ओरिगामी प्रदर्शन वॄत्तान्त

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in मिपा कलादालन
4 Jan 2015 - 2:05 pm

|| श्री गुरवे नम: ||

‘वंडरफोल्ड २०१४’

मार्च-एप्रिल उजाडला की ओरिगामी मित्रच्या सदस्यांची लगबग सुरू होते. पुणे-मुंबईकर मित्रांची फोनाफोनी, याहू ग्रूपवरचे संदेश (आणि आता व्हॉट्स अॅप संदेश) वाढायला लागतात. त्या वर्षीच्या ओरिगामी प्रदर्शनाच्या - ‘वंडरफोल्ड’च्या नियोजनाला सुरुवात होते. एखाद्या सामाईक संकल्पनेवर चर्चा होते आणि सगळे मित्र (म्हणजे यात मैत्रिणीसुद्धा आल्या..) ‘बोटं सरसावून’ कामाला लागतात. वर्षभरात झालेल्या नव्या सदस्यांनाही यात आवर्जून सामील केलं जातं. महिन्यातून दोनदा (दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी) होणाऱ्या मीटिंग्ज आता दर शनिवारी - कधीकधी रविवारीसुद्धा व्हायला लागतात.

मुंबईत एका वर्षी (२००८, ‘१०, ‘१२, ‘१४) डिसेंबरमध्ये, तर पुढच्या वर्षी (२००९, ‘११, ‘१३ आणि पुढच्या वर्षी ‘१५मध्ये) पुण्यात नोव्हेंबरमध्ये, अशा प्रकारे मुंबई-पुण्यात आलटूनपालटून हे प्रदर्शन आयोजित केलं जातं. या वर्षी ११ ते १४ डिसेंबर या दिवसात सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या ठिकाणी ‘वंडरफोल्ड-२०१४’ हे प्रदर्शन होतं. १० डिसेंबरला सकाळीच आम्ही सगळे प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचलो आणि सर्व कलाकृती टेबलांवर मांडण्यात आख्खा दिवस गेला. ओरिगामी ही मूळ जपानी कला असल्यामुळे ‘वंडरफोल्ड’ला मुंबईतल्या जपानी दूतावासाचं पाठबळ लाभतं आणि जपानी राजदूतांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होतं. ११ डिसेंबरला सकाळी ठीक ११ वाजता (‘इंडियन टाईम’नुसार नव्हे, खरोखर ठीक ११ वाजता) उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘इक्बाल’फेम प्रसिद्ध सिनेनट श्रेयस तळपदे उद्घाटनाला सपत्निक हजर होते.

या वर्षीची सामाईक संकल्पना (थीम) होती ‘जेवणाचं टेबल’ (dining table). जेवणाच्या प्लेट्स, ग्लास, सर्विएत, काटे-चमचे आणि जेवणाचे पदार्थही – जपानी ‘सुशी’, केक, नूडल्स, स्ट्रॉबेरीज ओरिगामीने साकार केलं होतं.

DiningTable1
DiningTable2

ओरिगामी ढोबळमानाने दोन प्रकारे केली जाते – एकच कागद वापरून किंवा एकापेक्षा जास्त कागद वापरून (याला ‘मोड्युलर ओरिगामी’ म्हणतात), अशा सर्व प्रकारात ओरि-कलाकृती प्रदर्शनात सादर केल्या होत्या. एकच कागद वापरून प्राणी, पक्षी, कीटक, फूलपाखरं, फुलं, मुखवटे, मानवाकृत्या, वापरण्याजोग्या वस्तू, डबे-वाडगे, टॅसलेशन्स, अमूर्त (अॅब्स्ट्रॅक्ट) वस्तू तयार केल्या जातात. तसंच, कातरी वापरून एकाच कागदातून कोरून तयार केलेलं ‘किरीगामी’ (पॉप अप कार्ड) हासुद्धा ओरिगामीचाच प्रकार.

एका कागदापासून प्राणी, पक्षी, कीटक बनवणं खूप आव्हानात्मक असतं. जगातल्या अनेक ओरि-निर्मात्यांनी आणि अर्थात ओरिगामीचे पितामह अकिरा योशिझावा यांनी प्राणी-पक्षी-कीटकांच्या असंख्य कलाकृती निर्मिल्या आहेत. योशिझावा यांनी शोधलेली ‘ओलसर (वेट फोल्डिंग)’ पद्धत वापरून प्राणी, पक्षी आणि कीटक या सर्व कलाकृती बनवल्या आहेत.

