कोणी अडवले ?

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
22 Dec 2014 - 4:32 pm
गाभा: 

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Azam-Khan-SP-Mukhtar-Abbas...

नुकतीच ही बातमी वाचली . आझम खान हे माझे अत्यंत आवडते नेते आहेत . अगदी अकबरुद्दीन ओवेसींच्या पाठोपाठ त्यांच्याच नंबर लागतो माझ्या आवडत्या नेत्यांच्या लिस्ट मध्ये :) त्याची विधानेही फार सुंदर असतात , मागे "मी ताजमहल पाडायचे ठरले असते तर नेतृत्व केले असते " असे विधानही त्यांनी केले होते .

पण त्यांनी ह्या येथे केलेल्या विधानावर जरा शंका उत्पन्न झाल्याने हा काथ्याकुट करीत आहे ...

'आम्ही पाकिस्तानात जायला निघालो होतो. आमच्यासाठी पाकचे दरवाजेही खुले होते. पण तेव्हा आम्हाला थांबवण्यात आले. सरदार पटेल, महात्मा गांधी आणि नेहरूंसारख्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही. त्यामुळेच मुस्लिम भारतात राहिले.'

हे खरे आहे का ? पटेल गांधी नेहरु वगैरे महात्मा लोकांनी "प्लीज प्लीज प्लीज पाकिस्तानात जाऊ नका " असे म्हणत खरंच आझम खान ह्यांचे रस्ते अडवुन धरले होते का ? की आमरणउपोषण सुरु केले होते ? गांधींनी अखंड भारत का नाकारला ह्या युगप्रवर्तक पुस्तकात अखंड भारत नाकारुन महात्माजींनी भारतावर केलेल्या प्रचंड उपकारांचे वर्णन केले आहे म्हणे , त्यात ह्या प्रकाराबद्दल काही माहीती आहे का ? की इतरत्र काही रेफरन्सेस आहेत ?

असे अजुन काही रेफरन्सेस अभ्यासु आणि व्यासंगी मिपाकरांच्या वाचनातील असतील तर त्यांची माहीती मिळावी म्हणुन हा काथ्याकुट :)

प्रतिक्रिया

ग्रेटथिंकर's picture

22 Dec 2014 - 5:03 pm | ग्रेटथिंकर

कुणी अडवण्याची गरजच नव्हती, ईथे राहिलेले मुस्लिम भारतावरच्या निस्सिम प्रेमामुळे ईथे राहिले. भारतावर त्यांचा हिंदूईतकाच हक्क आहे.
गांधी पटेलांनी मुस्लिमांना अडवल्याचा एकही दाखला नाही, परंतु गांधी व नेहरुंच्या दूरदृष्टीमुळे भारत धर्मवेडाच्या झटक्यातून वाचला व धर्मनिरपेक्षता वाढीस लागली. या सेक्युलर वातावरणाने आश्वस्त होऊन भारतराष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधव इथे राहिले.

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 5:06 pm | प्रसाद गोडबोले

आता माईसाहेब आणि नेफळेंच्या मताची वाट पहात आहे =))

मंदार दिलीप जोशी's picture

23 Dec 2014 - 6:21 pm | मंदार दिलीप जोशी

:D

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 5:08 pm | मदनबाण

या सेक्युलर वातावरणाने आश्वस्त होऊन भारतराष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधव इथे राहिले.
अगदी अगदी ! आणि भारत पाकिस्तान मॅच मधे पाकिस्तान जिंकल्यावर हेच हिंदूस्तान प्रेमी मुल्सिम बांधव फटाके फोडुन आनंद साजरा करायचे ! कित्ती कित्ती देश प्रेमी आहेत म्हणुन सांगु !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

नाखु's picture

23 Dec 2014 - 9:08 am | नाखु

बाणा एकाच वेळी दोन "दादल्यां"वर पिरेम हाय त्यांच सोयी-सवलतींसाठी हिंदुस्तान बाकींसाठी पाकीस्तान.
जाता जाता अवांतर : २६/११ ला किती पाकप्रेमी-मिडीया-पत्रकार्-विचारजंत (इथले आणि तिथलेही) यांनी आप्ले मूल्यवान मत देऊन सह्वेदना व्यक्त केली *scratch_one-s_head* * *SCRATCH* ते जरा मज पामरांस कळावे.

