ये लाल रंग , कब मुझे छोडेगा ?

Maheshswami's picture
Maheshswami in जनातलं, मनातलं
19 Dec 2014 - 7:55 pm

पहाटेच्या त्या शांत वातावरणात , फारशी वाहतूक , वर्दळ नसलेल्या , पावसानी न्हावून निघालेल्या चकाकत्या रस्त्यावरून त्याची मोटारसायकल भन्नाट वेगात धावत होती . "मुंबई एकदम वेगळी दिसते न पहाटेच्या वेळी . फार कमी वेळी मुंबई ला दिवसातल्या ह्या वेळेस बघायचा योग येतो. दिवसभराच्या दगदगीनंतर कशी शांत, समाधानी दिसते. " तो विचार करत होता . मोबाईल ची रिंग वाजायला लागली , संतोष चा असावा फोन . आजीबात उशीर चालत नाही त्याला कुठेच . फोन न उचलता तशीच गाडी दामटत तो रेल्वे स्टेशन मध्ये घुसला . घाई घाईत, दिवसभराच्या पार्किंगचे पन्नास रुपये पार्किंग वाल्याच्या हातात कोंबत तो प्लाटफॉर्म कडे पळत सुटला . ग्रुप मधले सगळे मेम्बर्स आधीच पोचले होते.त्यांनी शिव्या द्यायला सुरु करण्याआधीच माफी मागत तो त्यांना सामील झाला . गप्पा गोष्टी, विनोद यांना उधाण आले होते. बऱ्याच दिवसांनी ग्रुप एकत्र जमला होता . प्रसंगच तसा होता . अक्षराचे लग्न होते आज पुण्याला . अक्षरा ग्रुप मधलीच एक . सगळ्यात पहिले लग्न होते ग्रुप मधल्या कुणाचे तरी . फ्रांस मध्ये काम करणारा एक देखणा मुलगा निवडला होता तिने . भारी एक्साईटमेंट होती प्रत्येकाला .

"हाय गाईज , वोटस अप ?" असा एक मंजुळ निनाद किणानला. "ती", उभी होती मागे. परवाच परदेशातून परत आली होती वाटतं . ती पण येणार होती अक्षर च्या लग्नाला त्यांच्यासोबत . ग्रुप मधल्या सगळ्यांच्या तोंडातून आनंदाचे चित्कार उमटले . सगळ्यांनी तिच्याभोवती गलका केला . "कशी आहेस, सो गुड टू सी यु , काय म्हणतेय स्वित्झर्लंड ?" धाड धाड प्रश्नांच्या फैरी झडल्या तिच्यावर . त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तो मात्र थोडं मागेच थांबला . नुसतं निरीक्षण करत होता तिचे . लालचुटुक रंगाचा तो ड्रेस , त्यावर खुलणारी ती चंदेरी किनाऱ्याची ओढणी . चेहऱ्याशी चाळा करणारे तिचे कुरळे केस . हल्कासा मेकअप . मंद दरवळणारे तिचे इम्पोर्टेड परफ्युम . "बदललीस गं अगदी तू . कसली छान दिसायला लागलीस . " कुणीतरी म्हणाले तिला . "खरंय "
तो मनाशी विचार करू लागला - "आधीपासूनच हि अशी जीवघेणी सुंदर , आणि त्यात परदेशातलं हवामान मानवलंय हिला खरं . अजूनही जास्त आकर्षक दिसतेय ही ". मित्रांशी बोलता बोलता तिची नजर त्याच्या नजरेला भिडली , उधारीचं हसू चेहऱ्यावर आणत तिने त्याला "हाय!" केलं . त्यानेही चेहऱ्यावरची रेष हि हलु न देता मान हलवली.

तेवढ्यात ट्रेन आली . "चला लवकर , नाहीतर अक्षराच्या मुलाच्या बारशाला पोचू अजून उशीर झाला तर!" असे पांचट विनोद वगैरे करत सगळेजण गाडीत चढले . ट्रेनमध्ये मुद्दामहूनच तो जेणेकरून ती दिसणार नाही अशा एका सीट वर बसला. गप्पाटप्पांना ओघ आला होता . तो मात्र आज अलिप्त होता . अजिबात मजा येत नव्हती. त्याचे ठेवणीतले sarcastic विनोद आज आटून गेले होते . सिगारेटचे झुरके घेत ट्रेन च्या दाराशी बराच वेळ बसून राहिला. तिच्यासोबत बसून तिच्याकडे दुर्लक्ष करणे त्याला जमणार नव्हते . एकदम ऑक्वर्ड झाले असते. म्हणून उगीच झोपायचा वगैरे बहाणा करत थोडा दूरच बसून राहिला .

