चीनच्या प्रमूखांना वजन कमी करण्याचा सल्ला !

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
21 Dec 2014 - 5:03 pm

शाळांमध्ये निबंध लेखना प्रमाणेच पत्र लेखन आपल्याकडे विद्यार्थ्यांकंडून करून घेतले जाते तसे ते चीन मध्येही करून घेतले जाते. असेच पत्र लेखन Niu Ziru, नामक Zhengzhou येथील चौथी इयत्तेत शिकणार्‍या मुलाने चीनचे सध्याचे सर्वेसर्वा "षी चिन्पिंग" (Xi Jinping) यांना उद्देशून केले. सर्वसामान्य शालेय विद्यार्थी लिहिल तसेच ते पत्र आहे. त्यात "षी चिन्पिंग" यांना उद्देशून मंगळावर उतरण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याचे आवाहन आहे. पण हे पत्र वृत्त माध्यमांच्या चर्चेत वेगळ्याच कारणाने आले. बाळ Niu Ziru ने आपल्या उर्वरीत पत्रात चीनी प्रमूखांना तुम्ही जरा चबी दिसता. बराक ओबामा एवढे फिट नसले तरी किमान रशीयन अध्यक्ष पुतीन सारखे दिसण्याएवढे तरी वजन कमी करावयास हवे असा व्यक्तीगत सल्ला पत्रातून दिला. त्याच्या पित्याला त्याची गंमत वाटली म्हणून त्याने ते आंतरजालावर टाकले.

चीनची आंतरराष्ट्रीय ताकद आणि प्रतिष्ठा वाढत असताना चीनच्या प्रमुखांना त्यांच्याच देशाचा विद्यार्थी वजन कमी करण्याचा सल्ला देतो म्हणजे काय ? ) सहाजीक चिनी आंतरजालावर त्यावर विनोद होऊ लागले म्हणून चीन सरकारच्या आंतरजाल सेंसॉरने ते पत्र आणि संबंधीत वृत्ते चीनच्या आंतरजालावरून काढून टाकून प्रतिबंधीत केली. आंतरजाल आणि माध्यमे सेंसॉर करता येतात पण लोकांमध्ये एकदा पोहोचलेली गोष्ट लोकांमध्ये चर्चीत झाल्या शिवाय राहील का ?

संदर्भ

चीनचे प्रमूख "षी चिन्पिंग" सौजन्य विकिमीडिया कॉमन्स
chinche pramukh

विनोदमौजमजाबातमीविरंगुळा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

21 Dec 2014 - 5:36 pm | तुषार काळभोर

"अकरावे" जिनपिंग??

माहितगार's picture

21 Dec 2014 - 6:39 pm | माहितगार

होय !

माहितगार's picture

21 Dec 2014 - 7:20 pm | माहितगार
श्रीगुरुजी's picture

21 Dec 2014 - 8:47 pm | श्रीगुरुजी

असाच सल्ला महाराष्ट्रातील आणि देशातील राजकारण्यांना एखाद्या मुलाने/मुलीने दिला तर काय हाहा:कार उडेल याची कल्पनाच करवत नाही. लगेचच त्या मुलाला/मुलीला व कुटुंबियांना आत टाकले जाईल.

श्रीगुरुजी(डुप्लीकेट) मस्त सल्ला,
सध्याच्या सरकारी पोर्टलवर जावा शेबंड पोरग पण सल्ला देतो.आणी मोदीपण आयकुन घेतो.

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2014 - 12:30 pm | श्रीगुरुजी

>>> श्रीगुरुजी(डुप्लीकेट)

????

यमगर्निकर's picture

22 Dec 2014 - 6:54 pm | यमगर्निकर

माझे हि वजन वाधले आहक? काय करु समजतच नहि..

माहितगार's picture

22 Dec 2014 - 10:57 pm | माहितगार

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत लगे रहो हा.का.ना.का. =))

रमेश आठवले's picture

24 Dec 2014 - 2:02 am | रमेश आठवले

चीनी कम केल्याने वजन कमी होते.