१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
1 Jan 2015 - 1:34 pm

मिपाकरांनो,

प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818)

ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे.

पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा.

मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा.

ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत.

मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच.

नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको.

आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला.

तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा.

अरे हां..महत्वाची गोष्ट......

प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.

ठिकाण :वनविहार ,
ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात.
काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला).
प्रवेश फी :नाही.
जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज).
पार्किँग :भरपूर.
राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु.
संपर्क 9226093034 शिवाजी
0214683313
जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार.
पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल.
पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल.
मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत.
कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता.
राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे.
कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.

मौजमजामाहिती

प्रतिक्रिया

मी मुंबईहून नक्कीच येईन. तसेही कशेळीला जायचे होतेच. कट्ट्याच्या निमित्ताने ते ही होईलच.

इरसाल's picture

16 Jan 2015 - 11:04 am | इरसाल

नेरळ स्टँडावरुन हव्या तितक्या विक्रम रिक्षाची व्यवस्था करुन देवु शकतो.
फक्त वेळ, इप्सित स्थळाचा पत्ता नी नग किती ते कळवा .

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2015 - 2:12 pm | अत्रुप्त आत्मा

१४ ला रात्रिच येण्याचा इचार हाय! .. फुडिल चर्चा रात्रि'वाल्यांशी ( ;) ) मेसेजात करनेत यील!

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2015 - 2:43 pm | टवाळ कार्टा

मी आहे रात्रकट्ट्याला ;)

ज्याना या कट्टयाला यायचंय त्यांनी कृपया इथे नावे द्यावी.त्याप्रमाणे बुकिंग करायचे आहे.अादल्या दिवशी रात्री येणार असल्यास तसेही लिहावे.
इथे येणार्या मिपाकरांच्या नावाची यादी update करत राहु.

कशेळे वनविहार कट्ट्याला रस्त्याने येण्यासाठी मार्ग

१)मुंबईकडून
दादर.. चेंबूर.. वाशी ..सीबिडी ..पनवेल.. पळस्पे ..{खोपोली रस्त्याने}.. अंबानी हॉस्पिटल .. कर्जतफाट्याला डावीकडे वळणे पुढे  प्रमाणे

२)पुण्याकडून
पुणे ..लोणावळा ..घाट उतरणे ..आडोशी बोगद्यानंतर एक्सप्रेसवे सोडून डावीकडचा खोपोली रस्ता घेणे.. खाली खालापूर नाका ..{पनवेल रस्त्याने} ..कर्जतफाट्याला उजवीकडे वळणे ..पुढे  प्रमाणे

 कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार.

३) कल्याण डोंबिवलीकडून

{शिळफाटा रस्त्याने} काटई नाक्याअगोदर डावीकडे ..{पाईपलाईन रोडने} अंबरनाथ एमआइडिसी ..बदलापूर ..{बदलापूर नेरळ रस्त्याने} नेरळ ..फाटक रे क्रॉसिँग करून ..{कशेळे रस्त्याने} कशेळे ..{जामरुघ रस्त्याने} आंबिवली ..@वनविहार.

कंजूस's picture

16 Jan 2015 - 8:31 pm | कंजूस

४)अलिबाग/पेणकडून

पेण-पनवेल रस्त्याने ..खारपाडा.. खाडी ओलांडल्यावर.. जिते.. आपटेफाट्याला उजवीकडे वळा.. आपटा ,आपटा रे॰ स्टे॰.. रसायनी रे॰ स्टे॰.. उजवीकडे वळून.. मोहापाडा ..दांडफाटा ..{पनवेल-खोपोली रस्त्याने उजवीकडे खोपोलीच्या दिशेने पुढे} कर्जतफाटा.. कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार.

आदूबाळ's picture

16 Jan 2015 - 8:56 pm | आदूबाळ

ऐला कशेळे इकडं आहे होय! या कडावच्या पलिकडे असलेलं वैजनाथ हे माझ्या आजोळचं मूळ गाव.

मुवि साहेब,
१) कशेळी ते तीर्थक्षेत्र आहे का ?
२) काही जणच आदल्या रात्रीच कशासाठी ?सग्ळे मिपाकर का नकोत ?
३)आपपला खर्च हा बेसिस आदल्या रात्रीच्या " खर्चा" साठी आहे की दिवसा उजेडीच्या कट्ट्याचा ?
आपले अविस्तर पत्र यावे . थोनलहा.
आपला डोंबोली चा जावई.

१) कशेळी ते तीर्थक्षेत्र आहे का ?

१४ला रात्री पक्षी-तीर्थ

२) काही जणच आदल्या रात्रीच कशासाठी ?सग्ळे मिपाकर का नकोत ?

