ट्रॅप - ५

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
5 Jan 2015 - 2:22 pm

दिल्लीतील साऊथ ब्लॉक परिसरातील ऑफीसमधल्या आपल्या डेस्कवर बसून कॅप्टन नितिन देशमुख आपल्या समोरील कागदाच्या कपट्याकडे रोखून पाहत होता. आतापर्यंत किमान तीनवेळा त्याने तो कपटा वाचला होता. त्यावर एकच वाक्य लिहीलेलं होतं.

The Man on the terrace winked at the lady beside and thrown flowers at her!

एखाद्या सामान्य माणसाने ते वाक्यं वाचलं असतं तर त्याला एखाद्या कथेतील प्रसंगाचं वर्णन वाटलं असतं. पण कॅप्टन नितिनला मात्रं त्या वाक्याचा अर्थ बरोबर कळला होता.

"गुड मॉर्निंग कॅप्टन!"

एक मधुर स्वर त्याच्या कानावर आला. त्यासरशी त्याची समाधी भंग पावली. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं.

अर्चना खन्ना!
अस्सल पंजाबी सौंदर्याचा तडका!

नितिनचे वरिष्ठ अधिकारी कर्नल परमिंदर त्रिपाठी यांची अर्चना ही सेक्रेटरी होती. नितिन आपल्यावर लाईन मारतो याची तिला पूर्ण कल्पना होती. अर्थात ती देखिल त्याच्याबरोबर मनसोक्त फ्लर्टींग करत असे!

"म्हातारा आला नाही अजून?"

"नाही! आज लेट येणार आहेत बहुतेक!"

"बरं झालं! चल लेट्स गो आऊट फॉर लंच! माय ट्रीट!"

"ती तर तुला द्यावीच लागेल! काँग्रेच्युलेशन्स!"

"थॅंक्स! पण कशाबद्दल?"

अर्चना काही बोलणार त्यापूर्वीच बाहेर शिस्तीत पावलांचा आवाज आला! ही चालण्याची ढब दोघांच्याही चांगल्याच परिचयाची होती.

"शैतानका नाम लिया और शैतान हाजिर!"

नितिन हळूच उद्गारला. अर्चना हसू दाबत आपल्या जागेवर पळाली. तोपर्यंत कर्नल परमिंदर त्रिपाठी आत आले होते. नितिनने त्यांना कडक सॅल्युट ठोकला.

"अ‍ॅट इज कॅप्टन... पार्डन मी, मेजर देशमुख!"

"सर ??" नितिनने हळूच अर्चनाकडे पाहीलं. त्याचं प्रमोशन झालेलं होतं. अर्चनाने यासाठीच पार्टी मागितली होती!

"येस मेजर नितिन! यू हॅव बिन प्रमोटेड! काँग्रेच्युलेशन्स! इनफॅक्ट आपलं पूर्ण युनिट अपग्रेड झालं आहे. आय अ‍ॅम अ ब्रिगेडीयर नाऊ!"

"काँग्रेच्युलेशन्स सर!

मेजर म्हणून प्रमोशन झालं याचा अर्थ आता नो फिल्ड ड्यूटी! रोज अर्चनाचा सहवास मिळू शकणार होता.

"नाऊ बी ऑन युवर टोज! अर्चना गेट द कॉन्फरन्स रुम रेडी! ऑल्सो सेन्ड इन टू कॉफीज अ‍ॅन्ड पेस्ट्रीज!"

"ओन्ली टू सर?"

"येस! नितिन, लव्ह लेटर मिळालं?"

"येस सर!"

"कम ऑन देन! लेट्स गो टू कॉन्फरन्स रूम!"

मिलीटरी इंटेलिजन्स विभागाची कॉन्फरन्स रूम!

कॉन्फरन्स रूममधील प्रत्येक गोष्ट या खात्याच्या खर्चावर कोणतीही मर्यादा नसल्याची साक्ष देत होती. इथून बाहेर पडल्यावर परत येतील याबद्द्ल काही खात्री देता येत नाही, ज्यांच्या आयुष्याची शाश्वती नाही अशा लोकांच्या गप्पा, सूचना आणि चर्चा इथे होत होत्या. या कॉन्फरन्स रुममध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी होत्या. दिवसातून किमान दोन वेळा या रूमची इलेक्ट्रॉनिक तज्ञांकडून कसून तपासणी करण्यात येत होती. साऊंड्प्रूफ असल्याने आत उच्चारला गेलेला एक शब्दही बाहेर ऐकू येत नसे.

"व्हॉट डू यू मेक आऊट ऑफ द लव्ह लेटर?" थंडगार कोकाकोलाचे घोट घेत त्रिपाठींनी विचारलं.

"चायना हॅड अ‍ॅग्रीड ऑन गिव्हींग समथिंग टू पाकीस्तान!"

"दॅट इज प्रेटी क्लीअर! बट व्हॉट इज दॅट समथिंग?"

"नो आयडीया सर!"

"हाऊ अबाऊट न्यूक्लीयर रिअ‍ॅक्टर्स?"

"सर..??? चायनाकडे रेडी रिअ‍ॅक्टर्स नाहीयेत अ‍ॅज फार अ‍ॅज वी नो!"

"ऑफकोर्स नाहीयेत! बट चायना कॅन ऑल्वेज गिव्ह देम द डिझाईन!"

"येस सर!"

"यू विल रिमेंबर काही दिवसांपूर्वी आपल्या इस्माईल बेगने चीनची वारी केली होती. तुझ्या लाडक्या मित्राला भेटायला गेला होता तो!"

"माझा मित्रं सर? मेंग फेई का?"

"येस! आपल्या सोर्सकडून तशी बातमी मागेच आली होती. भारताच्या इस्ट कोस्टला जो आपला नवीन न्यूक्लीयर प्लांट येतो आहे, त्यात लागणार्‍या रिअ‍ॅक्टर्समुळे आपली न्यूक्लीयर कपॅसिटी अर्थातच भरपूर वाढणार आहे. हे बेगला कसं खपणार?"

"बट सर, तो न्यूक्लीयर प्लांट इलेक्ट्रीकल आहे ना?"

"ओह येस!" कर्नल...अंहं ब्रिगेडीयर त्रिपाठी खांदे उडवत म्हणाले. शैलेशला त्याचा अर्थ लगेच ध्यानात आला. वरकरणी जरी तो प्लांट इलेक्ट्रीसिटीच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार असला, तरी प्रत्यक्षात त्याचा उद्देश निराळाच असणार होता.

"अ‍ॅन्ड वी निड टू गेट अवर हॅन्डस ऑन दॅट डिझाईन! राईट?"

"नॉट ओन्ली दॅट नितिन! चायनातील आपल्या सोर्सच्या म्हणण्याप्रमाणे या रिअ‍ॅक्टर्सचं डिझाईन आणि पूर्ण फंक्शनिंग मॅन्युअल लवकरच त्याच्या हातात पडतील. अनफॉर्च्युनेटली त्याची मायक्रोफिल्म बनवणं शक्यं नाही! त्यामुळेतर हे काम जास्तंच रिस्की होणार आहे. त्या डिझाईनच्या जोडीला एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे! आपल्यापुढचा मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे हे सर्व भारतात कसं आणायचं हा! आपला कोणताही ऑफीसर आपण चायनामध्ये पाठवू शकत नाही फॉर द ऑब्वियस रिझन्स! आपला सोर्स हा मूळचा तिबेटी आहे. तो स्वतः भारतात येऊ शकत नाही!” हे पेपर्स नेहमीच्या कोणत्याही मार्गाने आणणं शक्यं नाही. चायनीज इंटेलिजन्सवाले डोळ्यात तेल घालून बसलेले असणार, सो वी हॅव टू फाईंड अ न्यू वे अ‍ॅज वेल अ‍ॅज कॅरीयर, अ पर्सन, समवन व्हूम चायनीज इंटेलिजन्स डोन्ट नो अ‍ॅट ऑल!"

