माझी कर्नाळा ट्रिप - २८ डिसेंबर २०१४

हुकुमीएक्का's picture
हुकुमीएक्का in भटकंती
4 Jan 2015 - 2:50 am

Previous Albums
सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १ --> 09 May 2014
सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग २ --> 10 April 2014
Winter Photography २०१४ - कवडी पाट - भाग १ --> 08 Dec 2014
फोटोग्राफी कट्टा कम ट्रिप - २१ डिसेंबर २०१४ - भिगवण --> 21 Dec 2014

                                                           माझी कर्नाळा ट्रिप - २८ डिसेंबर २०१४
************************************************************************************

    सर्व मिपाकरांना हुकुमीएक्क्याचा नमस्कार. मागील भिगवण ट्रिपला कंजूस काकांना ऐनवेळी यायला जमले नाही त्यामूळे त्यांना भेटण्याची संधी हुकली होती. मी मुंबईला नातेवाईकांकडे जाणार असल्याचे कंजूस काकांना व्य.नि. करून सांगितले होते. मला त्यांचा ३-४ दिवस अगोदर फोन आला की २८ डिसेंबर ला कर्नाळा भटकंती ला जाण्याच्या विचारात आहे. येणार का? मी २६ ते १ मुंबईला असल्याने जमण्यासारखे होते. त्याप्रमाणे एक दिवस अगोदर कंजूस काकांना भेटलो जेणेकरून ओळख व्हावी आणि ट्रिपची माहितीही कळावी.

    कंजूस यांचे लेख वाचल्यावर ते खुप मोठे व्यक्ती असतील आपण एकदम कसं बोलणार हा प्रश्न मला पडला होता. परंतू कंजूस ना भेटल्यावर एकदम मस्त वाटले. एकदम Free-minded, frank आणि प्रत्येक विषयातील गाढा अभ्यासक अशी माझ्या मनातील त्यांची सुस्पष्ट प्रतिमा. त्यांच्या घरी जाण्याचा देखील योग आला. त्यांच्या घरातील सर्वांनी अगदी आपुलकीने चौकशी केली. त्यामूळे त्यांच्या घरी प्रथमच गेलोय असे अजिबात वाटले नाही. एकंदरीत एका नवीन Family शी ओळख झाल्याचा आनंद अनुभवून मी त्यांचा निरोप घेतला.

    दुसर्‍या दिवशी (रविवार २८ डिसेंबर २०१४) सकाळी डोंबिवली (पूर्व) स्टेशनवर भेटायचे असे ठरले. दुसर्‍या दिवशी सकाळी मी व माझा भाऊ स्टेशनवर पोचलो. तिथून आमचा रसायनीकडील प्रवास सुरू झाला. 'भटक्या खेडवाला' यांची गाडीतच भेट झाली. त्यांनाही भेटल्यावर मला पहिल्यांदाच भेटतोय असे अजिबात वाटले नाही. पहिल्याच भेटीत आम्ही अगदी जुने मित्र असल्यासारखे बोलायला लागलो.

फोटो क्र. १ - भटक्या खेडवाला आणि हुकुमीएक्का (मी)
Bhatakya khedwala aani mi
Camera - Mobile Camera
Shutter Speed - 1/30
ISO - ISO-176
Camera Mode - Manual

    एकंदरीत माझ्या पहिल्या मि. पा. कट्ट्याला जसा मी Silent मोडवर होतो तसं इथे अजिबात झाले नाही. 'भटक्या खेडवाला' आणि कंजूस काका यांचा तर मी फॅनच झालोय. गाडी एका स्टेशनवर (नाव आठवत नाही) थांबली होती. मी कंजूस व भटक्या खेडवाला यांच्या सांगण्यावरून कॅमेरा हातात घेऊनच बसलो होतो. एक Green Bee-Eater किंवा रानपोपट्/वेडा राघू उडून एका झाडावर येऊन बसला.

