कथा bigger cypher ची

येडाफुफाटा's picture
येडाफुफाटा in जनातलं, मनातलं
21 Dec 2014 - 5:16 am

एक विचार-
लहान शून्य म्हणून जन्मलो, आणि मोठं शून्य म्हणून संपतोय हे श्रेयही मला जगण्याच्या तृप्तीसाठी पुरे आहे!
यावरुन a bigger cypher हा याच अर्थाचा धडा आठवला.
म्हणजे आयुष्याच्या गणिताच्या अखेर उत्तर शून्य येणार असलं तरी ते तसं आहे हे कळायला गणित तर करायलाच हवं हा न्याय जगण्याला लावणारे!
bill अन् melinda gates , warren buffet , Rockfellar किंवा tata वगैरें आयुष्यभर पैसे कमावतात. व नंतर तो स्वहस्ते donate करतात. म्हणजे आयुष्यात आधी कोणत्याही भल्या/बुर्या(रॉबिनहूड,आल्फ्रेड नोबेल वगैरें) मार्गाने पैसे मिळवावे व उतारवयात स्वतःच्याच हस्ते(credit घेउन) खर्च करावे. असे धोरण समाजात मान्य दिसते. म्हणजे मी आता घरदार सोडून निघिलो तर "सडाफटींग कडे काहीच नव्हते म्हणून निघाला" असे म्हणतात. बरं उतारवयात पैसे घेउन आलात तर "आता कशाला आला मरताना" असे म्हणतात. बाकी राजकारणी सुद्धा आपापले गोल pursuit करत असावेत. आपण म्हणतो तमक्याने एवढा पैसा खाल्ला वगैरें. पण पैसा कोणी खात नसतं. एक गाडी ,अनेक गाड्या, बंगले वगैरें घेउन कोणी चाटत नसतं. प्रतिष्ठा,मान,लोकांवर टाकता येणारा दबाव,पुढचै पद मिळवण्यासाठी लागणारी साधनं म्हणून याचा वापर होत असतो.जनता पण नेत्याने तरुणवयात केलेल्या कामाला विसरते.
अनेक निर्माते,अभिनेते वगैरें खस्ता खाउन मोठे होतात अन् आपण त्यांच्या मार्गावर जावे ही त्यांची इच्छा असते. तद्वतच आपल्या आई-वडीलांची इच्छा असणारच की 'कष्ट' करुन कमावलेला पैसे याचे कसलेही ईप्सित मिळवायला का द्यावा? याच्या उलट काहीजण आम्हाला जे मिळाले नाही ते मुलाला मिळावे असे म्हणत आपापल्या मुलांना नाही ते लाड पुरवतात. मग बाहेर काहीही करावे लागले तरी बेहत्तर. म्हणजे प्रत्येक वस्तु वगैरें माझी प्रॉपर्टी असा विचार करत जगतात. समाजसुधारक पण अशाच विचाराने प्रेरित होत असतील. मग या मार्गात अनेक हितसंबंध दुर्लक्षित करावे लागतील. यात काही जण कुटुंब/नातेवाईक इत्यादीना काहीच महत्त्व देत नाहीत तर काही जण तेवढ्यासाठीच जगतात.
मग प्रत्येक पक्ष नेतृत्व आपापल्या कार्यकर्त्यांच्या सोयीचे बघते तर त्याला स्वार्थी जीवन जगणे म्हणता येईल काय?

मांडणीसमाजराहणीप्रकटनविचारप्रतिसादअनुभवमतप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

जेपी's picture

21 Dec 2014 - 5:24 am | जेपी

फालतु जिल्बी.

माझे नेटचे पयशे वाया गेले.
हम्म आज आमावश्या आहे.तरीच येडाफुफाटा सुटलाय.

मुक्त विहारि's picture

21 Dec 2014 - 5:44 am | मुक्त विहारि

जिल्बी पण पडली सुसाट...

समाजकारणासाठी राजकारण करणे आणि राजकारणासाठी समाजकारण करणे यामध्ये तसे म्हणले तर काहीच फरक नाही. दोन्हीमध्ये राजकारण आणि समाजकारण दोन्ही केले जाते. मग एक चांगले आणि एक वाईट का?

तुमच्या प्रश्नाचे उत्तर यात आहे.