त्रिपाठी बोलत असताना नितिन विचार करत होता. त्याच्या मनात एक भन्नाट योजना आकाराला येत होती. अर्थात यात प्रचंड धोका होता, यश मिळ्ण्याची जवळपास काहीही खात्री नव्हती, पण जर हा प्लान सक्सेसफुल झाला असता तर मात्रं धमाल येणार होती! या मार्गाने एखादी गोष्ट आणण्याचा कोणी विचार करेल हे चायनीज गुप्तहेरांच्या स्वप्नातही आलं नसतं!

"आय हॅव अ प्लान सर!"

नितिन शांतपणे बोलू लागला. आपल्या डोक्यातली योजना त्रिपाठींपुढे मांडण्यास त्याने सुरवात केली. त्याचं बोलणं पूर्ण झालं तेव्हा ब्रिगेडीयर त्रिपाठी त्याच्याकडे आSSS वासून पाहत होते!

“आर यू मॅड नितिन? हाऊ मच रिस्क इट इज? बी प्रॅक्टीकल! इज इट फिजीबल इव्हन इन वाईल्ड इमॅजिनेशन? ऑल्सो धिस विल टेक मिनिमम टू टू थ्री मंथस!"

"आय नो इट इज टाईम कन्झ्युमिंग सर! सक्सेसची शक्यता झिरो पर्सेंट आहे! पण सर, या मार्गाने एखादी गोष्ट स्मगल केली जाऊ शकते हे कोणाच्या डोक्यातही येणार नाही! फक्त एकच माणूस असेल ज्याला हे सर्व माहीत असेल! अ‍ॅन्ड द मॅन वुड बी....!”

नितिनने जे नाव घेतलं, ते ऐकून त्रिपाठी क्षणभर विचारात पडले. मग म्हणाले,

"वेल, लेट मी डिस्कस धिस विथ पी एम सर! मी उद्यापर्यंत तुला सांगतो! टिल द टाईम कीप युअर माऊथ शट! सध्या फक्त मी आणि आपले पंतप्रधान यांच्याव्यतिरिक्त आणखीन दोन व्यक्तींनाच याबद्दल माहीत आहे! बट आय कॅन नॉट टेल यू अ‍ॅट द मोमेन्ट !”

सुदेश चक्रवर्ती, निरंजन गुप्ता आणि अशोक सोळंकी आदित्यच्या केबिनमध्ये बसले होते. त्यांच्याबरोबरच आणखीन एक वक्ती मिटींगला हजर होती. तो होता जेम्स डिसूझा! अमेरीकेतील ऑरोरा या कंपनीचा डिसूझा हा सेल्स आणि मार्केटींग मॅनेजर होता. अमेरीका आणि युरोपनंतर भारतीय बाजारपेठेत पदार्पण करण्याची ऑरोराची मनिषा होती. मूळचा भारतीय असलेला डिसूझा त्याच कामगिरीवर भारतात आला होता. काही कामानिमीत्त मुंबईबाहेर असल्याने सक्सेना मात्रं या मिटींगला हजर नव्हते.

मुंबईत येण्यापूर्वी डिझूझाची सुदेश बरोबर मेल आणि फोनवरुन बरीच चर्चा झाली होती. सुदेशच्या सूचनेप्रमाणे डिसूझाने एक रफ प्रपोजल तयार करुन पाठवलं होतं. हे प्रपोजल आल्यावर सुदेशने ते काळजीपूर्वक इव्हॅल्युएट केलं होतं. एक-दोनदा त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तो दिल्लीला जाऊन सोळंकींनाही भेटून आला होता. प्रपोजल नीट वर्कआऊट झाल्यास क्रेडेन्ससाठी ते बरंच फायदेशीर ठरेल असं सोळंकींचं मत पडलं होतं.

वास्तविक सेल्स आणि मार्केटींग डायरेक्टर या नात्याने आधी सोळंकींनी डिसूझाशी चर्चा करणं हे योग्य ठरलं असतं. प्रपोजल फायनल होईपर्यंत प्रेसिडेंटना त्यात मधे पडण्याची आवश्यकता नव्हती. परंतु कोणत्याही बिझनेस प्रपोजल संदर्भात आपल्याला सुरवातीपासून इन्व्हॉल्व्ह करण्याची जॉईन झाल्यापासूनच आदित्यने सर्वांना सूचना दिली होती. त्या निमित्ताने आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकता येतील असं त्याचं मत होतं!

त्या संदर्भातील चर्चा करण्यासाठीच डिसूझा आज क्रेडेन्सच्या ऑफीसमध्ये आला होता.

सुरवातीला डिसूझाने ऑरोराबद्दल सर्वांना माहिती दिली. ऑरोराचं हेड ऑफीस अमेरीकेतील मॅसेचुसेट्समधील बोस्टनजवळ होतं. ऑरोराचं मुख्य खासियत होती ती एक्स रे मशिन्स बनवण्यात. ही एक्स रे मशिन्स थ्री डी बाय-लॅटरल ब्रेस्ट इमेजिंग प्रकारातली होती. स्त्रियांमध्ये वाढता प्रादुर्भाव असलेल्या स्तनांच्या कर्करोगाचं निदान आणि तपासणी करण्यासाठी या मशिन्सचा प्रामुख्याने वापर करण्यात येत होता.

ऑरोरासंबधीत थोडक्यात माहिती देऊन झाल्यावर डिसूझा म्हणाला,

"अमेरीका आणि युरोपनंतर इंडीयामध्ये उतरण्याची आमची इच्छा आहे! अर्थात इंडीयात उतरताना ऑलरेडी एस्टॅब्लीश असलेल्या कंपनीशी जॉईंट व्हेन्चुअर करुनच मार्केट्मध्ये एन्ट्री करणं योग्यं ठरेल असं आम्हाला वाटतं. दुसरं म्हणजे मशिन्सच्या पार्टसचं मॅन्युफॅक्चरींग आणि असेम्ब्लींग यापुढे भारतात करण्याचा ऑरोराचा प्लान आहे. अर्थात हे बोलणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात ते अतिशय कठीण आहे याची आम्हाला कल्पना आहे! त्या सगळ्या गोष्टी फॉर एक्झँपल लँड मिळवणं, प्लांट सेटप करणं, रॉ मटेरीयल मिळवणं आणि प्रत्यक्षात प्रॉडक्शन सुरू करणं हे आम्हाला करणं अशक्य नसलं तरी ते वेळखाऊ ठरेल. क्रेडेन्स गेल्या २५ वर्षांपासून ऑलरेडी इथे एस्टॅब्लीश्ड आहे. तुम्हाला ते सहज शक्यं आहे! त्या दृष्टीने हे प्रपोजल सर्वांनाच प्रॉफीटेबल ठरेल याबद्द्ल मला खात्री आहे!"

आदित्यने कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त न करता फक्त सोळंकींकडे पाहीलं. आजच्या मिटींगमध्ये मी फक्तं हजर राहणार आहे, सगळं डिस्कशन तुम्हीच करा असं त्याने आधीच सोळंकींच्या कानी घातलं होतं. सोळंकीनी सुदेशला खूण केली.

"मि. डिसूझा, तुमचं प्रपोजल ऑन पेपर जरी इंटरेस्टींग असलं, तरी प्रत्यक्षात ते वर्कआऊट करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. भारतात प्रॉडक्शन प्लान्ट उभा करुन प्रॉडक्शन सुरू करणं सोपं नाही. गव्हर्मेंटच्या अनेक परमिशन्स, लँड अ‍ॅक्वीझिशन, रॉ मटेरीयल असे अनेक फॅक्टर्स आहेत! हे सगळं वर्कआऊट झाल्यावर प्लान्ट सुरू होईल. याला निश्चितच काही काळ लागणार आहे! कॅन ऑरोरा वेट दॅट लाँग?"

"शुअर वी कॅन! नो इशूज ऑन दॅट फ्रंट! साधारण किती वेळ लागेल?"

"मिनीमम सहा महिने ते एक वर्ष!"

"दॅट्स फेअरली रिझनेबल फॉर अस! इथलं सगळं ग्राऊंडवर्क तुम्ही करा! इथलं प्रॉडक्शन सुरु होण्यापूर्वीच्या ज्या काही ऑर्डर्स येतील, त्यासाठी ऑरोरा कॅन फुलफील द ऑर्डर्स फ्रॉम अवर करंट प्लांट! एकदा इथलं प्रॉडक्शन सुरु झालं की तो इश्यूच येणार नाही!"