फोटो क्र. २ - Green Bee-Eater किंवा रानपोपट्/वेडा राघू
Green Bee-Eater
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1000
ISO - ISO-200
Camera Mode - Manual

    'भटक्या खेडवाला' यांच्याशी बोलता बोलता रसायनी कधी आले कळालेच नाही. आम्हाला गाडीत चहा घ्यायचा होता. परंतू त्या दिवशी नेमका चहावाला आलाच नाही. आम्ही स्टेशनवर घ्यायचा असे ठरवले तसेच थोडे Snacks वगैरे खायचे असे ठरले. परंतू स्टेशनवर देखील चहा उपलब्ध नव्हता. तसेच वडापाव विकणारा मुलगा देखील निघून गेला होता. तो मुलगा संध्याकाळी ४ वाजता येईल अशी माहिती कंजूस यांनी दिली. आम्ही सोबत खादाडी व पाणी आणलेच होते. त्यामूळे पोटापाण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही कर्नाळ्याकडील वाटचाल सुरू केली. वाटेत कंजूस काका व विनायक काका (भटक्या खेडवाला) आपले आजवरचे भटकंतीचे अनुभव सांगत होते ते ऐकून कर्नाळा चढतानादेखील थकवा असा अजिबात जाणवला नाही.

    वाटेत थांबून फोटोग्राफी करायचे ठरले. कारण आमचा मुख्य उद्देश कर्नाळा भटकंती असली तरी प्रथम प्राधान्य फोटोग्राफीलाच होते. वाटेत जाताना कंजूस यांनी दुर झाडावर बसलेला Black Drongo किंवा कोतवाल दाखवला.

फोटो क्र. ३ - Black Drongo किंवा कोतवाल
Black Drongo
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    कर्नाळ्याकडील वाटचाल सुरूच होती. रसायनी गावाहून अर्ध्या वाटेत पोहोचलो. तिथे कंजूस व भटक्या खेडवाला यांनी कर्नाळा किल्ला बोटाने दाखवला.

फोटो क्र. ४ - कर्नाळा
Karnala
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/640
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. ५ - कर्नाळा
Karnala
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/200
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    वाटेत थांबून रानफूले, किडे, तसेच फुलपाखरे यांचे फोटो काढणे सुरू केलेच होते. माझ्याकडे तसेच भटक्या खेडवाला यांच्याकडे Point and Shoot Camera होता. कंजूस त्यांच्या मोबाईल कॅमेरातूनच फोटो काढत होते. माझा भाऊ मात्र जाम वैतागला होता. त्याच्याकडे मोबाईल होता परंतू त्याला फोटोग्राफीमध्ये तेव्हडे नैपूण्य नसल्यामूळे त्याचाही नाईलाज होता.

फोटो क्र. ६ - रानफूले
Wild Flowers
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/50
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ७ - Red Hibiscus किंवा जास्वंदी
Red Hibiscus
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/160
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ८ - रानफळे
Wild Flowers
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/50
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. ९ - Mylabris Pustulata किंवा एक बीटल
Beetal
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. १० - Common Sailer Butterfly किंवा फुलपाखरू
ButterFly
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/40
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. ११ - नाव माहीत नाही.
ButterFly
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/125
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. १२ - Spider किंवा जंगलातील कोळी
Spider
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1600
ISO - ISO-250
Camera Mode - Manual

फोटो क्र. १३ - रानफूले
Wild Flowers
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1600
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. १४ - रानफूले
Wild Flowers
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/1600
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. १५ - नाव माहित नाही
Noname
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/50
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. १६ - बीटल
Beetal
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/400
ISO - ISO-80
Camera Mode - Manual

फोटो क्र. १७ - सुरवंट
Surwant
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/160
ISO - ISO-320
Camera Mode - Manual

फोटो क्र. १८ - थोडी विश्रांती ( बसण्याची नाही तर फोटो काढण्यासाठीची )
Rest
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/320
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    त्यानंतर सर्वांना भूक लागली होती. तरी आम्ही साधारण ५-६ किमी. चाललो होतो. त्यामूळे एका ठिकाणी बसून खादाडी करायचे ठरले. आम्ही येतानाच कंजूस यांनी सूचना केल्याप्रमाणे डब्यात पोळी-भाजी आणली होती, भटक्या खेडवाला यांनी पराठे आणि सफरचंदाचे लोणचे (जे मला फारच आवडले) आणले होते, कंजूस यांनीही पोळी भाजी आणली होती, माझ्याकडे फावल्या वेळेत खायला बाकरवडी होतीच त्यामूळे वाटेत 'चरूनच' आम्ही वर आलो होतो. आता वेळ झाली होती डबे उघडायची.