प्रसाद१९७१'s picture

22 Dec 2014 - 5:07 pm | प्रसाद१९७१

नक्कीच आडवले असणार, एव्हडी मोठ्ठी व्हॉट बँक पाकीस्तानात गेली असती तर काँग्रेस १९५७ च्या निवडणुकीतच हरली नसती का?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Dec 2014 - 5:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हिंदू लोक नेहमी फक्त आणि फक्त हिंदू महासभा-जनसंघालाच मत देत आले आहेत असे म्ह्णतोस?

प्रसाद१९७१'s picture

22 Dec 2014 - 7:04 pm | प्रसाद१९७१

१५ टक्के मते कमी झाली असती तर समाजवादी तरी निवडुन आले असते ना.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Dec 2014 - 9:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

'त्यावेळचे' समाजवादी आत्ताच्या समाजवाद्यांसारखे नव्हते.
ना.ग.गोरे,राम मनोहर लोहिया,एस.एम. जोशी,कृपलानी हे खरे समाजवादी.

अद्द्या's picture

22 Dec 2014 - 5:47 pm | अद्द्या

YZ लोकांच्या बोलण्यावर का म्हणून इतकं लक्ष द्यायचं ते .

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 5:51 pm | प्रसाद गोडबोले

YZ कोणाला म्हणताय ? स्वतंत्र भारताचे खास आवर्जुन थांबवुन घेतलेले पेश्शल नागरिक आहेत ते !
जरा सांभाळुन बोला अन्यथा तुमच्यावर मानहानीचा खटला दाखल करतील ते ! आणि आपल्या देषातील न्यायव्यवस्था थांअबवुन घेतलेल्या लोकांचा सहानुभुतीपुर्वक विचार करते हे ठावुन नाही का तुम्हाला ?

सगळ्यांनी जरा सांभाळुन मत प्रदशन करावे ही णम्र इणंती :)

अद्द्या's picture

22 Dec 2014 - 6:07 pm | अद्द्या

अरेरे . स्वओरी . . .

शिद's picture

22 Dec 2014 - 5:54 pm | शिद

कोण आझम खान?

धन्यवाद.

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 6:05 pm | प्रसाद गोडबोले

अभ्यास वाढवा .

प्रतिसादाची पि़ंक टाकण्यापुर्वी अभ्यास वाढवा .
http://en.wikipedia.org/wiki/Azam_Khan_%28politician%29

इतके दिवस जे लोक ' कोण एम आय एम ? ' असे म्हणत होते त्याच एम आय एम ने त्यांच्याच नाकावर टिच्चुन मुंबईत ३ जागा पटकावल्या आहेत हे विसरु नका !

Ignorance is actually not a bliss !

शिद's picture

22 Dec 2014 - 6:22 pm | शिद

ते सगळं माहितेय ओ.

पण इकडे चर्चा करून आझम खान काय त्याचं चंबूगबाळ आवरून पाकीस्तानला जाणार आहे की नवाझ शरीफ त्याचं म्हणणं ऐ़कून त्याच्यासाठी पाकीस्तानमध्ये स्वागत सभारंभ आयोजीत करून त्याला "निशाण-ए-पाकीस्तान" खिताब देणार आहे?

बाकी चालू द्या.

hitesh's picture

23 Dec 2014 - 11:55 am | hitesh

मुंबैत त्याना तीन जागा मिळाल्या.

आणि त्यांचे थोबाड फोडणारा मिडास राजा सगळे सोने इथेच ठेऊन अल्ला को प्यारा हो गया !

जेपी's picture

22 Dec 2014 - 6:13 pm | जेपी

कोन प्रगो आणी,आझमखान
.

धन्यवाद.

जेपी's picture

22 Dec 2014 - 6:22 pm | जेपी

एक आणखीन भर-
तुमच्या सारखे दांभीक लोक आहेत म्हणुन हि आग विझायला तयार नाही...

संपादित

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 6:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुराव्या सकट उद्या तथाकथीत दांभीक लोकांना उद्या उघडे पाडण्यात येईल. हे उत्तम. मिपा त्याकरिता प्रसिद्ध आहेच...

पण त्याचबरोबर उद्धट भाषा वापरण्याने लेखकाची स्वतःची पातळी खाली येते आणि त्याच्या मुद्द्यांची किंमत कमी होते असे वाटत नाही का? विचार करून पहा.

जेपी's picture

22 Dec 2014 - 7:10 pm | जेपी

एक्का साहेब,
खर वास्तव्य जळजळीत कडवट असत, गोड भाषेत घोळवुन देता येत नाही.