"इथलं प्रॉडक्शन सुरू होईपर्यंत रेव्हेन्यू कसा वर्कआऊट करणार?"

"इंडीयाचं प्रॉडक्शन सुरु होण्यापूर्वीच्या प्रत्येक ऑर्डरवर वी कॅन गिव्ह यू सर्टन पर्सेंटेज! यू ऑलरेडी हॅव सेल्स टीम हिअर! सो द ऑर्डर्स शुड नॉट बी अ‍ॅन इश्यू! एकदा प्रॉडक्शन सुरु झालं की मग काही इश्यूच नाही!"

"व्हॉट विल बी द प्रॉफीट मार्जिन देन?"

"वी कॅन वर्क दॅट आऊट! फिफ्टी फिफ्टी ऑर सिक्स्टी - फोर्टी!

"अ‍ॅन्ड व्हू गेट्स सिक्स्टी?"

"ऑफ कोर्स यू गेट मोअर शेअर हिअर!"

"अ‍ॅन्ड हाऊ अबाऊट एक्स्पोर्ट?"

"वेल, इफ डोमेस्टीक इज सिक्टी फोर्टी फॉर यू, फॉर एक्स्पोर्ट, इट वुड बी सिक्स्टी - फोर्टी इन अवर फेवर!"

"व्हॉट डू यू थिंक सर?" सुदेशने सोळंकीना विचारलं.

"मि. डिसूझा, तुम्ही फक्तं मशिनचं डिझाईन आणि टेक्नॉलॉजी आणताहात अ‍ॅन्ड स्टील यू आर आस्कींग फॉर फोर्टी पर्सेंट इन इंडीया! इथली सगळी इन्व्हेस्टमेंट जर आम्ही करणार आहोत तर दॅट्स नॉट फेअर डील!" सोळंकी म्हणाले.

"ओह वेल, वी कॅन नेगोशिएट दॅट! वि कॅन मेक इट सिक्स्टी फाईव्ह - थर्टी फाईव्ह ऑर इव्हन सेवंटी - थर्टी!" डिसूझा म्हणाला, "बट नॉट बिलो दॅन दॅट!"

"सेवंटी - थर्टी इज मिनीमम व्हॉट वी वाँट!"

"आय शुअरली कॅन डू दॅट!"

"अ‍ॅन्ड वी वाँट मोअर मार्जिन इन एक्स्पोर्ट अ‍ॅज वेल!"

"वेल.." डिसूझा क्षणभर थांबला, "वी कॅन शुअरली डू समथिंग देअर!"

सोळंकींनी आदित्यकडे दृष्टीक्षेप टाकला. त्याच्या चेहर्‍यावरची रेषही हलली नव्हती!

"आय थिंक आय कॅन मूव्ह अहेड विथ माय मॅनेजमेंट ऑन धिस?" डिसूझाने प्रश्न केला

"जस्ट अ मिनीट मि. डिसूझा!" आदित्यने पहिल्यांदा तोंड उघडलं, "हाऊ अबाऊट रोल रिव्हर्सल हिअर?"

"आय डिड नॉट गेट यू सर?

"लेट्स रिव्हर्स द रोल्स! तुम्ही इथलं मार्केट हँडल करा, आम्ही ओव्हरसीज करतो इंडीपेंडंटली! अ‍ॅन्ड लेट्स कीप द सेम मार्जीन रेशोज!"

शॉक्ड! डिसूझा वॉज शॉक्ड!

चक्रवर्तीदेखील थक्क झाला! सोळंकींनी प्रयत्नपूर्वक आपला चेहरा निर्विकार ठेवण्यात यश मिळवलं तरी त्यांची अवस्थाही फारशी वेगळी नव्हती. गुप्ता तर काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते.

"अं... वेल...बट वी आर ब्रिंगींग द टेक्नॉलॉजी!"

"ती आम्हीपण आणू शकतो! इफ यू वाँट टू मेक अ डील, इट हॅज टू बी फेअर फॉर बोथ पार्टीज! वी वाँट फिफ्टी पर्सेंट मार्जिन इन एक्स्पोर्ट!"

"आय मिन..अ‍ॅज आय सेड, मी शुअरली प्रयत्न करु शकतो! मि. सोळंकी... ?"

डिझूझा सोळंकींकडे पाहत म्हणाला. 'या माणसाला काहीतरी समजावून सांगा' असा स्पष्ट अविर्भाव त्यामागे दिसत होता.

"टॉक टू मी मि. डिसूझा!" आदित्यच्या आवाजाला धार आली, "एक्स्पोर्टमध्ये आम्हाला फिफ्टी पर्सेंट मार्जिन मिळणार असेल तरच हे डील होईल! यू आर स्मार्ट इनफ टू नो व्हाय! जर ऑरोरा असं प्रपोजल आणू शकत असेल तरच हे डील होईल! अदरवाईज आय् अ‍ॅम नॉट इंटरेस्टेड इन धिस थिंग!"

"आय अ‍ॅम सॉरी टू अपसेट यू सर्! लेट मी टॉक टू माय मॅनेजमेंट सर! बट आय थिंक वी कॅन डू समथिंग देअर! मे बी फिटी फाईव्ह - फोर्टी फाईव्ह!"

"मि. डिसूझा, डू यू थिंक यू आर पर्चेसींग स्टफ फ्रॉम अ स्ट्रीट हॉकर? फिफ्टी पर्सेंट मान्य असेल तर डील होईल, अदरवाईज वी आर वेस्टींग एव्हरीबडीज टाईम!"

खरंतर आदित्यला इतक्या कठोर शब्दांत बोलण्याची आवश्यकता नव्हती, परंतु मगाशी डिसूझाने सोळंकींना मध्ये घालण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा अहंकार दुखावला होता!

"प्लीज डोंट गेट अपसेट सर!" डिसूझा सावरुन घेत म्हणाला, "आय अ‍ॅम शुअर वी कॅन स्ट्राईक अ डील! इफ नॉट एक्झॅक्टली फिफ्टी, इट कॅन बी लिटील फ्लेक्सीबल लाईक फिफ्टी वन - फोर्टी नाईन ऑर समथिंग लाईक दॅट!"

"ठीक आहे!" आदित्यने जास्त ताणून धरलं नाही!

डिसूझा निघून गेला. त्याच्यापठोपाठ चक्रवर्तीही बाहेर पडला. ते गेल्यावर आदित्यने विचारलं,

"सोळंकी अंकल, वॉज आय अ बिट हार्श ऑन हिम?"

"अ लिटील बिट मोअर दॅन नीडेड बेटा! प्रॉस्पेक्टीव्ह क्लायंटशी इतकं कठोर होऊन चालत नाही कधीकधी!" सोळंकी त्याला समजावत म्हणाले.

"आय अंडरस्टँड!" आदित्य उद्गारला, "बट अंकल, आजच्या डेटला ऑरोराचं मॅन्युफॅक्चरींग चालतं ते अमेरीकेत! तिथले कडक कायदे, लँडची कॉस्ट - अगदी लीजवर असेल तरीही, लेबर कॉस्ट याच्याशी तुलना करता भारतातली त्यांची प्रॉडक्शन कॉस्ट पावपटही नाही! मशिनचा मार्केट रेट मात्रं तोच राहणार! ऑरोरावाले तो काही कमी करणार नाहीत! इथल्या मार्केटचा विचार केला तर किती ऑर्डर्स मिळतील तो भाग वेगळा. आय अ‍ॅम शुअर दे आर गोईंग टू फोकस मोअर इन ग्लोबल मार्केट! इन दॅट केस आपल्या हातात काय पडणार?"

"इट्स फेअर लॉजिक बेटा! पण आपल्याला फोर्टी फाईव्ह पर्सेंट पण चाललं असतं! दॅट ऑल्सो इज हँडसम मनी! उद्या जर ऑरोराने दुसर्‍या कोणाशी डील केलं तर वी विल बी लेफ्ट विथ नथिंग!"