फोटो क्र. १९ - खादाडी
Lunch
Camera - Mobile Camera
Shutter Speed - 1/50
ISO - ISO-96
Camera Mode - Manual

    खादाडी नंतर थोडे पुढे येऊन एका ठिकाणी विश्रांती साठी बसलो.

फोटो क्र. २० - विश्रांती
Rest
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    परत कर्नाळ्याकडे वाटचाल सुरू केली. वाटेत चालत असताना कंजूस यांचा फोटो.

फोटो क्र. २१ - कंजूस
Kanjus
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/60
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    तसेच भटक्या खेडवाला यांचा माझ्या भावासोबत काढलेला फोटो.

फोटो क्र. २२ - संतोष पित्रे (Pink Shirt) आणि भटक्या खेडवाला
Together
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    कंजूस यांचा 'फोटो' काढत असतानाचा फोटो.

फोटो क्र. २३ - कंजूस फोटो काढत असताना
Kanjus
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/500
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    वाटेत जाताना 'भूताचे' झाड दिसले त्याचे फोटो.

फोटो क्र. २४ - भूताचे झाड
Ghost Tree
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

फोटो क्र. २५ - भूताचे झाड
Ghost Tree
Camera - Mobile Camera
Shutter Speed - 1/283
ISO - ISO-83
Camera Mode - Manual

फोटो क्र. २६ - रानफूले - मॅक्रो फोटो घेण्याचा प्रयत्न १
Wild Flowers Macro
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/250
ISO - ISO-640
Camera Mode - Manual

फोटो क्र. २७ - रानफूले - मॅक्रो फोटो घेण्याचा प्रयत्न २
Wild Flowers Macro
Camera - Canon PowerShot SX50 HS
Shutter Speed - 1/320
ISO - ISO-100
Camera Mode - Manual

    जास्त पक्षी दिसेनात आणि उशीरही झाला असल्याने साधारण दुपारी ३ वाजता परतण्याचा निर्णय घेतला आणि रसायनी स्टेशनकडे वाटचाल सुरू केली. येताना वडापाव खायचाच असे ठरवले. त्याप्रमाणे रसायनी स्टेशनवर साधारण ४.१५ ला आलो. दिव्याला जाणारी पॅसेंजर ५.३० ला असल्याने खुप वेळ होताच. त्यामूळे आम्ही परत खादाडी सुरू केली. तेव्हड्यात कर्जत ला जाणारी रा. प. म. ची बस आल्याने भटक्या खेडवाला यांनी आमचा निरोप घेतला तो परत भेटण्याच्या इराद्यानेच.

फोटो क्र. २८ - वडापाव ( ह्या खादाडी सोबतही चहा मिळाला नाहीच.)
Breakfast
ट्रिप ला आलेले मेंबर -

१. कंजूस
Kanjus
२. भटक्या खेडवाला
Bhatakya khedwala
३. संतोष पित्रे ( माझा भाऊ )
Santosh
४. हुकुमीएक्का ( मी )
Hukumiekka

    अशी ही माझी कंजूस व भटक्या खेडवाला यांच्यासोबतची ट्रिप अगदी मस्त झाली. ट्रिपच्या आठवणी अगदी कालच ट्रिपला जाऊन आल्यासारख्या ताज्या आहेत. या ट्रिपमूळे पुढील भटकंती साठी खुप अनुभव मिळाले. कर्नाळा ट्रिप आयोजित केल्याबद्दल तसेच मला एका नवीन ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल कंजूस आणि भटक्या खेडवाला यांचे मनापासून आभार. आपल्या पुढील ट्रिप्स साठी एक मेंबर फिक्स आहे एव्हडे नक्की. *smile* *i-m_so_happy*

...समाप्त...