(इथल्या दांभिक चर्चा वाचुन कंटाळलेला)जेपी

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2014 - 7:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

ज्याला आपला वास्तविक मुद्दा खरोखरच पटवून द्यायचा आहे त्याला "स्पष्ट बोलणे" आणि "उद्धट्पणा/धमकीने बोलणे" यातला फरक कळणे आवश्यक आहे.

असो, तुम्हाला योग्य वाटणारा निर्णय घ्यायला तुम्ही समर्थ आहातच.

बॅटमॅन's picture

22 Dec 2014 - 6:32 pm | बॅटमॅन

या आझम खानला पाकडेही स्वीकारतील की नै काय माहिती.

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 7:03 pm | टवाळ कार्टा

घेतील की आणखी १ मुहाजीर म्हणून

अजून एक मूँ हाजीर झाले म्हणून काय =))

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 7:14 pm | टवाळ कार्टा

लय म्हन्जे लयच हुच्च :)

प्यारे१'s picture

22 Dec 2014 - 9:08 pm | प्यारे१

प्रगो सरांचा नवा धागा.
सर्वधर्मसमभाव बाळगून वागा.
(उगाच यमक जुळवलंय बरंका पश्या, हौ, नैतर येशील वस्सकन!)

प्रसाद गोडबोले's picture

23 Dec 2014 - 1:02 pm | प्रसाद गोडबोले

नैतर येशील वस्सकन!

नाही हो हभप . आम्ही कशाला वस्सकन अंगावर येवु आम्ही इथे

भरयुध्दात सांगितलेल्या गीतेवर टीका ललिहिणारे ज्ञानियांचे राजे संतज्ञानेश्वर ,
१०८ आठ वेळा यवनाने अंगावर थुंकले तरीही शांतचित्ताने गोदास्नान करणारे शांतिची जलधी संत एकनाथ आणि
बुडाला औरंग्या पापी म्लेंच्छ संहार जाहला मम्हणणारे अकराशे मठांचे संस्थापक कर्मयोगी समर्थ रामदास

ह्या तिघांचे एकत्रित पणे अनुसरण आचरण करीत आहोत.

जे खळांची व्यंकटी सांडो | तया स्त्कर्मी रती वाढो | भूता परस्परे जडो | मैत्र जिवांचे || ह्या सोबतच
देवमस्तकी मस्तकी धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बुडावा की बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी || ह्याचेही आचरण करणे हाच हिंदुंधर्माचा आदर्श आहे .

आणि हो भगवंताने सांगितलेच आहे की
नेहाभिक्रमनाशोSस्ति प्रत्यवायो न विद्यते | स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ||

त्यामुळे नो टेन्शन :)

अवांतर : तुमच्यासाठी स्वतंत्र लेख लिहायल घेतला आहे , २-३ दिवसात प्रकाशित करेन :)

प्रचेतस's picture

23 Dec 2014 - 6:02 pm | प्रचेतस

१०८ आठ वेळा यवनाने अंगावर थुंकले तरीही शांतचित्ताने गोदास्नान करणारे शांतिची जलधी संत एकनाथ

यवन का म्लेंच्छ?
यवन म्हणजे ग्रीक. पूर्वीच्या 'पूर्व ग्रीस' अर्थात आयोनियातून आलेले लोक्स. यांनाच आयोनियन- यवन असे म्हणू लागले. कुप्रसिद्ध कालयवन हां ग्रीकच.

बाकी परकीय ह्या अर्थी म्लेंच्छांनाच पुढे यवन असे म्हणू लागले तरी ते कितिहिवेळा ते नाथांच्या अंगावर थुंकले तरी विचारे नाथ काय करू शकणार होते? राज्य म्लेंच्छांचेच.

hitesh's picture

23 Dec 2014 - 6:38 pm | hitesh

यवन व म्लेंच्च दोन्ही शब्द मुसलमान अर्थाने वापरले जातात.

दोन्ही उल्लेख गुरुचरीत्रत आहेत
गुरुचरित्रात चौदावा अध्याय क्रूर यवन कथा असा आहे.

नवव्या अध्यायात म्लेंच्छ राजाला पाहुन धोब्याला राजा व्हायची इच्छाहोते त्याची कथा अहे.

धन्य झालो "दात घशात घालणे "हा वाकप्रचार आहे.प्रत्यक्षात दात पाडणे नाही. चालु द्या. उद्या पदराला भरभक्कम खार लावुन येणारच आहे.