"दॅट इज अ चान्स! बट गोईंग डाऊन टू मच ऑन मार्जिन ड्झ नॉट गो वेल विथ मी! आय हॅव अ फिलींग अंकल, ही विल कम बॅक टू अस ओन्ली!"

सोळंकी काहीच बोलले नाहीत, पण आदित्य ओव्हरकॉन्फीडंट आहे असं त्यांचं मत झालं होतं. क्रेडेन्सबरोबरच मार्केटमध्ये असलेल्या इतर कंपन्यांकडेही ऑरोरा चाचपणी करणार हे उघड होतं. त्यातील कोणतीही कंपनी थोड्या कमी मार्जिनमध्ये काम करण्यास तयार झाली तर हे काँट्रॅक्ट साहजिकच क्रेडेन्सच्या हातून जाणार होतं. त्यातच आदित्यच्या कठोर बोलण्याने डिसूझाचा इगो दुखावला गेला असावा अशी सोळंकींना शंका आली होती. हे काँट्रॅक्ट हातातून गेलं तर त्याला केवळ आदित्यच कारणीभूत ठरणार होता!

मोजून दोन दिवसात जेम्स डिसूझाची सुदेश चक्रवर्तीला मेल आली! ऑरोरा च्या मॅनेजमेंटकडून नवीन प्रपोजल आलं होतं!
डोमेस्टीक इंडीयन मार्केटमध्ये पन्नास टक्के समान भागीदारीत आणि एक्स्पोर्टमध्ये अठ्ठेचाळीस टक्के प्रॉफीट देण्यास ऑरोरा तयार होती! मात्रं यात एकच लहानशी अट होती. ऑरोराची मशीन्स ज्या प्लांटमध्ये बनतील तो प्लांट आणि रॉ मटेरीयल हे फक्त ऑरोराच्या ऑर्डर्ससाठीच वापरण्यात यावं! दुसर्‍या कोणत्याही प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरींग त्या प्लांटमध्ये करता येणार नाही! तसंच काही कारणाने ऑर्डर्स डिले झाल्यास रॉ मटेरीयलही दुसरीकडे वळवता येणार नाही!

या मेलची कॉपी अशोक सोळंकी आणि आदित्य पाठक यांनादेखील पाठवण्यात आली होती!

मेजर नितिन देशमुख आपल्या फ्लॅटवर परतला तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता.

ऑफिसमधून निघताना रात्री जेवायला येतेस का असं त्याने विचारल्यावर अर्चनाने होकार दिला होता. हॉटेलमध्ये जेवण घेतल्यावर दोघं पिक्चरला गेले होते. पिक्चर आटपल्यावर तिला घरी सोडून तो आरामात घरी आला होता. कपडे बदलून बेडवर पडतो न पडतो तोच फोनची रिंग वाजली!

आता या वेळेला कोणाचा फोन असावा?

"हॅलो!" आवाजात मुद्दामहून झोपाळूपणा आणत तो म्हणाला.

"मेजर नितिन, तुमची रोमँटीक संध्याकाळ संपली असल्यास जरा एक काम होतं तुमच्याकडे!"

"बोला सर!" त्रिपाठींचा आवाज त्याने ओळखला.

"तू गाढव आहेस!"

"तुमच्याच कळपातलं आहे सर!"

"शट द फक अप! आता ऐक मी काय सांगतो ते! मी पी एम शी बोललो आहे! प्लीज गो अहेड विथ युवर प्लान. खुद्द पी एमची ऑर्डर आहे ही!"

"शुअर सर! बाय द वे मी तुमच्यासाठी एक पुस्तक विकत घेतलं आहे! ऑफीसला आलो की देतो!"

"पुस्तक?"

"हो सर! आंतरराष्ट्रीय शिव्यांचा शब्दकोश!"

"यू बास्टर्ड! एखाद्या दिवशी खड्ड्यात पडशील!"

"ते या नोकरीत आलो आणि त्याहुनही तुमच्या अंडर आलो तेव्हाच झालंय सर!”

त्रिपाठींनी फोन आदळला. नितिन खो खो हसत होता. दोघांमध्ये नेहमीच अशी बोलाचाली होत असे! थोडाफार मसाला लावला नाही तर रोजचं काम भयानक कंटाळवाणं होईल असं दोघांचंही ठाम मत होतं.

नितिनने नंबर फिरवला. तीन-चार वेळा रिंग वाजल्यावर फोन उचलला गेला.

"धिस इज नितिन! इज धिस रॉकी?"

"नितिन! हरामखोरा! ही काय वेळ आहे फोन करण्याची? दीड वाजून गेला आहे आता! सुखाने झोपून पण देत नाहीस भोस.."

"तुझ्या शिव्या नंतर ऐकू! आधी मला सांग, सकाळी मुंबई किंवा पुण्याला कोणी जातं आहे का? आय निड अ राईड!"

"साल्या, तुम्ही टी ए, डी ए क्लेम करा आणि आमच्याबरोबर फुकटात या! एनी वे उद्या सकाळी सहाला एक सॉर्टी आहे लोहगावला! डायरेक्ट बाँबे हवं असेल तर संध्याकाळी चारपर्यंत थांबावं लागेल!"

" ऑल राईट! आय विल मीट यू इन द मॉर्निंग रॉकी!"

"देन मीट मी शार्प अ‍ॅट सिक्स हंड्रेड अवर्स! आणि तोपर्यंत पुन्हा फोन करु नकोस! नाहीतर टेक ऑफ झाल्यावर लाथ घालून बाहेर फेकेन!" फ्लाइट लेफ्टनंट राकेशनाथ उर्फ रॉकीने फोन आदळला.

सक्सेनांच्या घरी टेरेसवर पार्टी रंगली होती.

रमाकांत पाठकांच्या अपघाती निधनाला आता तीन महिने होत आले होते. त्या धक्क्यातून सावरत क्रेडेन्सचं कामकाज पूर्वीप्रमाणे सुरळीत चालू होतं. आदित्यचा ऑरोराबद्दलचा आडाखा अचूक ठरला होता. दोन दिवसांपूर्वीच ऑरोराकडून क्रेडेन्सबरोबर जॉईंट व्हेन्चुअर करण्यासाठी होकार आला होता. आजची ही पार्टी ही त्याप्रीत्यर्थच होती. या पार्टीला आदित्य बरोबर सक्सेना, गुप्ता आणि सोळंकी हजर होते.

"चिअर्स!" ग्लास किणकिणले!

"आदित्यबेटा, दॅट वॉज व्हेरी स्मार्ट! द वे यू हँडल्ड दॅट गाय डिसूझा!" सोळंकी म्हणाले.

"थँक्स अंकल!" आदित्य उत्तरला.

"अर्थात त्यात रिस्क होतीच! कारण ऑरोरानी आपल्या काँपीटीटर्सना अ‍ॅप्रोच करणं सहज शक्यं होतं, बट आय ऑल्वेज हॅड दॅट गट फिलींग, धिस विल कम टू अस!"

"आदित्य, प्रामाणिकपणे सांगायचं तर त्या पद्धतीने त्या दिवशी तू त्या डिसूझाला झापलं होतंस, ते पाहिल्यावर तो पुन्हा आपल्याकडे पाऊल टाकणार नाही अशी माझी खात्री झाली होती! अर्थात तसं झालं नाही हा भाग वेगळा, बट फ्रॉम नाऊ ऑन, यू हॅव टू बी केअरफुल!" सोळंकी म्हणाले.

"आय अंडरस्टँड अंकल! अ‍ॅक्च्युअली, आय ऑल्सॉ गॉट अ बिट कॅरीड अवे! प्रोबेबली माय इगो!"

"रिमेंबर वन थिंग आदित्य!" सक्सेना समजावणीच्या सुरात म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीत आपला अहंकार कधीही मध्ये येऊन उपयोग नाही! बिझनेसमध्ये तर कधीच नाही! इगो मध्ये आला की त्या भरात माणूस एखादी चूक करून जातो जी घातक ठरते!"

