोडीयम पाण्यात टाकलं तर ते "नाचून", स्फोट करून आम्ल तयार होतं आणि सोडीयम क्लोराईड पाण्यात टाकलं तर ते विरघळतं. जगात कुठेही जा, हे बदलत नाही, तशा या गोष्टी वाटत नाहीत. म्हणून हे मान्य करावंसं वाटत नाही. (again first principle issue) म्हणून एवढे प्रश्न!
राहता राहिला नानांनी लेख का लिहिला हा प्रश्न ... तो ही माझ्यासाठी अजूनतरी अनुत्तरीतच आहे.
अदितीबाई,
जसं सोडीयम पाण्यात टाकलं तर ते "नाचून", स्फोट करून आम्ल तयार होतं
सोडियम पाण्यात टाकलं तर आम्ल होत नाही, अल्क (NaOH) तयार होतं. या क्रियेत हायड्रोजन वायू मुक्त होतो ज्याचं हवेबरोबर मिश्रण झालं आणि ठिणगी पडली तर स्फोट होतो......
बाकी तुमचं चालू द्या....

फार मनोरंजक चर्चा आहे....
रसायनशास्त्राचा विद्यार्थी,
पिवळा डांबिस
स्वारी! मी
स्वारी! मी आता रसायनशास्त्र सोडून बरेच दिवस झाले आहेत. आणि मी एवढा विचार नाही केला त्याचा लिहिताना. (वि)स्मरणशक्तिवर उगाच, नको तेवढा, भर दिला.
थ्यांकू!
(एकूणच विद्यार्थी) यमी/अदिती / संहिता वगैरे, वगैरे, वगैरे!
चालु द्यात
लगे रहो!
(ज्योतिषी)
प्रकाश घाटपांडे
खरं आहे!
खरं आहे! शनी मंगळ युती तुटल्या पासुन मला शौचाला देखिल साफ होते आहे.
धोंडोपंतांचे हार्दिक अभिनंदन!!!
बैलोबा
:)
>>शनी मंगळ युती तुटल्या पासुन मला शौचाला देखिल साफ होते आहे.
एकदम खवाट टाकला ...
माझं अजुन तसे नाही बाबा, राशीत दहावा गुरु असेल तर असे होते काय ?
शांती करतो आता.
हहापुवा
खरं आहे! शनी मंगळ युती तुटल्या पासुन मला शौचाला देखिल साफ होते आहे.
धोंडोपंतांचे हार्दिक अभिनंदन!!!
)
शौचाला साफ झाली म्हणून...
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे.
शनी मंगळ
शनी मंगळ युती तुटल्या पासुन मला शौचाला देखिल साफ होते आहे.
तो योगायोग समजा.
शनी मंगळ युती नसते तेंव्हा तुम्ही काय तसेच बसता काय?
कृपया थट्टा करताना विषय सोडुन वर्मी लागेल असे शब्द वापरु नयेत
पंत हे एक वयोवृद्ध गृहस्थ आहेत. घरात असणार्या आजोबाना आपण असे बोलतो का?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
?
कृपया थट्टा करताना विषय सोडुन वर्मी लागेल असे शब्द वापरु नयेत
हीच गोष्ट नाना चेंगटला समजावून सांगू शकता काय?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे.
अरेच्च्या
नमस्कार,
आता काय झालं आणि काय नाही , कोण काय बोललं ? कोणाचं खरं झालं ?
याचा विचार करुन ( किंवा वाद घालून ) काही फायदा आहे का ? आपण सर्वजण दुष्काळाच्या एका संकटातून वाचलो एव्हढं पुरेसं नाही का?
बाकी शनी मंगळ युती तुटल्या पासुन मला शौचाला देखिल साफ होते आहे.
लय भारी
आपला ( ????? )
संतोष.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
का नाही?
याचा विचार करुन ( किंवा वाद घालून ) काही फायदा आहे का ? आपण सर्वजण दुष्काळाच्या एका संकटातून वाचलो एव्हढं पुरेसं नाही का?
मान्य!