काही जणांना पक्षी-तीर्थ नको असते.

३)आपपला खर्च हा बेसिस आदल्या रात्रीच्या " खर्चा" साठी आहे की दिवसा उजेडीच्या कट्ट्याचा ?

दोन्ही कट्ट्यांसाठी.

मनिमौ's picture

1 Jan 2015 - 2:37 pm | मनिमौ

माझी मुलगी पण आहे बरोबर. वय 2.5 चालेल का?.मी सकाळीच येईन.

अजया's picture

1 Jan 2015 - 3:03 pm | अजया

हो,चालेल की.

जर काही बदल झालाच तर तसे आगाउ कळविण्यात येइल.

बुकींग किती दिवस आधी करावे लागणार आहे.

आत्ताच शिवाजी यांच्याशी बोलणे झाले. पंधरा जानेवारीपर्यंत बुकिंग करावे लागेल.

बहारिन् चा खलिफा's picture

1 Jan 2015 - 3:12 pm | बहारिन् चा खलिफा

१५ च्या कट्ट्याला नक्की येणार!

पैसा's picture

1 Jan 2015 - 5:09 pm | पैसा

तिकीट काढू ना?

मुक्त विहारि's picture

1 Jan 2015 - 5:25 pm | मुक्त विहारि

तुम्ही पुणे मार्गे येणार की मुंबई मार्गे?

त्रिवेणी's picture

1 Jan 2015 - 6:03 pm | त्रिवेणी

मी पण येईन.

१४ ला रात्रिच येण्याचा इचार हाय! ..

मुक्त विहारि's picture

2 Jan 2015 - 8:27 am | मुक्त विहारि

नक्की या...

जबरा कट्टा होणार असे दीसतेय !!

शुभेच्छा ..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Jan 2015 - 8:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कट्ट्यास शुभेच्छा. सुट्टी मिळेल की नाही हे आत्तचं सांगु शकत नाही. पण १४ पासुन यायची मात्र इच्छा आहे...

कंजूस's picture

2 Jan 2015 - 8:58 am | कंजूस

PUNE SAT)
पुण्याकडून शनिवारी येणाऱ्यांनी
१)शक्यतो दुपारी पावणे बाराच्या पुणे-भुसावळ एक्सप्रेसने दोन वाजता कर्जतला उतरा (पुणे-कर्जत रेजर्वेशन काढा.)[या गाडीचे पुणे -कल्याण रेज तिकिट कर्जतला उतरून पुढे नेरळला जाण्यास व्हैलिड नाही.]अनरिजर्वड पुणे -नेरळ काढले तर रेजच्या डब्यात १५ रुभरून कर्जत करून घ्यायचे .
२)लोकलचे नेरळ तिकिट काढून सिएसटी लोकलने नेरळला उतरा. पलिकडच्या प्लैटफॉर्मवर पुलावरून जा. पुढच्या बाजूस बाहेर पडा.
3)साडेतीनच्या डेक्कन एकसप्रेस ने येऊ नका फारच अंधार होईल आणि कर्जत हून६.२०च्या सिएसटी गाडीस फारच गर्दी असते.

PUNE SUNDAY
१)सकाळी ७.००ची सह्याद्री इक्सप्रेसचे (11024) पुणे/शिवाजीनगर/पिंपरी ते नेरळ थेट स्लीपरचे रेझ मिळेल आणि १०.००वाजता नेरळलाच उतराल
२)कट्टयाहून तीनला निघाल्यावर नेरळ स्टे ला ५.००ची कर्जत गाडी मिळून ६.0८ची कर्जतला प्रगति इक्स (12125)मिळेल

कंजूस's picture

2 Jan 2015 - 9:00 am | कंजूस

MUMBAI /THANE/KALYAN)मुंबई ठाणे कल्याणकडून येणारे:

१)कर्जत/खोपोली लोकलने नेरळ स्टे ला उतरा.
२)त्याच प्लैटफॉर्मच्या मागच्या बाजूस (कल्याण एंड)बाहेर पडा पाच मिनीटात बस/रिक्षा अड्डा येईल.
३)कशेळे कडे जाणाऱ्या ६सिटर शेअर रिक्षाने कशेळे जा.
४)इथून जामरूघ कडे जाणाऱ्या रिक्षाने वनविहार सांगा. वनविहारची कमान/ प्रवेशद्वारापाशीच रिक्षा थांबवेल.
५)उजवीकडचे कोपऱ्यात पहिलेच घर आहे.