"एनी वे! लेट्स नॉट टॉक अबाऊट व्हॉट डिड नॉट हॅपन!" गुप्ता म्हणाले, "आता आपल्याला पुढचा विचार करायला हवा. लँड घेण्यापासून ते प्लांट उभारण्यापर्यंत आणि अ‍ॅक्च्युअली प्रॉडक्शन सुरु होईपर्यंत बरीच कामं आपल्याला मार्गी लावावी लागणार आहेत! अनायसे आपण सगळे आता इथे एकत्रं आलो आहोत, तर त्याबद्दलचं डिस्कशन आताच करावं असं मला वाटतं!"

"आय अ‍ॅग्री विथ निरंजन!" सक्सेना मान डोलवत म्हणाले, "सर्वप्रथम आपल्याला लागणार्‍या गोष्टींचा विचार करु! लँड शोधावी लागेल, फायनान्स लागेल, प्लांट उभारण्यासाठी मशिनरी लागेल, त्याबरोबर गव्हर्मेंट परमिशन्स लागतील त्या वेगळ्याच!"

"आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं हँडल करण्यासाठी अनुभवी माणूस लागेल!" अनुभवी वर जोर देत गुप्ता म्हणाले.

"आय थिंक हा प्रोजेक्ट आदित्यनेच करावा! त्या डिसूझाला आणि ऑरोरावाल्यांना तूच बरोबर हँडल करु शकतोस!" सोळंकीनी वेगळा मुद्दा मांडला.

"अंकल, तुम्ही सगळे इतके अनुभवी लोक असताना मी यात हात घालणं मला बरोबर वाटत नाही! तुम्ही हे नवीन प्रोजेक्ट इनिशिएट करुन ते पूर्णपणे एस्टॅब्लीश होईपर्यंत साधारण वर्षभर तरी लागेलच! त्या पिरीयडमध्ये मी आपली ऑलरेडी एस्टॅब्लीश असलेली प्रोजेक्ट्स आणि डे टू डे अ‍ॅडमिनीस्ट्रेशन हँडल करेन! आणि ऑफकोर्स या प्रोजेक्टची सगळी प्रोसेसही फॉलो करत राहीन!" आदित्यने बॉल तिघांच्या कोर्टात ढकलला!

तिघांनीही एकमेकांकडे पाहीलं. आपण नेम़कं काय बोलावं याचा तिघजण विचार करत होते. हे प्रोजेक्ट यशस्वीपणे मार्गी लागलं तर भरपूर फायदा होणार होता हे उघड होतं!

नेमक्या त्याच वेळी आदित्यचा मोबाईल फोन वाजला.

"एक्स्क्यूज मी अंकल! हॅलो! आदित्य पाठक हिअर!"

"मि. आदित्य पाठक......."

आदित्य उठला आणि बोलत-बोलत टेरेसच्या एका टोकाला गेला. तब्बल पंधरा मिनीटं तो फोनवर बोलत होता. डोळ्याच्या कोपर्‍यातून त्याला इतर तिघांमध्ये रंगलेची चर्चा दिसत होती. वास्तविक फोनवरचं बोलणं पाच मिनिटातच आटपलं होतं, पण फोन सायलेंट मोडवर टाकून कानाला लावून बोलत असल्याचं नाटक करत नंतर दहा मिनीटं तो तिथे उभा होता. चेहर्‍यावरील भाव मात्रं तसूभरही बदलले नव्हते!

तो पुन्हा इतरांना जॉईन झाला तेव्हा मात्रं त्याचा चेहरा कोरा होता!

"अंकल, काय डिसाईड केलंत तुम्ही?"

"बेटा, आमचं मत असं आहे की हे काम मोहनने हाती घ्यावं! आमच्यापैकी मोहन सर्वात सिनीयर आहे! सुरवातीपासून क्रेडेन्समध्ये असल्याने त्याचा अनुभव सर्वात मोलाचा आहे! हे प्रोजेक्ट तोच हँडल करु शकेल. आणि आम्हीही आहोतच!" निरंजन गुप्ता म्हणाले.

"शुअर अंकल! विल डू! तुम्ही सगळ्या गोष्टी फायनल करुन मला त्याप्रमाणे कळवा! नाऊ प्लीज एक्सक्यूज मी! आय हॅव टू लिव्ह फॉर द डे!"

"काय झालं बेटा? अगदी अचानक निघालास?"

"नथिंग सिरीयस अंकल! इफ यू लव्ह युअर वाईफ टू मच..... एनी वे! प्लीज कॅरी ऑन!"

मेजर नितिन देशमुखने जेवण उरकून एका हॉटेलमध्ये रुम घेतली आणि झकासपैकी ताणून दिली! उठल्यावर आपण कुठे आहोत हेच त्याला क्षणभर आठवेना. कित्येक दिवसांत अशी निवांत झोप त्याला मिळाली नव्हती!

सकाळी दहाच्या सुमाराला त्याने पहिला नंबर डायल केला,

"मे आय स्पीक विथ....."

मिनीटभराने त्याला हवा असलेला माणूस लाईनीवर आला.

"येस..."

"नितिन देशमुख हिअर! कॅन यू मिट मी?"

आदित्य लॅपटॉपच्या स्क्रीनवरील डिसूझाची मेल वाचत होता.

क्रेडेन्सबरोबर थेट जॉईंट व्हेन्चुअर करण्याऐवजी एक नवीन कंपनी स्थापन करुन त्या कंपनीबरोबर भारतात सहकार्य करावं असं ऑरोराच्या मॅनेजमेंटचं मत होतं. या निर्णयाचा क्रेडेन्स तसेच ऑरोरा या दोन्ही कंपन्यांना फायदा होईल असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. या मेल संदर्भात चर्चा करण्यासाठीच सक्सेना, गुप्ता, सोळंकी, ईराणी आणि सुदेश चक्रवर्ती आदित्यच्या केबिनमध्ये बसले होते. आदित्यची सेक्रेटरी या नात्याने रोहीशा हजर होतीच!

"मि. सक्सेना, व्हॉट डू यू थिंक? नवीन कंपनी?"

"वेल मि. पाठक, इट्स अ नॉर्मल प्रॅक्टीस! फॉरेन पार्टनर्सबरोबर जॉईंट व्हेन्चुअर्स स्थापन करताना सगळ्याच भारतीय कंपन्या हा मार्ग पत्करतात! आय डोंट सी एनी इश्यूज इन दॅट!"

"इफ यू से सो, आय अ‍ॅम ओके!"

"मोहन, फायनान्सचं काय?" गुप्तांनी विचारलं.

"सुदेश, तू प्रोजेक्ट्चं कॉस्ट इव्हॅल्युएशन केलं आहेस! साधारण किती फंडींग लागेल सुरवातीला?"

"सर ओव्हरऑल प्रोजेक्ट कॉस्ट साधारण पाचेकशे कोटीपर्यंत तरी जाईल! अर्थात हे इनिशियल एस्टीमेट आहे! वी कॅन गेट अराऊंड टू हंड्रेड क्रोअर्स फ्रॉम द बँक! बाकी अमाऊंट आपल्याला जनरेट करावी लागेल!"

"दॅट कम्स डाऊन टू थ्री हंड्रेड क्रोअर्स! हाऊ मेच वी कॅन पुल फ्रॉम क्रेडेन्स?"

"इनिशियली वी कॅन पुल अराऊंड हंड्रेड क्रोअर्स!"

"बट व्हॉट अबाऊट रिमेनिंग टू हंड्रेड क्रोअर्स?"

बराच वेळ उरलेले दोनशे कोटी क्से उभे करायचे यावर त्यांची चर्चा चालली. इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. नवीन प्लांट उभारण्यासाठी जमिन घ्यावी लागणार होती. सर्वात प्रथम पैसा लागणार होता तो त्यासाठी! नवीन कंपनी उभारताना कागदोपत्री का होईना पण वर्कींग कॅपीटल दाखवावं लागणार होतं. अन्यथा बँकेने कर्ज दिलंच नसतं.

"या दोनशे कोटींचं काय करायचं अंकल? ते कुठून आणायचे?"