>>उद्या पदराला भरभक्कम खार लावुन येणारच आहे.

काय सांगता !!

जेपी's picture

22 Dec 2014 - 9:50 pm | जेपी

गपं राव र वशाड मेलो.
*ROFL*

इकडे जितके लाड होतात तितके तिकडे होणार नाही हे ते जाणृन आहेत त्यामुळे पाक होण्यापेक्षा प्रॉपर्टीची ग्यारंटी देणारा देश पसंत केला.

ग्रेटथिंकर's picture

23 Dec 2014 - 9:12 am | ग्रेटथिंकर

तिकडचे दहा लाख हिंदू ईकडे आल्यास, तुमी भारतीय हिंदू तुमच्या प्रॉपर्टीतून त्यांना हिस्सेदारी देणार काय? कि' मुहाजीर' सारखी नवी टूम काढणार?

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2014 - 10:34 am | टवाळ कार्टा

ते १० लाख आत्ताच्या परिस्थितीपेक्षा तरी नक्कीच चांगल्याप्रकारे रहातील

गब्रिएल's picture

23 Dec 2014 - 10:42 am | गब्रिएल

ग्रेटटिंकरसायेब, बांगलादेशातून आलेल्या करोडो घुसखोरांना घर आणि राशन कार्ड देताना तेव्हा हा प्रश्न तुम्च्या ग्रेट टिंकरिंगमद्ये का नाय ब्र येत ? :)

hitesh's picture

23 Dec 2014 - 11:06 am | hitesh

पाकिस्तान होण्यापुर्वी अखंड भारतात ४० % मुसलमान ४० % हिंदु व बाकीचे इतर असे होते.

पाकिस्तान होऊन मुसलमान गेल्याने आजच्या भारतात हिंदु ८० % झाले.

जिनानी भारतीय हिंदुंवर उपकारच केलेत ना ?

जिनानी भारतीय हिंदुंवर उपकारच केलेत ना ?
जिनांच्या उपकाराचे फळ :-
Jihadi
Jihadi
बाकी चालु ध्या...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

hitesh's picture

23 Dec 2014 - 4:08 pm | hitesh

हो. उपकारच. नैतर हे सगळे इथेच गोळ्या उडवत फिर्ले अस्ते

आझाद मैदानात काय मूक मोर्चा काढला होता का या देश भक्तांनी ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

hitesh's picture

23 Dec 2014 - 5:34 pm | hitesh

अखंड हिंदुस्तान झाला असता तर आझाद मैदान घटना झआलीच नसती.. बांग्ला देश भारताचाच भाग असता. मग घुसखोरांसाठी आंदोलन झालेच नसते.

तो गोडसे बिच्चारा फुक्कट मेला.. ४० % हिंदु ४० % मुसलमान असला अखंड हिंदुस्तान घेउन तो काय करणार होता ? आणि हे चाळीस चाळीस देखील ४७ सालचे.. म्हणजे आज हा रेशो २० : ६० असता.

hitesh's picture

23 Dec 2014 - 5:38 pm | hitesh

त्या चित्रातल्या बंदुका खर्‍या आहेत का ?

आम्ही एन सी सी त बंदुका घेउन उभा राह्यचो तेंव्हा अशेच दिसायचो.

श्री प्रगो आणी तमाम मिपाकर,
हा लेख वाचा.http://www.misalpav.com/node/22034
हे १)http://www.misalpav.com/comment/602785#comment-602785
हे २)http://www.misalpav.com/comment/602546#comment-602546
हे २)http://www.misalpav.com/comment/407710#comment-407710

पेशावरच्या धाग्यावर तुमच्या मुस्लिम मित्राला पडलेला प्रश्नाचे ऊत्तर एका हिंदु माणसाने दिले आहे.कुनाच खर मानायच
http://www.misalpav.com/comment/641132#comment-641132
भावनांना आवर ह्या वरुन सुचले हे ...