इरसाल's picture

2 Jan 2015 - 10:39 am | इरसाल

कशेळेपासुन ४ किमी वर सुगवे येथे( इथुन भिमाशंकर जायला फाटा फुटतो ...खांडस फाटा) इ. ६ वी ते ११ वी शिकताना रहात होतो आणी कशेळे येथे माझे हाय्स्कुलचे शिक्षण झालेय. (कोणाला मोहाची घ्यायची आहे का ?)

मय ये कट्टा भौत मिस क्रुंगा. (इथे रडणारा बाहुला इमॅजिन कर्नेका !)

मुक्त विहारि's picture

2 Jan 2015 - 10:50 am | मुक्त विहारि

एकदा चाखून बघायची इच्छा आहे...

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 12:16 pm | टवाळ कार्टा

मी २ थेंब घेईन

गवि's picture

2 Jan 2015 - 12:25 pm | गवि

मोह वाईट..

मुक्त विहारि's picture

2 Jan 2015 - 1:30 pm | मुक्त विहारि

पण

मोहाची दारू हा अपवाद..

चौकटराजा's picture

3 Jan 2015 - 7:32 am | चौकटराजा

"मोहा" आपल्या हाताने पाजली असेल तर ...... काय ? तर ती वाईट नाही......

पा पा's picture

2 Jan 2015 - 12:28 pm | पा पा

घस्यात ओतनार ....

पा पा's picture

2 Jan 2015 - 12:29 pm | पा पा

पन नागपूर ला...

अगोदर जाऊन आलेले दोघे तिघे एकेका मुबई/पुण्याच्या गटाला नेरळ स्टेशनहून नेतील आणि फोनाफोनी होणार नाही. पंचवीस तीसजण येणार असतील तर कमीतकमी गोंधळ व्हावा अशासाठी सांगतो आहे.आणखी कोण वालंटिअर आहेत ते कळवा. जे पुणेकर रविवारी सकाळी साडेदहाला नेरळला येतील त्यांना मी घेऊन येतो.

जर आधी नीट ठरत असेल की किमान आठदहा जण नक्की येणार असं तर खरोखर मुंबई/ ठाणे इथून एक अन पुणे इथून एक अश्या रिटर्न बोलीवर सुमो / इनोव्हा बुक कराव्यात. थेट सुटसुटीत अन सोयीस्कर जाणे येणे. एकत्र असणे.

शेअरिंग केल्यावर खर्च नक्की परवडेल आणि आपापले वेगवेगळे जाणे, तिथे शेअर रिक्षा शोधणे, रेल्वे बदलणे, ठराविक रिझर्वेशनवर अवलंबणे, तीन टप्पी प्रवास , लोकलांशी घासाघीस आणि अनिश्चितता हे सर्व टळेल

मुक्त विहारि's picture

2 Jan 2015 - 1:29 pm | मुक्त विहारि

सहमत...

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2015 - 4:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे नक्कीच खूप सोईस्कर होईल.

चौकटराजा's picture

12 Jan 2015 - 6:29 pm | चौकटराजा

शेअरिंग केल्यावर खर्च नक्की परवडेल आणि आपापले वेगवेगळे जाणे, तिथे शेअर रिक्षा शोधणे, रेल्वे बदलणे, ठराविक रिझर्वेशनवर अवलंबणे, तीन टप्पी प्रवास , लोकलांशी घासाघीस आणि अनिश्चितता हे सर्व टळेल अशीच अरेंजमेट पुणेकरानी /चिंचवडकरानी ही करावी. पुणेकर मिपावाल्या कडे तिघा चौघांकडे चारचाकी असणारच. सगा, सावंत काका ई.

अभ्या..'s picture

15 Jan 2015 - 8:12 pm | अभ्या..

काका,
त्येंच्यात आमची बी सोय लावा.
टपावर बसून येताव, सवय हाय. ;)

चौकटराजा's picture

16 Jan 2015 - 5:04 am | चौकटराजा

त्यापेक्षा माझ्याकडे जालिम उपाय आहे. तू १० तारखेलाच माझ्याकडे चिंचवडला ये . आपण तहान लाडू भूक लाडू घेउन
मजल दरमजल करीत कशेळीकडे कूच करू. वाटेत अनेक " सातवहन कालिन" धर्मशाळा आहेत. वल्लीने त्या आधीच दाखवून ठेवल्या आहेत. गुप्तकालीन पाणपोयाही आहेत. मला गाताही येते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा गरीबो़ंकी सुनो ई ई . बाकी दोघानाही चित्रकला बर्‍यापैकी येते. गरज पडली तर रंगीत खडू कोळसा ई ने मारुति , साईबाबा ई चित्रे रस्त्यावर काढू. मस्त " कल्पक" सफर होईल. तू जमले तर जानेवलो जरा मुडके देखो मुझे किंवा जिंदगीकी ना टूटे लडी ही गाणी पाठ करून ठेव. म्हणजे मला मधून मधून रिलिफ मिळेल. हा का ना का.