"वेल! एक मार्ग आहे! पण मि. पाठक इटस बिट ट्रीकी?"

"ट्रिकी मिन्स?"

सक्सेनांनी सुदेश चक्रवर्ती आणि रोहीशा यांना बाहेर जाण्याची सूचना केली. ते बाहेर निघून गेले.

"येस अंकल?"

"बेटा, शंभर कोटी ताबडतोब उभं करणं न मला शक्य आहे, न निरंजनला ना अशोकला! हे फक्तं तुलाच शक्य आहे! रमाकांतकडे आणि आता तुझ्याकडे ५२ पर्सेंट शेअर्स आहेत, त्या प्रपोर्शनमध्ये प्रॉफीट कॅल्क्युलेट केला तर..."

"तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे अंकल?"

"मला वाटतं, हे दोनशे कोटी तू सहज घालू शकतोस!"

"दोनशे कोटी?.... वेल...."

"बेटा, हे प्रोजेक्ट तू क्रॅक केलं आहेस त्या डिसूझाबरोबर! त्यामुळे तुलाच पुढाकार घ्यावा लागेल!"

"बट अंकल, तुम्हाला तर माहीत आहे, आय हार्डली नो एनिथिंग! मला अजून क्रेडेन्सचंच काम काही कळलेलं नाही. त्यात हा नवीन प्रोजेक्ट आणि तो पण अमेरीकन क्लायंटबरोबरचा! हे तुम्हीच सांभाळा अंकल! फारतर पैशाच्या बाबतीत आपण एक करू शकतो...."

तिघंही अपेक्षेने त्याच्याकडे पाहत होते.

"हाऊ अबाऊट वी सेल मोअर स्टॉक?"

"व्हॉट? स्टॉक विकायचा?"

"येस! आपण दोनशे कोटी मार्केटमधून उभे करु!"

"पण...पण.. किती स्टॉक विकावा लागेल?"

"फ्रँकली स्पिकींग अंकल, तुमच्याकडे तिघांकडे मिळून ३८ पर्सेंट शेअर्स आहेत. हाऊ अबाऊट वी पुट इट अप ऑन मार्केट? दॅट विल इझीली गिव्ह अस मच मोअर दॅन २०० क्रोअर्स!”

आदित्यचं बोलणं ऐकून सर्वजण एकदम उडालेच!

"धिस इज सेन्सलेस!" सर्वात आधी गुप्तांना कंठ फुटला, "आमचा स्टॉक विकला तर क्रेडेन्समध्ये आमची पोझीशन काय मग? मला हे पटत नाही मुळीच!"

"आय अ‍ॅग्री विथ निरंजन! व्हेरर डू वी स्टँड देन?" सोळंकी गुप्तांची री ओढत म्हणाले.

"तू तुझ्या मालकीचा स्टॉक का नाही विकत?" सक्सेनांनी नेमका प्रश्न केला.

"आय डोंट माईंड इट! पण आपल्यापैकी किमान एकाकडे तरी ५०% पेक्षा जास्त शेअर्स राहीले तरच आपला कंपनीवर होल्ड राहील! माझ्याकडचे शेअर्स मी तुम्हाला कोणालाही मार्केट रेटने विकायला तयार आहे, बट नॉट अ‍ॅन आऊटसायडर! एनीवन इंटरेस्टेड?"

तिघांपैकी कोणालाही एकरकमी ५२ टक्के शेअर्स विकत घेणं शक्यंच नव्हतं!

"अंकल, पूर्ण ऐकून तर घ्या! हा स्टेक विकत घेणारा आपल्या भरवशाचा एखादा माणूस निवडायचा. केवळ नावापुरता हा स्टेक त्याच्या नावावर ट्रान्स्फर करायचा, आणि त्याच्याकडून पैसे उचलायचे! ते पैसे ऑफकोर्स नवीन कंपनीत घालायचे. वन्स वी गेट दॅट मनी बॅक, तो स्टेक आपण त्याच्याकडून परत विकत घ्यायचा! अशा तर्‍हेने आपला पैशाचा प्रॉब्लेम सुटेल आणि दोन्ही कंपन्यापण एस्टॅब्लीश होतील!

दुसरं म्ह्णजे, ऑरोराबरोबर आपण जी नवीन कंपनी उभारणार आहोत, त्या कंपनीत क्रेडेन्सचा स्टॉक विकून आणि बँकेकडून पैसे घेऊन आपण इव्हेस्टमेंट करणार! इन केस वी आर शॉर्ट ऑफ फंडींग स्टील, आय कॅन पुट इन द रिमेनिंग अमाऊंट! हा स्टॉक तुम्ही विकत असल्याने या कंपनीवर पूर्ण अधिकार अर्थात तुमचाच राहील! आय डोंट वाँट अ पेनी टिल यू बाय बॅक युवर स्टॉक इन क्रेडेन्स!

मी ऑरोराचे फायनान्शियल रिपोर्ट्स पाहीले आहेत गेल्या पाच वर्षांचे! आपला मार्केट रिसर्च रिपोर्टही हेच सांगतो की त्यांच्या इमेजिंग मशीन्सना अमेरीका आणि युरोपात डिमांड आहेच, पण साऊथ इस्ट एशिया आणि ओशनिया मार्केटपण वर येतं आहे! अशा परिस्थितीत डिमांड वाढणार हे तर उघडच आहे! त्यामुळे आपल्याला जास्तं फोकस एक्स्पोर्टवर करावं लागेल. कारण मुख्य रेवेन्यू तिकडूनच येणार! आज ऑरोरा आपल्याला एक्स्पोर्टमध्ये ४८ पर्सेंट प्रॉफीट देण्यास तयार आहे, अशा परिस्थितीत ही ऑपोर्च्युनिटी वेस्ट करु नये असं मला वाटतं! अर्थात आफ्टर ऑल इट्स युवर कॉल!

अ‍ॅन्ड ऑफकोर्स तुमच्याशिवाय मी क्रेडेन्सचा विचारही करु शकत नाही! अ बिल्डींग कॅन नॉट स्टँड विदाऊट पिलर्स! आणि तुम्ही क्रेडेन्सचे आधारस्तंभ आहात! तुमच्याशिवाय क्रेडेन्स चालू राहणं अशक्यं आहे, सो वन डे यू आर गोईंङ टु बी बॅक इन क्रेडेन्स फॉर शुअर! इट्स जस्ट अ मॅटर ऑफ फ्यू मंथस टू अ‍ॅन इयर!"

आदित्य बोलायचा थांबला तेव्हा तिघंजणं विचारात पडले होते!

रुस्तमजी ईराणींकडे काही स्टॉक नसल्याने त्यांना या चर्चेत फारसा रस नव्हता, पण नक्की काय निर्णय होतो हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता मात्रं होती!

निरंजन गुप्तांना हे पाउल अती धाडसाचं वाटत होतं. ऑरोराबरोबर जॉईंट व्हेन्चुअर करण्यास त्यांची हरकत नव्हती, त्यात फायदा होता हे त्यांना दिसत होतं, पण... पण त्यासाठी वर्षभर का होईना क्रेडेन्सच्या स्टॉकवर पाणी सोडावं लागणार होतं. आपसूकच प्रॉफीटवरही! अर्थात त्यातून पुढे होणार्‍या कमाईचा विचार करता ही रिस्क घेणं कितपत योग्य होतं?

अशोक सोळंकींच्या मनातही नेमके हेच विचार येत होते! क्रेडेन्समधील स्टॉक न सोडता नवीन कंपनीतून अधिक प्रॉफीट मिळवण्याला त्यांची संमती होती! पण क्रेडेन्सचा स्टॉक.... !!!

मोहनदास सक्सेनांच्या मनात काय सुरु होतं?

"आदित्यबेटा, तुझं प्रपोजल उत्तम आहे यात काही वाद नाही! तू ऑरोराच्या एक्स्पोर्टचा नीट अभ्यास केला आहेस हे देखील दिसून येतं आहे! पण बेटा, यात एक सर्वात मोठा फ्लॉ आहे हे तुझ्या ध्यानात आलं का?" सक्सेनांनी विचारलं.