एकदाच पुणे आलं . स्टेशन जवळचं मंगल कार्यालय होतं . वेळेवर पोचले सगळे . अक्षता पाच मिनिटात पडणार होत्या . बाकी अक्षरा अगदी अप्सरेसारखी दिसत होती नवरीच्या पोशाखात . थोडं स्थिरस्थावर झाल्यावर ते सगळे स्टेज वर अक्षरा आणि तिच्या नवऱ्याला शुभेच्छा द्यायला गेले. अक्षराने थोड्या वेळानी एकदम त्याचा आणि तिचा हात पकडला आणि लटक्या रागाने म्हणाली "आता अजून किती दिवस वाट बघणार आहात ? करिअर होतच असते. आता वाजवून टाका बार तुमचा पण . मला खूप मिरवायचं आहे तुमच्या लग्नात ". बहुतेक, गेल्या एक वर्षात काय काय घडलं त्याची कल्पना नसावी अक्षराला . तो आणि ती , दोघेही क्षणभर स्तब्ध झाली . कुणीतरी बोलावतंय असा बहाणा करून हात सोडवत तो तिथून निघून गेल. तिनेही तेच केलं असावं .

जेवणं वगैरे आटपल्यावर , सगळा ग्रुप अक्षरासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी करायला बाहेर पडला. खरेदी वगैरेसारख्या गोष्टींमध्ये त्याला फारसा इन्टरेस्ट नसल्यामुळे त्याने टाळले व तिथेच बसून राहिला. एका खुर्चीवर शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. तेवढ्यात खांद्यावर एक थाप पडली . ओळखीचा स्पर्श जाणवला म्हणून मागे वळून पाहिले त्याने. "का रे , अगदीच बोलायचं नाही असं ठरवलंय कि काय ? एवढी अनोळखी झाले का मी ?" ती म्हणाली . क्षणभर सुन्न झाला तो . खोटं हसून म्हणाला, "नाही गं , तसं आजिबात नाही . जरा डोकं दुखतंय म्हणून शांत आहे". "मी ओळखते तुला चांगलं . प्लीज खोटं बोलू नकोस" ती म्हणाली . "बरेच दिवस झाले ना बोलून , कशी आहेस तू". "अगदी मजेत आहे रे मी. ". "बाकी एकदम वेगळी दिसायला लागलीय हं तू ". "सुंदर म्हणायचय का तुला?" असं म्हणून ती नेहमीप्रमाणं जीवघेणं हसली. "बाकी तुझी नौकरी कशी सुरु आहे. काम कसे आहे ?" अशा बघता बघता गप्पा सुरु झाल्या . ५ मिनिटात सगळा अवघडलेपणा गळून पडला . खूप गप्पा मारल्या त्यांनी . किती बोलू नि किती नाही असं झालं होतं दोघांनाही. एक तो अप्रिय प्रसंग (ब्रेकअप) चा सोडला तर बाकी सगळ्या गोष्टीवर गप्पा झाल्या . मन हलकं झाल्यासारखं वाटले त्याला . खंगून वाळणाऱ्या झाडाला नवी पालवी फुटावी तसं वाटू लागलं अचानक . तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला . फोन झाल्यावर ती म्हणाली "बाबांची कार सर्विसिंग ला दिलीय आज , म्हणतायत कि, रात्री बस नि जाऊ स्टेशन वरून घरी ". तो म्हणाला "कशाला, मी सोडीन तुला घरी . सांग त्यांना तसदी घेऊ नका म्हणून ". "ओके " ती म्हणाली .