पण शनी-मंगळामुळे पाऊस अडला होता का नव्हता, साधारण या विषयावर चर्चा सुरू आहे. आता तर दुष्काळ असला तरी खूपच सुसह्य असेल आणि खरीपाचं पीक तर जवळजवळ गेलंच आहे. मग परसात बसून नुसता तमाकू मळायच्या ऐवजी मराठी बाण्याला जागून चर्चा केली तर काय बिघडतं?
आणि सरळसाधे प्रश्न विचारले, माहितीवृद्धी करण्याचा प्रयत्न केला तर काय पावसाचे ढग पळून जात नाहीत ना?
बाकी शनी मंगळ युती तुटल्या पासुन मला शौचाला देखिल साफ होते आहे.

युती असताना त्रिफळा चूर्ण घ्या, नाहीच तर जमालगोटा सुद्धा घेऊन पहा! (मी तर युती तुटल्यावर थोडी आजारी झाली आहे, त्या आंद्यामुळे!)
(माहितीप्रेमी) अदिती!
बाकी शनी मंगळ युती तुटल्यामुळे
नेमबाज अभिनव बिंदाने अचूक नेम साधला
राणेंनी पक्ष सोडला
दलाई लामा फ्रान्स भेटीवर गेले
सायना नेहवालचा झंझावात सुरू झाला
श्रीलंकेने मालिका जिंकली
दिल्लीत हाय अॅलर्ट घोशित
बँकेची कर्जे आणखी महागली
दहीहंड्या रस्त्यावरच बांधणार
शाहिद - करिना परत दुरावले
पावसाची नेमबाजी सुरूच
(छ्त्री कुठे हरवली...कोण सांगेल ) अर्चिस
वेल डन!
शाहिद - करिना परत दुरावले, राणेंनी पक्ष सोडला तर
चांगलं झालं का वाईट? आणि कोणासाठी??
दहीहंड्या रस्त्यावरच बांधणार
हे चांगलं?
आणि सानियाच्या मनगटाच्या दुखापतीबद्दल काय हो अर्चिसभौ? आणि मी आजारी पडले आज सकाळी त्याचं काय?
ठराव संमती व इतिवृत्त
मंडळी, मिसळपाव विविध कार्यकारी संस्थेच्या सदस्याने सादर केलेला धोंडोपंताच्या अभिनंदनाचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला आहे असे आम्ही जाहिर करुन त्याप्रमाणे इतिवृत्तात नोंद करण्यात येत आहे.
ज्याप्रमाणे ग्रामपंचायत, विकास सोसायट्या तसेच कंपन्यांच्या ठराव संमतीच्या वेळेस खेळीमेळीचे वातावरण असते तसेच विषयाला अनुसरुन व विषयाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टींची चर्चा होत असते व त्यानंतर ठराव मंजुर होत असतो, तेच वातावरण या ठरावाच्या वेळि होते हे आम्ही येथे सागु इच्छितो.
ठरावाच्या बाजुने पडलेली मते
१ नाना चेंगट
२ विसोबा खेचर
३ आन्या नावाचा बैल
४ विद्याधर३१
५ प्रकाश घाटपांडे (यांनी चालु द्या असे सांगुन मुक संमती दीली)
ठरावाला तटस्थ
१ यमी (यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले पण मुख्य ठराव कि धोंडोपंतांचे अभिनंदन करायचे किंवा नाही याबद्दल काहिच मत न दिल्यामुळे तटस्थ)
२ धनंजय (यांनी प्रस्तावकाच्या हेतुविषयी शंका उपस्थित करुन माननीय सदस्यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला पण मुख्य ठराव कि धोंडोपंतांचे अभिनंदन करायचे किंवा नाही याबद्दल काहिच मत न दिल्यामुळे तटस्थ)
ठरावाच्या विरोधी मत
आम्ही इथे हे आनंदाने नमुद करु इच्छितो की, धोंडोपंतांचे अभिनंदन करु नये असा सुर कुणिही लावला नाही. धोंडोपंताच्या ज्ञानाबद्दल तसेच ज्योतिषविद्येबद्दल कुणाला शंका असु शकतात पण त्यांचे अभिनंदन करुच नये असा करंटा सुर कुणीही लावला नाही.
बाद मते
वरिल नावांव्यतिरिक्त मते ही प्रोक्सी वेळेवर न देणे, स्टैंप कमी किमतीचा लावणे, रजिस्टर मधे नाव नसणे तसेच हजेरी पुस्तकात केलेली सही न जुळणे या विविध कारणांनी बाद झाली आहेत. यावर आमचा निर्णय अंतिम आहे.