Animals7

Animals5<

Animals4

डॉ. अनिल अवचट यांनीही अनेक प्राणी-कलाकृती स्वत: तयार केल्या आहेत.

AnilAwachat3 AnilAwachat2

पक्षी..

Birds2
Birds3

कीटक बनवणं जरा किचकट असतं, कारण एकाच कागदातून त्याचे सहा पाय, दोन स्पर्शिका आणि डोकं, पंख तयार करायचे असतात.
Insects3 Insects2

ओरिगामी फुलं अत्यंत सुंदर दिसतात. फुलांचा गुच्छ, परडी, ताटवे प्रदर्शनाचं सौंदर्य वाढवतात.
Cactii Roses2

Flowers1

रोज वापरता येतील अशा वस्तूही ओरिगामीने बनवता येतात. सीडी कव्हर, पैशाचं पाकीट, पर्स, पिशव्या, वाडगे-वाट्या, फूलदाणी, फोटोफ्रेम वगैरे.

Utility

या वर्षी ‘अमूर्त (अॅब्स्ट्रॅक्ट)’ या प्रकारच्या काही कलाकृती सादर केल्या होत्या. मला हा प्रकार जरा नवीनच आहे, तो आवडला आहे आणि मी या प्रकारातल्या काही कलाकृती करून बघणार आहे.

Abstract2

Abstract1

अर्धपारदर्शक कागदाला उभ्या-आडव्या-तिरप्या किंवा समभुज त्रिकोनाकृती (Equilateral triangular) घड्या घालून एक संदर्भ चौकट (grid) तयार करून तिच्यावर पुनरावृत्त (repetitive) डिझाईन असलेला प्रकार म्हणजे टॅसलेशन. या प्रकारासाठी अर्धपारदर्शक कागद वापरल्यामुळे याच्या मागच्या बाजूने प्रकाशझोत सोडल्यास (पार्श्वप्रकाशित – backlit) हे अतिशय सुंदर दिसतं. मात्र प्रदर्शनात पार्श्वप्रकाश प्रणालीने आयत्या वेळी दगा दिल्यामुळे यांचं खरं सौंदर्य नीट दिसू शकलं नाही.

Tesselations1 Tesselations2

एकाच कागदाच्या ओरिगामीचा आणखी एक आव्हानात्मक प्रकार म्हणजे मानवाकृती आणि मुखवटे (मास्क).
Human

काही परदेशी ओरि-कलाकारांनी सर्वसाधारण मास्क तयार केले आहेत. पण पुण्याच्या विश्वास देवलकाकांनी सूक्ष्म विचार करून, विशेष मेहनत घेऊन काही खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक भारतीय व्यक्तींचे मुखवटे तयार केले आहेत.
Masks3
अस्सल भारतीय ओरिगामी! सर्वप्रथम लो. टिळक, म. कर्वे आणि आता इथे मांडले आहेत अब्राहम लिंकन, डॉ. हेडगेवार, नरेंद्र मोदी, जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंद.

पॉप अप शुभेच्छापत्र आपल्याला चांगलीच माहीत असतात. कातरीने किवा चाकूने कागद कोरून कलाकृती तयार करण्याचं हे तंत्र म्हणजे ‘किरीगामी’.

Kirigami2

एकापेक्षा जास्त कागदांची ओरिगामी म्हणजे ‘मोड्युलर ओरिगामी’. यात एकाच आकाराच्या अनेक कागदांना एकाच प्रकारे घड्या घालून ‘युनिट्स’ तयार करतात. प्रत्येक युनिटला एक ‘टोक (point किंवा end)’ आणि एक ‘खिसा (pocket)’ असतं. एका युनिटचं टोक दुसऱ्या युनिटच्या खिशात सरकवून ‘लॉक’ करायचं, अशा प्रकारे कुसुदामा, बॉक्स, तारे, क्विल्ट, थ्री-डी तयार होतात. अर्थात, गोंद न वापरता हे तुकडे (युनिट्स) एकमेकात अडकवतात. तसंच, यात अनेक रंगांचे कागद वापरता येतात. त्यामुळे मोड्युलर ओरि-कलाकृती साहजिकच अत्यंत रंगीबेरंगी, शोभिवंत दिसतात.

कुसुदामाला जपानमध्ये सांकृतिक महत्त्व आहे. कुसुदामा बनवून त्यामध्ये औषधी आणि शुभसूचक वनस्पती ठेवून आपल्या दरवाजाबाहेर टांगायचा, त्याने अशुभ, अमंगळ दूर राहतं, असं जपानमध्ये मानतात.