योगी,
तुमच्या गल्लीतलया मुस्लिमलोकांनी भारत पाकिस्तान मॅच मधे भारत हरल्यावर फटाके वाजवल्याचे पाहिले आहे का हो कधी ?
किंव्वा तुमच्या ओळखीतल्या कोणी हातावर "लादेन" असा टॅटु करुन घेतला आहे का हो ?
क्किंव्वा
तुमच्या रुममेटने कधी "९-११" प्रकारात तालिबानचा दोष नव्हताच तो अमेरिकेचा खोटारडेपणा आहे लादेन निर्दोष होता अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ?
किंवा तुमच्या कलीगने कधी "काश्मीर मधे भारतीय सेनाच गरीब बिचार्‍या लोकांना त्रास देते , तिथे दहशतवादी नाहीयेतच" अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ?
किंववा तुमच्या टीममॅटने कधी "चलो तुम्हारा नाम आज से अब्दुला खान करके तुम्हे कन्व्हर्ट कर देते है " असे विधान केले आहे का ?
मी पण लय जग पाहिलय योगीराव , भावना कशा आवरायच्या मला व्यवस्थित माहीत आहे , माझा प्रतिसाद भावनेच्या भरात दिलेला नसुन सारासार विचार करुनच दिलेला आहे

(निजामाने रगडल्यावरही आज मुस्लिम मित्राच्या कॅफेत बसुन ही धर्माची आग ईथे तरी लावु नका अशी विंनती करणारा)जेपी.

आपले राज्य देणार नाही , हवे तर लढुन घ्या असे म्हणणरा निजाम देशद्रोही ?

की ,

आमचे राज्य भारताला देतो पण सगळे राजवाडे , इस्टेट व शिवाय पेन्शनही हवी असे सरदार पटेलांकडुन घेणारे हिंदु ( व इतरही ) संस्थानिक देशद्रोही ?

मदनबाण's picture

23 Dec 2014 - 12:03 pm | मदनबाण

@जेपी
ट्वीन टॉवर अ‍ॅटॅक हा इनसायडर जॉब होता, या मतावर मी आज देखील ठाम आहे. रशियाने देखील स्वतःच्या देशात पुतिन नेत्रूत्वाखाली हे बॉब्स ठेवले होते...मला वाटत लोकसत्ता मधे मध्यंतरी यावर लेख देखील आला होता. { दुवा शोधुन मिळाल्यास देतो.}

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

रशियाने देखील स्वतःच्या देशात पुतिन नेत्रूत्वाखाली हे बॉब्स ठेवले होते...मला वाटत लोकसत्ता मधे मध्यंतरी यावर लेख देखील आला होता. { दुवा शोधुन मिळाल्यास देतो.}
हा तो लोकसत्ते मधला लेख :- तेलगंगेच्या दोन तीरांवर..

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

लादेन निर्दोष नक्कीच नव्हता... फक्त ट्वीन टॉवरच्या वेळी तो पपेट म्हणुन देखील कामास आला इतकेच !
अधिक इकडे :-
Let’s Not Forget Duane Andrews and SAIC
War Crimes and 9/11: Why Dick and Don Are Suspects

अमेरिका आणि शेल ऑइल रिव्होल्युशन मधे मोठा सहभाग आहे तो Halliburton कंपनीचा ज्यांचे सीइओ पद डीक चेनी ने भुशवले आहे. याच कंपनीने आपल्या देशातुन मोठ्या प्रमाणात गवार उचलेली होती. {संदर्भ :- गवारगाथा}
आता Rand Paul काय म्हणाला :-
WATCH: Rand Paul Says Dick Cheney Pushed for the Iraq War So Halliburton Would Profit
जाता जाता :- ९/११ ही फक्त अमेरिकाला युद्ध सुरु करण्यासाठी निर्माण केलेली गरज होती... त्यात लादेन हा अनेक मोहर्‍यां पैकी एक होता.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

http://www.halliburton.com/en-US/ps/solutions/unconventional-resources/s...

प्रसाद गोडबोले's picture

23 Dec 2014 - 12:39 pm | प्रसाद गोडबोले

तुमच्या गल्लीतलया मुस्लिमलोकांनी भारत पाकिस्तान मॅच मधे भारत हरल्यावर फटाके वाजवल्याचे पाहिले आहे का हो कधी ?

भारत म्यॅचमधे हरल्यावर कित्येकदा सातार्‍यात फटाके वाजले आहेत , मी स्वतः पाहिले आहे !

किंव्वा तुमच्या ओळखीतल्या कोणी हातावर "लादेन" असा टॅटु करुन घेतला आहे का हो ?