"कोणता फ्लॉ अंकल?"

"क्रेडेन्सबाहेरच्या कोणा माण्साला आपण स्टॉक विकला आणि वर्षाभराने त्याने तो आपल्याला विकण्यास नकार दिला तर?"
"मी त्याचा विचार केला आहे अंकल! त्यासाठीच मी म्हणालो की माणूस आपल्या विश्वासाचा हवा! आणि मुळात डील करतानाच एक वर्षात किंवा त्याच्या आधीच क्रेडेन्स ते शेअर्स मार्केट रेट किंवा ज्या रेटने त्याने विकत घेतले यापैकी जो जास्त रेट आहे त्याला विकत घेईल असं अ‍ॅग्रीमेंट करुनच स्टॉक विकायचा! तसंच हा स्टॉक क्रेडेन्स सोडून कोणालाही विकता येणार नाही असंही क्लॉज त्यात घालून घ्यायचं! इन शॉर्ट अंकल, आपण फारतर वर्षभर आपला स्टॉक मॉर्गेज ठेवतो आहोत! बँकेला यात आणलं, तर इंटरेस्ट द्यावं लागेल आणि लिगल फॉरमॅलीटीज मध्ये वेळ जाईल!"

"लेट्स टॉक टू मि. वर्मा इफ वी कॅन साईन सच अ‍ॅन अ‍ॅग्रीमेंट!"

कंपनी सेक्रेटरी रमेश वर्मांना बोलावणं गेलं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्यावर असं अ‍ॅग्रीमेंट होऊ शकतं असा त्यांनी निर्वाळा दिला.

"वेल! आता प्रश्न असा आहे की व्हू कॅन बी द गाय?"

"अंकल, तुम्ही इतकी वर्ष इंडस्ट्रीत आहात, असं कोणी ना कोणीतरी तुमच्या ओळखीचं असेलच ना?"

सक्सेना काहीच बोलले नाहीत. ते स्वतःशीच कसलासा विचार करत होते. काही वेळाने ते म्हणाले,

"लेट्स नॉट जंप टू द कन्क्लूजन सो फास्ट बेटा! आपण जरा दोन-तीन दिवस विचार करु यावर अ‍ॅन्ड देन वी कॅन मेक द डिसीजन!"

"शुअर अंकल! फक्तं यामुळे ऑरोरा हातून जायला नको एवढंच मला वाटतं!"

"ओह येस! आपण एक काम करु! लेट एव्हरीवन गिव्ह इट अ थॉट! उद्या दुपारनंतर आपण फायनल डिसीजन घेऊ!"

"चालेल अंकल!"

"बेटा!" सक्सेना आदित्यच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "तू रमाकांतचा मुलगा शोभतोस खरा! अशीच धडाडी आणि निर्णयक्षमता रमाकांतमध्ये होती म्हणून क्रेडेन्स आज या पोझीशनला आहे! आय अ‍ॅम शुअर यू विल टेक इट वे अहेड दॅन युअर फादर!"

आपल्या बंगल्याच्या टेरेसवर निवांतपणे चिवास रिगल रिचवताना एका व्यक्तीच्या चेहर्‍यावर आसुरी हास्य उमटलं होतं.

मूर्ख!

स्वत:ला खूप शहाणा समजतोस ना आदित्यबेटा?
पण तू किती महामूर्ख आहेस हे आता तुला समजेल बाळा!

स्वत:च्याच हाताने तू केवढा मोठा खड्डा खणतो आहेस याची कल्पना आहे का तुला?
छे! छे! तुला कशी कल्पना असेल?
जोपर्यंत तू त्या खड्ड्यात पडत नाहीस!
रादर
जोपर्यंत आम्ही सगळे तुला खड्ड्यात ढकलत नाही!

नजरेसमोर पुढच चित्रं स्वच्छ दिसत होतं.

एकदा का नवीन प्लांटचं प्रॉडक्शन सुरू झालं की बस्स!
एक्स्पोर्ट्सच्या ऑर्डर्स भरपूर प्रमाणात मिळतील यात काही वादच नव्हता!
आणि एकदा मार्केटमध्ये स्वत: एस्टॅब्लीश झाल्यावर क्रेडेन्समध्ये कोण परतणार होतं?
उलट हळूहळू क्रेडेन्सचे कस्टमर्सच त्या नवीन कंपनीत खेचता येणार होते.

सक्सेना, गुप्ता आणि सोळंकी यांच्याशिवाय क्रेडेन्स उभीच राहू शकणार नव्हती!

त्यातच सुदेश चक्रवर्तीलाही क्रेडेन्स मधून तिकडे खेचता येणार होतं! सुदेश गेला म्हणजे क्रेडेन्सचं निम्मं मार्केट खलास! ते मार्केट नवीन कंपनीला मिळणार होतं!

क्रेडेन्सच्या मागे अनेक कटकटी लागणार होत्या!
कंपनीचे वर्कर्स संप पुकारणार होते!
प्लांट्समध्ये अपघात होणार होते!
रिसर्चमध्ये गडबड होणार होती!
अधिकाधीक प्रॉड्क्ट्स कॉलबॅक केले जाणार होते!
आजपर्यंतची क्रेडेन्सची रेप्युटेशन धुळीला मिळणार होती!

आणि हे सग़ळं होईपर्यंत क्रेडेन्समधूनच पैसे उचलून नवीन कंपनीत इन्व्हेस्ट केले जाणार होते!

नवीन कंपनी!
जिथे आदित्य पाठक नावाचं जोखड मानेवर वागवण्याची जरुर नव्हती!
केवळ रमाकांतचा मुलगा म्हणून तू आमच्या डोक्यावर बसलास!
पंचवीस वर्ष आम्ही काय उघाच घासली तिथे?

सॉरी 'बेटा'!
एव्हरीथींग इज फेअर इन लव्ह अ‍ॅन्ड वॉर!

बिझनेस इज अ वॉर!
आणि युद्धाला कोणतीही नीती नसते!
नीती-अनितीचा विचार असता तर तुझ्या बापाला जिवंत नसता सोडला?
नको त्या भानगडीत नाक खुपसत होता
आमची चौकशी करायला निघाला होता!

काहीही असो!
पण या आदित्यवर मात्रं नजर ठेवली पाहीजे!
तशी नजर आहेच म्हणा!
ऑफीसचा प्रश्नच नाही!
घरी 'ती' आहेच!
बाहेर कुठेही गेला तरी दिवाकर बरोबर नजर लावून बसेल त्याच्यामागे!
हा दिवाकर कडे चौकशी करतो आहे, पण दिवाकर माझा माणूस आहे हे याला कळलं तर?

क्रेडेन्सचं काऊंटडाऊन आता सुरु झालं आहे बेटा!

मेजर नितिन देशमुखच्या समोर बसलेल्या व्यक्तीने त्याचं सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं.

"मेजर देशमुख! मला थोडा वेळ लागेल! आता माझ्या हाती जे काम आहे, ते उरकल्याशिवाय मला कोणत्याही नवीन प्रकरणात हात घालता येणार नाही! ते आटपेपर्यंत किमान महिनाभर लागेल. तोपर्यंत तुम्ही थांबू शकत असाल तर आय अ‍ॅम रेडी!"

"ठीक आहे! डन!"

"आय वॉज शुअर, यू विल टेक धिस अप! महिन्याभराने मी पुन्हा काँटॅक्ट करेन!"

"थँक्स मेजर! वन मोअर थिंग..."

"येस?"

.... आणि नितिनसमोर बसलेला माणूस बोलू लागला!

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

तुषार ताकवले's picture

5 Jan 2015 - 2:49 pm | तुषार ताकवले

अप्रतिम...!!! पुढचा भाग कधी पडतोय याची वाटच बघत असतो... शुभेच्छा...!!!

विजुभाऊ's picture

5 Jan 2015 - 2:52 pm | विजुभाऊ

गुड गोइंग.
मस्त चाललय. इन्टरेस्टिंग. एखाद्या टीव्ही मालिकेप्रमाणे प्रत्येकवेळेस नवी उत्सुकता जागवताय.......