Kusudamas3

तारे जमींपर... आणि बॉक्सेस

Stars1 Stars2

Boxes1

क्विल्ट हा थोडा वेगळा प्रकार. यात आपल्याला दिसणाऱ्या रंगीत युनिट्सना एकत्र धरून ठेवणारी युनिट्स खालच्या बाजूला असतात. या सपाट कलाकृती असल्यामुळे फ्रेम करून भिंतीवर टांगता येतात.

Quilts1 Quilts2

थ्री-डी ओरिगामी अलीकडे फार प्रचलित झाली आहे. यात २:१ आकाराच्या आयताकृती कागदापासून युनिट्स तयार करून ती एकमेकात खोचून कलाकृती तयार होते. यासाठी २००, ३००, ५०० अशा मोठ्या संख्येने युनिट्स तयार करावी लागतात. (माझ्यासारख्या आळशी माणसाचं हे काम नाही.)

3D2

3DMayur1

ओरिगामीचा आणखी एक प्रकार म्हणजे स्नॅपॉलॉजी. यात चौरस / आयताकार कागद न वापरता लांब रिबन वापरतात. एका रिबनवर काटकोनात दुसरी रिबन ठेवून तिरप्या घड्या घालून ‘गोफ’ विणत जायचं, हे स्नॅपॉलॉजीचं मूलभूत तंत्र. यातून त्रिमित भूमितीय वस्तू (डो-डेकाहेड्रॉन वगैरे) आणि बांगड्या वगैरे दागिनेही बनवता येतात.

Snapology1

ओरिगामी म्हणजे विज्ञान आणि गणित – विशेषतः भूमिती. विज्ञान आणि भूमिती शिकवायला ओरिगामीचा उपयोग दाखवणाऱ्या या काही कलाकृती.. यासंबंधी एक विशेष कार्यशाळाही होती.

OriMaths1 OriMaths2 OriPatterns

ओरिगामी कार्यशाळा
ओरिगामीचा प्रसार करणं हा संस्थेचा उद्देश. प्रदर्शन बघितल्यावर अनेकांना ओरिगामी शिकण्याची इच्छा होते. त्यांच्यासाठी एक-दीड तासांच्या, प्राथमिक-मध्यम-विशेष स्तरांच्या सशुल्क कार्यशाळाही होत्या.

BasicWorkshop3 IntmdWorkshop1 SpecialWorkshop2

जगभरातल्या ओरिगामी संघटनांशी ओरिगामी मित्रचे संबंध असल्यामुळे विचारांची देवाणघेवाण सतत चालू असते आणि आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. या वर्षीची एक विशेष गोष्ट म्हणजे ओरिगामी तज्ज्ञ मीनाक्षी मुखर्जी या प्रदर्शनासाठी अमेरिकेहून मुद्दाम आल्या होत्या. या मूळच्या कोलकाताच्या, आता अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांनी विशेषत: मोड्युलर प्रकारात अनेक कुसुदामा, बॉक्सेस वगैरे स्वत: तयार केले आहेत. त्यांची पाच पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी बनवलेल्या कलाकृती –

MinakshiKusudamas3

आम्हाला झालेला या प्रदर्शनाचा लाभ म्हणजे, मीनाक्षी मुखर्जींनी आमच्यासाठी दोन दिवस विशेष कार्यशाळा घेतली. प्रदर्शन सुरू होण्यापूर्वी दोन तास (सकाळी साडेआठ ते साडेदहा) त्यांनी आम्हाला त्यांच्या काही सुंदर कलाकृती शिकवल्या. प्रत्यक्ष निर्मात्याकडून एखादी कलाकृती शिकायला मिळणं हा एक वेगळाच अनुभव होता.

Master's Chopsticks MinakshiWorkshop2

Masterpiece Masterpieces01

प्रदर्शनाला मिपाकरांची भेट
मिपाकरांना प्रदर्शनाचं आवतण दिलं होतंच, त्याला प्रतिसाद देऊन काही मिपाकरांनी प्रदर्शनाला हजेरी लावली. विलासरावांशी माझी भेट होऊ शकली नाही. प्रास आणि विमे आले होते, त्यांच्याशी भेट झाली, पण मला कार्यशाळेसाठी जायचं होतं, त्यामुळे त्यांचा फोटो काढता आला नाही. मिपा अनाहितांना मात्र वेळ देऊ शकलो. इनिगोय, त्यांचा मुलगा वेदस, आरोही यांचा मुलगा अद्वेय, आरोही आणि अजया यांच्याशी गप्पा मारता आल्या. मुलांना सगळं प्रदर्शन दाखवलं.