आमच्या शाळेतील एकाने च्या अमेरिकेवरील दहशतवादी घटनेनंतर हातावर लादेन असा टॅतु करुन घेतला होती शिवाय लादेनचा फॅन असल्याचे घोषित केले होते ( सदर व्यक्तीचे नाव देत नाहीये कारण तुम्ही लगेच धार्मिक आगलावतो म्हणुन बोंब ठोकाल )

तुमच्या रुममेटने कधी "९-११" प्रकारात तालिबानचा दोष नव्हताच तो अमेरिकेचा खोटारडेपणा आहे लादेन निर्दोष होता अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ?

मुंबईतील माझ्या रूम मधे रहाणार्‍या मित्राने हे विधान कैक वेळा केले आहे , धर्मयोध्दा लादेन निर्दोशच होता , तो करत होता ते धर्ममान्यच होते वगैरे विधानेही ऐकली आहेत मी !

किंवा तुमच्या कलीगने कधी "काश्मीर मधे भारतीय सेनाच गरीब बिचार्‍या लोकांना त्रास देते , तिथे दहशतवादी नाहीयेतच" अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ?

हे विधान माझ्या बँकेतील एका मित्राने केले होते , ह्यावर्षी पूर परिस्थीतीत भारतीय सैन्याचे काम पाहुन आणि फुटीरतावाद्यांचा दांभिकपणा पाहुन त्याने ते सविनय मागे घेतले ( असे तर्कनिष्ठ लोक फार विरळा आहेत )

किंववा तुमच्या टीममॅटने कधी "चलो तुम्हारा नाम आज से अब्दुला खान करके तुम्हे कन्व्हर्ट कर देते है " असे विधान केले आहे का ?

हे विधान माझ्या दोन कलीग्सने केले होते शिवाय अब्दुलाह खान असे माझे नामकरण करण्यात आले होते .

__________________________________________________________________________

जरा डोळे उघडा . धर्माची आग कोण लावतय ते नीट पहा . धागा नीट वाचला नसेल तर परत एकदा ती आझमखान ह्यांची लिन्क पहा . स्वातंत्र्य मिळुन ७० वर्ष होत आली तरी समान नागरी कायदा का लागु करता येत नाहीये , त्याला मुख्य विरोध कोणाचा आहे ह्यावर जरा चिंतन करा जमले तर.
इतिहासातुन काहीतरी शिका राव.
____________________________________________________________________________

असो. तुमच्याशी चर्चा करुन काही उपयोग नाही. विचारांची लढाई विचारांनी करावी इतके सौजन्य तुमच्या कडे नाही आणि जे डोळ्यासमोर स्पष्ट दिसते ते स्विकारायची मानसिकता नाही .

काळच तुम्हासारख्या डोळेझाक करणार्‍यांना धडा शिकवेल :)

ॐ शांति: शांति: शांति:

लेखनसीमा________________________________________________________________________

hitesh's picture

23 Dec 2014 - 4:12 pm | hitesh

समान नागरी काय्दा म्हणजे काय ?

त्यानी एकच बायको करायची असा कायदा आणायचा?

की,

आपणही चार बायका करायच्या?

काळा पहाड's picture

23 Dec 2014 - 4:33 pm | काळा पहाड

चार करायला हरकत नाही, त्यांना सांभाळण्यासाठी अंबानीला मिळणारा पगार कुठून आणायचा?

hitesh's picture

23 Dec 2014 - 4:51 pm | hitesh

दरवर्षी एक्जण प्रेग्नंट होईल. उरलेल्या तीन व नवरा मिळुन मिळवतील.

दरवर्षी एक्जण प्रेग्नंट होईल. उरलेल्या तीन व नवरा मिळुन मिळवतील.
आ सु कहेछे हितेस भाय... तमो तो इन्स्परेश लेवानु ! आ व्हिडीयो जोएने मने बताव हं

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Russia to bail out Trust Bank with up to $530 million
Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender
Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year
China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

काळा पहाड's picture

23 Dec 2014 - 5:35 pm | काळा पहाड

ह्म्म्म्म.. आता बाकिच्या तीन शोधणं आलं.

hitesh's picture

23 Dec 2014 - 10:53 pm | hitesh

आमचासाठीही शोधा

टायपो हा प्रश्न आहे.
तुमच्या रुममेटने कधी "९-११" प्रकारात तालिबानचा दोष नव्हताच तो अमेरिकेचा खोटारडेपणा आहे लादेन निर्दोष होता अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ?

hitesh's picture

24 Dec 2014 - 3:48 am | hitesh

धागा बन्द झाला. कोणी अडवले ?