यामुळे हा प्रस्ताव ५ विरुद्ध ० अशा दणदणीत बहुमताने संमत झाला आहे हे आम्ही जाहिर करतो व धोंडोपंतांचे पुनश्च त्रिवार अभिनंदन करतो व त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो.
आभार
या प्रस्तावा दरम्यान यमुताइ यांनी विविध मुद्दे आणले. प्रथम दर्शनी ते मुद्दे जरी योग्य असले तरी या प्रस्तावाशी त्यांचा काहिहि संबंध नसल्याकारणाने नर्म विनोदाने आम्ही ते बाद केले आहेत. यमुताईंनी त्यांना आवडेल अशा पद्धतीने नवीन प्रस्ताव आणावा. त्या प्रस्तावानुसार साधक बाधक चर्चा करुन निर्णय घेता येइल. हा प्रस्ताव केवळ आणि केवळ धोंडोपंताच्या अभिनंदनाचा असल्यामुळे इतर विषय यावेळेस चर्चा करणे शक्य नाही. ठराव कामकाज पद्धतीची यमुताईंना जाण असल्याने त्या हा आग्रह धरणार नाहीत अशी खात्री आहे.
धनंजय हे मागील काही काळ आमच्या विरोधात असल्याने व आज जरी शरीराने ते आज आमच्या बरोबर असले तरी कधी कधी ते मनाने मागे जातात व आमच्या हेतुंविषयी शंका घेतात. पण आज त्यांची खात्री झाली असेल की आम्ही वक्रोक्ति कधीही करत नाही.
असो. मंडळी वेळ बराच झाला असुन आपले मुख्य काम ठराव संमत करण्या चे पुर्ण झाले असुन सभा संपन्न होत आहे.
यानंतर राष्ट्रगीत होईल, सर्वांनी गडबड गोंधळ न करता उभे राहुन एकसुरात राष्ट्रगीत म्हणावे. त्यानंतर महिला व लहान मुले आधी बाहेर जातील. तरूण मुले सर्वात शेवटी जातील. या सभेदरम्यान जे उशीरा आले ते सतरंज्या नीट गोळा करतील व नीट कुलुप लागल्याची खात्री करुन घरी जातील. गाड्या नीट चालवुन स्वतःच्याच घरी नीट जा आपली कुणीतरी वाट पहात आहे याची जाणिव असु द्या.
जय हिंद जय महाराष्ट्र
आता राष्ट्रगीत .......
(कंपनी कायदा, सोसायटी कायदा, सहकार कायदा कोळुन प्यायलेला व गावापासुन जिल्हयापर्यत राजकारणात मुरलेला) नाना चेंगट पा.
बहिष्कार
यामुळे हा प्रस्ताव ५ विरुद्ध ० अशा दणदणीत बहुमताने संमत झाला आहे हे आम्ही जाहिर करतो
नानाकाका, आम्हाला वाटलं की इतरांनी बहिष्कार घातला हो तुमच्या निवडणुकांवर. मिसळपावाची सदस्यसंख्या १००० च्या पुढे आणि प्रस्ताव ५-० च्या दणदणीत बहुमताने संमत -गंमतच की.
अंमळ गंमत
मिसळपावाची सदस्यसंख्या १००० च्या पुढे आणि प्रस्ताव ५-० च्या दणदणीत बहुमताने संमत -गंमतच की.
आम्हालाही अंमळ गंमतच वाटली. असो.
प्रश्नांचीसरळ उत्तरे न देता चर्चेला फाटे फोडण्याची पद्धत आवडली.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे.
नाना,
सभेचे इतिवृत्त आवडले!
एकदम शंकर पाटलांची 'मीटिंग' गोष्ट ऐकल्यागत वाटलं!
चतुरंग
:)
नान्या, धन्य आहे रे तुझी!
+१
धन्य आहे!
ठरावाला
ठरावाला तटस्थ व्यक्ती म्हणून माझे नाव देखील आम्ही वाचन मात्र होतो चर्चेमध्ये !!