MipaKids

रविवारी १४ तारखेला संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शन आवरतं घेतलं. सगळ्यांनी आपापल्या कलाकृती काळजीपूर्वक जमा करून घराची वाट धरली.. थकलेल्या शरीराने आणि समाधानी मनाने. प्रदर्शनाला हजारो लोकांनी भेट दिली, अनेकांनी कार्यशाळांमधून ओरिगामी शिकायचा प्रयत्न केला, काही प्रसारमाध्यमांनी प्रदर्शनाची दखल घेतली. इतके दिवस केलेल्या श्रमांचं सार्थक झालं, असं वाटलं.

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण सुरेख वृत्तांत.आम्हालाही फार अावडले हे प्रदर्शन.

मुक्त विहारि's picture

4 Jan 2015 - 2:44 pm | मुक्त विहारि

त्रिवार दंडवत....

१. अजून पण ओरीगामी शिकत आहात म्हणून.

२. वेळात वेळ काढून एक नितांतसुंदर लेख लिहीलात म्हणून

आणि

३. आता ह्या फेब्रुवारीत आम्हाला पण ओरीगामी नि:शुल्क शिकवणार म्हणून....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2015 - 2:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांत आवडला. ओरीगामी या कलेसाठी खूप वेळ द्यावा लागतो असे दिसते.
मेहनतीने ही कला जोपासणार्‍यांना, त्याचा प्रसार करणा-यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

-दिलीप बिरुटे

सुधांशुनूलकर's picture

4 Jan 2015 - 3:15 pm | सुधांशुनूलकर

ओरीगामी या कलेसाठी खूप वेळ द्यावा लागत नाही, या प्रदर्शनाच्या तयारीसाठी वेळ लागतो. ओरि-कलाकॄती तयार करण्यापलीकडेही बरीच कामं असतात, त्यासाठी मार्च-एप्रिलपासून तयारीला सुरुवात होते. मी तर रोज बसमधून प्रवास करताना एक-दीड महिन्यात अ‍ॅक्शन ओरिगामीच्या ३००-३५० कलाकॄती बनवल्या. इतकी ही कला सोपी..

ही कला जोपासणं आणि तिचा प्रसार करणं हा तर 'एक आनंदाचा धंदा!'

अजया, मुवि, डॉ. बिरुटे, धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2015 - 3:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण वृत्तांत ! कलाकृतींचे फोटोही बहारदार आहेत.

एस's picture

4 Jan 2015 - 7:41 pm | एस

ओरिगामीचे इतके विविध आणि नजरबंदी करणारे नमुने पाहून थक्क झालो आहे. आंतरजालावरून पाहून पाहून गुलाबाची कृती बरेचदा करून पाहिली पण अजिबात जमली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष ओरिगामी कार्यशाळेत शिकल्याशिवाय येणार नाही.

तुम्ही मिपावर काही सोप्या ओरिगामी कृती का टाकत नाहीत? खरंच टाका.

सुधांशुनूलकर's picture

4 Jan 2015 - 8:43 pm | सुधांशुनूलकर

काही सोप्या कलाकॄती बनवताना व्हिडिओ चित्रीकरण करून मिपावर टाकायचा प्रयत्न करणार आहे.

धन्यवाद.

खटपट्या's picture

4 Jan 2015 - 11:35 pm | खटपट्या

सर ! मिपाकरांसाठी हे कराच ही नम्र विनंती !!
बाकी फोटो आणि व्रतांत अप्रतीम !!

खूप सुंदर प्रदर्शन होते .आणि नूलकर सरांनी ओरीगामिचे दाखवलेले प्रात्यक्षिक हि खूपच आवडले .लेकाला हि फार मज्जा आली .सरांसोबत छान गट्टी जमलेली लेकाची .नूलकर सरांनी लेकाला दिलेले ओरीगामिचे हार्ट,बेडूक,कावळा आम्ही फार जपून ठेवले आहे .घरी येणाऱ्या जाणार्या सगळ्यांना पुढे काही दिवस त्याची प्रात्याक्षिके बघावी लागत होती .

के.पी.'s picture

4 Jan 2015 - 9:59 pm | के.पी.

फोटोमधिल सर्व कलाकृती मस्त आहेत .विशेषतः थ्री-डी ओरिगामी मधील मोर खूपच छान आहे

अन्या दातार's picture

4 Jan 2015 - 10:31 pm | अन्या दातार

टेसलेशन्स मस्तच असतात दिसायला. टेसलेशन्सचा एक फोटो इथे देतोय. माझ्या एका मैत्रिणीने (तेजा बांदल-खरात) हे बनवलेय. खिडकीच्या बॅकग्राऊंडवर दिलेला इफेक्ट.

tess

याच मैत्रिणीने बनवलेले कागदी वस्त्रप्रावरण
model

(फोटो तेजाच्या फेसबुक वॉलवरुन पूर्वपरवानगीने साभार)

एस's picture

4 Jan 2015 - 11:00 pm | एस

वरील पोशाखाचे एक फोटोशूट नक्कीच करेन एक दिवस.