कॅप्टन नितिन आणि कॅप्टन शैलेश अशा दोन नावांमध्ये गल्लत झालीय. तेवढं सोडलं तर हाही लेख नेहमीप्रमाणेच.

स्पार्टाकस's picture

5 Jan 2015 - 2:58 pm | स्पार्टाकस

टायपिंग मिस्टेक :)
नितिनच :)

सस्नेह's picture

5 Jan 2015 - 4:03 pm | सस्नेह

अत्यंत रोचक आणि रसपूर्ण कथानक.
पु भा प्र.

बोका-ए-आझम's picture

5 Jan 2015 - 3:06 pm | बोका-ए-आझम

मस्त! पुभाप्र!

स्नेहल महेश's picture

5 Jan 2015 - 3:44 pm | स्नेहल महेश

मस्त!मस्त!मस्त!

योगी९००'s picture

5 Jan 2015 - 4:58 pm | योगी९००

इतके उत्क्रुष्ठ चालले आहे की ऑफिसचे काम सोडून हा भाग वाचला...

पु.भा.शु.

प्रत्येक भागात आणखीनच उत्सुकता वाढत आहे. कृपया पुढचा भाग लवकर टाका.

मुक्त विहारि's picture

5 Jan 2015 - 5:04 pm | मुक्त विहारि

कथा मस्त रंगत चालली आहे...

हे कथानक संपले की...

एक जोरदार पार्टी करू या......

नन्दादीप's picture

5 Jan 2015 - 5:37 pm | नन्दादीप

फक्त एक सुचना.....प्रकरण बदलताना मधेच **** किंवा ### असल काही टाकत जा...

अमित खोजे's picture

5 Jan 2015 - 10:36 pm | अमित खोजे

+१

प्रकरण बदलले आहे ते कळत नाही. अन त्यामुळे जरा गोन्ढळ होतोय

सौंदाळा's picture

5 Jan 2015 - 5:47 pm | सौंदाळा

मस्त चालली आहे कथा.
एका दमात पाचही भाग वाचुन काढले.
क्रेडेन्स आणि आदित्य पाठकच्या कथानकावर ब्लडलाईनचा स्पष्ट्पणे प्रभाव वाटला.

आता दोन्ही कथानके (क्रेडेन्स आणि न्युक्लिअर रिअ‍ॅक्टर) एकत्र कशी येतात त्याची खुप उत्सुकता आहे.

मायबोलीवर बेफिकीर यांची ‘ गुड मोर्निंग मैडम’ हीच कथा इथे नावे, लिंग बदलून टाकली आहे.
स्पार्टाकसभाऊ निदान तुमच्याकडून तरी हि अपेक्षा नव्हती राव :(

आनन्दा's picture

5 Jan 2015 - 8:33 pm | आनन्दा

असो - मला तरी फरक दिसतोय.. कथाबीज कदाचित एक असेल, पण बाकी बराच फरक आहे.

स्पार्टाकस's picture

5 Jan 2015 - 10:05 pm | स्पार्टाकस

गजानन,

आरोप करणं हे अगदी सोपं असतं, कारण त्याला काहीच लागत नाही! पण आपण जो आरोप करतो त्याच्याशी किमान काहीतरी तर्कसंगत गोष्ट असावी लागते.

अद्याप कथा अर्धीही झालेली नाही आणि तुम्ही निखालस चुकीचा आरोप करत आहात. ब्लडलाईनचा प्रभाव काही भागावर जाणवणं शक्य आहे पण या आरोपाबद्दल निषेध!

गजानन५९'s picture

6 Jan 2015 - 11:31 am | गजानन५९

@ स्पार्टाकस,
आरोप नाहीये हा तुमचे सकस लिखाण इथे वाचले आहे म्हणून फ़क़्त मत नोंदवले आहे, मला वाटले होते हि टीका तुम्ही खिलाडूवृत्तीने घ्याल.
आणि अतार्किक वगेरे असे काही नाहीये हो यात १ दा बेफिकीर यांची कथा वाचून पहा आणि मग बोला मला (यात उपरोध वगेरे काही नाहीये फ़क़्त जे वाटले ते सांगितले आहे तुमचा पूर्ण आदर ठेऊन)
असो बाकी भावना दुखावल्या गेल्या असतील तर जाहीर माफी माझ्याकडून.

कपिलमुनी's picture

6 Jan 2015 - 2:40 pm | कपिलमुनी

मी दोन्ही कथा वाचल्या आहेत.
सुरुवातीचा कथासूत्र बराचसा सारखा आहे.त्यामुळे गैरसमज होउ शकतो पण स्पार्टाकस यांच्या कथेमधला न्युक्लीयर प्लांटचा कथानक बघता ही कथा बेफिकीर यांच्यापेक्षा पूर्ण वेगळी आहे.

योगी९००'s picture

7 Jan 2015 - 12:43 pm | योगी९००

मी पण.. बेफिकीर यांची "गुड मॉर्निंग मॅडम" ही कथा काल बसून वाचून काढली.

फक्त ५१% शेअर आणि प्रेसिंडेंट सिलेक्शन, एकच डिटेक्टिव्ह दोघांसाठी काम करणे, निरंजन गुप्तांचे शेअर्स ऑरोरा साठी विकणे अशा गोष्टी दोन्ही कथेत सारख्या वाटला. पण ओवर ऑल बेफीकिर यांची कथा फक्त कॉर्पोरेट विश्वातच फिरते पण "ट्रॅप" ला पाकिस्तान, न्युक्लिअर प्लँट् चा कोन आहे आणि तो कोन या मेन कथेत कसा काय सामावणार याची जास्त उत्सुकता आहे.

प्यारे१'s picture

7 Jan 2015 - 12:51 pm | प्यारे१

वरच्या संदर्भावरुन 'गुड मॉर्निंग मॅडम' वाचली.
२१ भागांची कादंबरी झालीये पण काही ठिकाणी अतिरंजित वाटली. एखादा चित्रपट निघू शकतो अशी आहे.

स्पार्टाकस ह्यांची कथा/कादंबरी सीरीज छान सुरु आहे.

सु शी चि कादन्बरी वाच्तेय अस्स भास होतोय

इशा१२३'s picture

5 Jan 2015 - 8:35 pm | इशा१२३

हा भागहि मस्त.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Jan 2015 - 11:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वाचतोय. मस्तं रंगलय लिखाणं. येउदे पुढचा भाग लौकर.

सखी's picture

6 Jan 2015 - 1:47 am | सखी

मस्त हा भागही!
एक सूचना: लेखाच्या सुरवातीला मागच्या भागाची लिंक दिली तर भविष्यातील वाचकांनाही सोयीचं पडेल.

खटपट्या's picture

6 Jan 2015 - 4:42 am | खटपट्या

मस्त चालू आहे. पण खूप मन लावून वाचावं लागतंय !!

धडपड्या's picture

6 Jan 2015 - 12:41 pm | धडपड्या

स्पार्टाण्णा, कधी कधी तुमचं इतक्या वेगवेगळ्या विषयांवरच, अभ्यासपूर्ण, लेखन वाचून असा संशेव येतो, की चार पाच वेगवेगळी माणसं, एकाच आयडी वरुन आपलं लेखन प्रकाशित करतात...

योगेश पाडेकर's picture

6 Jan 2015 - 4:54 pm | योगेश पाडेकर

+१११११११

अद्द्या's picture

6 Jan 2015 - 5:30 pm | अद्द्या

नेहमी प्रमाणेच मस्त .

फक्त एक सूचना . . नवीन लेखाच्या सुरुवातीला जर त्या मालिकेतील जुन्या लेखांची लिंक देत आली तर पहा .
म्हणजे आमच्या सारख्या आळश्यांना तेवढंच काम कमी . .

(पण लेख एवढे जबरा आहेत कि ते सुद्धा आनंदाने करतोच .)

:)

संपादक मंडळ's picture

9 Mar 2015 - 8:49 pm | संपादक मंडळ

स्पार्टाकस यांच्या लेखनाबद्दल त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. आक्षेपार्ह प्रतिसाद टाळावेत ही नम्र विनंती.

संपादक मंडळ.