प्रतिक्रिया

फोटे छान आलेत. रानपाखरांची फोटोग्राफी किती अवघड असते त्याची एकंदर कल्पना आलीच असेल. नंदन नाचण दिसला परंतू आवाक्यात नाही आला. सकाळची वेळ सात ते नऊ ही गाठली तरच पक्षी दिसतात. आता कशेळी कटट्यात चांगली संधी आहे.

मस्त भटकंती. लेख आवडला.

छान लिहिलंय रे हुक्कू. फोटोही चांगले आलेत.
किल्ल्यावर गेलाच नाहीत का?

मुक्त विहारि's picture

4 Jan 2015 - 9:55 am | मुक्त विहारि

कंजूस आणि भटक्या खेडवाला, बरोबर असतील तर कुठलीही भटकंती ही त्रासदायक न ठरता, मंगलमय प्रदक्षिणाच असते.

चौकटराजा's picture

4 Jan 2015 - 10:39 am | चौकटराजा

रानटी फुलाचा मॅक्रो व भुताच्या झाडाचा फोटो चांगलाच आला आहे !

येणारच... सकाळच्या वेळी काढला आहे ना!!!!

कंजूस's picture

4 Jan 2015 - 12:29 pm | कंजूस

माझे या ट्रीपचे मोबाइल कैमऱ्याचे फोटो
इथे १
आणि
इथे २ आहेत.

सर्वसाक्षी's picture

4 Jan 2015 - 1:15 pm | सर्वसाक्षी

मस्त भटकंती आणि चित्रे

सुधांशुनूलकर's picture

4 Jan 2015 - 3:02 pm | सुधांशुनूलकर

डिसेंबर २०१४मध्ये कर्नाळा भटकंतीचा बेत होता, तो काही जमला नाही. म्हणून तुमची कर्नाळा भटकंती वाचून खूप आनंद झाला.

फोटो क्र. १२बद्दल थोडंसं : ही आहे 'जायंट वूड स्पायडर' (Giant Wood Spider, Nephilia maculata) मादी. नर आकाराने लहान असतो. प्रजोत्पादनासाठी मिलन एवढंच त्याचं काम, ते झाल्यावर तो मरतो (मादी त्याला खाते असंही म्हणतात.)
कोळ्याची ही जात दीड मीटर व्यासाचं सर्वात मोठं जाळं विणते. कर्नाळ्याला ही जात मुबलक सापडते.

फोटो क्र. १६ : हा बीटल नसून 'बग' आहे. नाव - लीफहॉपर (Eurybrachys tomentosa). वनस्पतिरस (सॅप) शोषून जगतो. मादी पांढुरक्या मेणचट, पावडरीसारख्या पदार्थाच्या संरक्षक कवचाच्या आत अंडी घालते. (फोटोमध्ये त्याच्या टिरेजवळ पांढुरकी पावडर स्पष्ट दिसते आहे!) अपूर्ण जीवनक्रम (Incomplete Metamorphosis). छोटं पिलू (nymph) एक गोडसर रस स्रवतं, त्याच्यासाठी विशिष्ट जातीच्या मुंग्या आकर्षित होतात आणि या मधुर भेटीच्या बदल्यात मुंग्या पिल्लाचं रक्षण करतात. परस्परांना फायद्याच्या सहजीवनाचं (Symbiotic relationshipचं) उदाहरण.

पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा.

कीटकप्रेमी
निसर्गवेडा आनंदयात्री
सुधांशुनूलकर

मुक्त विहारि's picture

4 Jan 2015 - 4:23 pm | मुक्त विहारि

माहिती-प्रेमी

मिपावेडा कट्टेकरी

मुवि

जायंट वूड स्पायडरवर 'रातवा' या पुस्तकात मारूती चितमपल्ली यांनी लिहिलेला 'एका कोळियाने' हा लेख जरूर वाचा. त्यात हे सगळे वर्णन आहे. तुमच्या प्रतिसादामुळे आठवले म्हणून मुद्दाम लिहिले.