परतीच्या प्रवासात दोघं सोबत बसली . बऱ्याच अजून गप्पा मारल्या. परत सगळे आधीसारखे वाटत होते त्याला. त्याच अवघड क्षणात कमजोर पडला तो. म्हणाला "आपण पूर्वीसारखं नाही होवू शकणार ? सगळं विसरून". डोळ्यात पाणी तरळले तिच्या एकदम . "नाही रे , सॉरी . पण I have moved on . तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी . पण तुझ्या शेवटच्या फोन वर आपली जी भांडणं झाली त्यात खूप काही बोलून गेलो रे आपण एकमेकांना . खूप खोलवर जखमा झाल्या आहेत मनाला . मला नाही सहन होणार आता परत काही तसे झाले तर . मी माझ्या जीवनात खुश आहे आणि तू तुझ्या . काही तक्रारी नाहीयेत जीवनाकडून आता". बरोबर होतं तिचं . पण क्षणात ह्रदयाला भगदाड पडले त्याच्या . मन पिळवटून निघाले . खूप राग आला स्वतःचा . का आपण विचारले तिला . का स्वतः च्या स्वाभिमानाशी विश्वासघात केला? विषादाने तो तिला म्हणाला " हाहा , तू काय सिरियस झालीस काय, अगं मी मजा करत होतो . मी पण प्रेम वगैरे गोष्टींपासून चार हात लांबच राहायचं ठरवलंय". ती काहीच बोलली नाही . मात्र , त्या क्षणापासून सगळे अवघडल्यासारखे होवून बसले. संभाषण तिथेच खुंटले .

मुंबईला पोचायला रात्रीचे १० वाजले . पावसाची रिप रिप सुरूच होती. सगळ्या ग्रुप चे निरोप घेऊन झाल्यावर त्याने पार्किंग मधून गाडी काढली आणि तिला म्हणाला "बस ". तिच्या घराकडे प्रवास सुरु झाला मोटार सायकल वर. किती वेळा हा सीन आधी रिपीट झाला होता . कॉलेज संपलं कि रोज तिला घरी सोडायचा तो. आज मात्र सगळं वेगळं होतं . रात्रीचं शांत वातावरण . दोघंही अबोल होती . सकाळचा अवघडलेपणा पुन्हा डोकं काढून वर आला होता . नेहमीप्रमाणे ती त्याला बिलगून बसली नव्हती , तिचे केस त्याच्या मानेला गुदगुल्या करत नव्हते , तो मोठमोठ्यांनी जोक्स सांगत नव्हता आणि ती खदखदून हसत नव्हती . पावसांत भिजून चिंब झाले होते दोघेहि.

शेवटी एकदाचे तिचे घर आले. खाली उतरून ती म्हणाली "Thanks . निघते आता मी . बघ जमलं तर अधून मधून फोन करत जा ". तो उगाच हो म्हणाला . एक बॉक्स काढून तिने त्याच्या हातात ठेवला . "हे तुझ्यासाठी, माझ्या आवडीचे कफलिंक्स. " त्याने काही न बोलता ते आपल्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्याच्या खिशात ठेवले. ती पाठमोरी झाली आणि चालायला लागली . ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच थांबून राहिला . गाडीला कीक मारून परत निघाला . पावसाने चांगलाच जोर पकडला होता आता . जाता जाता रस्त्यात एक बार उघडा दिसला . दारू न पिण्याचा निर्धार विसरून तो बार मध्ये जावून बसला . व्हिस्की चे दोन नीट पेग रिचवले . आणि बाहेर टपरी वर येवून सिगरेटचा कश मारायला लागला . तिच्या आठवणी राहून न राहून लाटांसारख्या त्याच्या मनाच्या किनाऱ्यावर धडकत होत्या . मधमाशांचे मोहोळ उठावे तशा त्याला डसत होत्या . फार एकटे वाटायला लागले त्याला एकदम . टपरीवरच्या रेडियो वर किशोर गुणगुणायला लागला . " हम बेवफा हर्गीझ न थे , पर हम वफा कर न सके… ". आता मात्र त्याला बांध अनावर झाला . घळाघळा अश्रू वाहायला लागले. पानवाल्याच्या "अरे क्या हुवा साहब . . . सब ठीक तो है ?" कडे दुर्लक्ष करून गाडीवर सवार होऊन निघाला . बास , आता तिला विसरूनच जायचे असा निर्धार केला स्वतःशी . गाडी मुद्दामहूनच कॉलेज जवळून घेतली . त्या कट्ट्याजवळ येउन थांबला . इथेच तासंतास बसून पावसाची रिमझिम उपभोगली होती दोघांनी कधी काळी. कफलिंक्स काढून ठेवले कट्ट्यावर आणि सुसाट घरी निघाला .