अजया's picture

5 Jan 2015 - 9:34 am | अजया

काय सुंदर बनवलं आहे._/\_

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2015 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

__/\__ सर्व काहि अप्रतिम ! :HAPPY:

आदूबाळ's picture

4 Jan 2015 - 11:59 pm | आदूबाळ

जबरदस्त!

वाचनखूण साठवण्याची सोय कुठे गायब झाली आहे?

मस्तच वृत्तांत व फोटो. वर नमूद केल्याप्रमाणे २-४ ओरिगामी कलाकृतींचे विडीओ चित्रीकरण जरुर येऊ द्या हि नम्र विनंती.

@अन्या दातार : कागदी वस्त्रे जबरदस्तच. कला आहे तुमच्या मैत्रीणीच्या हातात. आमचा _/\_ कळवा.

जबरदस्त ! :) गुलाबाच्या फुलांचा ताटवा फारच आवडला ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||

प्रचेतस's picture

5 Jan 2015 - 9:04 am | प्रचेतस

खूप आवडलं.
पुण्यात होणार्‍या प्रदर्शनाची वाट पाहात आहे.

नाखु's picture

5 Jan 2015 - 3:30 pm | नाखु

मी येणार घरच्या कार्यकर्त्यांना घेऊन..

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2015 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

खुपच सुंदर, मोर तर विशेष आवडला,

एम्पायर स्टेटची प्रतिकृति पण मस्तच जमली आहे. (कशी बनवली असेल?)

(तु नळीवरचे व्हिडीओ बघुन करकोचा बनवायला शिकलेला) पैजारबुवा,

विशाल कुलकर्णी's picture

5 Jan 2015 - 3:49 pm | विशाल कुलकर्णी

अप्रतिमच... _/\_

स्पा's picture

5 Jan 2015 - 3:50 pm | स्पा

कातील

धन्य झालो, साला काय स्कील आहे
__/\__

इशा१२३'s picture

5 Jan 2015 - 8:40 pm | इशा१२३

छान फोटो आणि माहिती.अप्रतिम वस्तु आहेत.

सुधांशुनूलकर's picture

5 Jan 2015 - 9:13 pm | सुधांशुनूलकर

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद.
काही ओरि-कलाकॄतींचे व्हिडिओ बनवून मिपावर टाकायचा प्रयत्न करणार आहे.

@वल्ली आणि इतर पुणेकर मिपाकर : पुण्यात दिवाळीनंतर टिळक स्मारकात प्रदर्शन असतं. तारीख नक्की झाली की कळवीनच. या वर्षी प्रदर्शनाच्या वेळी पुण्यात यायचा प्रयत्न करणार आहे.

@अन्या दातार : पार्श्वप्रकाशित (backlit) टॅसलेशन्स खरंच छान दिसतात. तुमच्या मैत्रिणीने केलेलं टॅसलेशन छान आहे. मी केलेली काही टॅसलेशन्स आणि इतर ओरि-कलाकॄती ओरिगामी आणि ओरिगामी - २ या मिपावरच्या लेखांमध्ये जरूर पाहा.

जमल्यास, १४-१५ फेब्रुवारीच्या कट्ट्यामध्ये एखादं सोपं टॅसलेशन शिकवायचा प्रयत्न करणार आहे.

कविता१९७८'s picture

13 Jan 2015 - 9:42 am | कविता१९७८

खुपच सुंदर , ओरी कलाकृतींचे व्हीडीओ पाहायला आवडतील.

सविता००१'s picture

13 Jan 2015 - 11:29 am | सविता००१

काय सुंदर कला आहे..
मस्तच
तो मोर आणि पोषाख फारच सुरेख

सविता००१'s picture

13 Jan 2015 - 11:33 am | सविता००१

दोघांनी अगदी मस्त स्टायलीत दिलाय फोटो :)
झकास दिसतेय जोडगोळी

पैसा's picture

16 Jan 2015 - 7:25 pm | पैसा

काय सुंदर कलाकृती आहेत!

सुबोध खरे's picture

17 Jan 2015 - 12:09 am | सुबोध खरे

अप्रतिम