अजया's picture

16 Jan 2015 - 10:37 am | अजया

_/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2015 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा मार्ग आणि वेळा कळवा. फोटो काढायला कोणीतरी लागेलच... मी येतो. मिपाकट्ट्याला जाण्याच्या एका नव्या प्रयोगाचा साक्षीदार होण्याचा मोह आवरत नाहीय +D

एक्का साहेब फक्त फोटो नको या प्रसंगाचे व्हीडीओ शूटीग करा

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2015 - 12:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

हरकत नाय !

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2015 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

MSG (मेसेंजर ऑफ गॉड) पेक्षा जास्त खळबळजनक पिच्चर बनण्याची ताक्द आहे या कथाबिजात ;)

अभ्या..'s picture

16 Jan 2015 - 1:05 pm | अभ्या..

चौराकाका, कट्टा आपल्याला स्पॉन्सर करायचा नाहीय्य्ये.
ज्याचा त्यानी खर्च करणारेत.. उगी जास्त उत्पन्नाचे मार्ग सुचवू नका.
मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन घ्यायला कुणालाही घोड्यावर चढवतील त्याचा नेम नै. :)

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 2:15 pm | टवाळ कार्टा

मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन घ्यायला कुणालाही घोड्यावर चढवतील त्याचा नेम नै. Smile

आण्भव कै? ;)

ट्क्या तू इचारतोस आण्भव काय?????
=)) =)) =))
लका उतर आधी अनाहिताद्वेष्ट्या घोड्यावरुन. ;)

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 5:05 pm | टवाळ कार्टा

अर्रे...मला त्या घोड्यावर (का हत्तिणीवर?) जबरदस्तीने "बशीवलेय" :(
मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे ;)

मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे

म्हणूनच...
=)) =)) =))

मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे

घोड्यावरील उच्च 'विनोद' *lol*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 4:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टक्या शी सहमत. तो शांतीवादी आहे. इन्फॅक्ट पुढच्या वर्षी त्याला नो-बेल मिळणारे शांतीसाठी. (वाजवा रे वाजवा)

देवा ह्याला लौकर शांती देरे बाबा!!! =))

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 4:22 pm | टवाळ कार्टा

;)

कपिलमुनी's picture

22 Jan 2015 - 4:55 pm | कपिलमुनी

ही चालेल का ?
shanti

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Jan 2015 - 10:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ही मंदिरातली शांती मी लहान असल्यापासुन बुक करुन ठेवलीये. तस्मात वो मेरी है!!!

खटपट्या's picture

23 Jan 2015 - 11:57 am | खटपट्या

बाबौ !!

बॅटमॅन's picture

23 Jan 2015 - 7:16 pm | बॅटमॅन

एका सीरियलीचे नाव आठवले.

*** लगते हैं.

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2015 - 7:34 pm | टवाळ कार्टा

ते ** ** असे हवे होते ना? ;)

बॅटमॅन's picture

23 Jan 2015 - 7:39 pm | बॅटमॅन

ये हृदयींचे ते हृदयीं ;)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2015 - 10:19 pm | अत्रुप्त आत्मा

@तो शांतीवादी आहे. इन्फॅक्ट पुढच्या वर्षी त्याला नो-बेल =)))))) मिळणारे शांतीसाठी.> =))))))

वैभव जाधव's picture

23 Jan 2015 - 7:42 pm | वैभव जाधव

घोड्यावरील उच्च 'विनोद'

जणू ऊच्चै:श्रवा
(स्पेलिंग मिष्टेक मापी)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2015 - 2:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

ऑ ? तुम्ही घोड्यावरून जाणार ? चौरकाका काय म्हणाले नव्ह्ते तसं !... आता उघड्या जीपवर बसवलेला क्यामेरा शोधणे आले +D

चौकटराजा's picture

16 Jan 2015 - 2:29 pm | चौकटराजा

पयशे युरो मधे घेऊन येणे. डोलर कालच ४२ पैशानी ( अरेरे अमेरिकनानो काय हे ?) घसरलेला आहे रू च्या तुलनेत.