घरी पोचून रेडियो ऑन केला . आणि कच्चं भिजलेला कुर्ता काढला . पांढरा शुभ्र कुर्ता त्याचा मागून पूर्ण लालभडक झाला होता . तिचा तो लालचुटुक ड्रेस पावसात भिजून त्याच्या कुर्त्यावर आपली छाप सोडून गेला होता. तगमगत उठला तो . भरभरा बकेट मध्ये पाणी काढले , न मोजताच ४-५ चमचे सर्फ टाकलं आणि जीवाच्या आकांतानं डाग धुवून काढायाचा प्रयत्न करू लागला . पण रंग पक्का बेरकी , जायलाच तयार नाही . अस्वस्थ झाला तो , आता घासून घासून , कुर्ता फाटायचाच बाकी राहिला होता . रंग काही निघायला तयार नव्हता . अगदी तिच्या आठवणीसारखाच… शेवटी कंटाळून, दमून , भागून मुळकुटं करून झोपून गेला बिचारा . रेडियो तसाच सुरु होता . लता आपल्या जादुई आवाजात गातच होती….

"तेरे बीना जिंदगी से कोई ,शिक्वा , तो नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं .
तेरे बीना जिंदगी भी लेकिन , जिंदगी, तो नही, जिंदगी नही , जिंदगी नही, जिंदगी नही"

कथाअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Dec 2014 - 8:03 pm | कंजूस

मस्त !

बाबा पाटील's picture

19 Dec 2014 - 8:31 pm | बाबा पाटील

कशाला धपल्या काढतोस बे

प्रश्न तुझा आनी उत्तर हि तुझेच - "ए बाबा काही काम नाही का..."

मस्तचं लिहिलं आहे. शिर्षक पण एकदम परफेक्ट.

लेखनप्रकार:
अनुभव

???

Maheshswami's picture

19 Dec 2014 - 9:09 pm | Maheshswami

;)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Dec 2014 - 10:18 pm | अत्रुप्त आत्मा

:)

vikramaditya's picture

19 Dec 2014 - 10:25 pm | vikramaditya

आवडेश...

प्यारे१'s picture

19 Dec 2014 - 11:33 pm | प्यारे१

>>> तिचा तो लालचुटुक ड्रेस पावसात भिजून त्याच्या कुर्त्यावर आपली छाप सोडून गेला होता.

जागो ग्राहक जागो!
असं रंग जाणारं कापड वापरु नका. रंग जात असल्यास दुकानदाराच्याच तोंडावर 'होली'चा मुहूर्त साधून मारा ;)
___________________________________

लेख छान जमला आहे.

काय यार! तुम्ही पण असं लीहीता ना.....

स्पंदना's picture

20 Dec 2014 - 1:19 pm | स्पंदना

असच म्हणेन.
काय लिहेता हो!!

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 12:49 am | मुक्त विहारि

सुरेख....

आनन्दिता's picture

20 Dec 2014 - 3:58 am | आनन्दिता

:(

साती's picture

20 Dec 2014 - 12:42 pm | साती

मस्तच लिहिलय.

पैसा's picture

20 Dec 2014 - 12:46 pm | पैसा

खूपच सुंदर कथा!

विनोद१८'s picture

20 Dec 2014 - 1:02 pm | विनोद१८

:pardon:

अनुप ढेरे's picture

20 Dec 2014 - 3:33 pm | अनुप ढेरे

मस्तं!

अजया's picture

20 Dec 2014 - 4:47 pm | अजया

हम्म! छान आहे कथा.

विवेकपटाईत's picture

20 Dec 2014 - 6:14 pm | विवेकपटाईत

मस्त, आवडलं

किसन शिंदे's picture

20 Dec 2014 - 6:16 pm | किसन शिंदे

आवडली कथा

माझीही शॅम्पेन's picture

20 Dec 2014 - 9:37 pm | माझीही शॅम्पेन

छान चांगल लिहिलाय ... किप इट अप

स्वप्नज's picture

21 Dec 2014 - 8:31 am | स्वप्नज

आवडलं.

भिंगरी's picture

21 Dec 2014 - 12:34 pm | भिंगरी

भावनांचे अचूक वर्णन करणारी कथा.