त्यांची 'रातवा', 'रानवाटा', 'सुवर्णगरूड' ही सगळीच पुस्तके वाचनीय आहेत. विशेषतः 'रानवाटा' मधील 'अरणी' ही कथा खरोखरच रोमांचकारी आहे. खरंच तसे काही घडले असेल का? खरंच अशी कुणी अरणी होती का हे प्रश्न 'मालगुडी डेज' वाचून मालगुडी हे गाव शोधायला येणार्‍यांच्या उत्सुकतेइतकेच छळत राहतात.

लॉरी टांगटूंगकर's picture

4 Jan 2015 - 10:25 pm | लॉरी टांगटूंगकर

झकास ट्रीप राव!
सफरचंदाचे लोणचे ???? हे पहिल्यांदा ऐकतो आहे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

7 Jan 2015 - 8:15 pm | भ ट क्या खे ड वा ला

मनाली ला मिळते. लीन्गडी, सफरचंद आणि इतर प्रकारची हिमाचल मधील फ़ूड product पण मिळतात.
गोल्ड Wine Pvt Ltd
Sukkibain TEH Chachiot ,dist . Manali H P दूरभाष. ०१९०७ २७२७५३
असा पत्ता आहे बाटली वर .
जर्दाळू , लीची, इत्यादी फळांची वाइन हि मिळते.
Mall रोड मनाली मार्केट मधील बर्याच दुकानात हे लोणचे मिळेल.
मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर ला हिमाचल टुरिझम मध्ये चौकशी केले तर वाइन सोडून इतर उत्पादने मिळू शकतील

लॉरी टांगटूंगकर's picture

23 Jan 2015 - 2:32 pm | लॉरी टांगटूंगकर

धन्स, शोधण्यात येईल.

सतिश गावडे's picture

4 Jan 2015 - 10:33 pm | सतिश गावडे

मस्त रे हुकू. यावेळी चिंचवडचा इरसाल म्हातारा नव्हता काय तुझ्या सोबत? ;)

पूर्वी गुरू शिष्यास सांगत "बालका, मी तुला माझ्याकडचे सर्व ज्ञान दिले आहे, आता बारा वर्षे भारतभ्रमण कर. सर्व तीर्थाँत स्नान करून ये. इथे तुझी वाट पाहतो."

चौकटराजा's picture

5 Jan 2015 - 1:01 pm | चौकटराजा

बालका, तीर्थक्षेत्री जायचा मार्ग कळण्यासाठी तुला मुवि नावाच्या यक्षाची गाठ घ्यावी लागेल. त्या यक्षाला अनेक तीर्थांची माहिती आहे. शुभा: ते पंथान: सन्तु असे काही " गुरू" म्हणत असतील तर ....?

महाजन: येन गत: स पंथ: । महाजन ज्या मार्गाने जातात तोच मार्ग धरावा ।

भ ट क्या खे ड वा ला's picture

5 Jan 2015 - 10:47 am | भ ट क्या खे ड वा ला

भटकंतीचे वर्णन आणि फोटो दोन्ही उत्तम .
कंजूस म्हणजे माहिती ची खाण आहे.
भुताचे झाड म्हणजे कांडोळ.
हुकमी एक्क्याकडून फोटोग्राफी आणि संगणक या विषयी शिकायला मिळाल.एक नवीन मित्र मिळाला.
एकंदर २८ चा रविवार सार्थकी लागला.
११ नंबर मधील फुलाची माहिती मिळाली कि कळवतो.

वेल्लाभट's picture

5 Jan 2015 - 3:36 pm | वेल्लाभट

सहीच फोटो ! मस्त झालीय सहल! किल्ल्यावर नाही गेलात?

बोका-ए-आझम's picture

6 Jan 2015 - 3:11 pm | बोका-ए-आझम

सुंदरच फोटो!आणि मस्त वर्णन! आता कशेळी कट्ट्यावर भेटूच!

पैसा's picture

7 Jan 2015 - 9:52 pm | पैसा

वर्णन आणि फोटो लै आवडले! असेच भटकत रहा!