आदूबाळ's picture

16 Jan 2015 - 10:27 pm | आदूबाळ

ब्याक्कार हसतोय :))

सुहास झेले's picture

2 Jan 2015 - 1:17 pm | सुहास झेले

मी मुंबईहून नक्की आहे.... :)

विजुभाऊ's picture

2 Jan 2015 - 2:11 pm | विजुभाऊ

मी १०० % येणार

सूड's picture

2 Jan 2015 - 3:10 pm | सूड

शुभेच्छा!! :)

पैसा's picture

2 Jan 2015 - 3:14 pm | पैसा

हिरव्या देशात जाणारेस का काय?

छे!! तसं झालंच तर बरंय म्हणा. ;) पण सध्यातरी एका शाळामित्राच्या लग्नाला हजेरी लावायचीये, ते नाही केलं तर आयुष्यभर शिव्या खाव्या लागतील. त्यापेक्षा एका कट्ट्याला गैरहजर राहणं परवडेल. :)

अन्या दातार's picture

2 Jan 2015 - 3:34 pm | अन्या दातार

मी येणार.

कंजूस's picture

2 Jan 2015 - 4:05 pm | कंजूस

सकाळच्या डेक्कन expचे दादर ते नेरळ रेज सह तिकिट फक्त साठ रूपये आहे आणि ८.२५ला नेरळला 'वनपीस' नेते.

अनन्न्या's picture

2 Jan 2015 - 4:22 pm | अनन्न्या

रत्नागिरीत कट्टा! पण हे फारच दूरचे कशेळी निघाले.
कट्ट्याला शुभेच्छा!

सुनील's picture

3 Jan 2015 - 6:37 am | सुनील

तसे दुसरेही एक 'कशेळी' ठाण्याला लागूनच, भिवंडी रस्त्यावर आहे!

कट्ट्याला शुभेच्छा!

इरसाल's picture

16 Jan 2015 - 11:01 am | इरसाल

कशेळी नाही कशेळे आहे क शे ळे !!

खटपट्या's picture

16 Jan 2015 - 12:22 pm | खटपट्या

खरंच कशेळे आहे का ? कारण बाजुच्या खारेगावातील लोक कशेळीच बोलतात.

इरसाल's picture

16 Jan 2015 - 1:08 pm | इरसाल

ते कर्जतवालं जे आहे ते कशेळे आहे अस म्हणायचं होतं मला.

स्पार्टाकस's picture

3 Jan 2015 - 7:44 am | स्पार्टाकस

बराकभायच्या मुंबै एम्बस्सीची कंची डेट मिळते त्यावर अवलंबून हाय!
जमल्यास रात्रीपासून हजेरी असंल!

मुक्त विहारि's picture

4 Jan 2015 - 1:43 pm | मुक्त विहारि

हे तर एकदमच मस्त....

बराकभायशी बोलू का?

बराकभाईंबरोबरच या ना मग.

अन्या दातार's picture

5 Jan 2015 - 11:17 am | अन्या दातार

बराकभाईंना घेऊन यायचे असेल तर आजूबाजूला बरॅक बांधाव्या लागतात. :P

मुक्त विहारि's picture

5 Jan 2015 - 1:02 pm | मुक्त विहारि

आपापल्या जोडीदारा समवेत आल्यास उत्तम....

मिपाकर सहकुटुंब येण्यास काही हरकत नाही.फक्त किती जण हे स्पष्ट सांगुन ठेवावे,बुकिंगच्या सोयीसाठी.

(बुकिंगच्या दृष्टीने)नक्की होकार/नकार कळवण्याची शेवटची तारीख काय आहे?

मुक्त विहारि's picture

5 Jan 2015 - 11:33 pm | मुक्त विहारि

तुमचे नांव आधीच नक्की केले आहे...

सांगा महिना अखेरपर्यंत.आपण तात्पुरतं तारीख बुकिंग १५ जानेवारीला करुन ठेवणार आहोत.माणसांचा आकडा सावकाश चालेल.

प्रमोद देर्देकर's picture

8 Jan 2015 - 9:27 am | प्रमोद देर्देकर

अर्ज किया है...
"मुवि तो कट्टे का दिवाना है",
"कट्टा तो मिलने का इक बहाना है",
"निकलता है तो निकलने दे जनाजा मेरा ए खुदा"
"लेकिन मिपाकरोंसे मिलनेके बाद ही तेरे पास आना है"!

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2015 - 9:39 am | टवाळ कार्टा

व्वा...

खटपट्या's picture

8 Jan 2015 - 9:57 am | खटपट्या

वाहवा वाहवा !!

चौकटराजा's picture

8 Jan 2015 - 10:09 am | चौकटराजा

मुवि है ये कट्टेका दिवाना
क्युं के इसको है प्यारा बहोत खाना
शौक है ये इसका पुराना
कट्टे का कोई भी निकालता बहाना

मी पण पुण्यावरुन येणार आहे.
बुकिंग करावे.