कपिलमुनी's picture

22 Dec 2014 - 2:07 pm | कपिलमुनी

एकंदरीत माझ्या आजुबाजूचे मित्रांचे , मैत्रीणींचे अनुभव बघ्ता , ब्रेक अप नंतर मुली फार लौकर मूव्ह- ऑन होतात .
कदाचित परीस्थितीशी लौकर जुळवून घेण्याचे क्षमता किंवा नाइलाज .
पण लौकर पुढे जातात , त्या क्षणाशी रेंगाळत बसत नाहीत.. कदाचित लग्नानंतर मिळालेले नवीन वातावरण , सहचर्य यामुळे असे होत असावे

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 2:20 pm | प्रसाद गोडबोले

खुप सुंदर कथा :)

लिहित रहा रे मित्रा .

बाकी ब्रेकपचे क्षण कित्येकदा मुलांच्याच नजरेतुन पाहिलेत , कित्यएकांना रडतानाही पाहिले आहे ते "तुटले" गाणे ऐकताना , कित्येकांबरोबर दारु शेयर केले आहे , अन कित्येकांना "ये नही तो और सही " असला तद्दन पोकळअनफालतु सल्लाही दिला आहे...

मुलींची रीअ‍ॅक्शन काय असते अशा प्रसंगांवर देव जाणे . ( अनाहितावर चौकशी केली पाहिजे ;) )

ब्रेकप झालेल्या एकाच मुलीची प्रतिक्रिया आजवर पाहण्यात आली आहे , ती त्याच्या लग्नात सुंदर नटुन थटुन आली होती की जसे काहीच झाले नाही , पण रडलेल्या डोळ्यांना मात्र मेकपने लपवता आले नव्हते तिला !!

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 2:49 pm | टवाळ कार्टा

"ये नही तो और सही " असला तद्दन पोकळअनफालतु सल्लाही

हा पोकळ सल्ला नाही हा भौ...काही जणांना सावरायला तो बराच उपयोगी पडतो

पैसा's picture

22 Dec 2014 - 3:00 pm | पैसा

पण रडलेल्या डोळ्यांना मात्र मेकपने लपवता आले नव्हते तिला

तूच उत्तर दिलंस की रे! मुलगे बरेचदा दारू बिरू पिऊन मित्रांच्या गळ्यात पडून रडतात आणि आणि दु:ख कोणाशी तरी बोलून मोकळे होतात. मुलींना "गप बस, बाहेर कुठे कळलं तर तुझं लग्न कसं जमायचं" याचं खूपदा घरातून प्रेशर असतं. मग त्या मैत्रिणींसोबतही असली दु:ख क्वचितच शेअर करतात आणि मुकाट्याने घरचे बघून देतील त्या मुलाशी लग्न करून संसाराला लागतात. काहीजणी संसारात रमत असतील, तर काहीजणी वरकरणी आनंदात तर मनात झुरत राहून स्वतःची, नवर्‍याची फसवणूक करत रहातात. सरसकट असंच होतं असं नव्हे, पण असे प्रकारही होतात.

कपिलमुनी's picture

22 Dec 2014 - 3:06 pm | कपिलमुनी

काहीजणी संसारात रमत असतील, तर काहीजणी वरकरणी आनंदात तर मनात झुरत राहून स्वतःची, नवर्‍याची फसवणूक करत रहातात. सरसकट असंच होतं असं नव्हे, पण असे प्रकारही होतात.

मूव्ह ऑन होण चांगला आहेच आणि अपरीहार्य आहे !
फक्त मुली लौकर सावरतात असा एकंदरीत अनुभव आहे .

स्वीत स्वाति's picture

22 Dec 2014 - 3:10 pm | स्वीत स्वाति

खरे आहे.

पिंपातला उंदीर's picture

22 Dec 2014 - 3:17 pm | पिंपातला उंदीर

नॉर्मली स्त्रिया मानसिकदृष्ट्या जास्त कणखर आहेत असा माझा तरी अनुभव आहे . सगळी दुख , अपेक्षा भंग मनात दाबून ठेवण आणि तरी पण move on करण याला सिंहाच काळीज लागत . बाकी स्वामी साहेब तुमच लेखन लई जबरी

वेल्लाभट's picture

22 Dec 2014 - 3:29 pm | वेल्लाभट

कमाल !

मदनबाण's picture

22 Dec 2014 - 3:31 pm | मदनबाण

जबरदस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops?
Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

Maheshswami's picture

23 Dec 2014 - 5:52 pm | Maheshswami

मनापासून धन्यवाद !!!