जोतिष्यावर थोडाफार विश्वास आहे.. पण हस्तरेखा विभागात... धोंडोपंतावर विश्वास नाही कारण त्यांच्या विद्येचा मी अनुभव घेतला नाही त्यामुळे ... पण जाणकार व्यक्ती (तात्या, ईत्यादी मंडळी) म्हणत आहे की ह्या विषयात धोंडोपंताना खुप गती आहे !
त्यामुळे आम्ही तटस्थ !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
सभेचे जोरदार इतिवृत्त !!!
आम्हीही केवळ वाचनमात्र होतो त्यामुळे तटस्थ सभासदांत आमची गणना होऊ शकते.
आता प्रश्न ज्योतिष आणि पाऊस पडणे हा, तर त्याबाबतीत मी असं म्हणेन की मला ज्योतिषातलं काहीही कळत नाही.
त्यावर माझा विश्वास आहेही आणि नाहीही! म्हणजे जर ते प्रमाणवाक्य धरुन चाललं तर कदाचित निराशा पदरी पडू शकते. पण हेच जर एक सुचवणुक किंवा कार्याची दिशा म्हणून वापरलं तर कदाचित फायदाही होऊ शकतो. शेवटी ते आहे ते सगळं आडाख्यांवर अवलंबून!
आता उरतो मुद्दा धोंडोपंताचं अभिनंदन करावं की नाही हा.
तर त्यावर मी असं म्हणेन की, जर पंतांनी काही आडाखे बांधून पावसाची संभाव्य कालमर्यादा वर्तवली आणि नेमका त्याच वेळी पाऊस पडला तर पंतांचं ते विधान चुकीचं ठरेल का? "शनि-मंगळ' युत्यांबद्द्ल मला काडीचंही कळत नाही, पण धोंडोपंत जे बोलले ते घडलं, त्यासाठी त्यांनी भले कुंडली मांडली असेल किंवा वेधशाळेत बसुन रात्रंदिवस अभ्यास करुन पावसाची कालमर्यादा सांगितली असेल, तर त्यांच्या ह्या आडाख्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात मला स्वतःला तरी काही गैर वाटत नाही!
धोंडोपंत अभिनंदन!
- (तटस्थ सदस्य) ध मा ल.
आगायायायाया
नाना नाना नाना ... आवरा ... (संदर्भः सौजन्याची ऐशी तशी मधे नाना बेरक्याला ऊद्गारलेले)
जबराट ... सदश्य १६७२ आहेत बरका या घडीला .. त्यातले आपण १४०० निवडनुक पात्र समजू ..
त्यात ५-० ने एकतर्फी प्रचंड बहूमताने ईजय .. कॉगो नाना ..
आम्हीही यात तटस्थ आहोत.... नानांच ईतिपत्र जबराट ....
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
मला प्रतिसाद नक्की करा हं!
लेका इतिवृत्त कसे झाले हे तर सांगशील का नाही? का त्यातहि तटस्थ?
समसची भिक मागणारे आणि प्रतिसादांचा जोगवा मागणारे, दोघे ही सारखेच.
(हागणदारी*ला वैतागलेला) -सोकाजीराव
*मान्यताप्राप्त शब्दोच्चार
गुढ ज्ञानी
शनी-मंगळाची युती .........झाली. ठराव एकमताने (एकाच्याच मताने) संमत झाला.
एकाच ग्रहावर वास्तव्य असलेला अर्चिस
ठराव पास
शनी-मंगळाची युती .........झाली. ठराव एकमताने (एकाच्याच मताने) संमत झाला.
आम्हीही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे नाना यांचा १-० अशा एकमताने पाडाव झाल्याचे जाहीर करतो.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे.
इतीवॄत
इतीवॄत अगदी मस्त लिहीलये ,
त्याबद्दल ठराव करून नाना चे देखिल आभार मानाव म्हणतो .....
आपलाच ,
( ठरावीक )
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
आनंद
धोडोपंतांचे भाकित खर आल्याबद्द्ल आम्ही आनंद व्यक्त करतो.
http://www.misalpav.com/node/515#comment-6862
(स्नेही)
प्रकाश घाटपांडे
नाना
नाना
जोरदार इतिवृत्त
सगळया विरोधकांची तोंडे बंद
जबरदस्त कलाटणी
वा वा